Nitish Chavan – Batmi https://www.batmi.net Get marathi latest news Thu, 20 Oct 2022 19:35:21 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.2 https://www.batmi.net/wp-content/uploads/2022/09/cropped-Picsart_22-08-31_02-05-02-169-96x96.jpg Nitish Chavan – Batmi https://www.batmi.net 32 32 201029915 क्रेडिट कार्ड वापरण्याचे फायदे काय आहेत? एकदा नक्की वाचा… https://www.batmi.net/what-are-the-benefits-of-using-a-credit-card/ https://www.batmi.net/what-are-the-benefits-of-using-a-credit-card/#respond Fri, 19 Aug 2022 07:41:18 +0000 https://www.batmi.net/?p=26354 क्रेडिट कार्ड वापरण्यासंबंधी अनेकांना अडचणी असतात. कोणाला ते का आणि कशासाठी वापरावे किंवा त्याचे नेमके फायदे काय याची अजिबातच कल्पना नसते.

मग ते वापरावे किंवा नाही, त्यामुळे काही नुकसान झालं तर या संभ्रमात अनेकजण असतात. तर आजच्या या लेखात आपण क्रेडिट कार्डचे नक्की काय फायदे असतात हे जाणून घेऊयात.

• क्रेडिट कार्ड का वापरावे ?

क्रेडिट कार्ड हे एक सोयीचे साधन आहे ज्याद्वारे तुम्ही वस्तू आणि सेवांसाठी पैसे देऊ शकता. शिवाय, तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन क्रेडिट कार्ड वापरू शकता.

रोख किंवा डेबिट कार्ड वापरून तुम्हाला मिळणाऱ्या मुख्य क्रेडिट कार्डच्या फायद्यांपैकी एक म्हणजे तुम्हाला मोफत क्रेडिटचा कालावधी मिळतो. त्यामुळे तुम्ही साठवलेले पैसे न वापरतासुध्दा बरीच उत्पादने घेऊ शकता.

म्हणून, तुमच्यासाठी योग्य असलेले कार्ड निवडण्यापूर्वी कोणत्याही क्रेडिट कार्डची वैशिष्ट्ये जाणून घेणे चांगले असते.

• क्रेडिट कार्डचे फायदे

१. ईएमआय पेमेंट्स –

ईएमआय म्हणजे थोडक्यात असं कर्ज जे प्रत्येक महिन्यात ठराविक रकमेतून फेडावे लागते. क्रेडिट कार्डचा एक वेगळा फायदा म्हणजे परवडणाऱ्या ईएमआयवर फ्लॅगशिप वस्तू खरेदी करण्यासाठी क्रेडिट कार्ड वापरले जाऊ शकते. तुम्ही निवडाल त्या कालावधीत याची परतफेड केली जाऊ शकते.

२. सोप्पी प्रक्रिया –

क्रेडिट कार्ड ऑनलाइन आणि ऑफलाइन उपलब्ध आहे. शिवाय, पात्रता निकष पूर्ण करणे सोपे आहे आणि यासाठी मूलभूत कागदपत्रांची पूर्तता करणे देखील सोपे आहे.

ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही माध्यमात क्रेडिट कार्ड वापरता येत असल्याने कसली पंचाईत होत नाही. तसेच ते हाताळणे देखील सहजशक्य आहे.

३. अडचणीच्या काळात कर्ज –

आपत्कालीन खर्चाच्या बाबतीत वैयक्तिक कर्ज मिळविण्यासाठी क्रेडिट कार्ड सुविधांचा वापर केला जाऊ शकतो.

यावेळी तुमच्या बँकेचे क्रेडिट कार्ड पाहून आणि एकूणच तुमच्या मालमत्तेचा आढावा घेऊन अशी सुविधा क्रेडिट कार्डमुळे शक्य होते.

४. रोख पैसे काढणे –

डेबिट कार्डापेक्षा क्रेडिट कार्डचा आणखी एक फायदा म्हणजे जेव्हा तुम्हाला तुमचे बिल सेटल करावे लागेल तेव्हा तुम्ही एटीएममधून आगाऊ रक्कम काढू शकता.

५. सवलत/ऑफर/पुरस्कार –

स्पष्टपणे, सर्वोत्कृष्ट क्रेडिट कार्ड लाभ म्हणजे सवलत आणि ऑफर ज्या तुम्ही उत्पादनांच्या श्रेणीवर घेऊ शकता.

याशिवाय, तुमचा खर्च आणि तुम्ही कोणत्या प्रकारचे क्रेडिट कार्ड वापरता याच्या आधारावर तुम्हाला रिवॉर्ड पॉइंट मिळतात. हे नंतर अधिक सवलतींसाठी रिडीम केले जाऊ शकतात.

६. पेमेंट सुरक्षा –

क्रेडिट कार्ड हे एक डिजिटल साधन आहे जे तुम्हाला पेमेंटमध्ये सुरक्षितता देते. ज्यामध्ये मल्टी-फॅक्टर ऑथेंटिकेशन आणि इन-हँड सुरक्षा वैशिष्ट्यांची पूर्तता केली गेली आहे. त्यामुळे काळजी करण्याचे काहीच कारण उरत नाही.

७. क्रेडिटवर बिग-तिकीट उत्पादने –

तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डने उच्च श्रेणीची म्हणजेच महागाची उत्पादने खरेदी करू शकता. केवळ क्रेडिट-मुक्त कालावधीसहच नाही तर EMI मध्ये उत्पादने खरेदी केली जाण्याची त्यात सोय आहे. त्यामुळे बजेटवर देखील याचा जास्त मोठा परिणाम होत नाही आणि तुम्ही चिंतामुक्त राहता.

८. रोख रकमेपासून मुक्ती –

तुम्ही खरेदी करता तेव्हा क्रेडिट कार्ड तुमच्यासोबत रोख रक्कम घेऊन जाण्याची गरज दूर करते. हे ऑनलाइन खरेदीची सुविधा देखील देते.

त्यामुळे कधी पैसे राहिले, विसरले तर क्रेडिट कार्ड ही चिंता मिटवू शकते. शिवाय रोख रक्कम बाहेर घेऊन फिरणे तसे धोक्याचे असते. त्यामुळे क्रेडिट कार्ड हा निश्चिंत राहण्यासाठीचा योग्य पर्याय आहे.

तर हा होता क्रेडिट कार्डचे महत्व आणि त्याचे फायदे सांगणारा लेख. या लेखातून तुम्हाला नक्कीच क्रेडिट कार्डचे फायदे लक्षात आलेच असतील.

तेव्हा क्रेडिट कार्ड वापरण्यासंबंधी जागृत व्हा. स्वतःचा फायदा करून घ्या आणि हा लेख कसा वाटला तेही जरूर कळवा.

]]>
https://www.batmi.net/what-are-the-benefits-of-using-a-credit-card/feed/ 0 26354
मंकीपॉक्स आजाराबद्दल ‘ह्या’ गोष्टी माहिती आहेत का? https://www.batmi.net/do-you-know-these-things-about-monkeypox-disease/ https://www.batmi.net/do-you-know-these-things-about-monkeypox-disease/#respond Thu, 18 Aug 2022 05:56:14 +0000 https://www.batmi.net/?p=26352 आपण कांजण्या म्हणजेच चिकनपॉक्स बद्दल ऐकलं असेलच. पण मंकीपॉक्स बद्दल ऐकलं आहे का? जगात कोरोनाच्या तडाख्यातून देश अजून सावरलेले नाहीत तोवर हा अजून एक आजार येऊन धडकला आहे. तर या लेखात या आजाराबद्दल व त्याच्या विषाणूबद्दल जाणून घेऊयात.

  • मंकीपॉक्सची लागण जोरदार:

मंकीपॉक्स या दुर्मिळ संसर्गाच्या येण्याने अमेरिका आणि युरोपातील शास्त्रज्ञ चिंतेत आहेत. सुदैवाने , आतापर्यंत भारतात संसर्गाचे एकही प्रकरण नोंदवले गेले नाही, परंतु मंकीपॉक्सचा युरोपीय देश ब्रिटन,

इटली, पोर्तुगाल, स्पेन, स्वीडन आणि अमेरिकेसह वीस देशांमध्ये जोरदार फैलाव होताना दिसत आहे. याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेनेही खबरदारीचा इशारा दिला आहे आणि ही सुद्धा महामारी होऊ शकते अशी चिंता व्यक्त केली आहे.

  • मंकीपॉक्स हे नाव का पडले:

मंकीपॉक्स हा मानवी स्मॉलपॉक्स म्हणजेच गोवरासारखाच दुर्मिळ विषाणूजन्य सांसर्गिक आजार आहे. संशोधनासाठी ठेवलेल्या माकडांमध्ये तो प्रथम आढळून आला तो १९५८ मध्ये. त्यावरून त्याचे मंकीपॉक्स असे नाव ठेवले गेले.

