Parth Sutar – Batmi https://www.batmi.net Get marathi latest news Tue, 20 Sep 2022 09:36:27 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.2 https://www.batmi.net/wp-content/uploads/2022/09/cropped-Picsart_22-08-31_02-05-02-169-96x96.jpg Parth Sutar – Batmi https://www.batmi.net 32 32 201029915 प्रत्येक भारतीयाच्या मनात खदखदणारी फाळणीची घोषणा! https://www.batmi.net/the-announcement-of-partition-that-is-shocking-in-every-indians-mind/ https://www.batmi.net/the-announcement-of-partition-that-is-shocking-in-every-indians-mind/#respond Fri, 19 Aug 2022 07:45:54 +0000 https://www.batmi.net/?p=26378 भारताची फाळणी झाली म्हणून आपल्याकडे १४ ऑगस्ट हा पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन काळा दिवस मानतात. पण या दिवसाची बीजे ज्या दिवशी रोवली गेली तो दिवस होता, ३ जून १९४७. याच दिवशी तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांनी ही फाळणीची घोषणा केली.

पण या फाळणीच्या घोषणेनंतर काय झालं? याबद्दल थोडी खोलात जाऊन माहिती घेऊया. लेख पूर्ण वाचलात तर आपल्या देशाचा एक संघर्षमय इतिहास तुम्हाला समजेल.

भारताची फाळणी कशी झाली?

दुसऱ्या महायुद्धाच्या विरामानंतर इंग्लंडमध्ये ‘क्लेमेंट ऍटली’ हे ब्रिटिश पंतप्रधानपदी बसले. इंग्लंडकडून भारताकडे सत्ता देण्याची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी ‘माउंटबॅटन’ यांची भारतात व्हाइसरॉय म्हणून नियुक्ती केली.

त्यांनी एक योजना मांडली, ज्यात भारतातील तत्कालीन राज्ये स्वतंत्र ठेवून वेगवेगळी ठेवायची आणि त्यांना ‘संविधान सभेत’ सामील व्हायचे की नाही, हे निवडण्याची मुभा द्यावी, असा प्रस्ताव मांडला, त्याला जवाहरलाल नेहरूंनी विरोध केला तेव्हा माउंटबॅटननी ती योजना रद्द केली.

त्यांच्या या योजनेला ‘डिकी बर्ड योजना’ किंवा ‘भारताचे बाल्कनीकरण योजना’ असं म्हणतात. पुढे त्यांनी ३ जूनची योजना आणली.

३ जूनच्या योजनेत घोषित करण्यात आले की, भारत स्वतंत्र झाल्यानंतर दोन राष्ट्रांमध्ये विभागला जाईल – भारत आणि पाकिस्तान. १५ ऑगस्ट १९४७ रोजी विभाजन लागू झाले.

याच योजनेत फाळणीच्या तत्त्वांचा समावेश होता आणि भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना स्वायत्तता आणि सार्वभौमत्व दिले गेले.

तसेच राष्ट्रांना स्वतःची राज्यघटना तयार करण्याचा अधिकार दिला गेला. डिकी बर्ड योजनेपेक्षा वेगळी असणारी ही योजना काँग्रेस आणि मुस्लिम लीग या दोन्ही पक्षांनी स्वीकारली.

१९४७ चा भारतीय स्वातंत्र्य कायदा, जो ब्रिटिश संसदेत मंजूर झाला आणि १८ जुलै १९४७ रोजी त्यास शाही संमती प्राप्त झाली, तो माउंटबॅटन योजनेच्या आधारे तयार करण्यात आला.

या योजनेनुसार, ब्रिटीश सम्राट यापुढे ‘भारताचा सम्राट’ ही पदवी वापरणार नाही आणि ब्रिटीश पार्लमेंट दोन राष्ट्रांपैकी एकावर बंधनकारक असेल असा कोणताही कायदा करू शकत नाही.

नवीन राज्यघटना तयार होईपर्यंत गव्हर्नर-जनरलला म्हणजे माउंटबॅटनना घटनात्मक प्रमुख म्हणजे राष्ट्रपतींप्रमाणे बनवण्यात आले. या योजनेचा एक भाग म्हणून राष्ट्रांच्या संविधान सभांनी संमत केलेल्या कायद्यांना मान्यता देण्यासाठी त्याला जबाबदार धरण्यात आले.

फाळणीनंतर काय झाला परिणाम?

फाळणीमुळे दंगली, मोठ्या प्रमाणावर जीवितहानी आणि स्थलांतराची प्रचंड लाट निर्माण झाली. मुस्लिम पाकिस्तानच्या दिशेने आणि हिंदू आणि शीख भारताच्या दिशेने असे लाखो लोक त्यांना सुरक्षिततेतची अपेक्षा असलेल्या ठिकाणी गेले. पायी, बैलगाडीत आणि रेल्वेने प्रवास करत करत अंदाजे १ कोटी ६० लाख लोक विस्थापित झाले.

फाळणीनंतर मृतांची संख्या २० लाखांपर्यंत गेली होती. अनेक जण दोन धर्मियांच्या हत्याकांडात मेले तर काही जणांना त्यांच्या स्वतःच्या कुटुंबीयांनी निर्वासित शिबिरांमध्ये पसरलेल्या संसर्गजन्य रोगांच्या साथीत मरण्यासाठी सोडून दिले. लाखो महिलांचे बलात्कार किंवा अपहरण करून त्यांचे हालहाल केले गेले.

फाळणीचा आणखी एक अनपेक्षित परिणाम असा झाला की, पाकिस्तानची लोकसंख्या मूळच्या अपेक्षेपेक्षा धार्मिकदृष्ट्या एकसंध झाली.

मुस्लिम लीगच्या नेत्यांनी असे गृहीत धरले होते की, पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात गैर-मुस्लिम लोकसंख्या असेल, ज्यांच्या उपस्थितीमुळे भारतात राहिलेल्या मुस्लिमांचे स्थान सुरक्षित होईल.

परंतु पश्चिम पाकिस्तानमध्ये, १९५१ साली बिगर मुस्लिम अल्पसंख्याक हे एकूण लोकसंख्येच्या केवळ १.६% होते. तर पूर्व पाकिस्तान आताच्या बांगलादेशमध्ये २२% होते.

त्यानंतर दोन्ही देशांना फाळणीनंतर आलेल्या निर्वासितांना सामावून घेण्यात आणि त्यांचे पुनर्वसन करण्यात मोठ्या समस्यांचा सामना करावा लागला.

१९४७-४८ मध्ये जम्मू आणि काश्मीरच्या विवादित प्रदेशाबाबत दोन राज्यांमध्ये युद्ध झाल्यानंतर निर्वासितांची संख्या अजूनच वाढली.

६० च्या दशकाच्या उत्तरार्धातही स्थलांतरित झालेल्या लोकांच्या झुंडी भारतात येतच होत्या. जातीय तणावाच्या नंतरच्या संघर्षांनी आणखी चळवळ निर्माण केली.

फाळणीमुळे भारत छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये विभागला न जाता एकसंध राहिला हे जरी खरं असलं तरी फाळणी ही भारताच्या इतिहासातली कायमची भळभळती जखम बनून राहणार आहे.

]]>
https://www.batmi.net/the-announcement-of-partition-that-is-shocking-in-every-indians-mind/feed/ 0 26378
आनंदी जीवनाचं तंत्र सोप्प्या भाषेत शिकवणारं पुस्तक… https://www.batmi.net/a-book-that-teaches-the-techniques-of-a-happy-life-in-simple-language/ https://www.batmi.net/a-book-that-teaches-the-techniques-of-a-happy-life-in-simple-language/#respond Fri, 19 Aug 2022 07:42:13 +0000 https://www.batmi.net/?p=26363 द करेज टू बी डिसलाइक्ड हे एक जपानी पुस्तक आहे. जपानमध्ये आणि इतर देशांमध्येही हे पुस्तक प्रचंड प्रमाणात विकलं गेलं. हे केवळ पुस्तक नसून १९व्या शतकातील मानसशास्त्रज्ञ ‘आल्फ्रेड ॲडलर’ यांनी केलेल्या कामाच्या विश्लेषणावर आधारित जपानी तत्त्वज्ञान आहे.

आनंद हा प्रत्येक व्यक्तीच्या हातात असून इतर कशावरही अवलंबून नाही हा संदेश आपल्याला या पुस्तकातून मिळतो. ‘इचिरो किशिमी’ आणि ‘फुमिटेक कोगा’ यांनी हे पुस्तक लिहिलं आहे.

