ताज्या बातम्याट्रेंडिंग

अष्टमासिद्धी। महाराष्ट्रातल्या या चमत्कारी विहिरीच्या पाण्याने त्वचारोगही जातात पळून…

आपला भारत देश असा आहे की जिथे प्रत्येक दिवशी काहीना-काही चमत्कार होतच असतात. आता मला सांगा तुम्ही आजारी असले की सगळ्यात आधी कुठे जाता. (Ashtmasiddhi | Skin diseases are also cured by the water of this miraculous well in Maharashtra)

साहजिक आहे डॉक्टरांकडे पण, आपल्या महाराष्ट्रात कित्येक वर्षा पासून अशी एक चमत्कारी विहीर आहे, ज्या विहिरीच्या पाण्यानी लहान मुलांची अंघोळ घातली की सगळी रोगराई निघून जाते. तुम्हाला ही आश्यर्य वाटत असेल पण हे खर आहे. कारण या गोष्टीला डॉ.सुद्धा मान्य करतात.

चला तर मग यामध्ये जाणून घेऊयात ही विहीर कुठे आहे? आणि या विहिरी मागचं नेमकं रहस्य काय ? अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यात असणारी अष्टमासिद्धी येथील छोटीशी विहीर पर्यटकांना खुणावत असते. लहान मुलांची आंघोळ या विहिरीतील पाण्याने घातली की त्यांची रोगराई दूर होते.

असा अनेकांचा विश्‍वास आहे. या विहिरीवर आंघोळ करणाऱ्यांची गर्दी असते. लहान मुलांसोबतच प्रत्येकांनी या विहिरीच्या पाण्याने आंघोळ केली तर ते आरोग्यासाठी पोषक असल्यामुळे केवळ अमरावती जिल्ह्यातूनच नव्हे तर, विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यातील अनेक कुटुंबाची या विहिरीच्या पाण्याने अंघोळ करण्यासाठी नेहमीच गर्दी पाहायला मिळते.

याच ठिकाणी गोविंद प्रभू यांनी काही लिला केल्या असल्याचा देखील उल्लेख महानुभाव साहित्यात आढळतो. बुधवार आणि शुक्रवार महानुभव पंथीय भाविक मोठ्या संख्येन या मंदिरात दर्शनासाठी येत असल्याने,या मंदिर परिसरात असणाऱ्या विहिरीच्या पाण्याने अंघोळ करण्यासाठी सुद्धा बुधवारी आणि शुक्रवारी या दोन दिवसांना महत्व देण्यात येते.

आता इथे येणाऱ्या नागरिकांसाठी विहिरीतून पाणी काढायला दोर आणि बकेट भाड्याने मिळते. यात आणखी एक गोष्ट मला सांगावीशी वाटते ती म्हणजे इथे मुलांनी ज्या कपड्यावर अंघोळ केली, ते कपडे परत मुलांना घालू न देता ते तिथल्या झाडावर नेहमीसाठी टांगून देतात.

अंघोळ करायच्या आधी बकेट विहिरीत टाकताना त्यात विड्याचं पान ठेऊन कपूर जाळण्यात येतो,आणि मगच पाणी काढावं लागत अशी इथे प्रथा आहे. पण आता मी म्हटल्या प्रमाणे डॉक्टर सुद्धा या विहिरीला खर मानतात. मग ही खरंच चमत्कारी विहीर आहे का? तर होय.. हा निसर्गाचा चमत्कार आहे.

म्हणजे काय तर अष्टमासिद्धी येथील विहिरीच्या पाण्यामध्ये औषधी गुण असल्यामुळे या पाण्याने आंघोळ केल्यामुळे त्वचेशी संबंधित विकार होत नाही. भौगोलिकदृष्टीने विचार केला तर अष्टमासिद्धी ची विहीर ज्या ठिकाणी आहे तो संपूर्ण दख्खनचा पठार असून याची निर्मिती लावा रसाच्या उद्रेकामुळे झाली आहे.

लावा रसाचा उद्रेक होताना त्यामधून अनेक वायू सुद्धा बाहेर पडलेत. यापैकीच सल्फर अर्थात गंधक या वायूचा प्रवाह जमिनीतून अष्टमासिद्धी येथील विहिरीत आला आहे. या विहिरीतील पाण्यात गंधकाचे मिश्रण सतत होत असल्यामुळे या पाण्याचा रंग पिवळसर झाला असून, हे पाणी सतत गरम असतं.

अष्टमासिद्धी येथील विहिरीच्या पाण्याचा उपसा सतत सुरू असल्यामुळे हे पाणी आता फारसे गरम नसले तरी ,गंधकयुक्त असणार हे पाणी त्वचेसाठी अत्यंत गुणकारी आहे.  बालरोगांसाठी देखील या विहिरीचे पाणी उपयुक्त आहे अशी माहिती भूगोल विषयाचे अभ्यासक सांगतात आणि तेथील डॉकटर्स सुद्धा सांगतात.

अष्टमासिद्धी येथील विहिरीच्या औषधीयुक्त पाण्याबाबत संशोधन होणे गरजेचे असल्याचे देखील ते म्हणतात

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button