तर मंकीपॉक्सचा मानवांना संसर्ग झाल्याचे पहिले प्रकरण १९७० मध्ये नोंदवले गेले. हा रोग प्रामुख्याने मध्य आणि पश्चिम आफ्रिकेतील उष्णकटिबंधीय पर्जन्यवनाच्या प्रदेशात आढळतो आणि कधीकधी इतर प्रदेशांमध्येही पसरतो.

  • मंकीपॉक्स बद्दल तज्ज्ञ काय म्हणतात:

मंकीपॉक्स हा ‘मंकीपॉक्स’ विषाणूच्या संसर्गामुळे होणारा एक दुर्मिळ रोग आहे. मंकीपॉक्सचा संसर्ग प्राण्यांपासून मानावाला व एका मानवापासून दुसऱ्याला होतो. मंकीपॉक्स विषाणू छोट्या जखमा,श्वसनमार्गातून किंवा डोळे,तोंडाद्वारे शरीरात प्रवेश करतो.

प्राण्यांनी चावल्यामुळे अथवा बोचकारल्यामुळे, जंगली प्राण्यांचं मांस खाल्ल्याने या विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. कोरोनाप्रमाणेच याचे संक्रमण शिंकल्यानंतर तयार होणाऱ्या ड्रॉप्लेट्स मुळे होऊ शकते.

रोगी व्यक्तीच्या शरीरातील घाम, थुंकी किंवा जखमांशी थेट व अप्रत्यक्षरित्या संपर्क आला की या आजाराचे मानवास संक्रमण होऊ शकते.

हा विषाणू ‘पॉक्सविरिडे’ या विषाणू कुटुंबातील आहे. या कुटुंबामध्ये कांजिण्या आणि गोवर या रोगांना कारणीभूत असलेले विषाणू देखील समाविष्ट आहेत.

  • मंकीपॉक्स या आजाराची काय आहेत लक्षणे:

मंकीपॉक्स विषाणू मानवी शरीतात गेल्यांनंतर या रोगाची लक्षणे स्पष्टपणे दिसण्याचा कालावधी साधारणतः एक ते दोन आठवड्यांचा असतो.

परंतु काही प्रसंगी तो ५ – २० दिवसांपर्यंत असू शकतो आणि या कालावधीत व्यक्तीच्या संपर्कात आल्याने सहसा संसर्ग होत नाही. ताप येणे,पुरळ उठणे आणि जास्त संख्येने गाठी तयार होणे ही

मंकीपॉक्सची लक्षणे आहेत. काही वेळेस गुंतागुंतीची वैद्यकीय परिस्थिती होऊ शकते. हे पुरळ शक्यतो चेहऱ्यावर आणि हातपायांवर उठतात.

चेहरा, हाताचे तळवे आणि पायांचे तळवे जास्त प्रमाणात व त्यानंतर तोंडात , जननेंद्रियाच्या ठिकाणी आणि डोळ्यातही पुरळ येतात. याची लक्षणे २-४ आठवड्यांपर्यंत असतात. रुग्णाची परिस्थिती गंभीर होऊ शकते. मृत्यू होण्याचं प्रमाण साधारणतः १-१०% इतकं आहे. लहान मुलांमध्ये या लक्षणांची तीव्रता अधिक आहे.

पुरळ उठणे सुरू होण्याच्या दोनेक दिवस आधी संक्रमित व्यक्ती हा रोग पसरवू शकतो आणि सगळ्या पुरळांवरील खपली पडेपर्यंत संक्रमण राहू शकते.

  • मंकीपॉक्सवर कसा उपचार केला जातो?

मंकीपॉक्स या रोगावर अजूनही कोणतेच ठराविक औषध नाही. म्हणूनच आधीपासून असलेल्या अँटीव्हायरल औषधांच्या द्वारे याचा उपचार करण्यात येतो.

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्या लक्षणांची तीव्रता कमी करण्यावर भर देण्यात येतो. वर सांगितल्याप्रमाणे याचे विषाणू कांजण्याच्या विषाणूंच्या वर्गात मोडतात म्हणून कांजण्यांचे औषध देऊनच याचा उपचार केला जातो.

‘टेकोविरिमेट’ हेच उपचारासाठी वापरले जाणारे औषध आहे. ते खरंतर सर्वत्र मिळत नाही. म्हणून जिकडे जी अँटीव्हायरल औषधे आहे ती दिली जातात.

आपल्याकडे याचे रुग्ण नसतील ही चांगली बाब आहे पण आपण सतर्क राहायलाच हवं आहे. तुम्हालाही हेच वाटतं ना?
]]>
https://www.batmi.net/do-you-know-these-things-about-monkeypox-disease/feed/ 0 26352
नामांतराची प्रकरणे का चिघळतात? एकदा नक्की वाचा… https://www.batmi.net/why-do-name-change-cases-get-so-hot/ https://www.batmi.net/why-do-name-change-cases-get-so-hot/#respond Thu, 18 Aug 2022 05:54:02 +0000 https://www.batmi.net/?p=26349 ‘नावात काय आहे?’ असं शेक्सपिअरने म्हणलं आहे. पण नावातच सगळं आहे. नावामुळे आपली ओळख असते. नावाचं स्पेलिंग चुकलं तरी व्यावहारिक जीवनात बऱ्याच अडचणी येतात.

लोकांच्या भाव भावना, अस्मिता या ही नावाशीच जोडलेल्या असतात. आपण जगात धडपड करत असतो ती नाव मिळवण्यासाठी आणि पावलं जपून टाकत असतो ते नावाला बट्टा लागू नये म्हणून तीच नावं बदलण्यावरून बरेच वाद पेटले आहेत.

अशी नावाची प्रकरणे महाराष्ट्राला नवीन नाहीत या निमित्ताने महाराष्ट्रात घडलेली काही नामांतराची प्रकरणे पाहू.

मराठवाडा विद्यापीठाचा नामांतराचा लढा:

‘नामांतर चळवळ’ म्हणून हे प्रकरण प्रसिद्ध आहे. १९७८ मध्ये विधानसभेतच डॉ. बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठ असं नाव ठेवण्याचा ठराव संमत झाला आणि जेव्हा ही बातमी पसरली तेव्हा औरंगाबाद व मराठवाड्याच्या बाकी भागात वातावरण पेटलं.

बऱ्याच विचारवंतांनीही याला विरोध केला. दलित विरुद्ध सवर्ण असा हा वाद पेटला. दलित वर्गातील बऱ्याच लोकांचे जीव गेले आणि त्यांची घरे पेटली.

यांत सेनेसारखा पक्ष नामांतराच्या विरोधात होता. कारण मराठवाड्यातील सेनेचे मतदार त्या विरोधात होते म्हणून. पण नामांतर न होता केवळ नामविस्तार होऊन ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं नाव ठेवलं गेलं.

औरंगाबादचे संभाजीनगर:

१९८८ ला औरंगाबादेत शिवसेनेचे २८ नगरसेवक निवडून आले. त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर घेतलेल्या सभेत औरंगाबादचं नाव संभाजीनगर केल्याचं जाहीर केलं. जून १९९५ मध्ये औरंगाबाद महापालिकेच्या सभेत बदलण्याचा ठराव बहुमतानं मंजूर करण्यात आला.

हा ठराव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला. तेव्हा राज्यसरकारमध्येही सेनाच होती. तेव्हाचे पालकमंत्री चंद्रकांत खैरेंनी नामांतराचा प्रस्ताव मांडला.

तो मंजूर करून नाव बदललं पण यांवर खूप वादंग झाला. औरंगाबाद महापालिकेचे तत्कालीन नगरसेवक मुश्ताक अहमद यांनी याविरोधात सुप्रिम कोर्टात याचिका दाखल केली.

व विरोध का आहे ? यावर ‘”आमचा विरोध नावाला अथवा व्यक्तीला नाही. पण हे करण्यामागे जो उद्देश आहे तो वाईट आहे, त्याला आमचा विरोध आहे.” असं मुश्ताक यांनी सांगितलं.

पुढं सुप्रिम कोर्टानेही नाव बदलण्यापेक्षा विकास काम करा असं सांगून ताशेरे ओढले. २००४ मध्ये आघाडी सरकार आल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनी हे ही मंजुरी मागे घेतली.

सोलापूर विद्यापीठाचे नामांतर:

सोलापूर विद्यापीठाचे नामांतर करून ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ’ करण्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केल्यावर लिंगायत समाजाने आंदोलन करून त्यांचे पुतळे जाळले तर तत्कालिन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ही घोषणा मागे घेतल्यावर धनगर समाजाने आंदोलन करून त्यांचे पुतळे जाळले. व हे प्रकरण मागे पडलं आहे.

नामंतरावरून रान पेटवलं जातं आणि वाद निर्माण केले जातात. वातावरण बिघडवलं जातं. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला जातो. यात इतक्या परस्परविरोधी भूमिका दिसतात की मराठवाडा

विद्यापीठाच्या नामांतरासाठी हाल सोसणारे; औरंगाबाद शहराच्या नामांतराला विरोध करतात. किंवा मराठवाडा विद्यापीठाचे नाव बदलण्याच्या निर्णयाला विरोध करणारे मुंबई विद्यापीठाच्या नामांतराची मागणी करतात.

