ताज्या बातम्याट्रेंडिंग

हवेत उडणार विमान अचानक तारांमध्ये जाऊन अडकलं अन् ९०,००० घरात…

विमान कोसळण्याचे आणि विमानाच्या आत घडणारे अनेक व्हिडीओ आपण बघितले असणार. पण या व्हिडीओमध्ये चक्क विमान विजेच्या तारामध्ये जाऊन अडकल्याचे दिसेल. (A plane flying in the air suddenly crashed into power lines and 90,000 homes…)

होय, वॉशिंग्टन पोस्टच्या एका अधिकाऱ्यांने दिलेल्या माहिती नुसार अमेरिके मधील मेरीलँड राज्यातील मॉन्टगोमेरी येथे एका विमान अपघाताची घटना घडली आहे.

हवेतून उडणारे एक विमान थेट विजेच्या तारांमध्ये अडकल्यामुळे जवळपास ९० हजारांहून अधिक लोकांच्या घरातील वीज गेल्याचे कळलं आहे. विमान अपघातीची ही घटना रविवारी सायंकाळी मॉन्टगोमेरी येथील काउंटी पॉवर लाईन्समध्ये घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, मॉन्टगोमेरी येथे एक छोटे विमान हवेतून जात असताना अचानक ते वीजेचा तारांमध्ये घुसल्यामुळे हा अपघात झाला. या अपघातामध्ये सुदैवाने कोणीही जखमी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.

फेडरल एविएशन एडमिनिस्ट्रेशनच्या सांगण्यानुसार, रविवारी सायंकाळी ५ वाजून ४० मिनिटाच्या सुमारास एनवाई येथून उड्डाण घेतलेले एक सिंगल-इंजिन विमान गैथर्सबर्गमधील मॉन्टगोमेरी काउंटी एअरपार्कच्या जवळ असणाऱ्या वीजेच्या तारांमध्ये जाऊन अडकले.

तर त्या विमानाची ओळख देखील फेडरल एविएशन एडमिनिस्ट्रेशन कडून करण्यात आली असून, ते विमान मूनी एम२० जे असल्याचं सांगितलं जातं आहे.

या घटनेबाबत मॉन्टगोमेरी काउंटी पोलिसांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे “रॉथबरी डॉ अँड गोशेन आरडी परिसरात एक लहान विमान वीजेच्या तारांमध्ये घुसल्याने त्या भागातील वीज पुरवठा खंडीत झाला आहे.

अग्निशामक दलासह बचाव पथकं घटनास्थळी दाखल झाली आहेत. तर नागरिकांनी या भागात जाणं टाळावं” असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button