ताज्या बातम्याट्रेंडिंग

आयपीएल ऑक्शन नंतर खेळाडूंच्या हातात नेमका किती पैसा येतो? हा लिलाव होतो तरी कसा?

जगातील सर्वात मोठी टी-२० लीग म्हणजे इंडियन प्रीमियर लीग ज्याला आपण आई पी एल म्हणतो. या स्पर्धेत खेळण्यासाठी अनेक युवा, दिग्गज खेळाडू आतूर असतात. पैसा आणि प्रसिद्धी ही त्यामागची दोन कारणे आहेत. (After IPL Auction, how much money exactly comes in hands of players? How does this auction happen?)

आय पी एल एखाद्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेलाही मागे टाकू शकेल, इतकी या लीगची ताकद आहे. मागील वेळीच्या दोन नव्या संघांच्या प्रवेशामुळे लीगला नवे चैतन्य मिळाले, त्यामुळे प्रेक्षकांच्या दर्शनीय संख्येतही वाढ झाली.

आयपीएलसाठी क्रिकेटपटूंवर झालेल्या पैशांच्या पावसाचे संपूर्ण जग साक्षीदार झाले. परंतु खेळाडूंना मिळणाऱ्या मानधनाच्या प्रक्रियेची माहिती कदाचित फार कमी लोकांना असेल.

म्हणूनच बातमी व्हिडीओज मध्ये आपण आय पी एल ऑक्शननंतर खेळाडूंना पैसे कसे आणि किती मिळतात? त्यांचा करार कसा असतो, त्याचा कालावधी किती असतो? हेच जाणून घेणार आहोत..

जेव्हा एखादी फ्रँचाइझी खेळाडूला लिलावात विकत घेते तेव्हा ते एका ठराविक कालावधीसाठी असत. यासाठी खेळाडू, फ्रँचाइझी आणि बीसीसीआय यामध्ये करार केला जातो.

तो करार एक वर्ष, ३ वर्ष किंवा दुसऱ्या काही कालावधीसाठी असू शकतो. २०२२ मध्ये झालेला जो लिलाव आहे तो ३ वर्ष करार कालावधीसाठी आहे.

आता लिलावात लावलेली बोली ही प्रत्येक सिझनसाठी असते. उदाहरणार्थ एखाद्या खेळाडूला १० करोड रुपये बोली लावली तर ही रक्कम त्याला एका सिझनसाठी मिळेल.

जर तो पुढचे दोन सिझन देखील खेळला तर प्रत्येक सिझनला १० करोड त्याला मिळणार. ३ वर्षांनंतर हा करार संपेल. आता जे १० करोड प्रत्येक सिझननुसार मिळणार त्याचे तीन भाग आहेत.

पहिला भाग म्हणजे टीडीएस, भारतीय खेळाडूंसाठी हा १० टक्के तर विदेशी खेळाडूंसाठी २० टक्के असतो.

दुसरा म्हणजे विदेशी खेळाडू असल्यास ज्या संघाकडून तो खेळतो त्या संघाच्या बोर्डाला लिलावात ठरलेल्या किंमतीत मिळणारी ठराविक टक्केवारी. सध्याची टक्केवारी ही २० टक्के आहे.

तिसरा भाग म्हणजे खेळाडूला मिळणारी उर्वरित रक्कम. प्रत्येक हंगाम चालू होण्याआधी २० टक्के, तर सामने चालू असताना ६० टक्के आणि सिझन संपल्यानंतर उर्वरित २० टक्के रक्कम टप्प्याटप्प्याने खेळाडूला मिळत असते.

यामध्ये पुढील काही कारणांमुळे रक्कम वर खाली सुद्धा होऊ शकते. जसे की जर बीसीसीआय सिझन काही कारणांमुळे खेळवू शकली नाही, तरी खेळाडूंना उर्वरित रक्कम मिळते.

म्हणून सिझन हा दरवर्षी असतोच, कितीही संकट आले तरी सुद्धा आयपीएल होतो. खेळाडू पूर्ण सिझनसाठी संघाबरोबर असला, आणि जरी त्याने एकही सामना खेळला नाही.

तरी त्याला उर्वरित रक्कम मिळते. सिझन खेळताना खेळाडूला दुखापत झाली, तरी सुद्धा त्याला त्याची उर्वरित रक्कम मिळते. जर खेळाडू सिझन चालू होण्याच्या आधी संघाला खेळण्यास नाही म्हणाला असेल.

मग ते दुखापत किंवा अन्य कारणाने का नसो, खेळाडूला काहीच मिळत नाही. जर एखादा विदेशी खेळाडू आंतरराष्ट्रीय सामन्यांमुळे पूर्ण सिझन खेळू शकला नाही, तर त्याने जेवढे सामने खेळले आहेत त्याप्रमाणात त्याला रक्कम मिळते.

ऑक्शनमध्ये ज्या रकमेवर खेळाडूला खरेदी केले जाते, ती रक्कम त्याचे मानधन ठरते. त्यानुसार कर मोजला जातो. मानधनाच्या रकमेसाठी फक्त तोच खेळाडू दावेदार असतो.

तसेच ही रक्कम प्रत्येक सिझननुसार खेळाडूला दिली जाते. जर एखाद्या संघाला मानधन वाढवून खेळाडूला थांबवायचे असेल, तर रक्कम बदलू शकते. सामान्यतः खेळाडूंना वाढीव पगार देऊन कायम ठेवले जाते.

विशेष बाब म्हणजे सर्वच फ्रेंचायझी खेळाडूंना एकाच वेळी पैसे देत नाहीत. हे सर्व फ्रेंचायझीकडे किती रोख आहे, आणि प्रायोजकत्वातून पैसे कसे येत आहेत, यासारख्या अनेक गोष्टींवर अवलंबून असते. काही फ्रेंचायझी खेळाडूंना एकाच वेळी पूर्ण पैसेही देतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button