या तर मोठ्या गोष्टी साध्या सिनेमाच्या नावावरून ही लोकांच्या अस्मिता दुखावतात आणि सिनेमाचं नाव बदललं जातं. नावं बदलण्यासाठी दंगे धोपे करण्यापेक्षा समजा शहरांची नावं न बदलता त्यांची मूळ नावं,

त्यांचा इतिहास समाजात सर्वत्र पोहोचवला, शहरातील ऐतिहासिक वास्तू आणि अन्य ठेवा नीट जपला तर शांततेत बराच अपेक्षित बदल होईल.

पण केवळ राजकीय फायद्यासाठी वातावरण तापवून शांतता नष्ट करून काय लाभ होणार? तुम्हाला याबद्दल काय वाटतं?

]]>
https://www.batmi.net/why-do-name-change-cases-get-so-hot/feed/ 0 26349
संवाद कौशल्य सुधारण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स… https://www.batmi.net/use-these-tips-to-improve-communication-skills/ https://www.batmi.net/use-these-tips-to-improve-communication-skills/#respond Thu, 18 Aug 2022 05:52:43 +0000 https://www.batmi.net/?p=26347 “न बोलणाऱ्याचे गहू तसेच राहतात, पण बोलणाऱ्याचा कोंडा ही विकला जातो.” अशी म्हण आपण ऐकली असेल. म्हणजेचं संवाद कौशल्य सगळ्यात महत्त्वाच आहे.

म्हणून आपल्यालाही वाटतं का की आपलं संवाद कौशल्य सुधारलं पाहिजे तर हा लेख वाचा. यामध्ये दिलेल्या आहेत संवाद कौशल्य सुधारण्यासाठी काही टिप्स…

व्हा उत्तम श्रोता:

चांगल्या पद्धतीने संवाद करता येण्यासाठी, आपल्याला प्रथम चांगले ऐकावे लागेल. संवाद नीट लक्ष देऊन ऐकला तर प्रत्येक महत्त्वाचा तपशील मिळतो आणि आपण अजून चांगला संवाद कसा साधता येईल याकरता सुधारणा सुद्धा करु शकतो.

थोडक्यात आणि मुद्द्याचं बोला:

जेव्हा अनावश्यक माहिती बोलण्यात येत असेल तेव्हा बहुतेक वेळेस संवाद योग्य प्रकारे घडत नाहीत. आपल्या संभाषणादरम्यान महत्त्वाच्या मुद्यांना बगल न देता संक्षिप्तपणे आपले म्हणणे मांडावे.

हे मौखिक संभाषणच नव्हे तर लिखित संभाषण करतानाही लागू होते. संवादाचा प्रकार कोणताही असू दे लेखी अथवा मौखिक; संभाषणासाठी जे महत्त्वाचे आहे तेच बोलण्याचा सराव करा.

आपला श्रोता ओळखा:

आपण कोणाशी संवाद साधत आहात हे आपल्याला माहित असले पाहिजे आणि ते कोणत्या प्रकारे केलेले संभाषण समजणार आहेत हे लक्षात घ्यायला पाहिजे. उदा. जर तुम्ही एखाद्या सहकाऱ्याशी किंवा वरिष्ठांशी संवाद साधत असाल,

तर उघडपणे अनौपचारिक भाषा वापरली जाऊ नये. तसेच, तुम्ही शॉर्टफॉर्म असलेले शब्द वापरल्यास, समोरच्या व्यक्तीला लगेच समजेल असे आपण गृहीत धरू शकत नाही. तर, आपलं बोलणं ऐकणारा कोण आहे, हे नीट पहा.

आवाजाच्या चढ-उतारांकडे लक्ष दया:

बहुतेक वेळेस कोणीच जर का योग्य स्वरात बोलत नसतो त्यावेळेस गैरप्रकारे संवाद घडतात. खूप मोठ्याने बोलू नये. खूप सौम्यही होऊ नका आणि उद्धट किंवा उर्मटपणे तर नाहीच. सर्वांशी नेहमी नम्रपणे आणि आदराने संवाद साधायला हवा.

सकारात्मकतेने संवाद साधा:

आपण आपल्या संवादासाठी वापरत असलेल्या भाषेत जास्तीत जास्त वेळेस होकारार्थी वाक्ये असणं आवश्यक आहे. उदा. तो हे काम नक्की करेल.

भाषेचं स्वरूप श्रोत्याचं किंवा वाचकाचं लक्ष त्वरित वेधून घेतं. ते तुमच्या प्रत्येक शब्दावर लक्ष ठेवतात आणि अपेक्षित असणारा संदेश त्यांना मिळतो.

देहबोली योग्य ठेवा:

देहबोली हा शब्दांशिवाय संवाद साधण्याचा एक उत्तम मार्ग आहे त्याचा खोलवर प्रभाव पडतो. जेव्हा आपण व्हिडिओ कॉन्फरन्स कॉलमध्ये किंवा समोरासमोर भेटत असतो तेव्हा,

एक सकारात्मक देहबोली ठेवावी जसे की मोकळेपणा आणि डोळयांत डोळे घालून पाहणे. ही देहबोली पाहून समोरचा व्यक्तीही बदलून जाईल आणि त्याची देहबोलीही सकारात्मक होईल.

थेट बोला:

आपल्याला ज्या व्यक्तीशी संवाद साधायचा आहे त्याच्याशी जाऊन थेट बोला. बर्‍याच संस्थांमध्ये, संदेश पाठवण्यासाठी याच्या त्याच्या माध्यमातून संदेश पाठवले जातात.

कानगोष्टी सारख्या खेळाचा अनुभव असेल तर निरोप इकडून तिकडे जाताना काहीतरी भलताच दिला जातो म्हणून जेव्हा बरेच लोक असतात तेव्हा हे कानगोष्टी सारखा प्रकार नकोच. आपण संबंधित व्यक्तीशी थेट संवाद साधायाला हवा.

संवाद ही अशी गोष्ट आहे ज्याचा आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनावर मोठा प्रभाव पडतो. ही गोष्ट गांभीर्याने घ्यायला हवी. आणि नेहमी लक्षात ठेवा की सर्वात यशस्वी आणि आनंदी लोक जे आहेत, त्यांना उत्तम संवाद साधता येतो.

]]>
https://www.batmi.net/use-these-tips-to-improve-communication-skills/feed/ 0 26347
डावखुऱ्या लोकांचं एकदम वेगळं वैशिष्ट्य काय असतं? जाणून व्हाल थक्क… https://www.batmi.net/what-is-the-unique-characteristic-of-left-handed-people/ https://www.batmi.net/what-is-the-unique-characteristic-of-left-handed-people/#respond Thu, 18 Aug 2022 05:51:30 +0000 https://www.batmi.net/?p=26345 ‘अरे हा तर डावखुरा (डावरा) आहे!’ कोणी डाव्या हाताने काम करताना दिसलं की असं आपण अगदी आश्चर्याने बोलतो. पण तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का की, आपल्यापैकी काही लोकच डावखुरी का असतात,

नैसर्गिकरित्या अशा कोणत्या गोष्टी असतात ज्यामुळे त्यांना डाव्या हाताने काम करण्याची सवय असते आणि यामध्ये खरंच चांगलं किंवा अपशकुन अशा काही गोष्टी असतात का? डावखुऱ्या लोकांकडे वेगळी अशी काय वैशिष्ट्य असतात आणि खूप कमी प्रमाणातच लोकं डावखुरी का असतात, हे आपण या लेखात जाणून घेऊया.

आपल्या भारतात डाव्या लोकांची संख्या जाणून घेण्यासाठी एक संशोधन करण्यात आलं होतं. त्या संशोधनातून भारतातल्या डाव्या हाताचा अधिक वापर करणाऱ्या लोकांची आकडेवारी घेण्यात आली.

भारतात जवळ जवळ १० ते १२ टक्के लोक हे डावखुरे आहेत. त्यात महिलांची संख्या ९ ते १० टक्के आहे तर डावखुऱ्या पुरुषांची संख्या १२ ते १३ टक्के इतकी आहे. त्यामुळे भारतात महिलांच्या तुलनेत पुरुषांनी डावखुरे असण्यात बाजी मारलेली दिलते.

डावखुऱ्यांविषयी वैज्ञानिक काय सांगतात –

वैज्ञानिक सांगतात की, आपल्याला एक मेंदू असला तरी त्या मेंदूचा डावा आणि उजवा असे दोन भाग असतात. मेंदूचा उजवा भाग हा आपल्या शरीराच्या डाव्या बाजूवर तर मेंदूचा डावा भाग शरीराच्या उजव्या बाजूवर नियंत्रण ठेवतो.

