Yash Zore – Batmi https://www.batmi.net Get marathi latest news Wed, 03 Aug 2022 14:42:35 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.2 https://www.batmi.net/wp-content/uploads/2022/09/cropped-Picsart_22-08-31_02-05-02-169-96x96.jpg Yash Zore – Batmi https://www.batmi.net 32 32 201029915 शिवकाळातील चलन कसे होते? पाहा फोटो… https://www.batmi.net/how-was-the-currency-during-shiva-period-see-the-photo/ https://www.batmi.net/how-was-the-currency-during-shiva-period-see-the-photo/#respond Tue, 02 Aug 2022 11:15:32 +0000 https://www.batmi.net/?p=26122 शिवरायांचे स्वराज्य आणि तो संपूर्ण शिवकाळ स्वत्व टिकवण्यासाठीच होता. आपली भाषा, आपली संस्कृती, आपले किल्ले, आपली भूमी सारे आपल्या राज्यात टिकावे म्हणून हे स्वराज्य निर्माण केले गेले होते.

प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करून स्वराज्याला व रयतेला कसा लाभ होईल हे शिवराय नेहमी पहायचे. तसेच एक पाऊल महाराजांनी आपल्या स्वत्वासाठी उचलले होते.

अर्थकारणाला नवीन चालना मिळाली होती. शिवरायांनी स्वतःच्या नावे चलन चालू केले होते. शिवराई आणि होन ही नाणी आपल्याला माहितीच आहेत.

आजच्या लेखामधून आपण शिवकाळातील हेच चलन कसे चालायचे? ते किती प्रकारचे होते? कुठे निर्माण व्हायचे? हे पाहणार आहोत.

शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले म्हणजेच भूमीपुत्रांचे राज्य निर्माण केले. इथे स्वत्वाला महत्व होते. जसे राजाभिषेका वेळी महाराजांनी भाषा सुधारण्यासाठी राज्यव्यवहार कोष निर्माण केला अगदी तसेच राजांनी स्वराज्यासाठी नाणी बनवण्यास सांगितली.

हे चलन परकीय नाही तर स्वकीय असणार होते. ह्या आधी पातशाही होन, अशरफी इत्यादी मोगलांचे वा इतर बादशहांचे चलन स्वराज्यात चालायचे.

ह्याच गोष्टीवर शिवरायांना बंदी घालायची होती. हेन्री ऑक्सिंडन हा इंग्रज अधिकारी जेव्हा रायगडावर राजाभिषेकासाठी गेला होता तेव्हा तो इंग्रजांच्या काही मागण्या शिवरायांकडून पूर्ण करून घेणार होता.

एकूण १९ मागण्या घेऊन आलेल्या हेन्रीची शेवटची मागणी होती ती म्हणजे इंग्रजांचे चलन स्वराज्यात चालवण्याची. पण महाराजांनी ती मागणी नाकारली.

त्यावर फुली मारत राजांनी स्वत्व टिकवले. शिवरायांना स्वतःच्या चलनाविषयी आणि स्वराज्यविषयी किती प्रेम असेल हे ह्यातून दिसते.

शिवरायांनी रायगडावर टंकसाळ अर्थात नाणी पडण्याचा कारखाना निर्माण केला होता. जी आजही रायगडावर पाहता येते. केवळ रायगड नाही तर इतरही काही किल्ल्यांवर ह्या नाणी पाडल्या जात होत्या.

शिवरायांनी प्रामुख्याने दोन प्रकारची नाणी पाडली ‘होन’ आणि ‘शिवराई’. ह्यातील होन सोन्याचा व शिवराई तांब्याची होती.

होन हा कन्नड शब्द असून त्याचा अर्थ सुवर्ण असा होतो. ह्या दोन्ही नाण्यांवर एका बाजूने ‘श्री राजा शिव’ तर दुसऱ्या बाजूने ‘छत्र पती’ असे शब्द वेगवेगळे करून लिहिले होते.

केवळ एक टंकसाळ नसून अनेक किल्ल्यांवर ह्या नाणी पाडण्याचे काम चालायचे. त्याचे परवाने महाराजांनी लोकांना दिले होते. एका विशिष्ट पद्धतीने ती इतर नाणी पाडली जायची. त्यावर एक वेगळे चिन्ह असायचे म्हणून त्याला निशाणी होन म्हणायचे.

आज ह्याच एका होनाची किंमत तेरा लाख रुपये इतकी आहे. शिवराई बाबतीत विचार केला की समजते ६४ शिवराई म्हणजे एक रुपया. ह्यात अर्धी शिवराई देखील मिळायची.

एक टंकसाळेत सगळी नाणी निर्माण होत नसत त्यामुळे त्यांच्यात थोडा फरक जाणवतो. त्यावरील शिव ह्या शब्दातील वेलांटी बदलते. कधी कधी ‘सिव’ असे छापलेले दिसते.

शिवकाळात ह्या व्यतिरिक्त इतरही नाणी चालायची. अचानक इतर सगळ्या चलनावर बंदी घालणे शक्य नव्हते. म्हणून काही मोगली चलन देखील राजाभिषेकानंतर काही वर्षे सुरू राहिले.

गंभार, होन, पुतळी, रुणगिरी, पातशाही देवराई, अच्युतराई, रामचंद्रराई, धारवाडी, फलम, चक्रम असे इतर चलन देखील स्वराज्यात चालायचे.

मोहोरा ह्या नाणी एक राजा दुसऱ्या राजाला भेट देताना वापरायचा. यादव काळातील पगोडा हे चलन देखील वापरात होते.

आज जसे सुट्टे पैसे असतात त्याप्रमाणे शिवकाळात देखील अशी नाणी होती. प्रताप, धवल, चवल हे त्याचीच उदाहरणे. दोन ‘वीस’ नामक नाणी म्हणजे एक ‘व्यान’.

तसेच दोन ‘व्यान’ म्हणजे एक ‘दुव्वल’. ह्यात फलम नावाच्या नाण्यावर केवळ ‘छत्रपती’ लिहिलेले असायचे. दहा फलम म्हणजे एक होन अशा किंमती ठरलेल्या होत्या.

आज होन हा प्रकार पाहायला मिळत नाही. काही इतिहासकार ह्याचे कारण सांगतात की मोगलांच्या चलनापुढे कदाचित होन टिकले नसतील.

पण काहींच्या नुसार औरंगजेबाने दक्षिणेत आल्यानंतर मिळतील तितके होन वितळवले होते. शिवराई बाबतीत गोष्ट वेगळी आहे. शिवराई स्वराज्यात अत्यंत लोकप्रिय ठरली. आजही मोठ्या प्रमाणात ती उपलब्ध होते.

सभासद बखरमध्ये उल्लेख आहे की महाराजांच्या निधनासमयी स्वराज्यात ३१ प्रकारची सोन्याची नाणी होती. त्या सुवर्ण नाण्यांची एकूण संख्या ६९ लाखांच्या घरात होती.

त्यात ४ लाख शिवराई होन होते. अशी ही शिवकाळातली अर्थव्यवस्था व चलन होते. तुम्हाला याविषयी आणखी काही माहिती असल्यास आम्हाला नक्की सांगा. सोबत हा लेख कसा वाटला हे सागायला विसरू नका.

]]>
https://www.batmi.net/how-was-the-currency-during-shiva-period-see-the-photo/feed/ 0 26122
औरंगाबादच्या ऐतिहासिक स्थळांबद्दल माहित आहे का? https://www.batmi.net/know-about-the-historical-places-of-aurangabad/ https://www.batmi.net/know-about-the-historical-places-of-aurangabad/#respond Tue, 02 Aug 2022 11:13:11 +0000 https://www.batmi.net/?p=26124 औरंगाबाद की संभाजीनगर असा वाद खूप पूर्वी पासून चालत आला आहे. ज्या संभाजी महाराजांनी स्वराज्य रक्षण केले त्यांचे नाव ह्या शहराला द्यायचे सोडून त्यांना क्रूरपणे मारणाऱ्या औरंगजेबाचे नाव ह्या शहराला आहे.

ह्या शहराच्या नामांतराचा वाद तसा मोठा आहे. अर्थात तितकाच मोठा ह्या शहराचा इतिहास आहे. नेमका ह्या शहराचा इतिहास काय आहे? इथे कोणत्या ऐतिहासिक गोष्टी पाहण्यासारख्या आहे जाणून घेऊ आजच्या लेखात.