वेगवेगळी प्रकरणं, मुद्द्यांमधून पुस्तक उलगडत जातं हे आपण बऱ्याचदा पाहिलं आहे. पण हे पुस्तक मात्र प्रश्न उत्तरांच्या माध्यमातून आपल्या समोर येतं. एक तरुण व्यक्ती प्रश्न विचारते आणि मानसशास्त्रज्ञ ॲडलर आपल्या तत्वज्ञानातून मार्गदर्शन करतात.

यामध्ये आयुष्यातले क्लिष्ट प्रश्न, समस्या, प्रसंग अशा प्रत्येक प्रकारचे प्रश्न ती व्यक्ती त्यांना विचारते. त्यामुळे आयुष्याच्या प्रत्येक बाजूवर आपल्याला या पुस्तकातून माहिती मिळते. म्हणूनच हे पुस्तक आपल्या स्वतःशी जोडलं जातं. यातले प्रश्न आणि उत्तरं आपल्याशीच संबंधित वाटतात.

आपल्याला वाटतं की, आपल्या भावना आपल्या नियंत्रणात नाहीत, राग आल्यावर आपला कंट्रोल जातो. कधी आपण एखाद्यावर जोरात ओरडून राग व्यक्त करतो तर कधी एखादी वस्तूदेखील फोडतो आणि आपल्या या कृतीचं खापर आपण भावनांवर फोडतो.

मला राग आला म्हणून मी तसं वागलो असं म्हणून मोकळं होतो. ही पळवाट अतिशय चुकीची आहे, याची जाणीव आपल्याला या पुस्तकातून होते. आपल्या प्रत्येकात स्वतःला नियंत्रित ठेवण्याचं सामर्थ्य आपल्यात आहे. आपण आपल्या भावनांना निवडू शकतो, नियंत्रणात करु शकतो, ही शिकवण उदाहरणांमधून आपल्याला मिळते.

त्यानंतर आपल्या आयुष्यातल्या समस्यांच्या मुळावरही हे पुस्तक भाष्य करतं. आयुष्यातल्या अनेक समस्यांचं मूळ आपल्या परस्पर संबंधांमध्ये असल्याचं या पुस्तकात सांगण्यात आलं आहे. प्रत्येक माणूस नात्यांतून बनला आहे.

आपलं इतरांशी नातं कसं आहे, आपलं स्वतःशी नातं कसं आहे, याभोवती आयुष्य फिरत असतं. आपण स्वतःला कमी समजत असू तर अनेक समस्या आपण स्वतःहूनच निर्माण करतो. याबरोबरच सतत लोकं काय म्हणतील, लोकांच्या अपेक्षा पूर्ण करु शकू का, यातूनही अनेक समस्या निर्माण होत असतात. त्यामुळे आपण स्वतःला प्रेमाने वागवण्याची गरज असते.

जर आपणच स्वतःला प्रेमाने, सन्मानाने वागवलं नाही तर इतरांकडूनही आपल्याला तशी वागणूक मिळत नाही आणि हे पुस्तक आपल्याला हेच सगळं समजावण्याचं प्रयत्न करतं. यासाठी लोकांचा विचार सोडून देणं, कोणी आपल्याबद्दल काय बोलतं, कोण काय विचार करतं याकडे दुर्लक्ष करणं महत्त्वाचं आहे.

जेव्हा आपल्याला हे जमेल तेव्हा आपण खऱ्या अर्थाने मुक्त, ताकदवान होऊन जगू शकतो. कोणताही संबंध आपल्या मनाची शांतता, स्वास्थ्य बिघडवणार नाही, याची काळजी आपण घेऊ तेव्हाच आयुष्याचा आनंद आपण घेऊ शकतो. हा दृष्टीकोन आपल्यात आणून स्वतःमध्ये बदल घडवण्यासाठी हे एक पुस्तक वाचणं अतिशय महत्त्वाचं आहे.

आजच्या गुंतागुंतीच्या डिजिटल जगात सोशल मीडिया लाइक्सच्या मागे अनेकजण पळत आहेत. प्रत्येकाला इतरांकडून ‘लाइक’ मिळण्याची अपेक्षा आहे. ते लाइक मिळाले नाही तरी अनेकजण अस्वस्थ होतात.

ही अस्वस्थता मिटवण्यासाठी इतरांकडून नापसंत केलं गेलं तरी ते स्वीकारण्याचं धैर्य आपल्यात असलं पाहिजे. कोणत्याही लाईक्सची गरज न पडता आपण जसे आहोत तसं स्वतःला स्वीकारण्याची जबाबदारी आपण घेतलीच पाहिजे. ही जबाबदारी आनंदी आयुष्याच्या गोल्डन रुल्सपैकी एक आहे, असं लेखक सांगतात.

आपल्या वैयक्तिक विकासासाठी आत्मविश्वास, आदर्श, आपली मूल्य यांना चिकटून राहणं कसं गरजेचं आहे यावरदेखील लेखक आपल्याला उत्तर देतात. स्वतःचा आनंद वाढवण्यासाठी कधीही खोटेपणा करु नका,

इतरांना खुश ठेवण्यासाठी स्वतःचे आदर्श पणाला लावू नका, मूल्य विसरु नका, कारण कितीही प्रयत्न केले तरी कोणाला ना कोणाला आपण नापसंतच असणार आहे. त्यापेक्षा प्रामाणिकपणे वागून जे आपल्यासोबत राहतील त्यांना खरा मान द्यावा.

कधीही कोणाला व्यवस्थित ओळखल्याशिवाय विश्वास ठेवू नका. लोकांमध्ये अडकून पडण्यापेक्षा तुमच्या मनाला काहीतरी करण्याची प्रेरणा मिळेल, ध्येय ठरवा आणि ते पूर्ण करण्यासाठी सर्वस्व झोकून प्रयत्न करत रहा, असा मोलाचा सल्ला या पुस्तकातून आपल्याला मिळतो.

पुस्तक वाचताना अनेकदा आपणही विचारमग्न होतो, स्वतःच्या वर्तणुकीविषयी, आयुष्याविषयी प्रश्न मनात निर्माण होतात. त्यामुळे खूप शिकवण या पुस्तकातून आपल्याला मिळते.

प्रश्नोत्तरांमुळे वाचन सहजसोपं होतं. त्यामुळे प्रत्येकाने हे पुस्तक नक्की वाचावं. वेगवेगळ्या भाषांमध्ये याचे अनुवाद उपलब्ध असून, ऑनलाइन, ऑफलाइन पद्धतीने आपण हे पुस्तक विकत घेऊ शकतो.

]]>
https://www.batmi.net/a-book-that-teaches-the-techniques-of-a-happy-life-in-simple-language/feed/ 0 26363
सगळे चित्रपट शुक्रवारीच का प्रदर्शित होतात? काय आहे यामागचं कारण… https://www.batmi.net/why-are-all-films-released-on-fridays/ https://www.batmi.net/why-are-all-films-released-on-fridays/#respond Wed, 03 Aug 2022 07:01:07 +0000 https://www.batmi.net/?p=26237 “शुक्रवार येतोय गड्या, कुठला चित्रपट रिलीज होणार आहे बघून ठेव जरा आणि तिकीट पण काढून ठेव.” माझ्या मित्राला मी सांगत होते. आमच्या ऑफिसमध्ये शुक्रवार म्हटलं की, सगळ्यांची वीकेंडचा प्लॅन करण्याची धामधूम चालू होते.

त्यात मला चित्रपट पाहण्याची जाम आवड. त्यामुळे शुक्रवार आला आणि फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिला नाही, असं क्वचितच होतं.

तसं हे शुक्रवार आणि चित्रपट रिलीज होणं यांचं एकमेकांशी नेमकं काय कनेक्शन असावं? आठवड्यातील सगळे वार सोडून हे चित्रपट नेहमी शुक्रवारीच का प्रदर्शित होत असावेत? हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर आजचा हा लेख अगदी तुमच्यासाठीच आहे.

आपण भारतीयांनी तशा बऱ्याच गोष्टी या हॉलिवूड मधून घेतल्या आहेत. त्यांचे अनुकरण करण्याच्या नादात ही चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित करण्याची पद्धत सुद्धा सुटली नाही. हॉलिवूडमध्ये १९३९ रोजी ‘गॉन विथ द वाइंड’ (Gone with the wind) हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला.

परंतू एक दिवस आधी म्हणजेच गुरुवारी चित्रपटाचा प्रीमियर दाखवण्याची तिथे पद्धत होती. म्हणून शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित करण्याचा पायंडा पाडला गेला आणि तेव्हापासून ही बाब सगळीकडेच लक्षणीय ठरली. ज्याचे भारतीयांनी अनुकरण केले.

अगदी १९३९ पासूनच भारतात शुक्रवारी चित्रपट दाखवण्याची प्रथा चालू झाली असे नाही तर भारतीय सिनेसृष्टीतील मैलाचा दगड म्हणून ओळखला जाणारा ‘नील कमल’ हा चित्रपट सोमवार दिनांक २४ मार्च १९४७ रोजी रिलीज करण्यात आला होता.

