ताज्या बातम्याट्रेंडिंग

शरद पवार वाढदिवस: पवारांचा पुल आणि ग.दि माडगूळकारांसोबतचा एक गमतीशीर किस्सा…

शरद पवारांचे अनेक किस्से आपण ऐकले असतील पण साहित्यिक जगताचे मोठे नाव असणारे दोन व्यक्ती, पूल देशपांडे आणि ग. दि. माडगूळकर, यांचं नाव कोणाला माहित नसेल विशेष करून महाराष्ट्रात असा व्यक्ती शोधणं कठीणच आहे. (A funny anecdote with Pawar’s Bridge and g. di. Madgulkar)

तर हेच दोन व्यक्ती बारामतीला आले असता शरद पवारांसोबत यांचा एक गंमतीशील किस्सा घडला. आता हा किस्सा काय होता हेच आज यामध्ये आम्ही तुम्हला सांगणार आहोत तर ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा शरद पवार हे बारामतीतून उदयास येणारे अगदी तरुण राजकीय होते.

साहित्यमंडळातर्फे बारामतीत एक कार्यक्रम घेण्यात येणार होता आणि त्याचे प्रमुख पाहुणे म्हणून पूल देशपांडे आणि ग. दि. माडगूळकर येणार होते, आता हे इतके मोठे साहित्तिक आपल्या कडे येणार म्हटल्यावर साहजिक आहे बारामतीकरही अतिशय उत्साहात होते पण सगळ्यात मोठी जबाबदारी ही शरद पवारांवर दिली होती, ते म्हणजे त्या दोघांना आणायची.

आता ही आणायची जबादारी तर चांगली होती पण शरद पवार हे विचारात पडले कारण इतक्या मोठ्या व्यक्तींना आणायचं म्हणजे गाडी लागणारच एसटी मध्ये तर आणता येणार नव्हते आणि त्याहूनही मोठी पंचायत म्हणजे पवारांकडे त्यावेळी गाडी नव्हती. मग करायचं काय.. पवार तर पवारच त्यांनी एका श्रीमंत बागायतदाराला पकडले आणि त्याची गाडी घेतली.

जबाबदारी पार पडली दोघे आले आणि कार्यक्रम छान पार पडला. आता त्या दोघांना परत सोडायसाठी सगळे गाडीत बसले त्यावेळी ज्याची गाडी होती तो बागायतदारही त्या गाडीत होता. त्याला सुद्धा शहरात काहीतरी अर्जंट काम आले म्हणून निघायचे होते तर तोही त्यांच्या बरोबरच निघाला.

आता टिपिकल व्यापारी जसे असतात तसा तो होता. हाताच्या पाचही बोटात सोन्याच्या अंगठया, गळ्यात चेन, जाडजूड, एखाद्या सावली सारखा काळाकुट्ट आता पवारांनी बागायतदाराला दोघांची ओळखी करून दिली . हे पूल देशपांडे आणि ग .दि. माडगूळकर मोठे लेखक आहेत.

असं म्हणत बागायतदारांनी ओळख करून घेतली, आणि मग त्यांच्यात छोट्या मोठ्या गोष्टींच्या गप्पा रंगतच होत्या की बागायतदार महाशयांनी एक मोठा बॉम्बच टाकला. तो म्हणाला , माडगूळकर साहेब आणि देशपांडे साहेब पण नक्की तुम्ही करता काय हो? म्हणजे धंदा पाणी असेल, लेखकाला खरंच पैसे मिळतात का?

तो पोट कस भरतो हा सामान्य माणसांना प्रश्न पडन स्वाभाविकच आहे आणि हे महाशय तर हाडाचे व्यापारी बागायतदार … आता शरद पवारांची काही वेळेसाठी मोठी पंचाईतच झाली कारण ग.दि माडगूळकर हे अति कोपिष्ट तापट स्वभावाचे, हे दोघे काय म्हणेल याचीच जास्त चिंता शरद पवारांना वाटू लागली.

आता काय होणार पवार या विचारातच होते तर पू ल देशपांडे हे शांत पने म्हणाले, हे माडगूळकर आहेत ना ते पोस्टाच्या बाहेर बसून लोकांना चिठ्या लिहून देतात आणि मी यांच्या शेजारी बसून छत्र्याच्या काड्या दुरुस्त करतो. या व्यंगात्मक उत्तरा नंतर शरद पवारांच्या जीवात जीव आला.

काहीही म्हणा मात्र या साहित्यिकांचा सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला घेण्यासारखा आहे खरं तर साहित्यिक आपल्या महाराष्ट्राला लाभले हे आपल्यासाठी आपल्या पिढयांसाठी अभिमानाची आणि गर्वाची गोष्ट आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button