औरंगाबाद मधील ऐतिहासिक लेण्या :

औरंगाबाद पासून ३० किलोमीटरच्या अंतरावर असणाऱ्या वेरूळच्या लेण्या प्रसिद्ध आहेत. साधारण पाचव्या ते दहाव्या शतकामध्ये ह्या लेण्या कोरल्या गेल्या असाव्यात.
१७ हिंदू, १२ बौद्ध तथा ५ जैन लेण्या इथे आहेत. भारत सरकारने ह्या लेण्यांना राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले आहे. ह्यात एक महादेवाचे कैलास मंदिर आहे.

ह्या मंदिराचे वैशिष्ट्य असे की ह्याचे बांधकाम इतर मंदिरांप्रमाणे झालेले नाही. तर पायापासून पायथ्यापर्यंत कोरीवकाम करत हे मंदिर निर्माण करण्यात आलेले आहे.

तसेच बौद्ध लेण्यांमध्ये गौतम बुद्धांच्या बसलेल्या मुर्त्या कोरल्या आहेत. जैन लेण्यांमध्ये हत्ती, इंद्र तथा भरलेली सभा अशा गोष्टी कोरल्या आहेत.

औरंगाबादमध्ये वेरूळ प्रमाणेच अजिंठा लेणी देखील आहे. ह्यात बौद्ध धम्माच्या तत्वज्ञानाला धरून चित्र व कोरीव मुर्त्या बघायला मिळतात. इथले चित्रदालन पर्यटकांचे मन वेधून घेते. भगवान गौतम बुद्धांचे महापरिनिर्वाण झालेले शिल्प इथे आहे.

तसेच बुद्धांची आई त्यांच्या वडिलांना आपल्या स्वप्नाबद्दल सांगत असतानाचे चित्र देखील आहे. असे विभिन्न भाव, प्रसंग ह्या मुर्त्या व चित्रांमधून आपल्याला बघायला मिळतात.

औरंगाबाद मधील किल्ले :

औरंगाबाद मध्ये सर्वात प्रसिद्ध असणारा आणि पर्यटकांची सर्वाधिक गर्दी होत असलेला एकमेव किल्ला म्हणजे दौलताबादचा किल्ला.
अगदी वेरूळ च्या लेण्यांपुढे हा किल्ला आहे. ज्या डोंगरांच्या गिरीशिखरांवर देवाने तप केले तो देवगिरी किल्ला नंतर मुसलमानी राजवटीत दौलताबाद झाला.

हा किल्ला खूप बघण्यासारखा आहे. जैन, हिंदू, बुद्ध, इस्लाम सर्व धर्मीयांची प्रार्थना स्थळे व संस्कृती ह्या किल्ल्यात दिसते.

पण औरंगाबाद मध्ये केवळ दौलताबादच एकमेव किल्ला नसून इतरही किल्ले आहेत. कन्नड भागात अंतुर नावाचा एक किल्ला आहे.

हा किल्ला मराठ्यांनी बांधला होता नंतर तो निझामाकडे गेला. तसाच अजिंठा रांगेत सर्वात उंच ठिकाणी असणारा बैतलवाडी किल्ला देखील अपरिचित आहे.

अत्यंत खडतर रस्ता असल्यामुळे पर्यटक इथे जात नाही. औरंगाबाद मध्ये तसे अनेक किल्ले आहे त्यातलेच लहुगड नांद्रा, तालतम किल्ला, भांगसीमाता किल्ला प्रसिद्ध किल्ले आहेत.

औरंगाबाद मधील मंदिरांचा इतिहास :

औरंगाबाद मधील मंदिरे अत्यंत सुंदर आहेत. प्रामुख्याने ज्या मंदिरांची नावे घेतली जातात त्यातले एक वेरूळ लेण्यांमधील कैलास मंदिर आहे व तसेच घृष्णेश्वराचे मंदिर देखील आहे.
हे मंदिर देखील वेरूळ लेण्यांजवळ आहे. ह्याचे बांधकाम अहिल्यादेवी होळकरांनी करवून घेतले होते. असे म्हणतात की हे मंदिर एकाच पाषाणातून बनले आहे.

ह्याच प्रमाणे एक खंडोबा मंदिर देखील अहिल्याबाईंनी बांधल्याचे कळते. खंडोबा मंदिराचे स्थापत्त्य देखील मनमोहक आहे. भालगाव मध्ये रामाचे मंदिर आहे.

हे समर्थ रामदासांनी बांधले आहे. मोठा वाडा वाटावा असे हे मंदिर आहे. औरंगाबाद मध्ये भद्रा मारुतीचे देखील मंदिर प्रसिद्ध आहे.

औरंगाबाद मधील वाडे आणि महाल :

औरंगाबाद मध्ये बीबी का मकबरा हा प्रसिद्ध महाल आहे. शहाजहान ने मुमताज साठी ताजमहाल बांधला तसाच औरंगजेबाने त्याच्या बेगम साठी बांधलेला हा बीबीका मकबरा औरंगाबाद मधील खुलताबाद मध्ये आहे. औरंगाबाद मध्ये ह्याच प्रमाणे भोसल्यांचा वाडा देखील आहे.

शहाजी महाराजांच्या वडिलांनी अर्थात मालोजी राजांनी बांधेलला हा वेरूळचा वाडा बघण्यासारखा आहे. भोसले पूर्वी वेरुळचेच होते त्यामुळे तसे वाडे आणि महाल इथे बघायला मिळतातच. देवगिरी किल्ल्यावर देखील रंग महाल, शिशमहाल इत्यादी महाल आहेत.

असा हा औरंगाबादचा इतिहास सर्व गोष्टींमध्ये परिपूर्ण ठरतो.

]]>
https://www.batmi.net/know-about-the-historical-places-of-aurangabad/feed/ 0 26124
महाराणा प्रताप यांनी कसे लढले हळदी घाटाचे युद्ध? https://www.batmi.net/how-did-maharana-pratap-fight-the-battle-of-haldi-ghat/ https://www.batmi.net/how-did-maharana-pratap-fight-the-battle-of-haldi-ghat/#respond Tue, 02 Aug 2022 11:10:52 +0000 https://www.batmi.net/?p=26169 हळदी घाट म्हणजे समस्त इतिहासकरांसाठी अभ्यासाचा विषय. महाराणा प्रताप व अकबर ह्यांच्यात झालेले हे भीषण युद्ध आजही अनुत्तरित आहे. कोण जिंकले कोण हरले हे ठामपणे सांगता येत नाही.

मात्र अकबराचे मेवाड जिंकण्याचे स्वप्न स्वप्नच राहिले. १८ जून १५७६ ला झालेल्या ह्या युद्धात मुघल तसेच राजपुतांचे नुकसान झाले मात्र एक प्रश्न प्रत्येकाला पडतो की ह्या हळदी घाटाच्या या युद्धानंतर काय झाले?

महाराणा प्रतापांनी हे वादळ कसे रोखले? अकबराने नंतर काय केले? हे सारे आजच्या लेखात पाहणार आहोत. निमित्त आहे महाराणा प्रताप यांच्या आज तिथिनुसार म्हणजेच ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला असलेल्या जन्मदिनाचं. चला तर मग जाणून घेऊया या हळदी घाटाच्या युद्धाविषयी.

हळदी घाट म्हणजे हळदी प्रमाणे पिवळी माती असणारी भूमी. तिथे ही लढाई झाल्यानंतर सर्व घाट रक्ताने लालेलाल झाला होता. सर्वत्र आग आणि धूर दिसत होता.

किती तरी सैनिक मारले गेले होते. घोडे हत्ती जखमी झाले होते. सर्वत्र एक दुर्गंध पसरला होता. महाराणा प्रताप रणभूमी मधून निघून गेले असले तरी त्यांचा एक नवीन आदेश निघाला होता.

तो म्हणजे जे जे सैनिक जीवंत आहेत त्यांनी माघार घेत कुंभालघर इथे जमावे. अकबराकडून आलेल्या मानसिंगचे देखील मोठे नुकसान झाले होते. ह्याच कारणामुळे ह्या युद्धाचा परिणाम पुढे आला नाही.