त्याकाळात भारतात शुक्रवारसाठी हट्ट किंवा तारखेवरून वाद देखील होत नव्हते. मात्र १९५० च्या अखेरीस भारतात ‘मुगल-ए-आजम’ प्रदर्शित झाला, ज्याला भरघोस यश मिळालं.

खरं तर, चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी शुक्रवार निवडण्याचं संपूर्ण कारण हे आर्थिक फायद्यासाठी आहे आणि हे कारण त्या चित्रपटाच्यावेळी निर्मात्यांना उमगलं.

चित्रपटातील प्रत्येकाची चित्रपटाकडून वेगवेगळी अपेक्षा असते. कलाकारांना प्रसिद्ध हवी असते, प्रेक्षकांना मनोरंजन हवं असतं तर निर्मात्यांना आर्थिक नफा. त्यामुळे आपला आर्थिक नफा मिळविण्यासाठी निर्मात्यांनी शुक्रवारला पसंती दिली. शिवाय हिंदू धर्मात शुक्रवार हा लक्ष्मीचा वार मानला जातो.

शेवटी पैसा बोलता है, हे यावरून सिद्ध होते. चित्रपट निर्मात्यांकडे सगळे बजेट असते. त्यामुळे त्यांच्यासाठी शुक्रवार हा श्रध्देचा वार झाला. निर्माता असो वा कोणताही व्यावसायिक, प्रत्येकाकडूनच लक्ष्मीदेवीची आराधना केली जाते.

कारण देवीच्याच आशिर्वादाने व्यवसायात भरभरटात येते, यावर अनेकांचा दृढ विश्वास असतो. या दिवशी चित्रपट रिलीज केल्यास लक्ष्मीच्या आशीर्वादाने त्यांचा चित्रपट भरघोस कमाई करेल असे ते मानतात.

केवळ चित्रपट प्रदर्शनच नाही, तर चित्रपटाची शुटींग सुरु करण्याचा मुहूर्त देखील शुक्रवार बघूनच निश्चित केला जातो. जेणेकरून चित्रपटाचं शुटींग निर्विघ्नपणे पार पडावं आणि चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर छप्परतोड कमाई करावी, हा त्यामागचा मुख्य उद्देश असतो. शिवाय यामागे एक व्यवसायिक कारण देखील दडले आहे.

सध्या मल्टिप्लेक्स मध्ये चित्रपटाचं स्क्रिनिंग करण्याचं भारी वेड आहे. मल्टीप्लेक्समध्ये फिल्म स्क्रीनिंगची फी शुक्रवार वगळता इतर दिवशी जास्त असते. त्यामुळे साहजिक आपला व्यावसायिक फायदा लक्षात घेऊन चित्रपट निर्माते शुक्रवारीच चित्रपट रिलीज करतात.

चित्रपट शुक्रवारीच प्रदर्शित व्हायला हवेत, असा काही बंधनकारक नियम नाही. कारण सलमान खान आपले चित्रपट ईदच्या दिवशी मग तो कोणत्याही वारी येऊ प्रदर्शित करतोच. शिवाय २०१६ साली इरू मगन हा चित्रपट गुरुवारी दाखवण्यात आला.

इतकंच काय अभिनेता अमीर खान याने मुख्य भूमिका साकारलेला ‘रंग दे बसंती’ हा देशभक्तीपर चित्रपट २६ जानेवारीला प्रदर्शित झाला.

शुक्रवारीच चित्रपट प्रदर्शित करण्यामागे अध्यात्मिक, आर्थिक, मनोरंजनपूर्ण कारणे असली तरी शेवटी ज्याला जेव्हा चित्रपट प्रदर्शित करायचा असेल तो करू शकतो.

आता तुम्हां सगळ्यांना तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेलच. पण अजूनही अनेकांना याचं उत्तर माहिती नसेल तर हे उत्तर त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमची. जास्तीत जास्त मित्रमंडळींपर्यंत हा लेख पोहचवा आणि तुम्हाला हा लेख कसा वाटला तेही जरूर सांगा.

]]>
https://www.batmi.net/why-are-all-films-released-on-fridays/feed/ 0 26237
पु.ल. देशपांडेंची ‘ही’ पुस्तकं नक्की वाचायला हवीत… https://www.batmi.net/p-l-deshpandes-these-books-should-also-be-read/ https://www.batmi.net/p-l-deshpandes-these-books-should-also-be-read/#respond Wed, 03 Aug 2022 06:58:59 +0000 https://www.batmi.net/?p=26235 पु.ल.देशपांडे हे नाव तमाम मराठी जनांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवतं. पु.ल. हे महाराष्ट्राचं खूप लाडकं व्यक्तिमत्व. पु.ल. देशपांडेचं विनोदी लेखन आपल्याला माहीत असतं.

पण त्याचबरोबर पटकथा, संवाद लेखन, संगीत दिग्दर्शन, अभिनय, दिग्दर्शन नाटककार, एकपात्री सादरकर्ता असे पुलंच्या व्यक्तिमत्वाचे विविध आयाम होते.

त्यांचे विनोद, प्रवासवर्णने, नाटके यांचे व्हिडीओ आजही आवडीने पाहिले जातात. अशा पुलंनी १२ जून २००० रोजी आपल्यातून एक्झिट घेतली.

आज असलेल्या त्यांच्या बाविसाव्या स्मृतिदिनानिमित्त आपण त्यांच्या अशा काही पुस्तकांबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत ज्यांची फार चर्चा झाली नाही.

अघळ पघळ

बारा लेखांचं संकलन असलेलं हे पुस्तक आहे. खळखळून हसायला लावणारे आणि मन प्रसन्न करणारे असे हे सर्व लेख आहेत. त्यांच्या पुस्तकातील शब्दांतून विनोदी प्रसंग डोळ्यांसमोर जसेच्या तसे उभे राहण्याची किमया या लेखांनी साधली आहे.

माझा एक अकारण वैरी, काही बे’ताल’ चित्रे, माझ्या भावी चरित्राची ऐतिहासिक साधेन अशी यातील लेखांची शीर्षकेही आगळीवेगळी आहेत. ‘अघळ पघळ’मध्ये पुलंनीच लिहिलेल्या “मराठी वाङ्मयाचा ‘गाळीव’ इतिहास”चा खंड दुसरा हा २० पानांमध्ये दिला आहे.

एक शून्य मी

पु. लं. च्या वैचारिक लेखांचा हा संग्रह असलेलं हे पुस्तक आहे. ‘मराठी दृष्टिकोनातून मराठी माणूस’ हा सुरुवातीचा लेख. गांधीयुग व गांधीयुगान्त, संस्कार, छान पिकत जाणारे म्हातारपण, अत्रे : ते हशे आणि त्या टाळ्या, नाटकवेडा महाराष्ट्र, नामस्मरणाचा रोग, एक शून्य मी,

एक होती प्रभातनगरी, गांधीजी आणि त्यांचे घड्याळ अशा लेखांतून पु.लं.नी आपले विचार मांडले आहेत. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर परिस्थिती आपल्यासमोर मांडली आहे. संवेदनशील आणि सुसंस्कृत मराठी जनांचं दर्शन यातून आपल्याला घडवलं आहे.

नस्ती उठाठेव

संगीत चिवडामणी, त्याचे व्यावच्छेदक लक्षण किंवा मी आणि माझे लेखन : एक चडफडाट. असे मथळे वाचल्यावर काय आहे या लेखांमध्ये नक्की हे, याबद्दल तुम्ही खूप उत्सुक व्हाल. त्या उत्सुकतेपोटी हे पुस्तक मिळवून लगेच वाचायला सुरुवात कराल.

एकूण १३ लेखांचा समावेश असलेलं हे पुस्तक पुलंची ही नस्ती उठाठेव हवीशी उठाठेव करून टाकते. लेखाबरोबरच नाट्यप्रवेशही वाचायला मिळतात. शाब्दिक आणि प्रसंगनिष्ठ विनोदाची खुमासदार गंमत त्यात अनुभवायला मिळते.

अपूर्वाई

हे प्रवासवर्णनपर पुस्तक आहे. इ.स. १९६० साली हे पुस्तक पहिल्यांदा प्रकाशित झाले. पुलंनी केलेल्या इंग्लंड, स्कॉटलंड, फ्रान्स व जर्मनी या देशांतल्या भ्रमंतीवर आधारित प्रवासवर्णन आहे. याबद्दल पु.ल. स्वतः म्हणतात, “मी स्वत: प्रवासवर्णन ह्या गोष्टीची प्रत्यक्ष प्रवासापेक्षाही अधिक धास्ती घेतली आहे.

