ताज्या बातम्याट्रेंडिंग

नवीन वर्षात येणार १००० चे नोट, २००० चे नोट परतणार बँकेत? नेमकं सत्य काय?

सध्या सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे. ज्यामध्ये १००० रुपयांच्या नोटा पुन्हा चलनात येणार असल्याचा दावा केला जात आहे. हे 1 जानेवारी २०२३ पासून होणार असल्याचे,सांगण्यात येत आहे. (1000 note coming in the new year, 2000 note will be returned to the bank? What is the real truth?)

त्या सोबतच २००० रुपयांच्या नोटा त्याच दिवशी बॅंक्समध्ये परत जाणार,असेही म्हटले जात आहे. नवीन वर्ष सुरु होण्यासाठी अवघे काहीच दिवस बाकी आहेत. देशात अनेक नियमही बदलणार आहेत.

ज्याचा थेट परिणाम जनजीवनावर होणार आहे.अश्यात नवीन नोट येणार,आणि जुनी नोट जाणार, या चर्चाना उधाण आलाय. पण या मध्ये किती तथ्य आहे? सरकार कडून या बद्दल काही बोललं गेलय का? आरबीआय या वर काय म्हणतं. हेच आज आपण यामध्ये जाणून घेणार आहोत.

सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्या मध्ये लिहले आहे की, १ जानेवारी पासून १००० रुपयाचे नवीन नोट येणार आहे. २००० चे नोट बँकेत परत जाणार आहे. तुम्हाला फक्त ₹ ५०००० जमा करण्याची परवानगी असेल.

ही परवानगी देखील फक्त १० दिवसांसाठी असेल, त्यानंतर २००० च्या नोटांना किंमत राहणार नाही. या संपूर्ण प्रकरणातील आश्‍चर्यकारक बाब म्हणजे,सरकारने नवीन १००० रुपयांच्या नोटा जारी करणे आणि २००० रुपयांच्या नोटा काढण्यासंबंधी कोणतीही अधिसूचना जारी केलेली नाही.

अशा परिस्थितीत या गोष्टीवर विश्वास ठेवणे फार कठीण होते. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओचे, सत्य जाणून घेण्यासाठी पीआयबी फॅक्ट चेकने तपास केला. व्हायरल होत असलेल्या सर्व दाव्यांची वास्तविकता सांगण्यासाठी सरकारद्वारे पीआयबी फॅक्ट चेक चालवला जातो.

सरकार वेळोवेळी फेक न्यूजवर कारवाईही करत असते. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये ,करण्यात आलेला दावा पूर्णपणे खोटा असल्याचे पीआयबी फॅक्ट चेक च्या तपासात आढळून आले आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने अशी कोणतीही योजना केलेली नाही.

किंवा अशा प्रकारे २००० रुपयांच्या नोटा काढण्याची कोणतीही योजना नाही. याचा सरळ अर्थ असा की १ जानेवारी २०२३ पासून नवीन १००० रुपयांच्या नोटा येणार नाहीत. आणि २००० रुपयांची नोट पूर्वीसारखीच बाजारात चालणार आहे.

पीआयबीने ट्विट करून याबाबत माहिती दिली असून, लोकांना असे मेसेज फॉरवर्ड न करण्याचे आवाहन केले आहे. पीआयबीने हा व्हायरल मेसेजही ट्विटमध्ये दाखवला आहे. २०१६ मध्ये नोटाबंदीनंतर १००० रुपयाच्या नोटा चलनातून काढून टाकण्यात आल्या होत्या.

ब्लॅक मणीला आळा घालण्यासाठी हे केले गेले. त्याच वर्षी सरकारने २००० च्या नव्या नोटा बाजारात आणल्या होत्या. अलीकडेच, संसदेत एका प्रश्नाच्या उत्तरात केंद्र सरकारने सांगितले की, २००० च्या नवीन नोटांच्या छपाईसाठी २०१८-१९ नंतर कोणताही नवीन ऑर्डर देण्यात आलेला नाही.

सोप्या शब्दात समजून घ्यायचे झाले ,तर २००० च्या नवीन नोटांची छपाई बंद करण्यात आली आहे. पण असं असले तरीही २००० च्या नोट या अजूनही चलनात सुरु आहेजेव्हापासून सोशल मीडियाचे युग सुरू झाले, तेव्हापासून अनेक चुकीच्या गोष्टी पसरवल्या जाऊ लागल्या.

बर्‍याच वेळा सामान्य जनता या फेक न्यूजला खरे मानते, ज्यामुळे भविष्यात त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते. आणि म्हणूनच आम्ही तुम्हाला नेहमी सतर्क करत असत आणि सतर्क राहायला सांगत.

तुम्हालाही असा काही मेसेज आला तर अजिबात काळजी करू नका. असे फेक मेसेज कोणाशीही शेअर करू नका. याशिवाय तुम्ही कोणत्याही बातमीची तथ्य तपासणी करूनच पुढचं पाऊल उचला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button