पण अकबराने मानसिंगचा बहुमान न करता त्याला दरबारात येण्यापासून रोखले. ह्याच रागात नंतर मानसिंग आपली मोठी फौज घेऊन कुंभालघर इथे आला. तो तिथे येण्याआगोदरच महाराणा प्रतापांना बातमी मिळाली होती. ते तिथून थेट गोगुंडा इथे गेले.

मानसिंगला कुंभालघरमध्ये काहीच हाती लागले नाही. मानसिंगने नंतर गोगुंडाची वाट धरली. त्याची फौज आता थकली होती. महाराणा प्रतपांकडे होते ते केवळ सात हजार सैनिक. जिथे जिथे राणा प्रताप गेले तिथे तिथे हा मानसिंग गेला.

पण महाराणा प्रतापांना हे कळून चुकले होते की ह्या मानसिंगची रसद तोडली तर अन्न पाण्यावाचून त्याचे सैन्य सैरभैर होईल. त्यांनी तसेच केले जिथून जिथून ह्या मानसिंगला रसद मिळते ती रसद मोडून काढली. हे सारे अकबराला कळताच त्याने जातीने ह्या लढाईत उतरण्याचा निर्णय घेतला.

हळदी घाटात सुरू झालेली ही लढाई संपलेली नव्हती. आता स्वतः अकबर रणांगणी उतरला होता. त्याने मानसिंगसारखी चूक केली नाही.

त्याला केवळ हवे होते महाराणा प्रताप. त्यामुळे त्यांचा ठावठिकाणा लावणे गरजेचे होते. अकबराने सर्वप्रथम आजूबाजूचे प्रांत जिंकून घेतले.

नंतर आपल्या काही सैन्याच्या तुकड्या केल्या व महाराणा प्रतापांचा शोध सुरू झाला. महाराणा प्रताप डोंगराळ भागात गुप्तपणे राहत होते पण तिथे देखील त्यांनी भिल्ल समाजातील लोकांना हाती घेऊन फौज निर्माण करायला सुरुवात केली होती.

ह्या फौजेने अकबराच्या गुप्तहेरांना आणि सैन्याच्या तुकड्यांना यमसदनी धाडले. आता अकबराने आपला पवित्रा बदलला होता.

आपल्या सैन्याच्या तुकड्यांचे नेतृत्व करणाऱ्या कुतुबुद्दिन व भगवान दास ह्यांना अकबराने माघारी बोलावले आणि सर्वत्र नाकेबंदी केली. इतकी नाकेबंदी करून देखील महाराणा प्रताप काही अकबराच्या हाती लागले नाही.

नंतर मात्र महाराणा प्रतापांना हलाकीत दिवस काढावे लागले. त्यांनी अकबराला तहाचे पत्र पाठवले असे काही लोकांचे म्हणणे आहे पण त्याला कुठेही पुरावा नाही. मिळेल ते खाऊन राणा प्रतापांनी दिवस काढले. पण पुढे येणारा काळ विजयाचे संकेत देत होता.

हळदी घाटाचे युद्ध जरी अनुत्तरित राहिले तरी महाराणा प्रतापांनी ह्या मोगलांना उत्तर द्यायचेच होते. त्यांच्या एका विश्वासू माणसाने ‘भामाशाह’ने मोठी लूट महाराणा प्रतापांपुढे आणली होती. जवळपास २५ लाख रुपये आणि दोन हजार अश्रफी असा तो खजिना होता.

तो पगार म्हणून महाराणा प्रताप ह्यांनी रयतेला दिला आणि सात हजारचे सैन्य चाळीस हजाराच्या घरात गेले. पुढे देवीर ह्या ठिकाणी हळदी घाटाच्या लढाईचे उत्तर देण्याचे निश्चित झाले.

महाराणा प्रताप, त्यांच्या सोबत त्यांचा मुलगा, हाती असलेली चाळीस हजारची फौज आणि त्यांच्या जोडलीला भिल्ल समाजातील धनुर्धर लोक सारे मिळून देवीर वर तुटून पडले.

तिथे महाराणा प्रताप ह्यांच्या मुलाने सुलतान खान ह्या अकबराच्या मुख्य सरदाराला मारले व हे युद्ध राजपूत जिंकले. ह्यानंतर कित्येक वेळेस अकबराने आपले सैन्य मेवाडवर पाठवले पण हाती अपयशच आले. नंतर मात्र अकबराने स्वतःच्या बाजूने ह्या लढाईतून माघार घेतली होती.

अशा पद्धतीने हळदी घाटाच्या लढाईनंतर, अनुत्तरित राहणाऱ्या लढाईला महाराणा प्रताप ह्यांनी उत्तर देत आपले सैन्य पुन्हा नव्याने उभे केले आणि इतिहासात सोनेरी अक्षरांनी या युद्धाची नोंद झाली. अशा शूर पराक्रमी राजास मनाचा दंडवत!

]]>
https://www.batmi.net/how-did-maharana-pratap-fight-the-battle-of-haldi-ghat/feed/ 0 26169
शाहीर अमर शेख ह्यांनी लिहिलेला शिवरायांचा पोवाडा… https://www.batmi.net/shivarais-powada-written-by-shaheer-amar-shaikh/ https://www.batmi.net/shivarais-powada-written-by-shaheer-amar-shaikh/#respond Tue, 02 Aug 2022 11:09:32 +0000 https://www.batmi.net/?p=26171 शाहीर अमर शेख म्हणजे मराठमोळ्या डफावरची मराठमोळी थाप. तुणतुण्याचा ताण नि पहाडी आवाज. धर्म माणसासाठी असतो माणसं धर्मासाठी नसतात हे तत्व पाळून त्यांनी हाडाचा मराठी बाणा सांभाळला.

‘सुटला वादळी वारा’ सारखे गीत लिहिणारे नि संयुक्त महाराष्ट्र चळवळी दरम्यान दिल्लीच्या रस्त्यारस्त्यावर डफावर थाप मारत पोवाडे गाणारे शाहीर अमर शेख अत्यंत वंदनीय आहेत.

शाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांच्या कविता व पोवाडे अमर शेख ह्यांनीच सादर केले होते. आजच्या लेखात अमर शेख ह्यांनी शिवरायांवर लिहिलेला पोवाडा आपण पाहणार आहोत. तसा हा पोवाडा मोठा आहे पण नेमके त्यांना काय म्हणायचे होते, त्यांनी केलेले वर्णन कसे आहे सारे पाहुयात.

शाहीर अमर शेख ह्यांनी महाराजांच्या आयुष्यावर पोवाडा लिहिला असला तरी इंग्रजांवर महाराजांनी केलेली स्वारी ह्यात अधिकच तीव्रतेने मांडली आहे.
आपल्या तरुणांना इंग्रज कसे होते हे ओळखता यावे असाच काही हेतू त्यांचा असावा. शिवरायांच्या जन्मापूर्वीचे वर्णन त्यांनी अत्यंत सुंदरपणे केलेले आहे. अमर शेख म्हणतात,
“एके रात्री सह्यगिरी हसला। हसताना दिसला।
आनंद त्याला कसला। झाला उमगेला मानवाला।।”

हे वर्णन शिवरायांच्या जन्मापूर्वीचे वातावरण स्पष्ट करते. सूर्यास्त झाल्यानंतर पुन्हा प्रकाश कसा आला अशी कल्पना करत शाहीर म्हणतात, हे मानवाला उमगलेच नाही. ते केवळ सह्याद्रीला माहिती होते म्हणून तो आनंदाने हसत होता.