आयुष्यात प्रवासवर्णन आणि आत्मचरित्र लिहायचे नाही असा फार लहानपणीच संकल्प सोडलेला होता. जरासा विचार केल्यावर लक्षात आले की, मी दोन्ही संकल्प ह्या एकाच पुस्तकात मोडलेले आहेत. कारण ह्या दोन-अडीचशे पानांत मी केलेल्या प्रवासाचे वर्णन नसून प्रवासात असलेल्या माझेच वर्णन अधिक आहे.”

आपुलकी

बालगंधर्व, कवी गिरीश, अनंत काणेकर, शरद तळवलकर आदी विविध क्षेत्रांतील नामवंत व्यक्ती ज्यांनी मराठी मनांना साद घालण्याचं काम केलं. त्यांची पु.लं.च्या लेखणीतून रेखाटलेली व्यक्तीचित्रे आपल्याला ‘आपुलकी’मधून वाचायला मिळतात.

उरलंसुरलं

पु.लं.च्या काही पूर्वप्रकाशित तर काही अप्रकाशित निवडक लेखांचा संग्रह! पु.लं या पुस्तकाबद्दल म्हणतात- ‘माझं लिखाण आनंदाने हसत हसत स्वीकारणार्‍या माझ्या वाचक वर्गालाच हे ‘उरलंसुरलं’ कृतज्ञपूर्वक अर्पण करतो.’

काय वाट्टेल ते होईल!

अमेरिकेत पोटापाण्यासाठी आलेल्या जॉर्ज आणि हेलन पापाश्विली या एका जॉर्जियन जोडप्याची Anything Can Happen ह्या आत्मकथेचा पुलंनी केलेला अनुवाद म्हणजे ‘काय वाट्टेल ते होईल!’ हे पुस्तक.

“सर्वांनी एकत्र बसून जेवावं, खावं, प्यावं, भेदाभेद भ्रम अमंगळ असं वागावं, आनंदात रहावं हा मूलमंत्र देणारं हे पुस्तक आहे.

हसतखेळत, खातपीत, माणुसकीचे साधेसुधे नियम पाळीत अवघ्यांचा संसार सुखाचा व्हावा अशी इच्छा बाळगणारा जॉर्जी आपणा सर्वच सामान्य माणसांचे विचार बोलतो. दुर्दैवाने आजच्या जगातील असामान्यांना हे सामान्यांचे माणुसकीचे बोल कळत नाहीत.

हा जॉर्जी मला आपला वाटला. म्हणून त्याच्या पुस्तकाचे हे मराठी रुपांतर मी केवळ मराठी जाणणार्‍यांसाठी केले आहे,” असं पुलं आपल्या प्रस्तावनेत म्हणतात. हे पुस्तक अनुवाद वाटतच नाही इतक्या सोप्या व ओघवत्या भाषेत लिहिलेलं आहे.

बरं या पुस्तकांची उजळणी करण्याचं कारण हे की कायम हसवणाऱ्या पुलंनी २२ वर्षांपूर्वी आजच्या दिवशी महाराष्ट्राच्या डोळ्यांत पाणी आणलं.

१२ जून ही पु.लं.ची पुण्यतिथी. ते शरीररूपाने आपल्यातून निघून गेले असले तरी २२ वर्षानंतर सुद्धा पुस्तकांमधून, त्यांच्या फेसबुक, युट्युबवर असणाऱ्या विविध व्हिडीओजमधून ते आपल्याला सतत भेटतात. आजच्या या स्मृतीदिनी पुलं नावाच्या भाईंना सादर वंदन!.!.!

]]>
https://www.batmi.net/p-l-deshpandes-these-books-should-also-be-read/feed/ 0 26235
हे आहेत आचार्य अत्रेंचे भन्नाट किस्से… https://www.batmi.net/these-are-the-wonderful-stories-of-acharya-atre/ https://www.batmi.net/these-are-the-wonderful-stories-of-acharya-atre/#respond Wed, 03 Aug 2022 06:56:49 +0000 https://www.batmi.net/?p=26212 महाराष्ट्राला विनोदाचीही मोठी परंपरा आहे. महाराष्ट्राला विनोदाचा वसा ज्यांनी दिला त्यांच्यापैकी आचार्य प्र.के.अत्रे हे नाव खूपच मोठं आहे.

अभिजात विनोद, प्रसंगनिष्ट विनोद, शब्दनिष्ट विनोद, कल्पनानिष्ट विनोद, विरोधाभासातून निर्माण होणारा विनोद, कलाटणी किंवा कडेलोटी विनोद, अतिशयोक्तीतून विनोद, विसंगतीतून विनोद असे हे विनोदाचे प्रकार आहेत.

आचार्य अत्रेंचे किस्से या प्रकारांसाठी वानगीदाखल देता येतील. आज आचार्य अत्र्यांची आठवण येण्याचं कारण म्हणजे आज आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचा स्मृतिदिन. १३ जून १९६९ रोजी अत्रे गेले तरी आज ५३ वर्षांनंतर सुद्धा त्यांचे वोनोड हास्याची एक लकेर देऊन जातात.

आचार्य अत्रे यांची खासियत म्हणजे हजरजबाबी आणि त्वरित विनोद. आज त्यांच्या स्मृती जागवताना त्यांच्या या अफलातून किश्यांची आठवण आवर्जून येते. त्यातीलच काही आता जाणून घेऊ.

हजरजबाबी तात्काळ विनोद

◆ पुण्याच्या अँपी थिएटर फर्ग्युसन कॉलेजमध्ये ‘कळ्यांचे नि:श्‍वास’ या मालतीताई बेडेकरांच्या पुस्तकावर चर्चा होणार होती ज्यात विद्यार्थ्यांसाठी आचार्य अत्रे यांचे व्याख्यान आयोजित केले होते. आचार्य अत्रे यांनी व्याख्यानास सुरुवात केली आणि ‘सभ्य गृहस्थ हो!’

असे म्हटल्यावर तिसऱ्या मजल्यावरील एका विद्यार्थ्यांने ‘ओऽऽओ’ असा जोरदार प्रतिसाद दिला. त्यावर आचार्य अत्रे म्हणाले, ‘तुम्हाला नाही. मी सभ्य गृहस्थांना उद्देशून म्हटले होते.’ अशी हजरजबाबी, तात्काळ, सत्वर विनोदाची अनेक उदाहरणे खूप देता येतील.

◆ वक्‍त्याला बुचकळ्यात टाकणारे काही प्रेक्षक तसेच बेरकी असतात. एका सभेत एका श्रोत्याने काय हो, गाढवाच्या पाठीवर किती केस असतात? असे आचार्य अत्रे यांना विचारताच, “या व्यासपीठावर, तुमच्या पाठीवरचे मोजून सांगतो” म्हटल्यावर तो प्रेक्षक पळून गेला.

◆ आचार्य अत्रे पुण्यामध्ये राहत असताना एकदा काँग्रेसमधील तत्कालीन ज्येष्ठ नेते काकासाहेब गाडगीळ त्यांना म्हणाले, “तुमच्या साहित्य संमेलनाला मी कधी येत नाही. मी साहित्य संमेलनाला का येत नाही विचारा.”

अत्रे : का बुवा येत नाही?

काका: तुमच्या त्या साहित्य संमेलनात सगळे डँबिस लोक असतात.

अत्रे : मग तेवढ्यासाठी तुम्हाला न येण्याचे कारण काय? इतक्या डँबिस लोकांमध्ये अजून एक आला तर बिघडलं कुठं?

प्रसंगनिष्ठ विनोद :

◆ एकदा आचार्य अत्रे फर्ग्युसन कॉलेजची ड्युटी संपल्यावर सायकलवरुन घरी येण्यास निघाले. सायकल जेमतेमच होती. ब्रेक नाही, सीट कडक. आचार्य अत्रे सायकलवर बसून काव्य करण्याच्या तंद्रीत फर्ग्युसनच्या उतारावरुन लकडी पुलावरुन निघाले.

लकडी पुलाजवळ स्मशानभूमी आहे. राम बोलो, भाय राम राम बोलो, भाय राम असे बोलत एक स्मशानयात्रा चालली होती. आचार्य अत्रे त्यांच्या नादात होते. त्यांचा धक्का खांदेकऱ्यांना लागला व ताटीवरील प्रेत खाली पडले.

त्यावर “अहो, काही समजते की नाही? वेळ काय, प्रसंग काय? असे म्हणून खांदेकरी अत्रेंवर ओरडू लागले. त्यावर अत्रे, ‘ज्याला लागले तो काही बोलत नाही आणि तुम्ही काय ओरडताय,’ असे म्हटल्यावर गंभीर प्रसंगात देखील खांदेकरी हसू लागले.