वैज्ञानिकांच्या मते उजव्या हाताचा वापर करणाऱ्या व्यक्तीचा डावा मेंदू हा उजव्यापेक्षा जास्त शक्तिशाली आणि कार्यरत असतो. उजव्या हाताच्या व्यक्तीचा डावा मेंदू शरीराला कामं करण्यास संदेश देतो.

डावखुऱ्या लोकांमध्ये कोणते खास कलागुण असतात?

पण डावखुऱ्या लोकांच्या बाबत मेंदूचं हे समीकरण वेगळं असतं. त्यांच्या उजव्या मेंदूचं डाव्या मेंदूवर अधिक प्रभुत्व असतं. उजव्या हाताच्या लोकांचा जसा डावा मेंदू शरीराला कार्य करण्यास संदेश देतो तसंच डावखुऱ्यांचा उजवा मेंदू शरीराला सूचना देतो.

वैज्ञानिकांच्या मते ज्यांचा उजवा मेंदू डाव्यापेक्षा शक्तिशाली असतो, त्या व्यक्तीची कल्पनाशक्ती भन्नाट असते. त्याची कलाशक्ती, कौशल्य, हुशारी हे सगळंच भारी असतं. अशी लोक अत्यंत कलासक्त, भावनाप्रधान आणि सृजनशील असतात. क्रीडा आणि संगीत क्षेत्रात हे लोक अधिक रमतात.

डावखुऱ्यांच्या समस्या त्यांनाच माहीत –

● उजव्या हाताच्या लोकांना उजवी कडून डावीकडे लिहीत जाणं सोप्प होतं पण डावखुऱ्या माणसांची मात्र चांगलीच कसरत होते. त्यांना डाव्या हाताने उजवीकडे लिहीत जाणं अवघड होतं.

यामुळे त्यांच्या खांद्यावर आणि मानेवर अधिक ताण निर्माण होतो. अनेकदा त्यांनी लिहिलेली अक्षरं उलटी असतात. त्यामुळे त्यांना उजव्या बाजूच्या गोष्टींचा सराव करावा लागतो.

● आपल्याकडच्या सर्व सोयी-सुविधा उजव्या हाताला लक्षात घेत बनलेल्या आहेत. मग त्यात कात्री असो, कॉम्प्युटरचा माऊस असो, फिशिंग रॉड असो, दरवाज्याचं हॅन्डल,

गिटारच्या तारा, शर्टची बटणं, शिलाई यंत्र अशा अनेक गोष्टी निरीक्षण केल्यास सापडतील ज्या केवळ उजव्या हाताचा विचार करुन केल्या आहेत. त्यामुळे उजव्या हाताच्या व्यक्तीला सहज जमणाऱ्या गोष्टी डाव्या हाताच्या व्यक्तीला अत्यंत कठीण होऊन जातात.

डावखुऱ्या लोकांचा क्लब पण आहे !

डाव्या लोकांच्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी किंवा त्यांना पडलेल्या डावखुऱ्या नावाला कायमचं मिटवून सामान्य व्यक्ती म्हणून त्याच्याकडे पाहण्यासाठी डाव्या हाताच्या लोकांचा हक्काचा असा एक क्लब देखील आहे.

आज जगात त्यांच्या सर्वत्र शाखा निर्माण झालेल्या आहेत. या क्लबच्या स्थापनेनंतरच डावखुऱ्यांसाठी १३ ऑगस्ट हा जागतिक “लेफ्ट हँडर्स डे” म्हणून साजरा केला जातो.

डावखुऱ्या लोकांबाबतच्या विकृत प्रथा –

● फार पूर्वी जपानमध्ये अशी समज रुढ होती की, डावखुरी स्त्री ही चेटकीण असते. त्यामुळे लग्नांनतर ती डावखुरी आहे, हे समोर आलं तर कोणताही विचार न करता तिला घटस्फोट दिला जाई.

● चीन, जपान तसेच इतर देशांमध्ये राजे-रजवाडे डाव्या हाताच्या महिलेशी लग्न करत पण तिला कधीही पत्नीचा दर्जा देत नसत. तिला रखेल म्हणून रहावं लागे.

● एस्किमो लोकांच्या समाजात हा विचार रूढ होता की, डावखुरी व्यक्ती जादूचे प्रयोग करणारी किंवा चेटूक करणारी असते. त्यामुळे लोक त्यांना घाबरत किंवा समाजातून वगळत.

● भारतात आजही डावं-उजवं फार केलं जातं. प्रसाद घेताना डावा नाही उजवा हात. पैसे देताना डावा नाही उजवा हात अशा अनेक गोष्टीत उजव्या हाताला शुभ आणि डाव्याला अशुभ मानलं जातं जे आजच्या काळात बदलणं अत्यंत आवश्यक आहे.

● भारतातील बहुतांश घरात डावखुऱ्या मुलांना लहानपणापासूनच उजव्या हाताने काम करण्याचा अट्टहास केला जातो. जर त्यांनी तसं केलं नाही तर शिस्त लावण्याच्या नावाने मुलांच्या डाव्या हातावर फटके, चटके दिले जातात.

ज्यामुळे अनेक प्रकरणात मुलाचा हात खिळखिळा होतो किंवा ते उजव्या हाताने काम करु लागल्याने त्यांच्या विकासात बाधा येते. मुलं अपंगत्व आल्याप्रमाणे वागू लागतात. एकूणच त्यांच्या मानसिकतेवर त्याचा परिणाम होतो.

डावखुऱ्यांचे देश –

लंडन आणि ब्रिटनमध्ये जवळजवळ ७० ते ८० लाख लोक डावखुरे आहेत. ब्रिटन आणि लंडनमध्ये खास डावखुऱ्यांना लक्षात घेत सोईसुविधा उपलब्ध आहेत. लंडनमध्ये १९६८ पासून ‘एनीथिंग लेफ्ट हॅन्डेड’ नावाचं पहिलं डावखुऱ्यांचं दुकान आहे. तेथील कर्मचारी डावखुरेच आहेत. डाव्या हाताने वापरता येईल असं सर्व सामान दुकानात मिळतं.

यशस्वी डावखुरी माणसं –

आपल्याला आजवर हे माहीत नसेल, पण यशाचं शिखर गाठलेली अनेक माणसं डावखुरी होती. त्यात चार्ली चॅप्लिन, टॉम क्रुज, सचिन तेंडुलकर, ज्यूलियस सीझर,

ॲलन बॉर्डर, महात्मा गांधी, अमिताभ बच्चन, आइनस्टाइन, जॉर्ज बुश, प्रिन्स विल्यम्स अशी अनेक महान व्यक्तिमत्व येतात. त्यामुळे डावखुरे अधिकच हुशार असतात, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

तुम्हाला हा लेख कसा वाटला हे नक्की सांगा आणि आपल्या डावखुऱ्या मित्र मैत्रिणींचा न्यूनगंड कमी करण्यासाठी त्यांना हा लेख नक्की पाठवा.

]]>
https://www.batmi.net/what-is-the-unique-characteristic-of-left-handed-people/feed/ 0 26345
असं घडलं सुवर्ण मंदिरातील ऑपरेशन ब्ल्यूस्टार! https://www.batmi.net/operation-bluestar-in-the-golden-temple-happened/ https://www.batmi.net/operation-bluestar-in-the-golden-temple-happened/#respond Thu, 18 Aug 2022 05:42:06 +0000 https://www.batmi.net/?p=26343 १९८४ मधल्या जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारताच्या राजकीय इतिहासाला कलाटणी देणारी घटना घडली. त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी शीख अतिरेकी जर्नेलसिंग भिंद्रनवाले आणि त्यांच्या अनुयायांना अमृतसरमधील सुवर्ण मंदिरातून बाहेर काढण्यासाठी कारवाई करण्याचा आदेश भारतीय लष्कराला दिला.

ही मोहिम ऑपरेशन ब्लूस्टार म्हणून ओळखली जाते. ३ जून ते ६ जून १९८४ दरम्यान ही मोहीम अखंडपणे चालली. ६ जूनला ही मोहीम थांबली तेव्हा भारतातील राजकारण वेगळ्याच दिशेने जाणार आहे याची नांदी झाली होती. आज त्या घटनेला ३८ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या निमित्ताने जाणून घेऊया या कारवाईत नेमकं काय काय घडलं ते.

भिंद्रनवालेंची पार्श्वभूमी

फुटीरतावाद्यांना जसा काश्मीर वेगळा हवा आहे अगदी तसंच शिखांचं ‘खलिस्तान’ हे वेगळं राष्ट्र निर्माण करण्यासाठीच्या चळवळीला ‘खलिस्तानवादी चळवळ’ म्हणून ओळखले जाते. खलिस्तानवादी चळवळीची बीजं जरी ४० च्या दशकात रूजली असली तरी तिला तळागाळात पोहोचायला १९८० साल उजाडलं.

भिंद्रनवाले हे दमदमी टकसालचे नेते होते. त्यावेळी खलिस्तानच्या मागणीला नव्याने वाचा फोडणारे म्हणून भिंद्रनवाले यांच्याकडे पाहिले जात होते. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा शीख तरुणांवर प्रभाव पडला होता. खलिस्तानची मागणी जोर धरू लागली होती.