चिमण्यांचा थवा कसा गात उठला असे म्हणत सकाळचे वातावरण अमर शेख निर्माण करतात आणि त्याचे उत्तर देताना म्हणतात की, तो प्रकाश सूर्याचा नव्हता, तो सूर्य नव्हताच मुळी ते तर शिवराय होते. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर,

“सूर्य नव्हता शिवबा जन्मले। विश्व आनंदले।
गाऊ लागले। चराचर होऊन शिवबाचे भाट।
आगळा होता त्यांच्या गाण्याचा थाट। काढली शाहिरांनं त्यातूनच वाट।
अमर शाहीर शिवबाचा भाट। पोवाड्याच्या थाट।
ध्यानी तुम्ही घ्याहो। अहो राजे हो जि रं राजे रं जी जी।।”
स्वतःला शिवरायांचा भाट म्हणवून घेताना अमर शेख ह्यांना किती अभिमान वाटत असेल हे ह्यातून दिसते. पुढच्या चौकात शाहीर अमर शेख म्हणतात की, इंग्रज हे थपेबाज आहेत. त्यांनी चुकीचा इतिहास आपल्यापर्यंत पोहोचवला आहे. शिवरायांना डाकू म्हटलं आहे.
“इतिहासकार इंग्रजी। मुलुखाचे पाजी।
केली थपेबाजी। त्यांनी शिवबाला डाकू म्हटलं।।” 

असे म्हणत हे इंग्रज शिवरायांना का डाकू म्हणतात त्याचे ही कारण अमर शेख पुढे सांगतात. ते म्हणतात, इंग्रजांनी शिवकाळात सुरतला पहिली वखार घातली होती.

तिथून त्यांनी दिल्लीवर नजर रोखली होती आणि ही हालचाल महाराजांच्या ध्यानी आली म्हणूनच राजांनी इंग्रजांना झोडपायचे ठरवले होते. अमर शेख म्हणतात,

“धावती तराजुच्या बसुन काट्यावर। तिचं नव्हतं काही भागणार।
राज्य ती होती हाकणार। अवघ्या भारतावर।।
शिवबा हे द्रष्टे होते थोर। हेरलं त्यांनी सारं।
इंग्रज हे चोर। जळवा ह्या माझ्या वंशवेलिला।
मराठ्यांच्या शूर भावी पिढीला।। नाही तुडवायचं गुजराथ्याला।
तुडवायचं फक्त इंग्रजाला। तसंच मोगली सरदारांना।।” 

हे शब्द लिहून जणू अमर शेख शिवरायांचे मनोदय स्पष्ट करतात. गुजराती लोकांना हात न लावता इंग्रज व मोगलांना झोडपा हा आदेश सांगतो की महाराजांनी सुरत लुटली पण गुजराती बांधवांना नाही लुटले.

अमर शेख ह्यांनी आपल्या शब्दांमधून त्याच काळात हे गैर समज दूर केले होते. इंग्रजांना असे झोडपल्यामुळेच त्यांनी आपला इतिहास चुकीचा सांगितला हे ह्यातून स्पष्ट होते. शाहीर अमर शेख नंतर शिवरायांच्या पूर्वजांचे वर्णन करतात आणि शहाजी राजांचे वर्णन करताना ते म्हणतात,

“पेरावं तेच पीक येतं। जगाची रीत। नवं न्हाई त्यात।
शहाजीनं पराक्रम पेरला। शिवाजी सरजा अवतरला।।”

ह्यातून शिवरायांना स्वराज्य मंत्र देणारे शहाजी महाराज आहेत हेच अमर शेख सांगताय. शिवपूर्व काळातल्या महाराष्ट्राचे वर्णन करताना शाहीर म्हणतात की, जणू आई आणि मूल आडरानी अडकले आहे. त्यात जोराचा पाऊस व्हावा, वादळ सुटल्यामुळे जीव भयभीत व्हावा, तोच विजांचा कडकडाट व्हावा.

कुठून तरी वाघाच्या डरकाळीचा आवाज यावा आणि जीव फाटावा, वरून दगडांप्रमाणे गारांचा वर्षाव व्हावा, आश्रयासाठी एक गुहा दिसावी पण आत शिरताच डोंगर कोसळून खाली पडावा अशी काही अवस्था महाराष्ट्राची झाली होती. जी केवळ शिवरायांमुळे दूर झाली आणि महाराष्ट्र पुन्हा स्वतंत्र झाला.

शाहीर अमर शेख शिवरायांच्या मातापित्यांचे वर्णन करताना म्हणतात, जिजाऊंचे व शिवरायांचे कार्य गाताना ते म्हणतात,

“आला आला शिवाजी आला। अरुणोदय झाला।
लाल जनतेला। जिजाऊनं दिला योग्य वेळेला।
मराठ्यांनो करा रे जयजयकार। थोर त्या आईचे उपकार।
नाही रे नाही तुमच्यानं नाही फिटणारं जी जी जी जी….!”

महाराष्ट्राच्या इतिहासात शाहिरांचं मोलाचं योगदान आहे. त्यांनी जसं संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात डफावरच्या थापेने ती आग पेरली तशीच शिवाजी महाराजांची कीर्ती सुद्धा जनमनात रुजवली.

शाहिरांच्या या कार्यामुळेच महाराजांचा लढा आजही कोणत्याही लढ्याला बळ देत असतो. शाहीर अमर शेखांना, त्यांच्या कलेला आणि अस्मिता, अभिमान जागृत करणाऱ्या त्यांच्या काव्याला आणि मनाचा मुजरा!

]]>
https://www.batmi.net/shivarais-powada-written-by-shaheer-amar-shaikh/feed/ 0 26171
‘ह्या’ तंत्राने तात्काळ नदीचे पाणी स्वच्छ करा… https://www.batmi.net/clean-river-water-instantly-with-this-technique/ https://www.batmi.net/clean-river-water-instantly-with-this-technique/#respond Tue, 02 Aug 2022 11:06:59 +0000 https://www.batmi.net/?p=26173 जंगल सफारी करताना, रानोमाळ भटकताना, पायवाटा शोधताना तहान तर लागणारच आणि अशावेळी जर तुमच्या जवळील पाणी संपलेलं असेल तर तुमची फजिती झालीच म्हणून समजा. पण आज मी तुम्हाला असे तंत्र सांगणार आहे, ज्यामुळे नदीचे पाणी शून्य मिनिटात स्वच्छ होईल आणि तुमची तहान भागेल.

एकदा मी माझ्या मित्रांसमवेत महाबळेश्वरजवळील आंबेनळी घाटात, रानोमाळ भटकत होतो. उन्हाळ्याचे दिवस होते. आमची भटकंती वाढतच गेली. आमच्याकडील पाणी संपलेले होते. तेव्हा आमच्यातील दर्शनला तहान लागली. पाण्याच्या शोधार्थ आमची भटकंती सुरू होती.

तितक्यात आम्हाला दिसली जवळून घाटातून जाणारी सावित्री नदी! नदीचे पाणी वाहते पण गढूळ होते. त्यामुळे पाणी कसे प्यावे हा विचार आम्ही करतच होतो. आमची ही चलबिचल बघून शेजारीच थांबलेल्या एका काकांनी नदीचे गढूळ पाणी स्वच्छ करण्याचे एक तंत्र सांगितले.

काय आहे पाणी स्वच्छ करण्याचे तंत्र?

नदीच्या काठावरच, थोडेसे अंतर सोडून एक लहान खड्डा करायचा. या खड्ड्याला आदिवासींच्या भाषेत विहीरा असेही म्हणतात. त्या विहीरामध्ये नदीचे पाणी आपोआप येते. नदी किनारी केलेल्या खड्ड्यात नदीचे पाणी साचते. त्यातील गाळ आपोआप तळाला जातो आणि पाणी स्वच्छ होऊन ते पिण्यायोग्य बनते.

तेव्हा पाणी पिण्यासाठी पळसाचे तीन पाने घेऊन त्यापासून ग्लासच्या आकाराचे एक साधन बनवायचे. त्यातून पाणी गळती होऊ नये म्हणून एका काडीने त्याला घट्ट बसवा. पाणी पिण्याच्या या साधनाला टोपा किंवा डोमले असेही म्हणतात. त्या पानापासून बनलेल्या टोपात खड्ड्यात साचलेले पाणी घ्या आणि तुमची तहान भागवा. हे पाणी स्वच्छ आणि नितळ असते.

आम्ही ते पाणी प्यायले. पाणी खरंच खूप गोड होते. नदीचे पाणी वाहते असल्याने त्यात क्षार नसतात. तुम्ही भटकंती करत असताना सोबत काचेची बॉटल सुद्धा ठेऊ शकता. काचेच्या बॉटलला पाच सहा तास उन्हात ठेवल्याने सुद्धा पाणी शुद्ध होते.

या नैसर्गिक जुगाडाची गरज काय आहे?