◆ धिप्पाड शरीरयष्टीचे अत्रे एकदा पुण्याच्या पर्वतीवर पायऱ्या चढून चालले होते. थोड्याच वेळात त्यांना दम लागला आणि ते धापा टाकू लागले. हे पाहून एका पंचाहत्तर वर्षाच्या धडधाकट म्हाताऱ्याने त्यांना डिचवले,

अहो, काय हे अत्रे? चार वेळा पायऱ्या चढून उतरतोय अजुनही दोन वेळा चढून दाखवीन. काय द्याल मला? त्या म्हाताऱ्याचा आगाऊपणा झटकन उतरवीत अत्रे उत्तरले, “हा, देईन ना खांदा!” त्यावर आजुबाजूचे हसू लागले.

अभिजात विनोद :

◆ स.का. पाटील संयुक्त महाराष्ट्राचे विरोधक होते. ह्या सदोबा पाटलांची चेष्टा करण्याची एकही संधी आचार्य अत्रे सोडत नसत. ते नामदार होते. त्यांचा उल्लेख नेहमी नामदार सदोबा कान्होबा पाटील असा लांबलचक करण्याऐवजी नामदार स. का. पाटील असा करीत.

आचार्य अत्रे ‘नासका पाटील’ असा नेहमी उल्लेख करीत. सदोबा पाटलांनी मुंबई मराठी जनतेला मिळणार नाही अशी गर्जना केली होती. त्यामुळे आचार्य अत्रे यांचा सदोबांवर राग होता. आचार्य अत्रे एकदा म्हणाले,

“१३ ऑगस्टला मी जन्मलो. म्हणजे १३ ऑगस्टला विनोद जन्मला. १५ ऑगस्टला हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळाले. १५ ऑगस्टला भारत जन्माला आला. या दोन चांगल्या गोष्टी झाल्या. पण १४ ऑगस्टला सदोबा पाटील जन्माला आले. दोन चांगल्या गोष्टीमध्ये एखादी वाईट गोष्ट होणारच.”

असे अत्र्यांचे एक से एक किस्से आहेत. आजही त्यांचे किस्से, त्यांचं साहित्य, त्यांची नाटकं यांच्यावर मराठी जन तितकंच प्रेम करतात. त्याच्या किश्श्यांतूनच नाही तर त्याच्या एकूणच साहित्यातून आणि चित्रपटातून नेहमीच वाचकांचं,

प्रेक्षकांचं ज्ञानरंजन आणि मनोरंजन केलं आणि आज त्यांच्या मागे सुद्धा त्यांच्या विपुल संपदेचा आपण लाभ घेतच आहोत. सतत विनोदाची मुक्त उधळण करणाऱ्या विनोद सम्राट आचार्य अत्रेंच्या स्मृतींस आजच्या दिवशी सादर वंदन!.!.!

]]>
https://www.batmi.net/these-are-the-wonderful-stories-of-acharya-atre/feed/ 0 26212
पोलिसांनी आपल्यावर हात उचलला तर काय करायचं? एकदा नक्की वाचा… https://www.batmi.net/what-to-do-if-the-police-raise-their-hands-on-you/ https://www.batmi.net/what-to-do-if-the-police-raise-their-hands-on-you/#respond Wed, 03 Aug 2022 06:54:58 +0000 https://www.batmi.net/?p=26225 पोलिसांनी हात उचलल्यावर आपणही त्यांच्यावर हात उगारला तर काय होईल, माहितीये? काही माणसांना चटकन राग येतो. कोणी आपल्यावर हात उचलला हे त्यांना सहन होत नाही आणि समोर कोण आहे, हे न बघता ते पोलिसांवर हात उचलतात.

मारण्यासाठी पोलिसांच्या अंगावर धावून जातात. पण आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे आपण गुन्हेगार असो किंवा नसो कधीही पोलिसांनी आपल्यावर हात उचलल्यास आपण त्यांना परत फिरून मारण्याचं धाडस करू नये.

कारण कायद्यात हे स्पष्ट नमूद केलं आहे की, पोलिसांशी असभ्य भाषेत वर्तन आणि पोलिसांना मारहाण हा कायद्याने गुन्हा आहे. त्यानुसार IPC ३५३ आणि ३३२ नुसार गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. आपल्याला कठोरातली कठोर शिक्षा होऊ शकते.

पण पोलिस विनाकारण मारत असतील तर काय करायचं?

पोलिस विनाकारण मारत असतील तरी देखील आपण त्याच्यावर हात उगारु शकत नाही. त्यावेळी प्रतिकार न करता आपल्याला मार खावाच लागतो. परिस्थिती कितीही कठीण असली तरी आपल्याला स्वत:वर ताबा ठेवावाच लागतो.

पोलिसांना काय अधिकार असतात –

पोलिस आपल्या कायद्याचे रक्षक असतात त्यामुळे कायद्यानेच त्यांना आवश्यक प्रसंगी बळाचा वापर करण्याचा अधिकार दिलेला असतो. त्यामुळेच त्यांना ठराविक प्रसंगी ठरविक व्यक्तीवर हात उचलण्यासाठी कोणाच्याही संमतीची आवश्यकता नसते.

आपल्याला कायदा काय अधिकार देतो –

आपण गुन्हेगार असू आणि पोलिसांनी आपल्याला बेदम मारलं असेल तर आपल्याला कोणत्याही प्रकारे कायद्याची मदत होत नाही. आपल्याला शिक्षा भोगावीच लागते.

मात्र जर आपण गुन्हेगार नसू आणि पोलिसांनी आपल्यावर राग काढण्याच्या हेतुने किंवा कोणत्याही पुराव्याशिवाय हात उचलला असेल,

आपल्याला मारलं असेल तर आपल्या बाजूने कायदा उभा राहतो. मारहाण झाल्यानंतर आपण त्या पोलिस अधिकाऱ्यावर थेट FIR दाखल करू शकतो. किंवा कोर्टात अधिकाऱ्याविरुद्ध केस दाखल करू शकतो.

कोणत्या वेळी पोलिसांना मारण्याचा आपल्याला अधिकार आहे –

पोलिसांनी आपल्यावर हात उगरल्यावर आपण त्यांना परत फिरून मारू शकत नाही हे आपण आतापर्यंत जाणून घेतलं पण पोलिस मारत असताना आपला जीव जाईल अशी वेळ आली किंवा पोलिस कारण नसताना आपल्याला जीवानीशी मारत असतील तर आपण आपल्या संरक्षणसाठी पात्र ठरतो.

त्यावेळी आपण स्वत:च्या संरक्षणासाठी पोलिसांवर हात उचलून स्वत:चा बचाव करू शकतो. जर पोलिस आपला जीव घेतच असेल आणि स्वत:च्या संरक्षणासाठी तुम्ही जर पोलिसांना मारलं आणि पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला तर त्या हत्येसाठी आपण गुन्हेगार ठरत नाही.

या कारणांसाठी आपल्याला पोलिसांवर केस करता येते –

IPC ९९ नुसार पोलिस आपल्याला मारहाण करताना जर आपला एखादा अवयव तुटून आपल्याला अपंगत्व आलं आणि आपण साधारण वीस दिवसांपेक्षा अधिक काळ रुग्णालयात दाखल असू, आपल्यावर उपचार सुरू असतील तर आपण पोलिसांवर केस करू शकतो.

आपल्या नुकसानाची भरपाई करून घेऊ शकतो. पण जर आपण गुन्हेगार असू तर आपण पोलिसांवर केस करू शकत नाही उलट आपल्यालाच शिक्षा भोगावी लागेल.

सगळेच पोलिस मारतात का ?

मुळातच पोलिसांना एखाद्यावर विनाकारण आपलं बळ दाखवण्यासाठी तैनात केलेलं नसतं. त्याच्याकडे गुन्हेगार आणि सभ्य व्यक्ती ओळखण्याची दृष्टी असते.

त्यामुळे विनाकारण कोणताही पोलिस अधिकारी सामान्य व्यक्तीला मारहाण करत नाही. त्यांना कायद्याची तंतोतत ओळख असते.

मात्र शुभ्र दुधात माशी पडल्यानंतर जसं ते पूर्ण दूध खराब वाटतं त्या माशीप्रमाणे काही पोलिस अधिकारी असतात जे स्वत:च्या गैरवर्तनामुळे संपूर्ण पोलिस दलाचं नाव खराब करतात.

असाच कोणी अधिकारी जर कधी तुमच्या वाट्याला आला किंवा तुमच्यावर असा प्रसंग ओढवला तर वरील सर्व गोष्टी माहित असणं गरजेचं ठरतं.

