ताज्या बातम्याट्रेंडिंग

माउंटेन सिंहाने भुताचा आवाज काढताच पोलीस घाबरून पळू लागतो…पहा नेमकं काय घडत

सिंह झू मध्ये जरी आपण बघायला गेलो तरी सुद्धा त्याला बघून आणि त्याची डरकाळी ऐकून अनेकांना घाम फुटतो. मग कुठला व्यक्ती कितीही बलवान असला तरी सुद्धा त्याला सिंहाची भीती ही वाटतेच. सध्या सोशल मीडियावर माउंटेन सिंहाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यात सिंहाची डरकाळी ऐकताच पोलीस घाबरतो आणि तिथून पळत सुटतो. (As the mountain lion makes ghostly noises, the cop starts running… watch what happens

रात्रीच्या अंधारात टॉर्चच्या प्रकाशात एक पोलीस काहीतरी पाहण्याचा प्रयत्न करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येते. तो टॉर्च फिरवतो आणि आजू बाजूला पाहतो, तेव्हाच त्याला एक भुताची किंचाळी ऐकू येते, जी ऐकून तो घाबरतो. आवाज ऐकताच तो लगेच तिथून पळत सुटतो.

खरतर ती माऊंटन सिंहाची डरकाळी असेल, जे त्या पोलीस कर्मचाऱ्याला भूत वाटले असावे. आणि तो पळू लागला असेल किंवा त्याने तो माऊंटन सिंह बघितला असावा. खरं तर रात्रीच्या अंधारात अशा किंकाळ्या ऐकू आल्या तर कुणालाही भीती वाटणे साहजिकच आहे.

तुम्हीही एकदा हा व्हिडीओ पहा तुम्हाला सुद्धा सिंहाने भुताचा आवाज काढल्याचे ऐकू येणार. हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. माऊंटन सिंहाच्या डरकाळीने पोलीस घाबरला’ असे कॅप्शन यावर लिहिले आहे.

अवघ्या ८ सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत १ मिलियन म्हणजेच १० लाख वेळा पाहिला गेला आहे, तर ४५ हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक देखील केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button