खूपदा आपण सुट्ट्यांमध्ये फिरायला जातो. सोबत नेलेले एक दोन बॉटल पाणी कधी संपेल हे काही सांगता येत नाही आणि रानावनात पाण्याची उपलब्ध सुविधा म्हणजे नदी आणि ओढेच! त्यामुळे जंगलात ऐनवेळी तहान लागल्यानंतर ओढा, नदीकाठी हा नैसर्गिक जुगाड खूप महत्वाचा आहे.

स्वच्छ केलेल्या पाण्यातील जीवाणू नष्ट झाले असं होतही नसेल परंतु रेतीतून गाळलं गेल्यामुळे तहान भागवण्यासाठी पाणी स्वच्छ होत हे मात्र नक्की. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या सोबत तुरटीचा खडा, पाणी स्वच्छ करायच्या गोळ्या जवळ ठेऊ शकता.

तेव्हा तुम्ही सुद्धा ट्रेकिंग अथवा जंगल सफरीवर जाणार असाल तर नदीचे पाणी पिण्याचा हा प्रयोग करून निसर्गाची किमया अनुभवू शकता.

]]>
https://www.batmi.net/clean-river-water-instantly-with-this-technique/feed/ 0 26173
या ५ गोष्टी तुम्हाला माणूस म्हणून यशस्वी बनवतील! https://www.batmi.net/these-5-things-will-make-you-successful-as-a-man/ https://www.batmi.net/these-5-things-will-make-you-successful-as-a-man/#respond Tue, 02 Aug 2022 10:11:53 +0000 https://www.batmi.net/?p=26175 अगदी छोट्या – छोट्या गोष्टी, कृती केल्याने आपण आपलं आयुष्य समृद्ध करु शकतो. अर्थातच या कृती करण्याची इच्छा आणि क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे. अनेकदा आपला अहंकार, मीपणा, स्वकेंद्रीत वृत्ती आपल्याला समृद्धतेपर्यंत पोहोचू देत नाही.

एक संकुचित चौकट आपलाच स्वभाव आपल्याभोवती निर्माण करतो. पण ही चौकट सोडून खरंच जर आपल्याला आयुष्य समृद्ध करायचं असेल तर काही उपाय त्यासाठी केले पाहिजेत. काही गोष्टी पाळल्या पाहिजेत. त्या कोणत्या, याविषयी या लेखातून आपण जाणून घेऊ.

१. नम्रता आणि आत्मविश्वास यांच्यात संतुलन असावं

प्रत्येक माणसात नम्रता आणि आत्मविश्वास असणं गरजेचं आहे. या दोन गुणांच्या आधारावर माणूस आयुष्यात हवं ते साध्य करु शकतो इतकी ताकद या गुणांमध्ये आहे.

पण हे दोन्ही गुण सोबत बाळगणं आणि त्यांचं संतुलन राखणं मात्र अनेकांसाठी आव्हानासमान होऊन बसतं. ज्या माणसात आत्मविश्वास ओतप्रोत भरलेला असतो तो बऱ्याच अंशी स्वतःच्या प्रेमात असतो.

स्वतःला चांगलं समजताना अनेकदा त्याच्यातला नम्रपणा दूर होतो आणि अहंभाव जागृत होतो. मग त्याचं व्यक्तिमत्व कितीही प्रभावी असलं तरी त्याच्या अहंपणामुळे तो त्याचंच नुकसान करुन घेतो.

त्यामुळे नम्रता आणि आत्मविश्वासामधली बारीकशी रेष जपत या दोन्ही गुणांचं संतुलन राखणं आपल्याला समृद्ध करु शकतं.

२. जोखीम घ्या. “काय चूक होऊ शकते”, असा विचार न करता, “काय बरोबर होईल?” याचा विचार करा

जोखीम घेतल्याशिवाय आपण आयुष्यात काहीही उंच, मोठं असं करु शकत नाही. काही साध्य करायचं असेल, एखादी मोठी व्यक्ती म्हणून आपल्याला नाव कमवायचं असेल तर जोखीम घेतलीच पाहिजे.

अनेकदा जोखीम घेतली तर आपलं नुकसान होईल या विचाराने अनेकजण स्वतःचा कम्फर्ट झोनच सोडत नाही. त्याच त्या गोष्टी कम्फर्ट झोनमध्ये अडकून करत राहतात.

त्यातच आयुष्य संपून जातं. त्यामुळे जोखीम घ्यावी आणि कोणताही नकारात्मक विचार त्यामध्ये आणू नये. काय चूक होऊ शकतं यापेक्षा काय बरोबर होऊ शकतं याचा विचार करावा. सकारात्मक विचाराने घेतलेली जोखीम नक्कीच आपल्याला चांगल्या मार्गावर नेऊन पोहोचवेल.

३. आयुष्यात कृतज्ञतेची ठाम जागा असणं अतिशय गरजेचं आहे

प्रत्येक यशस्वी माणूस कृतज्ञतेचं महत्त्व आपल्याला सांगत असतो. कोणत्याही तक्रारीशिवाय, आनंदाने जगण्यासाठी कृतज्ञता व्यक्त करणं अतिशय गरजेचं आहे.

म्हणजे काय करायचं तर, आपल्याकडे जे – जे काही चांगलं आहे, त्या सगळ्याप्रती आभार मानायचे. जे नाही त्यामध्ये स्वतःला अडकवायचं नाही. चांगल्या गेलेल्या प्रत्येक दिवसाप्रती कृतज्ञतेची भावना मनात ठेवायची.

ही एक छोटीशी कृती आपल्याला मानसिकदृष्ट्याही आनंदी ठेवते आणि आयुष्यात समाधान आणते. अर्थात, या कृतीचं रुपांतर आपल्याला सवयीमध्ये करावं लागेल.

आयुष्यात कशालाही नावं ठेवण्याची सवयही कृतज्ञतेमुळे नाहीशी करता येईल आणि त्यामुळे आयुष्य निश्चितच समृद्ध होईल.

४. आवडत्या आणि नावडत्या भावनांमधील संतुलन

रोजच्या जगण्यात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आपल्याला येत असतात. अनेक भावना आपल्या मनात निर्माण होत असतात. या कधी चांगल्या, आपल्याला आवडणाऱ्या असतात तर कधी आपल्याला नावडणाऱ्या असतात.

पण भावना आवडत्या असो वा नावडत्या असो, त्यांचं संतुलन आपल्याला राखता आलं पाहिजे. आवडत्या भावनांनी आपण हुरळून जाता कामा नये आणि नावडत्या भावनांनी सतत दुःखात अडकून पडताही कामा नये. त्याचं संतुलन आपल्याला राखता आलं तर आयुष्याची मजा कित्येक पटींनी वाढू शकेल.

५. स्वतःला आणि लोकांना माफ करायला शिका

माफ करणं, क्षमाशीलता हे गुण समृद्ध आयुष्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. या गुणांमुळे मानसिक शांतता, स्थैर्य राखणं आपल्याला सोपं जातं. कोणाशीही संबंध बिघडत नाही आणि बिघडले तर माफी मागून त्यात सुधारणाही आपल्याला करता येते.

याबरोबरच स्वतःकडून काही चूक झाली, स्वतःच्या अपेक्षा आपण पूर्ण करु शकलो नाही तर स्वतःला माफ करणंही आपल्याला जमलं पाहिजे. स्वतःला दोष देणं हे सगळ्यात त्रासदायक ठरु शकतं याची जाणीव ठेवून आपण स्वतःलाही माफ करण्यास शिकलं पाहिजे.

या पाचही गोष्टी माणूस म्हणून आपल्याला समृद्ध करण्यासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत. कुठेही वाहवत न जाता, गरज असेल तिथे माघार घेत, आत्मविश्वासाची ताकद वापरत आयुष्य आपण जगलो तर त्याचा आनंद कितीतरी पटींनी जास्त असेल. अशा समृद्ध आयुष्यासासाठी या पाच गोष्टी आपण फॉलो केल्याच पाहिजेत.

]]>
https://www.batmi.net/these-5-things-will-make-you-successful-as-a-man/feed/ 0 26175
वाहतुकीचे २०२२ मधले नवे नियम माहीत आहेत का? https://www.batmi.net/do-you-know-the-new-traffic-rules-in-2022/ https://www.batmi.net/do-you-know-the-new-traffic-rules-in-2022/#respond Tue, 02 Aug 2022 10:10:14 +0000 https://www.batmi.net/?p=26178 वाहतूक व्यवस्थेत सुरळीतपणा रहावा म्हणून वाहतुकीचे नियम बनवण्यात आले आहेत. कालपरत्वे या नियमांमध्ये सुधारणाही करावी लागते.