तुम्हाला हा लेख कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपले कुटुंबीय आणि मित्रपरिवारालाही ही माहिती देण्यासाठी हा लेख पाठवायला विसरू नका.

]]>
https://www.batmi.net/what-to-do-if-the-police-raise-their-hands-on-you/feed/ 0 26225
संत तुकारामांच्या मते संवाद ‘असा’ असावा… https://www.batmi.net/according-to-sant-tukaram-communication-should-be-like-this/ https://www.batmi.net/according-to-sant-tukaram-communication-should-be-like-this/#respond Wed, 03 Aug 2022 06:53:24 +0000 https://www.batmi.net/?p=26233 ‘संवाद कौशल्य’ ही काळाची गरज आहे. आपल्याला बोलताना काय काळजी घ्यायला हवी? हे संत तुकारामांनी या काव्यातून सांगितलं आहे ते आपण जाणून घेऊया.

घासावा शब्द । तासावा शब्द ।
तोलावा शब्द । बोलण्यापूर्वी ।।

शब्दांचा म्हणजे आपल्या बोलण्याचा परिणाम व्यक्तिगत जीवनावर तसेच आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवरही होत असतो. शब्द हे मौल्यवान दागिन्यांप्रमाणे आहेत. जसे दागिने वापरण्यापूर्वी आपण घासून-पुसून लख्ख करतो अगदी त्याचप्रमाणे शब्दही केले जावेत.

उपदेशात्मक बोलताना तासून बोललेल्या शब्दांमुळे लगेच समोरच्याचे डोळे उघडतील. जे बोलायचे आहेत ते योग्य शब्द आहेत ना, याची पडताळणी करणं गरजेचं आहे! शब्द योग्य नसतील गोष्टी बिघडतात. म्हणून म्हणतात ‘बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोला’.

शब्द हेचि कातर । शब्द सुईदोरा ।
बेतावेत शब्द । शास्त्राधारे ।।

शब्दांची ताकद खूप मोठी आहे. तीक्ष्ण शब्दांत बोललो तर समोरच्याशी असलेलं नातं तुटेल, व्यक्ती दुरावेल. शब्द कात्रीचं काम करतात. गोड, मधुर शब्दांत बोललो तर नवीन नातं तयार होईल. शब्द कसे असावेत, त्यांचा क्रम, नियम हे सगळं संवाद शास्त्राच्या नियमानुसार बरहुकूम आपण करावं.

बोलावे मोजके । नेमके , खमंग, खमके ।
ठेवावे भान । देश , काळ, पात्राचे ।।

बोलताना जितकं गरजेचं आहे, तेवढंच बोलावं ते ही मुद्देसूद व थेट असावं, व ते कंटाळवाणं नसावं. तसंच जे बोलायचं ते ठामपणे बोलता यायला हवं.

आपण कोणत्या ठिकाणी काय बोलायला हवं? याबद्दल बोलणाऱ्याचं भान असणं फार महत्त्वाचं आहे. कोणत्या ठिकाणी, कोणत्या वेळी, काय बोलावं ही सुसूत्रता आणणं फार गरजेचं असतं. संवाद साधताना या बाबी सगळ्यात महत्वाच्या आहेत.

कोणाचेही वर्म । व्यंग आणि बिंग ।
जातपात धर्म । काढूच नये ।।

संबंध जपण्यासाठी सुसंवाद होणं महत्वाचं आहे. यावेळी सुसंवाद कसा करावा तर एखाद्याची कमतरता, त्याचं व्यंग किंवा गुपित त्याच्या जातपात धर्मावरून द्वेषपूर्ण भाषा, शब्दांचा वापर करू नये. तर चांगले संबंध राहतात.

थोडक्यात समजणे । थोडक्यात समजावणे ।
मुद्देसूद बोलणे । हि संवाद कला ।।

कमीतकमी शब्दांत समजावणे हे जमायला हवं, बरं हे थोडक्यात समजावलेलं समोरच्याला समजायला ही हवं. या समजावण्याच्या प्रक्रियेत बोलताना मुद्देसूद बोलायला हवं. ही कला आहे, त्यालाच संवादशास्त्र म्हणतात.

शब्दांमध्ये झळकावी । ज्ञान, कर्म , भक्ती ।
स्वानुभावातून जन्मावा । प्रत्येक शब्द ।।

शब्द वापरताना त्यातून बोलणारा किती ज्ञानवंत आहे ते समजून येतं. तसेच बोलणारा ज्या वातावरणातून आलेला असतो तसेच त्याचे शब्द असतात.

भक्तीही शब्दांमधून कळून येते. बरं जे पण बोलणं आहे त्यात स्वतःचा अनुभव असावा. विना अनुभवाचे शब्द परिणामकारक वाटत नाहीत.

शब्दांमुळे दंगल । शब्दांमुळे मंगल ।
शब्दांचे हे जंगल । जागृत राहावं ।।

शब्द विचार करून वापरले नाही तर वातावरण ढवळून काढतात. शांतता भंग करतात. शब्दांमध्येच सगळं मंगल करण्याची ताकद आहे. शब्दांनी आपल्याला वेढलेलं आहे. म्हणून शब्द वापरताना काळजीपूर्वक वापरावेत.

जीभेवरी ताबा । सर्वसूखदाता ।
पाणी , वाणी , नाणी । नासू नये ।।

शब्दांमुळे दंगल घडून रक्तपात होऊ शकतो. भांडणे होऊ शकतात त्यामुळे स्वतःच तसचं मालमत्तेचं नुकसान होऊ शकतं. म्हणूनच बोलताना जीभ ताब्यात हवी.

तेच शांतीकारक ठरू शकेल. तर संवाद कौशल्याचं महत्व हे आपल्याला यावरून कळते. म्हणून आपण विसंवाद टाळून सुसंवाद करा.

]]>
https://www.batmi.net/according-to-sant-tukaram-communication-should-be-like-this/feed/ 0 26233
असे होते शिवाजी महाराजांचे आदर्शवत न्यायदान; एकदा नक्की वाचा… https://www.batmi.net/such-was-the-ideal-justice-of-shivaji-maharaj/ https://www.batmi.net/such-was-the-ideal-justice-of-shivaji-maharaj/#respond Tue, 02 Aug 2022 12:57:56 +0000 https://www.batmi.net/?p=26252 शिवाजी महाराज एक सर्वगुणसंपन्न राजे होते. आपले अहोभाग्य असे की, ते महाराष्ट्रात जन्माला आले. किंबहुना आपण धन्य झालो की त्यांच्या महाराष्ट्रात आपला जन्म झाला. 

शिवरायांचे राज्य आजही हवेहवेसे वाटते ह्याचे कारण म्हणजे स्वराज्यात न्याय मिळत होता. केवळ युद्धलढाई पुरते महाराज मर्यादित नव्हते त्यांचे न्यायदान देखील महत्वाचे होते. नेमके कसे होते शिवरायांचे न्यायदान पाहुयात आजच्या लेखात.

शिवाजी महाराजांपूर्वी बादशाही हुकूमतीत न्याय मिळत नव्हता. अर्थात पैशाने न्याय विकत घेता येत होता. लाच घेत न्याय देणारे सुद्धा आपले तत्व खुंटीला टांगून ठेवत होते. वतनदार व काही देशमुख लोक हवा तसा न्याय करायचे. पण ह्यामुळे रयतेस त्रास व्हायचा.

शिवरायांनी वतनदारीच संपवल्यामुळे न्यायशास्त्राचे स्वरूप बदलले होते. महाराजांनी आता वतनदार नव्हे तर सरकारी अधिकारी नेमले होते.

गावखेड्यात गोत सभा भरायच्या आणि परगण्यात पंचायत भरायची. ह्यावर कोणाला निकाल मान्य नसेल किंवा सरकारी अधिकारी न्याय देत नसतील तर रयतेला थेट शिवरायांकडे न्याय मागता येत होता.

कधी कधी तर शिवरायांचे सुद्धा निकाल आऊसाहेबांनी बाद करून पुन्हा निवाडा केल्याचे दिसते. अर्थात आज उच्च, सर्वोच्च न्यायालय दिसतात ते महाराजांनी त्या काळात निर्माण केले होते.

महाराजांनी राजाभिषेकावेळी न्यायाधीश व पंडितराव अशी दोन पदे निर्माण केली. न्यायाधीश उच्चस्तरीय निवाडे करणार आणि पंडितराव धर्मासंबंधी निवाडे करणार.

“रयत कुणाचे जप्तीत नाही” म्हणत महाराजांनी सर्वांना ठणकावून सांगितले की रयत कुणाच्या अखत्यारीत वा अधिकारात येत नाही. हे रयतेचे राज्य आहे.