या मागणीमागे अनेक कारणे होती. यात चंदीगडचा समावेश पंजाबमध्ये करावा, पंजाब मधून वाहणाऱ्या नद्यांचे पाणी हरयाणा आणि राजस्थानला मिळू नये, अशा मागण्या होत्या. यासोबत पंजाबात झालेल्या राजकीय घडामोडी आणि त्यातून फुटीरतावाद्यांना मिळणार पाठींबा यामुळे खलिस्तानची मागणी वाढू लागली होती.

डिसेंबर १९८३ मध्ये भिंद्रनवाले आणि त्याने खलिस्तानवादी साथींनी अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात असलेल्या अकाल तख्त संकुलाचा ताबा घेतला. इथूनच सूत्रे हलवून त्यांनी अनेकांच्या हत्या घडवून आणल्या.

त्यांचा बिमोड करण्यासाठी आणि त्यांच्या तावडीतून सुवर्णमंदिर किंवा हरमंदिर साहिब परिसर मुक्त करण्यासाठी सैन्याला सुवर्ण मंदिरात घुसून कारवाई करण्याचे आदेश देण्यापलीकडे तात्कालीन पंतप्रधन इंदिरा गांधी यांच्याकडे कोणताही पर्याय नव्हता. या मोहिमेला ‘ऑपरेशन ब्लूस्टार’ हे नाव दिलं आणि कारवाई सुरु झाली.

ऑपरेशन ब्लूस्टारची प्रत्यक्ष कारवाई

हे ऑपरेशन १ ते ८ जूनच्या दरम्यान चालवले जाणार होते असे सांगितले जाते. पण, मुख्य हल्ला ३ ते ६ जून दरम्यान झाला ज्यात सुरुवातीच्या हल्ल्यात लष्कराचे अनेक जवान शहीद झाले. सैन्याला कळले की,

भिंद्रनवाले आणि त्याच्या समर्थकांकडे अँटी-टँक गन, रॉकेट लॉन्चर, स्नायपर गन यांसारखी आधुनिक शस्त्रे आणि सर्वात जास्त प्रशिक्षित लोक होते. या लोकांना जनरल शाबेग सिंग या भिंद्रनवालेच्या सहकाऱ्याने प्रशिक्षण दिले होते. हा शाबेग भारतीय सैन्यात मेजर जनरल होता. बांगलादेश मुक्ती युद्धादरम्यान मुक्ती वाहिनीच्या स्वयंसेवकांच्या प्रशिक्षणात त्याचा सहभाग होता.

विरोधकांची ताकद लक्षात आल्यानंतर ६ जून रोजी लष्कराने अकाल तख्तवर रणगाड्याने हल्ला केला. रणगाडे थेट सुवर्ण मंदिरात घुसले.

यावेळी हल्ल्यात भिंद्रनवाले यांचा मृत्यू झाला. तसेच त्यांचे समर्थक एक तर मारले गेले किंवा त्यांनी आत्मसमर्पण केले. लष्कराच्या म्हणण्यानुसार या हल्ल्यात सुमारे ८३ जवान शहीद झाले आणि २५० जखमी झाले, तर भिंद्रनवालेसह त्यांच्या समर्थकांचा मृतांचा आकडा ५०० च्या आसपास पोहोचला.

हल्ल्यानंतर सुवर्ण मंदिराची पाहणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ज्यांना पाहून त्यांची तयारी प्रदीर्घ लढाईची होती याचा अंदाज बांधता येतो.

ऑपरेशन ब्ल्यूस्टार नंतरचे पडसाद

या कारवाई दरम्यान मीडियाला पंजाबमध्ये प्रवेश करण्यापासून पूर्णपणे रोखण्यात आले होते. यापूर्वी पंजाबमध्ये पोहोचलेल्या मीडिया कर्मचाऱ्यांना बसमध्ये बसवून हरियाणा सीमेवर उतरवण्यात आले.

पंजाबमध्ये कर्फ्यूची परिस्थिती असल्याने त्यांना प्रवासासाठी कोणतेही साधन उपलब्ध नव्हते. यामागील आणखी एक कारण असे मानले जात होते की, सुवर्ण मंदिरावर कब्जा करणाऱ्या कट्टरतावाद्यांपर्यंत सरकारच्या कारवाईची माहिती पोहोचली नाही.

या घटनेमुळे शीखांमध्ये इंदिराजींबद्दल द्वेषाची भावना निर्माण झाली होती आणि या कारवाईचा परिणाम असा झाला की इंदिरा गांधींना ३१ ऑक्टोबर १९८४ मध्ये दोन शीख अंगरक्षकांनी गोळ्या घालून ठार मारले.

तसेच याच घटनेमुळे १९८५ मध्ये मॉन्ट्रियलहून दिल्लीला जाणारे एअर इंडियाचे कनिष्क विमान उडवण्यात आले होते. यामध्ये एकूण ३२९ लोकांचा मृत्यू झाला असून त्यात बहुतांश हिंदू प्रवासी होते. यानंतर १९८४ मध्ये राजीव-लोंगोवाल यांच्यात पंजाब भारतातच राहील याबद्दल करार झाला.

लोंगोवाल यांनी या करारावर स्वाक्षरी केली होती म्हणून त्यांचीही १९८५ मध्ये हत्या झाली. १९८६ मध्ये ऑपरेशन ब्लूस्टारच्या वेळचे लष्करप्रमुख जनरल अरुणकुमार वैद्य यांचीही हत्या झाली आणि जनरल ब्रार यांच्या जीविताला असलेला धोका लक्षात घेऊन त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली आणि ती आजही कायम आहे.

राजकारण, धर्म, अस्मिता, फुटीरता आणि संघर्ष असे विविध पैलू असलेली ऑपरेशन ब्लूस्टारची ही थरारक कथा आहे जी येणारी अनेक वर्षे स्मरणात राहील. पण ही फार मोठी शिकवण सुद्धा आहे. सशस्त्र संघर्ष हे कोणत्याही आंदोलनाला यशस्वी करीत नाही.

आपल्या विरोधात जे जे गेले त्या त्या लोकांना फुटीरतावाद्यांनी संपवलं पण या सगळ्याची अखेर कोणा एका व्यक्ती किंवा संघटनेच्या हितासाठी नाही तर समस्त देशाला एकसंध ठेवणाऱ्या विचारानेच झाली. तुम्हाला या ऑपरेशन ब्लूस्टार विषयी काय वाटते ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

]]>
https://www.batmi.net/operation-bluestar-in-the-golden-temple-happened/feed/ 0 26343
कवयित्री शांता शेळकेंच्या आनंददायी कविता… https://www.batmi.net/poet-shanta-shelkes-delightful-poems/ https://www.batmi.net/poet-shanta-shelkes-delightful-poems/#respond Thu, 18 Aug 2022 05:39:58 +0000 https://www.batmi.net/?p=26341 महाराष्ट्राच्या मातीतून प्रतिभाशाली कवी – कवयित्रींच्या कविता फुलल्या. या कवितांनी मराठी रसिकजन मंत्रमुग्ध होऊन गेले. पण एकाच वेळी कविता,

ललित लेखन, कथा संग्रह, कादंबरी-लेखन, मराठी भाषांतर अशा अनेक साहित्य प्रकारांत सहज संचार करून आणि ओघवत्या शैलीत आशय मांडून चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ कवयित्री कै. शांता शेळके या अलग भासतात.

६ जून हा त्यांचा स्मृतीदिन. हे वर्ष त्यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या काही कवितांचा आस्वाद घेता यावा म्हणून केलेला हा लेखनप्रपंच.

शांताबाईंच्या कविता या विविधतेनं नटल्या आहेत. निराळ्या स्वरूपाच्या वेगळ्या धाटणीच्या या कविता आहेत.

ऋतू हिरवा, ऋतू बरवा
पाचूचा वनी रुजवा
युग विरही हृदयावर
सरसरतो मधू शिरवा….

हिरवाईने नटलेली सृष्टी, चहूबाजूला जणू पाचूच उगवून आल्याने ही हिरवाई येते. पृथ्वीवर पावसाचा मोहक शिडकावा झाला म्हणून ती सर्वत्र बहरून जाते…

कारण ती पाण्यासाठी झुरते…. निसर्गाचं इतकं समर्पक वर्णन करणं.. हे शांताबाईच करू जाणे! या रम्य निसर्गाच्या वर्णनानंतर हे बालगीत पहा….

कुणी पाडती चिंचा बोरे,
“एक आकडा मलाही दे रे”
झाडाखाली कुणी बापडा लावील लाडीगोडी…?
मारू बेडूक उडी गड्यांनो, घालूया लंगडी….
लपाछपी खेळता देऊ या झाडामागे दडी

या ओळी आपल्याला लहान मुलाचं भावविश्व दाखवतात. त्यांच्या जीवनात घडणाऱ्या गोष्टीही इतक्या चपखलपणे या गीतातून शांताबाईंनी मांडल्या आहेत. यापुढे बाल्यावस्था संपवून तरुणपणात आल्यावर तारुण्यसुलभ प्रेम भावना सांगणारं हे गीतच पहा.