तशीच सुधारणा होऊन नुकतेच सरकारने नवीन नियम लागू केले आहेत. या लेखातून वाहतुकीच्या नवीन नियमांबद्दल आपण जाणून घेऊया.

काय आहेत बदललेले नियम –

जून २०२२ मध्ये नियमांमध्ये बदल करण्यात आला असून नवीन सुधारित नियम लागू करण्यात आले आहेत.

◆ हेल्मेट बाबत नवीन नियम –

मोटारसायकल किंवा स्कूटर चालवताना हेल्मेट घातलं मग आता काही काळजी नाही असं न म्हणता हेल्मेटची स्ट्रीप लावलेली असणं आवश्यक आहे. ते केलं नसेल तर नियम मोटार वाहन अधिनियम १९४ ड नुसार तुम्हाला १००० रुपयांचा दंड भरावा लागू शकतो.

त्याचबरोबर हेल्मेटही मान्यताप्राप्त म्हणजे बीआयएस मार्क नसलेले हेल्मेट घातले असेल तर याच नियमानुसार तुम्हाला १००० रुपयांचा दंड होऊ शकतो. अशा प्रकारे नियमाचे पालन न केल्यास याच नियमांतर्गत तुम्हाला २००० हजार रुपयांचा दंड होऊ शकतो.

◆ जास्त वजन असेल तर –

नवीन मोटार वाहन कायद्यानुसार तुमच्या वाहनात मर्यादेपेक्षा जास्त वजन भरलं असेल तर तुम्हाला २० हजार रु. इतका दंड होऊ शकतो.

शिवाय मर्यादेच्या बाहेर जितकं वजन जास्त असेल तितकं प्रति टन २००० हजार रुपये दंड देखील द्यावा लागेल. यापूर्वी देखील जास्त वजन वाहून नेणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.

◆ आपत्कालीन वाहनांना वाट दिली नाहीतर –

आपत्कालीन परिस्थितीत म्हणजेच इमर्जन्सीमध्ये जेव्हा रस्ता मोकळा करण्यासाठी ॲम्ब्युलन्ससारखी वाहनं हॉर्न वाजवत राहतात, तेव्हा या वाहनांना जाण्यासाठी बाकी वाहनांनी रस्ता रिकामा करून द्यायला हवा.

अग्निशमन दलाच्या गाड्या, अ‍ॅम्ब्युलन्स अशी वाहने आपत्कालीन वाहने समजली जातात. हा आता नियम बनला आहे. आपत्कालीन वाहनाला ओव्हरटेक करू दिलं नाही तर संबंधित वाहनचालकाकडून चलान कापले जाईल व दंड आकारणी करण्यात येईल.

◆ दंडाच्या रकमेत वाढ

स्वतःच्या जीवावर उदार होऊन अतिशय वेगवानपणे वाहने चालवून अन्य लोकांचा जीव धोक्यात घालणारे अनेकजण असतात.

जोरदारपणे वाहन चालवणे किंवा इतर कोणत्याही प्रकारे वाहतुकीचे नियम मोडल्याबद्दल यापूर्वी नाममात्र दंडाची रक्कम भरायला लागत होती. परंतु आता या दंडाच्या रकमेत चांगलीच वाढ करण्यात आली आहे.

वाहन चालवताना मोबाईलवर बोलताना आढळल्यास दुचाकी चालकांना एक हजार रुपये दंड, तर चारचाकी वाहनचालकांना दोन हजार रुपये दंड आकारला जाईल.

अशा प्रकारचा गुन्हा तीन वर्षांच्या आत दुसऱ्यांदा किंवा त्यानंतरही गुन्हा घडल्यास प्रत्येक गुन्ह्यासाठी दहा हजार रुपये दंड आकारण्याची तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे.

◆ विनापरवाना वाहन चालवत असाल तर –

नवीन नियमानुसार विनापरवाना वाहन चालवणाऱ्या चालकांकडून पाच हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. बेफिकीरपणे वाहन चालवल्यास दुचाकी, चार चाकी व्यतिरिक्त अन्य वाहनांच्या चालकांना चार हजार रुपये दंड आकारण्याबद्दलची तरतूद कायद्यानुसार करण्यात आली आहे.

वाहन चालवण्याचे नियम नागरिकांनी सुरक्षित रहावे यासाठी बनवलेलेअसतात. या नियमांचं दंडाच्या भीतीपेक्षाही जीवाच्या भीतीने पालन केलं जावं, असं मला वाटतं. कारण, आपला जीव अमुल्य आहे आणि कोणीतरी नेहमीच तुमची घरी वाट पहात असणार आहे, हे विसरू नका.

]]>
https://www.batmi.net/do-you-know-the-new-traffic-rules-in-2022/feed/ 0 26178
एलआयसी एजंट व्हायचंय? क्षेत्राची सखोल माहिती घ्या! https://www.batmi.net/want-to-become-an-lic-agent-get-an-in-depth-look-at-the-area/ https://www.batmi.net/want-to-become-an-lic-agent-get-an-in-depth-look-at-the-area/#respond Tue, 02 Aug 2022 06:52:27 +0000 https://www.batmi.net/?p=26180 “शेयर मार्केट इतना गहरा कुंआ है, जो पूरे देश की पैसे की प्यास बुझा सकता है” स्कॅम वेबसिरीजमध्ये हर्षद मेहताचा हा डायलॉग तुफान प्रसिद्ध झाला होता.

तुम्ही म्हणाल एलआयसी आणि शेयर मार्केटचा इथे काय संबंध! तर हो. संबंध आहे आणि तो म्हणजे दोन्ही क्षेत्रात संधी आणि पैसा भरपूर आहे.

शिवाय एलआयसीमध्ये जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी अशी सुरक्षितता आहे. एलआयसी एजंट म्हणून जो कोणी मेहनत घेतो त्याच्या हाती यशाची मोठी विहीर गवसतेच गवसते. चला तर मग आज जाणून घेऊयात एलआयसी एजंटचे विश्व कसे आहे.

एलआयसी म्हणजेच लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन म्हणजे जीवन विमा ही भारतातील सर्वात मोठी विमा पॉलिसी आहे. भारतातील सर्व बँकेच्या १० टक्के हिस्सा एकट्या एलआयसीचा आहे.

एलआयसी एजंट का बनावे आणि या कामाची विशेषता:

एलआयसी एजंट ही अशी व्यक्ती आहे जी लोकांना त्यांच्या कुटुंबाचे संरक्षण, मृत्यू, अपंगत्व आणि कुटुंब प्रमुखाच्या निवृत्तीनंतरच्या अनपेक्षित घटनांपासून संरक्षण करण्यासाठी जीवन विमा योजनेवर सल्ला देते. हे एक महान कार्य आहे हे प्रथम लक्षात घ्यावे.

जे लोक बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी एलआयसी एजंट म्हणून काम करणे हे करियरच्या दृष्टीने मोठे व्यासपीठ आहे. त्यांना कायम स्वरुपी रोजगार मिळतो.

तुमचे शिक्षण जरी दहावी पर्यंतचे असेल तरी तुम्ही एलआयसीमध्ये काम करून तुमचे सर्व स्वप्न साकारू शकता.

एलआयसी मध्ये तुम्ही महिना ५० हजारांहून अधिक कमवू शकता. पहिल्या प्रीमियममध्ये ३५ टक्के कमीशन तुम्हाला मिळू शकते.

पॉलिसींच्या कमीशनवर विनाव्याज तुम्हाला सण, दुचाकी, चारचाकी घेण्यासाठी, सब्सिडी तसेच पूरस्थिती, दुष्काळ यासारख्या स्थितीत कर्ज मिळू शकते.

कार्यालय भत्ता, प्रवास भत्ता, स्टेशनरी, डायरी, कॅलेंडर, व्हिझिटींग कार्ड, लेटर पॅड अशा अनेक सुविधा मिळतात.