महाराज सुद्धा सिंहासनावर आरूढ झाले तेव्हा तिथे सुवर्ण तुला होती. ह्या राज्यात न्याय मिळतो हाच त्या सुवर्णतुलेचा अर्थ होता. असे न्यायाचे राज्य शिवरायांनी केले होते. आता आपण शिवाजी महाराजांनी केलेले काही निवाडे पाहुयात.

स्त्री संबंधी न्यायदान:

शिवाजी महाराजांनी जे जे निवाडे केले त्यात स्त्री संरक्षण संबंधी केलेले न्यायदान अत्यंत प्रचलित आहे. रांझेगावच्या पाटलाने एका बाईसोबत बदअमल केले तेव्हा शिवरायांनी त्याचे हातपाय छाटून त्याचा चौरंगा करण्यास सांगितला. नारो त्रिमळ नावाच्या एका ब्राह्मणाने एका स्त्रीवर जबरदस्ती केली म्हणून महाराजांनी जावळी मारली आणि त्यास तिथे दंड दिला.

दक्षिण दिग्विजय झाल्यानंतर बेलवडीच्या लढाईत मल्लव्वा देसाईंच्या स्त्री सैन्याला राजांच्या एका सरदाराने कैद केले म्हणून राजांनी त्याचे डोळे फोडले.

आणि सुभेदाराची सून देखील समोर कैदी असताना महाराजांनी तिला आई म्हणत चोळी बांगडी देत सन्मानाने पाठवले. असे अनेक न्याय करत राजांनी स्त्रियांची सुरक्षितता स्वराज्यात अबाधित ठेवली होती.

धर्मासंबंधीचे न्यायदान:

शिवाजी महाराजांनी धर्म आणि राजकारण कधीच एकत्र मिसळले नाही. एकदा काही पुजाऱ्यांचे ऐकून सिंहगडाच्या किल्लेदाराने काही गरीब लोकांना कोठडीत डांबून ठेवले होते.

तेव्हा महाराजांनी किल्लेदाराला जाब विचारला “तू नेमका नोकर कोणाचा? पुजाऱ्यांचा की माझा?” आणि त्या पुजाऱ्यास पत्र धाडून महाराज म्हणाले “आमचे बिरदे तुम्ही घ्या, नि तुमची बिरदे आम्हास द्या.” अर्थात आम्ही तुमची कामे करतो आणि तुम्ही आमचे काम करा.

अशी समज देत राजांनी धर्म आणि प्रशासन आपापल्या ठिकाणी ठेवले. एकदा मोरया गोस्वामींच्या शिष्यांना शेतकऱ्यांनी पडत्या भावात धान्य देण्यास नकार दिला तेव्हा महाराजांनी वैयक्तिक खर्चातून गोस्वामींचा उत्सव चालू ठेवला आणि एकीकडे शेतकरी सुद्धा जगवला. महाराजांनी न्यायदान केले तेव्हा ते पूर्ण केले, अर्धा न्याय केल्याचे ऐकिवात व वाचनात नाही.

हिंदू सरदारांना पुन्हा हिंदू केल्यानंतर देखील त्यांच्याशी सोयरिकी केल्या. अर्थात न्यायदान पूर्ण केले. जिथे पूर्वी हिंदूंची मंदिरं होती तिथल्या मस्जिदी पाडून राजांनी संपूर्ण न्याय केला होता.

इतर धर्मांचा आदर करत कोणाच्याच मूळ अधिकारावर राजांनी कधीच गदा आणली नाही. जिथे पूर्वीपासून मस्जिद होती तिला धक्का लागू दिला नाही हेच शिवरायांचे निःपक्षपाती न्यायदान होते.

प्रशासनासंबंधीचे न्यायदान:

शिवाजी महाराजांनी प्रशासन व राज्यव्यवहार संबंधीचे न्याय निवाडे केल्याचे आपण पाहतो. पोर्तुगीजांनी स्वस्त भावात मिठाचा व्यापार करत भूमीपुत्रांवर अन्याय केला म्हणून महाराजांनी जबरदस्त जकात लावून त्यांना माघारी पाठवले.

खंडोजी खोपडे सारखा माणूस अफझलखानाला जाऊन मिळाला तेव्हा राजांनी त्याचे हात पाय तोडले. पद्मदुर्ग बांधत असताना एका व्यक्तीने पैसा वेळेवर पोहोचवला नाही तेव्हा त्याला “ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा धरू पाहतो,” असे म्हणत ताकीद दिली.

एकंदरीत कोणाचीच जात किंवा धर्म न बघता न्यायाने राज्य करणारे छत्रपती शिवाजी महाराज आजही मनामनात ह्याच न्यायदानामुळे घर करून राहिले आहेत. अशा न्यायालंकारमंडित शिवरायांना मनाचा मुजरा.

]]>
https://www.batmi.net/such-was-the-ideal-justice-of-shivaji-maharaj/feed/ 0 26252
महानुभाव पंथ स्त्रियांविषयी काय सांगतो? चक्रधर स्वामी https://www.batmi.net/what-does-mahanubhava-panth-say-about-women-chakradhar-swami/ https://www.batmi.net/what-does-mahanubhava-panth-say-about-women-chakradhar-swami/#respond Tue, 02 Aug 2022 12:55:25 +0000 https://www.batmi.net/?p=26256 महानुभाव अर्थात ज्यांचा अनुभव थोर आहे किंवा महान आहे असे. महानता अध्यात्माची, भक्तीची, वैराग्याची जिथे आहे तो हा महानुभाव पंथ. श्री कृष्णाचे उपासक व वेदांना प्रमाण न मानता केवळ भक्तिभाव जपणारा हा संप्रदाय आहे.

हल्लीच्या काळात ह्या पंथामध्ये अनेक नियम-अटी दिसतात मात्र एकेकाळी ह्याच पंथाने कर्मकांडांना कडाडून विरोध केला होता. जरी नियम असले तरी हा पंथ कर्मकांड मानत नाही. नियम केवळ भक्ती व उपासनेसाठीच आहेत.

पण महानुभाव पंथाच्या बाबतीत केलेल्या चुकीच्या प्रचारामुळे अनेकांना प्रश्न पडतो की, महानुभाव पंथामध्ये विचारांची महानता आहे का? हा संप्रदाय स्त्रियांसाठी पण आहे का?

की पूर्वीप्रमाणेच ह्याने देखील स्त्रियांना शूद्र ठरवले आहे. नेमके महानुभाव पंथ स्त्रियांविषयी काय सांगतो, ह्याचे उत्तर जाणून घेऊ आजच्या लेखात.

महानुभाव पंथ निर्माण करणारे चक्रधरस्वामीस्वतः विचारांनी थोर होते. त्यांना हे ज्ञान मिळवण्यासाठी अनेक काळ मौन बाळगावे लागले.

शांत बसून त्यांनी इतर सर्व संप्रदायाचा व उपासना पद्धतींचा विचार केला. शूद्रांची व स्त्रियांची होणारी अध्यात्मिक हानी त्यांना बघवत नसे.

तेव्हाच त्यांनी हा पंथ स्थापन केला. न स्त्री स्वातंत्र्य महती असे म्हणत शास्त्रांनी स्त्रियांचे स्वातंत्र्य काढून घेतले होते. स्त्रीजन्म व शूद्र कुळात जन्म म्हणजे केवळ पूर्वजन्मीचे पाप असे धर्म मानायचा.

ह्यालाच विरोध करत चक्रधर स्वामींनी महान अनुभूतीसाठी निर्माण केलेला हा पंथ होता. पंथ म्हणजेच मार्ग, एक विचारधारा.

वर्णव्यवस्थे प्रमाणे ब्राह्मणांना ज्ञानाचा अधिकार होता. क्षत्रियांना म्हणावा तितका अधिकार नव्हता. पण शूद्र व स्त्रियांवर मात्र खूप अन्याय व्हायचाच. चक्रधर स्वामींनी पंथ निर्माण केला तेव्हाच ‘नागाईसा’ नावाच्या स्त्रीला त्यांनी दीक्षा दिली. ह्या स्त्रीला संन्यास घ्यायचा होता.

त्या काळात स्त्रियांनी देव धर्म केवळ घरात करावा अशी मान्यता होती. तेव्हा नागाईसाला संन्यास देणे म्हणजे मोठे क्रांतिकारी पाऊल उचलण्यासारखे होते.

जे चक्रधरांनी केले. त्याचप्रमाणे त्यांनी विधवा स्त्रियांना देखील संप्रदायात घेतले. कोणतेही कर्मकांड न मानता देवाची भक्ती करण्यास शिकवले.

स्त्री व पुरुष समान आहे हेच चक्रधारांचे विचार होते. ते म्हणायचे “पुरुषांचा तो जीव व स्त्रियांचा काय जीवलिया काय?” अर्थात पुरुषांप्रमाणे स्त्रीचा देखील जीव आहे, तिला देखील अध्यात्मिक उन्नतीचा अधिकार आहे.