चांदनं रुपाचं आलंय भरा
मुखडा तुझा गं अति साजरा
माझ्या शिवारी ये तू जरा
चारा घालीन तुज पाखरा
माझे डोळे शिणले गं,
तुझी वाट पाहुनी, गं… ये ये ये ये ये…
गुलाबी गालांत हसत ये ना
सखे गं साजणी! ये ना!
मनाच्या धुंदीत लहरीत येना, सखे गं साजणी ये ना!

प्रेयसीला साद घालणाऱ्या प्रियकराच्या मनाची घालमेल या शब्दांमध्ये दिसते. तिला भेटण्याची तीव्र इच्छा धरून तो तिला बोलवत आहे, त्याची आर्तताही आपल्याला जाणवते.

हात तुझा हाती असावा, साथ तुझी जन्मांतरी
मी तुझिया मागून यावे, आस ही माझ्या उरी
तुज संगती क्षण रंगती, निमिषात मी युग पाहते
दिसते मजला सुखचित्र नवे
मी संसार माझा रेखिते….

प्रेमाच्या एक पाऊल पुढे जाऊन जेव्हा एखादी स्त्री सुखी संसाराची स्वप्नं रंगवताना काय विचार करते? तिच्या आपल्या साथीदाराकडून काय अपेक्षा असतात? हे साध्या सोप्या शब्दांत किती सुंदरतेनं मांडलं आहे! आता याच मुलीचं जेव्हा लग्न होतं आणि पाठवणीची वेळ येते तेव्हा वधुपिता काय म्हणतो?

हातात बाळपोथी, ओठांत बाळभाषा
रमलो तुझ्यासवे मी गिरवीत श्रीगणेशा
वळवून अक्षरांना केले तुला शहाणे
जातो सुखावुनि मी या गोड आठवाने
दाटून कंठ येतो, ओठांत येई गाणे
जा आपुल्या घरी तू, जा लाडके सुखाने

त्या पित्याच्या डोळ्यासमोर झरझर आपल्या लाडकीचं आजवरचं आयुष्य शब्दगणिक येतं जातं. एका डोळ्यांत आनंद; दुसऱ्यात अश्रू ही संमिश्र भावना ही यात पहायला मिळते.

हीच स्त्री लग्न करून संसारात रममाण होते आणि एके दिवशी तिला तिचं कपाट आवरताना एक जपून ठेवलेली आठवण सापडते…

फडताळात एक गाठोडे आहे
त्याच्या तळाशी अगदी खाली
जिथे आहेत जुने कपडे
कुंच्या टोपडी शेले शाली
त्यातच आहे घडी करुन
जपून ठेवलेली एक पैठणी
नारळी पदर जरी चौकडी
रंग तिचा सुंदर धानी
माझी आजी लग्नामध्ये
हीच पैठणी नेसली होती….

संसार सुरळीत चालला आहे आणि असाच चालत रहावा व अजून सुखी व्हावा म्हणून देवापुढे हात जोडले जातात आणि त्याचं स्तवन केलं जातं.

जन्मजन्मांचा हा योगी,
संसारी आनंद भोगी
विरागी की म्हणू भोगी
शैलसूतासंगे गंगा मस्तकी वाहे
मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश
माझ्याकडे देव माझा पाहतो आहे….

उमापती मंगेशाचं स्वरूप डोळ्यांसमोर साक्षात उभं करणारं हे भक्तीगीत आहे.

भक्तीरसात न्हाऊन निघाल्यानंतर पाळी आहे वीररसाची….

आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत
तलवारीशी लगीन लागलं जडली येडी प्रीत
लाख संकटं झेलून घेईल अशी पहाडी छाती !
देव, देस अन्‌ धर्मापायी प्रान घेतलं हाती !
शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती?

देवाला हात जोडले, आशिर्वाद घेतला पण देव, देश आणि धर्माचं रक्षण ही जबाबदारी पार पाडणं, त्यासाठी प्राणार्पण करणं हे पोटातूनच शिकून आला आहे तोच खरा शूरवीर..

भावगीत, भक्तीगीत, कविता, चित्रपटगीतं हे विविध प्रकार आणि आपल्या काव्यातून शब्दचित्र उभं करण्याची प्रतिभा… खरंच देवी सरस्वतीचा वरदहस्त शांताबाईंना लाभला होता. म्हणून त्यांनी तिचीच स्तुती ‘जय शारदे’ या गीतातून केली.

शांताबाईंना जाऊन आज दोन दशकं उलटून गेली. उद्या शतकं उलटल्यानंतर ही तरी त्यांनी स्वतःबद्दल, स्वतःच्या गीतांबद्दलही त्यांची समर्पक रचना आहे.

असेन मी, नसेन मी​ तरी असेल गीत हे​
फुलांफुलांत येथल्या​ उद्या हसेल गीत हे…

वाग्विलासिनी शांताबाई शेळके यांच्या स्मृतींस विनम्र अभिवादन!.!.!

तुम्हालाही आवडणाऱ्या शांता शेळकेंच्या कविता कमेंट करून सांगा.

]]>
https://www.batmi.net/poet-shanta-shelkes-delightful-poems/feed/ 0 26341
स्वतःच्या मनाने औषध घेण्याचे काय परिणाम होतात? https://www.batmi.net/what-are-the-consequences-of-self-medication/ https://www.batmi.net/what-are-the-consequences-of-self-medication/#respond Thu, 18 Aug 2022 05:36:29 +0000 https://www.batmi.net/?p=26336 केके अर्थात कृष्णकुमार कुन्नथ या प्रसिद्ध गायकाचं नुकतंच दुर्दैवी निधन झालं. पोस्टमार्टममध्ये केकेच्या शरीरात दहा वेगवेगळी औषधे आढळून आली आहेत, तसेच ॲसिडिटी, पोटाची जळजळ आणि गॅसमध्ये

त्वरित आराम देणारी मल्टिपल अँटासिड्स आणि सिरप आढळून आली आहेत. केके आम्लपित्ताच्या गोळ्या सतत घेत होते. ही सवय आपल्यालाही असते. अनेकदा आपणही डॉक्टरांना न विचारता स्वतःच औषधं घेत असतो. पण ही सवय योग्य नाही. ते का हे आपण या लेखात समजून घेऊया.

  • वेदनाशामक औषधे

औषधाच्या दुकानात ज्याला सगळ्यात जास्त मागणी असणारी औषधं कोणती तर ही वेदनाशामक औषधं म्हणजेच पेन किलर. डॉक्टरांच्या सल्ला विचारात न घेताच या गोळ्या मोठ्या प्रमाणावर घेतल्या जातात.

या गोळ्या घेण्यासाठी डॉक्टरांच्या चिठ्ठीचीही दुकानदार विचारपूस करत नाहीत म्हणून सतर्क रहायला हवं. डोकेदुखीसाठीही सतत या गोळ्या घेत राहू नये.

सगळ्यात जास्त प्रसिद्ध वेदनाशामक औषध आहे, ते म्हणजे पॅरासिटामॉल. याच्या अतिसेवनाने अनेक दुष्परिणाम होतात.

●पॅरॅसिटॅमोलमधील वेदनाशमन करणाऱ्या घटकामुळे झोप, मरगळ येते. म्हणूनच ही गोळी किती प्रमाणात घ्यायची हे स्वतः ठरवू नका.

●पॅरॅसिटॅमोलच्या गोळ्या सतत घेतल्यास गॅस्ट्रायटीस म्हणजे जठराला सूज येऊ शकते. म्हणजेच पचनक्रियेत बिघाड होण्याचीही शक्यता असते.

●काही जणांना पॅरॅसिटॅमोल वरचेवर घेतल्यामुळे हायपरसेन्सिटीव्हीटीचा त्रास होऊ शकतो. यामुळे त्वचेवर अ‍ॅलर्जी येऊ शकते.

● अतिप्रमाणात याचे सेवन केल्यामुळे यकृतावर याचा विपरीत परिणाम होतो. याबद्दल पाकीटाच्या मागे लिहलेलं सुद्धा असतं. म्हणून डॉक्टरांनी सल्ला दिल्याशिवाय ही गोळी बिलकुल घेऊ नका.

  • अ‍ॅन्टीबायोटिक्स –

सर्दी, खोकला यासारखे वरचेवर होणारे आजार बरे करण्यासाठी प्रतिजैविके म्हणजेच अ‍ॅन्टीबायोटिक्स घेतली जातात. ही औषधे जंतू संसर्गामुळे होणारे आजार बरे करण्यासाठी घेतली जातात. इथं जंतू म्हणजे जीवाणू किंवा बॅक्टेरियामुळे होणारे आजार असं अपेक्षित आहे.