एजंट कधीही सेवानिवृत्त होत नाहीत. तुम्ही आजीवन कमीशन मिळवू शकता. तसेच निवृत्तीवेतनही लागू होते.

तुम्ही लाखो लोकांचे भविष्य सुरक्षित करता. तसेच पॉलिसींच्या विक्रीमार्फत तुम्ही वेगवेगळ्या क्लबचे सदस्यही होता.

आजच्या धकाधकीच्या जीवनात एका पगारावर घर भागत नाही किंवा तुमच्या मूळ स्वप्नाकडे धावताना पैशाची चणचण भासते अशा वेळी हा जॉब तुम्ही पार्टटाईम म्हणून सुद्धा स्वीकारू शकता. या कामाची विशेषता म्हणजे बाकीची कामे सांभाळून करता येतो.

विशेष म्हणजे महिलासुद्धा हे काम करू शकतात. आता तर अर्धे काम ऑनलाईन झाल्यामुळे महिलांसाठी करियर म्हणून यात खूप सुरक्षितता आहे.

एलआयसी एजंट बनण्यासाठी काही अटी:

१) एलआयसी एजंट बनण्यासाठी व्यक्तीचे वय अठरा वर्ष पूर्ण असावे.

२) व्यक्तीने किमान १० वी उत्तीर्ण असावे.

३) स्वतःचे सहा फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, दहावी उत्तीर्ण मार्क्सशीट सोबत असावे.

एलआयसी एजंट बनण्यासाठी एलआयसीच्या संकेतस्थळावर जाऊन किंवा नजीकच्या एलआयसी शाखेवर भेट देऊन तुम्ही अर्ज करू शकता.

अर्ज केल्यानंतर ५० तास तुम्हाला काही गोष्टी शिकवून त्यावर ५० गुणांची परीक्षा घेतली जाते त्यात १७ गुण मिळवले की, तुम्ही एलआयसी एजंट बनला आहात असे समजा.

 आजच्या काळात एलआयसी एजंटकडे हवी असणारी मुख्य गोष्ट:

१) एलआयसी एजंट म्हणून सुरुवात:

कोणत्याही गोष्टीची सुरुवात ही लहानच असते. त्यामुळे सुरुवातीला इन्शुरन्स पॉलिसी विकत घेण्यासाठी जर ग्राहक मिळत नसतील तर तुम्हाला गरजू व्यक्तींची भेट घ्यावी लागेल, त्यांना पॉलिसीचे महत्त्व समजावून सांगावे लागेल.

२) कष्ट करण्याची तयारी पाहिजेच:

क्षेत्र कोणतेही असो, कष्टाला पर्याय नाही हेच खरे आहे. एलआयसी एजंट हे क्षेत्र असेच आहे. एलआयसी विश्वातील मोठे नाव म्हणजे भारत पारेख. आज ते करोडो रुपये जरी कमवत असतील तरी त्यांची सुरुवात ही शून्यातून झाली होती.

गरजू व्यक्तींचे घरे किंवा मृत व्यक्तीचे घर कळावे म्हणून प्रसंगी ते स्मशान भूमीवरही थांबले. कष्ट घेतल्यास या क्षेत्रात पैसा ही पैसा होगा, हे नक्की.

३) आजच्या काळात तंत्रज्ञानाचा वापर महत्त्वाचा:

आज एलआयसी सोबत इतर विमा कंपन्यांचे कामकाज जास्त करून ऑनलाईन झाले आहे. ग्राहक ऑनलाईन विम्याचे हफ्ते भरू शकतात. त्यामुळे एजंट लोकांचे काम पुष्कळ प्रमाणात कमी झाले आहे.

परंतु पॉलिसी काढण्यासाठी ग्राहकांना एजंटची भेट घ्यावीच लागते. ग्राहकांच्या मनात अनेक प्रश्न असतात त्यांचे निरसन एजंट लोकच करतात. परंतु आजच्या काळात जगा सोबत चालण्यासाठी एजंट लोकांनी तंत्रज्ञानातील नवनवीन गोष्टी जरूर शिकाव्या.

४) लोकांची नाडी ओळखा:

या क्षेत्रात झपाट्याने प्रगती करण्यासाठी जीभेचा गोडवा आणि चांगली सेवा या दोन बाबी खूप महत्त्वाच्या आहेत.

पॉलिसी विकण्यासाठी ते क्लायंटसमोर घरोघरी बोलताना तेथील बोली भाषेचा वापर, त्यांच्या वाढदिवसाला, सणावाराला शुभेच्छा देणे, अशा रीतीने तुम्ही त्यांच्याशी सतत संपर्कात राहून विश्वासाचं नाते निर्माण करू शकता..

काय असतात एलआयसी एजंटचे कामे?

१) इन्शुरन्स प्लॅन जाणून घेणे.

२) इन्शुरन्स प्लॅन विकणे.

३) सर्व आवश्यक कागदपत्रे विमेदाराकडे पोहचवणे.

४) प्रत्येक विम्याचा हफ्ता एलआयसी शाखेत जमा करणे:

५) ग्राहकाला विविध सेवा पुरवणे.

६) तसेच कंपनीच्या नियमातील वर्षभराचे दिलेले टार्गेट पूर्ण करणे.

७)एखाद्या ग्राहकाच्या पॉलिसीचा काळ पूर्ण झाल्यावर त्याला त्याची रक्कम पुरवणे तसेच कागदपत्र प्रकिया करावी लागते.

कसा मिळतो एलआयसी एजंटना पैसा?

याचे गणित तुम्ही किती पॉलिसी विकता यावर अवलंबून आहे. इन्शुरन्स पॉलिसी विकल्यावर अंदाजे तीस ते पस्तीस टक्के कमिशन विमा एजंटला मिळत असते.

एखाद्या क्लाएंटने तुमच्या कडून पाच लाखाची इन्शुरन्स पॉलिसी विकत घेतल्यास तुम्हाला त्याच्या प्रत्येक विमा हफ्ता भरण्यामागे कमिशन मिळते. त्यामुळे जितक्या जास्त पॉलिसी तितका अधिक नफा हेच यशाचे सूत्र आहे.

तेव्हा आशा आहे “एलआयसी एजंट” होण्यापूर्वी या क्षेत्राची लेखातून मिळालेली माहिती तुम्हाला आवडली असेलच. अशा अजून कोणत्या विषयावर तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल हे नक्की कळवा.

]]>
https://www.batmi.net/want-to-become-an-lic-agent-get-an-in-depth-look-at-the-area/feed/ 0 26180
लहान मुलांना एखादी गंभीर बातमी कशी सांगावी? एकदा नक्की वाचा… https://www.batmi.net/how-to-tell-children-a-serious-news-read-it-once/ https://www.batmi.net/how-to-tell-children-a-serious-news-read-it-once/#respond Tue, 02 Aug 2022 06:50:55 +0000 https://www.batmi.net/?p=26183 तुझ्या भावाचा अपघात झाला आहे किंवा बहिणीला साप चावलाय, तुझ्या बाबांना कॅन्सर आहे अशा धक्कादायक घटना तरुण किंवा समजुतदार व्यक्तीला अचानक सांगितल्या तर ते सुद्धा घाबरून जातात.

मग लहान मुलांना जर घटना सांगताना दक्षता घेतली नाही तर त्यांची काय अवस्था होईल, त्या बालमनावर काय परिणाम होईल याचा विचारही मनात करवत नाही. आज आपण जाणून घेणार आहोत लहान अशा गंभीर गोष्टी सांगताना काय सावधगिरी बाळगता येईल या विषयी.

खोटे बोलून निभावून न्यावे का?

आमच्या शेजारी राहणाऱ्या चार वर्षाच्या शांभवीच्या आईचे वडील कोरोना काळात गेले. नातीचे आजोबांवर खूप प्रेम होते.

ते गेल्यावर, शांभवीला “तिचे आजोबा उपचारासाठी गावी गेले आहेत आणि ते लवकरच परत येतील” असे सांगण्यात आले. अशा प्रकारे काळजी आणि कुतूहलाने भरलेल्या शांभवीचे समाधान करण्यात आले.

खरं तर लहान मुलांना मृत्यू काय असतो हे तितकेसे माहीत नसते त्यांना प्रेम, काळजी, सुरक्षितता या गोष्टी समजलेल्या असतात.

