इतिहासताज्या बातम्या

शिवाजी महाराजांचे अखेरचे स्वप्न काय होते?

शिवाजी महाराज संपूर्ण भारतीयांचे दैवत आहे. ते कोणत्याही एका जातीचे वा धर्माचे दैवत नाही. ज्याला ज्याला वाटेल त्याने शिवचरित्राचा आदर्श घ्यावा. पण शिवरायांचे शेवटचे स्वप्न काय होते? जे आजही पूर्ण झाले नाही.

ह्या बद्दल आपण कधी विचार केला आहे का? महाराजांचे ते स्वप्न जाणून घेण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे तो काळ मुसलमानी आक्रमकांचा होता. हिंदू धर्म जवळपास संपलाच होता. तेव्हा शिवरायांचे हे स्वप्न होते. कालानुरूप असलेले ते स्वप्न काय होते ते जाणून घेऊ आजच्या लेखात.

शिवाजी महाराजांनी मोठा पराक्रम केला. आपल्या कर्तृत्वावर स्वराज्य निर्माण केले. हे स्वराज्य अवघियांचे अवघियांनी ते रक्षावे, असे शिवरायांचे शब्द होते. पण चारही बाजूने मुसलमानी आक्रमकांनी हिंदूंची मंदिरे फोडली होती. केवळ कोणी हिंदू आहे म्हणून त्याला छळणे हे कितपत योग्य होते? म्हणूनच राजांनी स्वराज्य निर्माण केले.

असे असले तरी त्यांनी हिंदू मुस्लिम भेद न करता राज्य केले. केवळ हिंदूंना होणाऱ्या त्रासातून त्यांची मुक्तता शिवरायांनी केली. ह्यालाच अनुसरून राजांनी एक स्वप्न पाहिले. ३ एप्रिलला राजांनी देह ठेवला तेव्हा त्यांनी आपल्या विश्वासातील लोकांना हे स्वप्न सांगितले. राजे म्हणाले सप्त सिंधू, सप्त नद्या मुक्त करा. काशीचा विश्वेश्वर सोडवा. तुम्ही चुकुर होऊ नका.

आता ह्यातील पाहिले स्वप्न होते सप्त सिंधू नद्यांना मुक्त करणे. सिंधू नदी आज देखील पाकिस्तानात आहे. ‘सिंध विना हिंद भूमी अपुरी आहे,’ हे महाराजांनी जाणले होते. तसेच औरंगजेबाने काशीचे मंदिर पाडले होते. म्हणून ह्या विश्वेश्वराला मुक्त करण्यास शिवराय सांगत आहेत.

शिवाजी महाराजांचे हे स्वप्न अनेकांना कळत नाही म्हणूनच वाद होतात. हिंदुत्ववादी लोक ह्या स्वप्नाला आदर्श मानत राजांना एका धर्मपुरते मर्यादित ठेवतात तर डाव्या विचारसरणीचे लोक ह्या गोष्टी खोट्या मानतात. जरी बखरी संपूर्णतः विश्वासार्ह नसल्या तरी राजांनी जे कार्य केले ते त्या काळातील हिंदूंना संकटातून मुक्त करण्यासाठी केले.

त्या मागे आजच्या राजकारणी लोकांसारखा हिंदू मतपेटीचा विचार राजांनी केला नाही. केवळ जो संकटात आहे त्याला बाहेर काढले. शिवराय जेव्हा आग्र्यातून सुटले तेव्हा औरंगजेबाची नाचक्की झाली. त्या रागात त्याने काशीचे मंदिर पाडले.

पुढे तो महाराष्ट्रात आला तेव्हा त्याने वाटेतील मंदिरं पाडली. ह्याला धर्मांधता म्हणतात. शिवरायांनी केले त्याला न्याय म्हणतात. कारण राजांनी जिथे पूर्वी मंदिरं होती तिथे नव्याने निर्माण झालेल्या मस्जिदी पडल्या. ज्या मस्जिदी पूर्वीपासून होत्या त्यांना राजांनी हात लावलेला नाही.

शिवाजी महाराजांनी भिवंडी जवळील मस्जिदी पाडल्या कारण तिथे पुर्वी मंदीरं होती. हे खुद्द परमानंद शिवभारत ह्या ग्रंथात लिहितो. हा ग्रंथ शिवकाळातला आहे, शिवाय महाराजांच्या आज्ञेप्रमाणे लिहिला आहे.

त्यामुळे महाराजांनी मस्जिदी पाडल्याच नाहीत असे नाही, पण मूळ तत्व एकच की पूर्वी ज्या जागी मंदिर होते अशा जागी उभारलेल्या मस्जिदी पाडायच्या, इतर नाही. मुसलमानांच्या किंबहुना कोणाच्याच धर्माला राजांचा विरोध नव्हता.

त्या काळातील परिस्थिती बघता कवी भूषण म्हणतो, काशी की कला जाती, मथुरा की मस्जिद बनती अगर शिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी अर्थात राजे नसते तर काशी, मथुरा वाचल्या नसत्या आणि सर्वांची सुंथा झाली असती.

शिवाजी महाराजांनी इतरांच्या धर्माचा आदर केलाच पण हिंदू धर्मातील लोकांना कोणी हिंदू म्हणून त्रास देत असेल तर त्याला सोडले नाही. धर्मांतरे करणाऱ्या पाद्री लोकांची मुंडकी शिवरायांनी छाटली. हा पूर्ण न्याय होता. आज देखील बाबरी मस्जिद पाडून तिथे राम मंदिर उभे राहते आहे.

ह्यात सर्वोच्च न्यायालयाने हिंदूंची बाजू घेतली असे म्हणणे चुकीचे ठरेल, न्यायालयाने केवळ पूर्वी मंदिर होते म्हणून न्याय केला हेच शिवरायांच्या दृष्टीने पाहता योग्य आहे. त्यामुळे राजांच्या स्वप्नांचा चुकीचा अर्थ न घेता केवळ त्या काळातील परिस्थिती समजून हे स्वप्न पूर्ण करावे.

सिंधू पुन्हा भारतात आली पाहिजे आणि राहता राहिला प्रश्न काशीच्या विश्वेश्वराचा तर तो मुक्त झालाच आहे. हे स्वप्न समजून घेताना ध्यानी ठेवले पाहिजे की आपणही इतर धर्माच्या अखत्यारीत असणाऱ्या जागांवर ताबा मिळवला तर ते राजांना आवडणार नाही.

म्हणूनच हे स्वप्न खोटे ठरवत हिंदूंना अधिकारापासून वंचित ठेवणे जसे चुकीचे आहे तसेच हे स्वप्न सांगत आपले विचार थोपवणे देखील चुकीचे आहे. ह्या स्वप्नांचा खरा मर्म संपूर्ण शिवचरित्र समजल्यावर कळतो. म्हणून धर्मांध न होता न्यायचा विचार करावा. आपण या विचारांशी सहमत आहात ना! आपलं मत आम्हाला नक्की कमेंट करून सांगा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button