यासाठीही डॉक्टरांचा सल्ला आवश्यक असतो. सर्दी-खोकला यासारखे आजार विषाणूंमुळे होतात. विषाणूंवर जीवाणूविरोधी औषधे उपयोगी येणार नाहीत. याप्रकारची औषधे जी आपण घेत असू ती दुसऱ्या कोणाला देऊ नयेत. अशी औषधे दुध पितानाही घेऊ नका.

  • बद्धकोष्ठता

बद्धकोष्ठता हा पचनसंस्थेचा आजार बऱ्याच लोकांना होणारा आहे. शौच कठीण होऊन सहजगत्या उत्सर्जित होण्यास अडचण येणे म्हणजे बद्धकोष्ठता. हा त्रास आपल्याला साधारण वाटू शकतो.

म्हणून आपणच स्वतःच्या मनानेच औषधे घेत राहतो. पण यासाठी डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे. यावर उपचार करण्यासाठी घेतली जाणारी औषधे ही लॅक्झॅटिव्ह म्हणून ओळखली जातात.

ही औषधे बाकी औषधांबरोबरही घेऊ नयेत, कारण त्यांचं मिश्रण वेगळाच परिणाम करण्याची शक्यता असते. मूत्रपिंडाचे विकार, हृदयविकार यांवर औषधे चालू असणाऱ्यांनी डॉक्टरांना विचारूनच ही औषधे घ्यावीत.

म्हणून आपण औषधं जरी तब्येत बरी व्हावी म्हणून घेत असलो तरी त्याची योग्य मात्रा, गरज आणि परिणाम याविषयी डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यावश्यक आहे.

नाहीतर तात्पुरता आराम मिळवण्याच्या नादात आपण एखादा मोठा दुर्धर आजार मागे लावून घेऊ. हा लेख शक्य होईल तितक्या अधिक लोकांपर्यंत पोहोचवा आणि स्वतःची व तुमच्या जवळच्या लोकांची काळजी घ्या.

]]>
https://www.batmi.net/what-are-the-consequences-of-self-medication/feed/ 0 26336
आयुष्य बदलण्यासाठी फक्त या ७ गोष्टी करा… https://www.batmi.net/just-do-these-7-things-to-change-your-life/ https://www.batmi.net/just-do-these-7-things-to-change-your-life/#respond Thu, 18 Aug 2022 05:33:24 +0000 https://www.batmi.net/?p=26334 बहुतेक जण एक चौकटबद्ध आयुष्य जगत असतात. तसं आयुष्य जगणंही आवश्यक आहेच. पण ठराविक काळानंतर आपल्याला त्या दैनंदिन जीवनाचा कंटाळा येऊ लागतो. आयुष्यामध्ये काहीतरी नवीन हवं असतं.

पण लोक नवीन गोष्टी न शोधता आहे त्या जीवनाबद्दल रडत राहतात. त्यापेक्षा अशा काही गोष्टी आपण करू शकतो, ज्यामुळे आपलं आयुष्य बदलून जाईल आणि आयुष्यात आनंदाचं भरतं येईल. या सोप्प्या गोष्टी जाणून घेऊन तुमचं आयुष्यही सुंदर करायचं असेल तर हा लेख शेवटपर्यंत वाचा.

  • मी माझं जीवन कसं बदलू शकतो?

जीवनात बदल घडवून आणण्यासाठी आपल्या जीवनात काय महत्त्वाचं आहे, हे शोधण्यासाठी थोडा वेळ घालवावा लागेल. आपल्याला आयुष्यात काय साध्य करायचे आहे, आपली स्वप्नं काय आहेत, आपल्याला कशामुळे आनंद होतो, जीवन जगण्याचा आपला उद्देश आणि जीवन कसं जगायचं आहे, याची दिशा आपणच शोधायला हवी.

  • प्रवासातून मार्ग कसा मिळतो?

आपण कामानिमित्त जवळच्या अथवा लांबच्या प्रवासाला जात असतो. पण किती वेळा तो प्रवास आपण एन्जॉय करतो, हा प्रश्न स्वतःला विचारायला हवा. कामाच्या धावपळीत रोजच्या धकाधकीच्या जीवनात असे

काही खास वेगळे प्रवास जोडीदारासोबत, कुटुंबासोबत किंवा मित्र-मैत्रिणींसोबत करायला हवेत. त्यांच्यासोबत राहून काही क्षणांचा आनंद मिळवायला हवा. आपल्या आयुष्यातले काही महत्त्वाचे दिवस असे आनंददायी प्रवास करून संस्मरणीय बनवायला हवेत.

  • मुलांसोबत वेळ घालवण्याचे फायदे

हल्लीचे पालक हे दोघे नोकरी करतात किंवा व्यवसायातही एकमेकांना साथ देतात. स्वतःच्या आणि मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी ते खूप कष्ट करतात. पण या कष्ट करण्याच्या धावपळीच्या काळात या पालकांना मुलांना तितकासा वेळ देणं जमत नाही.

मुलं डोळ्यासमोर मोठी कधी झाली, कळतंच नाही. मागील काही वर्षांमध्ये लॉकडाऊनमुळे पालकांनी मुलांसोबत खूप छान क्षण व्यतीत केले, सर्वांच्याच कुटुंबात आलेल्या अशा क्षणांनी सर्वांना खूप काही शिकवलं. पण यापुढे हे क्षण अनुभवायला लॉकडाऊनची गरज नसावी.

  • आरोग्याची काळजी घ्यावी

आपण नवीन वर्षाच्या सुरुवातीला ठरवतो की, या वर्षी व्यायाम सुरू करणार. धावणार, चालणार, आणि स्वतःचा फिटनेस जपणार पण पुन्हा आपण नेहमीच्या कामाला लागतो आणि या फिटनेससारख्या महत्वाच्या गोष्टी मागे पडतात.

आज कमी वयात बऱ्याच जणांना मधुमेह, रक्तदाब, अशा विकारांना सामोरं जावं लागतं. आपली जीवनशैलीही त्याला कारणीभूत ठरते. म्हणून आपलं वेळापत्रक असं बनवायला हवं की, फिटनेस सांभाळण्यासाठी व्यायाम, प्राणायाम करून दिवसाची प्रसन्न सुरुवात करता येईल.

  • पश्चात्ताप सोडून द्यावा

पश्चात्ताप आपल्याला आयुष्यात मागे ठेवतो. जर आपण सगळा वेळ भूतकाळाबद्दल विचार करण्यात घालवला तर वर्तमान आणि भविष्यकाळ आपल्या हातून निघून जाईल. भूतकाळात जे काय झालं ते घडून गेलं, आता ते बदलता येणार नाही.

म्हणून गेलेलं जे आहे, ते सोडून देता आलं पाहिजे. आता सध्याचे आणि भविष्यातील जीवन कशा पद्धतीनं जगायचं हे जर का ठरवलं तर हा पश्चाताप करण्यावर नियंत्रण ठेवता येईल. आधी घडून गेलेल्या गोष्टींचा स्वतःवर होणारा नकारात्मक परिणाम दूर सारता यायला हवा.

गंमत वाटेल पण पश्चाताप करण्यासारखी गोष्ट एका कागदावर लिहून तो कागद जाळून किंवा पुरून टाकावा. एकदा प्रयत्न करून बघा. तुम्हाला नक्की समाधान मिळेल.

  • भीतीचा सामना करावा

आपल्या भीतीवर प्रभुत्व मिळवायला शिकायला हवं. कारण ही भीती आपल्याला नियंत्रणात ठेवते. अपयशाची भीती असो, एकाकीपणाची किंवा अज्ञाताची, ती आपल्याला आपलं आयुष्य मोकळेपणाने जगण्यापासून रोखते.

असंतुष्ट आणि अतृप्तीची भावना मनातून काढली तर भीतीदेखील निघून जाईल. जेव्हा आपल्याला आपल्या भीतीचा सामना करावा लागतो तेव्हा आपण आपले जीवन कसे जगायचे हे निवडण्यासाठी आपली विचारशक्ती पणाला लावा आणि या शक्तीच्या बळावर भीतीला पराभूत करा.

  • शिकण्याचा आनंद अनुभवावा

प्रत्येक वेळी तुम्ही काहीतरी नवीन शिकता तेव्हा आपल्याला अधिक ज्ञान मिळते आणि अधिक ज्ञानाने अधिक आत्मविश्वास येतो. नवीन कौशल्ये शिकणे आपल्याला नवीन परिस्थितींमध्ये अधिक जुळवून घेण्यास मदत करते.

नवं शिक्षण आपल्याला अधिक सर्जनशील आणि नाविन्यपूर्ण बनण्यासाठी प्रोत्साहित करते. वाचन हा आपल्यासाठी नवीन काहीतरी शिकण्याचा उत्तम मार्ग आहे. शिकण्याचा आनंद पूर्णपणे आत्मसात करण्यासाठी,

अशी प्रेरणादायी पुस्तकं वाचायला हवीत ज्यामध्ये नवनवीन गोष्टी व्यवस्थितपणे शिकता येतील. सर्वात जास्त आवडणारं कौशल्य याच पुस्तकातून मिळून जाईल.