महानुभाव पंथ केवळ स्त्रियांना अध्यात्माचे ज्ञान देण्यापुरता मर्यादित राहीला नव्हता तर मासिक पाळी सारखे विटाळाचे थोथंड ह्या पंथाने मोडून काढले होते. एकदा महदंबा नामक स्त्री चक्रधारांपासून लांबवर बसली होती.

तिला चक्रधरांनी जवळ येऊन बसण्यास सांगितले. उपदेश ऐकू येत नव्हता तरी महदंबा जवळ आली नाही. कारण विचारता तिने मासिक पाळीचा धर्म सांगितला.

तेव्हा चक्रधर स्वामी म्हणाले, बाई जैसा नाका शेंबूड ये, तोंडा थुंका ये, काना मळ ये, डोळीया चिपडिया येती, गुह्यद्वारा मळू ये, तैसा हा एकी धातू स्त्रवे.. तयाचा विटाळ धरु नये“.

हे सांगत चक्रधरांनी केवळ स्त्रियांना स्वातंत्र्य नाही दिले तर त्यांच्या भावना व परिस्थिती देखील समजून घेतली. महदंबाला कळले की अध्यात्मात ह्या गोष्टींचा विटाळ होऊच शकत नाही ती म्हणाली आजपासून न धरी जी म्हणजेच हे कर्मकांड व रूढी मी आजपासून पाळणार नाही.

महानुभाव पंथामुळे स्त्रियांना अध्यात्मातले ज्ञान मिळाले होते. त्याचे फलस्वरुप ह्या पंथातील स्त्रियांनी स्वतः लिखाण केले. अहिंसेचे व्रत पाळून कोणतेच कडकडीत वैराग्य नसताना ह्या स्त्रियांना देव समजला होता.
महानुभाव पंथाने स्त्रियांना पुरुषांप्रमाणे अधिकार दिल्यामुळे त्या काळातील स्त्रियांची प्रगतीच झाली. आशा आहे की, ही माहिती वाचल्यानंतर तुमचे महानुभाव पंथाविषयीचे गैरसमज दूर झाले असतील. लेख आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा.
]]>
https://www.batmi.net/what-does-mahanubhava-panth-say-about-women-chakradhar-swami/feed/ 0 26256
लुटेत आलेल्या परस्त्रीलाही शिवरायांनी कसे वागवले? https://www.batmi.net/how-did-shivaraya-treat-the-woman-who-came-to-loot/ https://www.batmi.net/how-did-shivaraya-treat-the-woman-who-came-to-loot/#respond Tue, 02 Aug 2022 12:50:51 +0000 https://www.batmi.net/?p=26260 कल्याणच्या सुभेदाराची सून शिवरायांनी सन्मानाने मागे पाठवून दिली ही कथा आपण आजवर अनेकदा ऐकली असेल. शिवाजी महाराजांनी स्त्रियांचा नेहमीच आदर केला. स्त्री म्हणजे मराठ्यांसाठी लक्ष्मीचे रूप, तिची विटंबना महाराष्ट्र देशी होणे शक्यच नाही.

ह्याच तत्वावर शिवरायांनी सुभेदाराची सून सन्मानाने परत पाठवली. ही कथा ऐकताना महाराजांविषयी असणारा आदर अधिकच वाढतो.

पण नेमके काय घडले होते? कोणी त्या सुनेला धरून आणले होते? ही कथा सत्य आहे की निव्वळ एक दंतकथा? ह्या कथेमधील काही समज गैरसमज आपण आजच्या लेखामधून दूर करण्याचा प्रयत्न करूयात.

त्या वेळेस कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद होता. शिवरायांनी एकीकडे जावळी जिंकून चंद्रराव मोऱ्यास ठार केले होते व रायगड सारख्या किल्ल्याचे बांधकाम देखील चालू केले होते. खर्च प्रचंड येत होता पण स्वराज्यात नवनवीन मुलुख सामील करावेच लागणार होते.

विजापूरचा आदिलशाह शेवटचे श्वास मोजत असतानाच मोठा मुलुख स्वराज्यात सामील केलेला बरा असा निर्धार करत शिवरायांनी मोठा प्रांत स्वराज्यात जोडला होता. त्याच दरम्यान राजांना खबर लागली की कल्याणचा सुभेदार मोठा खजिना घेऊन विजापूरला निघाला आहे.

आता शिवरायांनी मोठी मोहीम आखली होती. काहीही करून हा खजिना मिळवायचाच होता. म्हणून महाराज काही विश्वासू लोकांना घेऊन कल्याणच्या मार्गाने निघाले होते. राजांनी एक तुकडी पुढे पाठवली होती तिचे नेतृत्व आबाजी सोनदेव करत होते.

एकीकडे हा कल्याणचा सुभेदार आपल्या कुटुंबियांसोबत घाट पार करत होता. त्यात मुलं आणि सुनाही होत्या. सर्व बाजूंनी घनदाट जंगल, तरी सुभेदार तिथून प्रवास करत होता.

काही काळ भयाण शांतता होती पण नंतर मात्र मराठ्यांनी हर हर महादेवच्या घोषणा देत विजापुरी फौजेवर हल्ला चढवला होता.

अचानक झालेल्या हल्ल्यामुळे विजापुरी सैन्य पळून गेले होते आणि मराठ्यांच्या हाती हा शाही खजिना लागला होता. तो खजिना घेत आबाजींनी भिवंडी व कल्याण काबीज केले.

शिवराय कल्याणला आले तेव्हा त्यांचे मोठ्या जल्लोषात लोकांनी स्वागत केले. राजांपुढे सारा खजिना पेश करण्यात आला.

अत्यंत मौल्यवान हिरे, माणके, विविध रत्न, सोने रूपे त्या खजिन्यात होते. आबाजी सोनदेवांनी इशारा केला आणि काही मावळे एक मेणा घेऊन दरबारात आले.

कल्याणच्या सुभेदाराची सून त्या मेण्यातून बाहेर आली. लुटीदरम्यान तिला देखील अटक झाली होती. आबाजी सोनदेवांनी महाराजांना सल्ला दिला की, “ही एक अत्यंत रूपवान स्त्री आहे. त्यात ती सुभेदाराची सून आहे.

तिला आपण नाटकशाळेत ठेवावे.” राजांना हे ऐकून अत्यंत राग आला. त्यांनी असे करण्यास नकार दिला. तेव्हा आबाजी सोनदेव म्हणाले, “महाराज, अहो ह्या पातशहांनी आपल्या आया बहिणी नागवल्या, बाटवल्या. आपण ह्यांचा सूड घेतलाच पाहिजे.” राजांसमोर आता तुकोबांचे शब्द येऊ लागले होते परस्त्री रखुमाई समान.

महाराज म्हणाले, “आबाजी, अहो ह्या पातशहांनी ऐसें केले म्हणून तर आपण हे ईश्वरीय राज्य निर्माण करत आहोत. ह्या सुभेदाराच्या सुनेला उचित मान करून पुन्हा माघारी पाठवा.”

महाराजांचा आदेश निघाला होता, अगदी तसेच करण्यात आले होते. शिवरायांनी महिलेचा आदर केला होता. स्वराज्यात महिला देवासमान होत्या.

आता शिवरायांच्या तोंडी काही जणांनी एक वाक्य घातले आहे ते म्हणजे अशीच अमुची आई असती सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्रपती.

अर्थात महाराज तिला म्हणाले होते की. आमची आई तुझ्यासारखी सुंदर असती तर आम्हीही सुंदर निपजलो असतो. पण हे वाक्य निव्वळ ढोबळ वाटते. कितीही कुरूप असली तरी मुलाला आपली आई प्रिय असते.

त्यात समकालीन असणाऱ्या परमानंदाने जिजाऊंचे वर्णन करताना अत्यंत सुंदर रूपवान असल्याचे म्हटले आहे. आपल्या आईची बरोबरी आपण कोणाबरोबरही करत नाही. केवळ तुम्ही आम्हाला आईच्या जागी आहात असे म्हटले जाते. हेच महाराजांना अभिप्रेत असावे.

ही कथा खरी की खोटी ह्यावर एकमत नाहीय. पण ऐतिहासिक बखरींमध्ये ह्या कथेचा उल्लेख येतो. कथा खरी असो वा खोटी पण महाराजांनी स्त्रियांचा आदर नेहमीच केला हे आपल्याला त्यांच्या चरित्रातून स्पष्ट जाणवते. ह्या कथे विषयी तुमचे मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
]]>
https://www.batmi.net/how-did-shivaraya-treat-the-woman-who-came-to-loot/feed/ 0 26260