आपण सकारात्मक वृत्तीने या गोष्टी करायला हव्यात. लक्षात ठेवायला हवं की बदलाला वेळ लागतो. जेव्हा आपण आपलं आयुष्य कायमचं बदलण्याचा निर्णय घेतो तेव्हाच नव-आयुष्य सुरू होतं! नाही का? लेख आवडला असेल, विचार पटले असतील तर कमेंट करून नक्की सांगा आणि इतरांसोबत शेयरही करा.
]]>
https://www.batmi.net/just-do-these-7-things-to-change-your-life/feed/ 0 26334
अशी झाली बाजीराव आणि मल्हाररावांची पहिली भेट… https://www.batmi.net/this-is-how-bajirao-and-malharrao-met-for-the-first-time/ https://www.batmi.net/this-is-how-bajirao-and-malharrao-met-for-the-first-time/#respond Tue, 09 Aug 2022 05:34:00 +0000 https://www.batmi.net/?p=26394 इतिहासाच्या पानांमधील पराक्रमाचा नि निष्ठेचा गंध असणारा खंडोबाचा भंडारा म्हणजे सुभेदार मल्हारराव होळकर. ज्यांच्या धाकाने “मल्हार आया मल्हार आया” असे म्हणत गनिम दुरूनच पळून जायचा त्या मल्हारराव होळकरांची आज पुण्यतिथी आहे.

२० मे १७६६ ला आलमपूर इथे असताना मोहिमेदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अहिल्याबाईंनी त्यांची तिथे समाधी बांधली व आलमपूरचे नाव बदलून मल्हारनगर ठेवले. मल्हारराव होळकर एक कर्तबगार सेनानी

होतेच त्यांच्या पराक्रमाचे किस्से आपण ऐकलेच असतात पण पुण्यतिथी निमित्त जाणून घेऊ त्यांची आणि बाजीराव पेशव्यांची ओळख कशी झाली? हे दोन्ही योद्धे शत्रुत्वापासून मित्रत्वाकडे कसे वळले? नेमके असे काय झाले होते की मल्हाररावांनी थेट बाजीराव पेशव्यांना मारायची धमकी दिली होती? पाहुयात.

मल्हारराव हे जेजुरी जवळ असणाऱ्या होळ गावात जन्मले. त्यांचे वडील खंडोजी अत्यंत पराक्रमी होते पण मल्हारराव तीन वर्षांचे असतानाच खंडोजी युद्धात धारातीर्थी पडले. इतक्या लहान वयात पित्याचे छत्र हरवले होते. अखेर त्यांच्या मातोश्री आपल्या लहानग्या मुलास घेऊन आपल्या माहेरी आल्या.

भोजराज हे मल्हाररावांचे मामा कदम-बांडे सरदारांकडे कामाला होते. ह्याच वातावरणात मल्हारराव मोठे झाले. त्यांनी आपल्या मामाच्या मुलीसोबत विवाह केला व स्वतःच्या कर्तबगारीवर कदम-बांडे सरदारांकडे काम करू लागले. त्यांच्या दिमतीस ५०० ची फौज होती.

मल्हाररावांचा मुळात असणारा चांगला नि भोळा स्वभाव. त्यात ते अडीअडचणीला इतरांच्या मदतीला धावून जायचे तसेच आपल्या सैन्यातील लोकांवर ते भावाप्रमाणे प्रेम करायचे ह्याच त्यांच्या गुणांमुळे लोक त्यांच्या शब्दाखातर शस्त्र उचलायला तयार व्हायचे. असे हे मल्हारराव होळकर आता रणमैदान गाजवू लागले होते.

जेव्हा शाहू महाराज व बाळाजी विश्वनाथ भट ह्यांनी दिल्लीवर स्वारी केली तेव्हा त्यात कदम-बांडे ह्यांचे ५०० सैनिक होते. त्यांचे नेतृत्व स्वतः मल्हारराव करत होते. ह्यात मल्हाररावांचे काही लोक थोडे हट्टी होते. मल्हाररावांचे सोडून ते कुणा दुसऱ्याचे ऐकत नसायचे.

तेव्हाचीच ही घटना आहे. दिल्लीला जात असताना मल्हाररावांच्या दोन-तीन सैनिकांनी आपले घोडे थेट शेतकऱ्यांच्या वावरात नेले. तिथे घोड्यांना चारले. शेताची नासधूस झाली आणि शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. ह्या शेतकऱ्याने थेट बाळाजी विश्वनाथ ह्यांना ह्या विषयी तक्रार केली. बाळाजींनी ह्यात स्वतः लक्ष न घालता आपल्या तरुण मुलास म्हणजेच बाजीराव ह्यास घडलेल्या गोष्टीचा निवडा करण्यास सांगितले.

तरुण वायतले बाजीराव पण होळकरांच्या छावणीत घुसले. मल्हाररावांना काहीही न सांगता बाजीरावांनी थेट त्या तीन सैनिकांना बांबूने बडवायला सुरुवात केली. इथे बाजीरावांनी मल्हाररावांना जाब विचारण्याऐवजी स्वतःच सैनिकांना शिक्षा द्यायला सुरूवात केली होती.

ह्याचा मल्हाररावांना चांगलाच राग आला. “मी ज्यांना भावांप्रमाणे वागवतो त्यांना हे पेशव्याचं पोरं बडवतंच कसं?” असं म्हणत मल्हाररावांनी चिखलाचे गोळे बाजीरावांवर फेकले. तिथून बाजीराव निघून गेले खरे पण त्यांच्या मनात देखील राग होता. चिखलाच्या गोळ्यांचे उत्तर त्यांना लढाईने द्यायचे होते.

तरुण वयातील बाजीरावांनी फौज जमवायला सुरुवात केली. हे मल्हाररावांना कळताच त्यांचा राग अधिकच वाढला. इतक्या छोट्या प्रकरणासाठी बाजीराव असे करतायत म्हटल्यावर मल्हारराव काय गप्प बसणार? त्यांनी आपले सारे घोडे सोडून दिले, लष्करी सामान पेटवले,

अंगावरचे कपडे काढून फेकले व राख फासून दूर जाऊन बसले आणि जाहीर केले की आम्ही आता संन्यास घेत आहोत. मल्हाररावांना मराठ्यांमध्येच युद्ध नको होते, म्हणून त्यांनी असे केले. त्यांना पाहून त्यांच्या सैनिकांनीही तेच केले.

आता मात्र कसलीही माहिती नसलेल्या बाळाजी विश्वनाथ ह्यांना ह्याची खबर मिळाली होती. ते मल्हाररावांकडे गेले व त्यांची समजूत काढली, बाजीरावांना देखील काही बोल सुनावले आणि अखेर हे प्रकरण मिटवण्यात आले.

मल्हाररावांना मात्र बाजीरावांचा सूड घ्यायचाच होता. “एवढं एवढं ते पेशव्याचं पोर, त्याची गुर्मी उतरलीच पाहिजे,” असे म्हणत एक दिवस बाजीराव एकटे असताना मल्हाररावांनी गाठले. मल्हाररावांचे काही साथीदार पण आपले भाले सरसावून उभे होते.

घोड्यावर असणाऱ्या मल्हाररावांनी एकट्या असणाऱ्या बाजीरावांच्या छातीवर भाल्याचे टोक ठेवले आणि म्हणाले, “घालू का ह्यो भाला आरपार, त्या दिवशी लैच गुर्मीत व्हतास. आता काय करशील?” बाजीराव घाबरले नाही ते म्हणाले, “काका मला जेवायचे आहे, तुम्ही पण आमच्या सोबत पंगतीस बसावे.” त्या काळात जातीव्यवस्थेमुळे वेगवेगळ्या जातीचे लोक एकत्र पंगतीला बसत नसायची.

पण बाजीरावांनी असे करून मल्हाररावांचे मन बदलले होते. मल्हाररावांना हे काहीच अपेक्षित नव्हते. जेवणाला बसल्यावर बाजीरावांनी मल्हाररावांना सांगितले, “आम्ही तुम्हाला ५००० ची फौज देऊ पण आमच्या पदरी काम करा.” मल्हाररावांनी समतेची वागणूक देण्याची बोली बाजीरावांकडून करून घेतली व अखेर मराठी सत्तेमध्ये मल्हारराव होळकर सामील झाले.

नंतर मल्हारराव ह्यांनी खूप निष्ठेने पेशवे दरबारी अर्थात बाजीरावांकडे काम केले. तसे मल्हारराव कर्तबगार सेनानी होतेच पण त्यांचे बाजीरावांविषयी असणारे शत्रुत्व संपत मित्रत्व कसे सुरू झाले हे ह्यातून समजते. तुम्हाला ही ऐतिहासिक घटना कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगा.

]]>
https://www.batmi.net/this-is-how-bajirao-and-malharrao-met-for-the-first-time/feed/ 0 26394