एखाद्याचा मृत्यू होणे, अपघात होणे, घरातील पाळीव प्राणी सोडून जाणे अशा गोष्टी लहान मुलांसाठी विचलित करणाऱ्या असतात. त्यामुळे अनेकदा त्यांच्याशी खोटं बोलून वेळ निभावून नेण्याचा प्रयत्न केला जातो.

परंतु मुलं मोठे झाल्यावर त्यांना समजेल अशा पद्धतीने परिस्थिती सांगावीच लागते. त्यामुळे मुलं अगदीच लहान असेल तर वेळ निभावून नेलेली बरी पण मुलं जर नऊ दहा वर्षांचे असेल तर त्याला तुम्ही सांगा की माणूस मरू शकतो. त्यांना सोडून पण आनंदाने जगायचं असते.

सकारात्मक वातावरण निर्माण करा:

घरातील एखादा व्यक्ती गेल्यानंतर त्या व्यक्तीबद्दल अनेक जण तो कसा मेला, मरताना त्याला किती त्रास झाला अशा नकारात्मक गोष्टी बद्दल जास्त बोलतात. तसे न करता त्या व्यक्तींच्या आयुष्यातील चांगल्या आठवणींबद्दल बोलल्यास लहान मुलांपुढे सकारात्मक वातावरण तयार होते.

घरातील एखादी व्यक्ती गेल्यानंतर लहान मुलांच्या विश्वात एक पोकळी तयार होते. आता आजोबा गेले मला सायकलवर कोण फिरवणार, माझ्यासोबत कोण खेळणार असे विविध प्रश्न मुलांना पडतात तेव्हा वडिलांनी,

घरातल्या वयाने मोठ्या व्यक्तीने मी तुझ्या सोबत खेळतो, मी तुला बागेत घेऊन जाईल असा दिलासा देणे खूप महत्त्वाचे असते. घरातील इतर सदस्य सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत ही जाणीव करून दिली की मुलांचे मन आपसूक हलके होते.

लहान मुलांशी गंभीर गोष्टीविषयी बोलताना ही दक्षता घ्या:

लहान मुलांना पाळीव प्राणी खूप प्रिय असतात. त्यामुळे घरातील पाळीव प्राण्यांचा मृत्यू झाल्यास ते रडून रडून घर डोक्यावर घेतात. अशावेळी त्यांच्या भावनेकडे दुर्लक्ष न करता त्यांच्याशी संवाद साधा. आपण दुसरा असाच एक पाळीव प्राणी आणुया असा दिलासा द्या.

तुम्ही दुःखी झालात तर एकट्यात जाऊन रडू नका. दुःख होणे, रडू येणे हे खूप साहजिक आहे हे मुलांना कळू द्या. यामुळे मुलेसुद्धा भावना व्यक्त करायला शिकतील.

एखादी व्यक्ती आपल्याला सोडून गेली तर आपण तिच्या आठवणी सांगू शकतो, त्या व्यक्तीबद्दल मनमुराद बोलू शकतो या गोष्टीची जाणीव मुलांना होऊ द्या. व्यक्ती गेली तरी आनंदी राहण्यात काहीच वाईट नाही हे त्यांना सांगा.

घरातील व्यक्तीला मोठा आजार जडला असेल अथवा अपघात झाला असेल तेव्हा काय करावे?

लहान मुलांचे मने खूप संवेदनशील असतात. प्रत्येक गोष्टीबद्दल ते बारीक विचार करत असतात. इतरांबद्दल त्यांना नेहमी चिंता आणि काळजी असते.

आजोबा आजारी म्हंटल्यावर ते निरागस मुल त्यांच्याकडे जाणारच तेव्हा त्यांना हे समजावून सांगणे खूप आवश्यक आहे की आजोबांना आजार झाला आहे, तू त्यांच्या जवळ गेलीस तर तू सुद्धा आजारी पडशील.

घरातील अन्य कोणी व्यक्ती आजारी असेल तर मुलांना त्याविषयीची माहिती द्या. मुले याबाबतीत खूप संवेदनशील असतात.

एखाद्याचा अपघात झाल्यास किंवा अन्य गंभीर घटना घडल्यास काहीच घडलेले नाही असे वागू नका. अशा वागण्याने मुले आणखी जास्त विचार करतात.

मृत्यूला धार्मिक वा काल्पनिक गोष्टींशी जोडा:

आपल्या इथे व्यक्ती वारला की देवा घरी गेला अस आपण म्हणतो किंवा आकाशात बघ, ते तारा बनलेले तुझे आजोबा आहेत अस म्हणणे मुलांच्या भाबड्या मनाला सुरक्षितपणा मानसिक दिलासा देण्याची भावना असते आणि त्याने मुले सुखावतात.

मृत्यूला दैवी गोष्टीशी जोडल्यास मनाला आधार आणि शांती लाभते. चांगली माणसे देवाला प्रिय असतात त्यामुळे तुझ्या बाबांना देवाने बोलवले असे म्हणल्यास मुलांना आत्मिक समाधान मिळते.

तेव्हा मुलांना अशा गंभीर गोष्टी सांगताना थोडी खबरदारी नक्की घ्या. फुलांना कुरवाळल्यास ते सुद्धा सुंदर दिसतात तसे मुलांना प्रेमाने सर्व सांगून शंका निरसन केल्यास ते सुद्धा सर्व समजून घेतात.

]]>
https://www.batmi.net/how-to-tell-children-a-serious-news-read-it-once/feed/ 0 26183
आजच्या काळात स्मार्ट राहण्यासाठी नक्की करायचं काय? https://www.batmi.net/what-to-do-to-be-smart-in-todays-time/ https://www.batmi.net/what-to-do-to-be-smart-in-todays-time/#respond Tue, 02 Aug 2022 06:49:01 +0000 https://www.batmi.net/?p=26186 आजच्या बदलत्या आणि धावत्या काळात स्वतःचा टिकाव लागण्यासाठी स्मार्ट असणं आवश्यक आहे असं आपण अनेकदा ऐकतो. पण नेमकं स्मार्ट असणं म्हणजे काय यातच अनेकांचा गोंधळ होतो. म्हणूनच या लेखात आपण स्मार्टनेसबद्दल आणि स्मार्ट असणाऱ्यामध्ये नेमकं काय वेगळेपण असतं याबद्दल जाणून घेणार आहोत.

१. परिस्थितीविषयक जागरूकता

दिवसागणिक आपण वेगवेगळ्या परिस्थितीला सामोरं जात असतो. या परिस्थितीचा सामना कसा करायचा याची समज ज्या व्यक्तीला असते त्याला आपण स्मार्ट म्हणतो. मानसिक, भावनिक आव्हान निर्माण करणारी परिस्थिती, मनाविरुद्ध काही घडलं तर अशा प्रत्येकवेळी वागण्या – बोलण्याचं ज्ञान असायला हवं.

आव्हानात्मक परिस्थितीत जर आपणच घाबरुन जात असू तर परिस्थितीचा सामना करणं शक्य होणार नाही. त्याचे आणखीन विचित्र काही परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात. त्यामुळे स्मार्ट व्हायचं असेल तर परिस्थितीविषयी जागरुकता असणं अत्यंत गरजेचं आहे.

२. गरज असल्यास माहितीमध्ये बदल करणे

अनेकदा आयुष्यात काहीतरी न आवडणारं घडतं. एखादा आपल्याकडे काहीतरी बोललेला असतो ते दुसऱ्याला समजलं तर वाद निर्माण होण्याची शक्यता असते. अशावेळी आपल्याकडे असलेल्या माहितीत गरजेनुसार बदल करणं अतिशय गरजेचं आहे.

आपल्याकडील माहितीमध्ये बदल करुन जर वाद निर्माण होणं टळणार असेल तर तो बदल करणं आपल्याला जमलं पाहिजे. समजा, आपला तीन जणांचा ग्रुप आहे. आपण एक आहोत, दुसऱ्याने आपल्याला तिसऱ्याबद्दल काही वाईट सांगितलं तर ते त्या व्यक्तीपर्यंत जाऊ न देणं आणि भांडण टाळणं गरजेचं असतं. अशावेळी माहितीमध्ये बदल करुन वागणं महत्त्वाचं.

३. समस्या निवारण

समस्येचं निवारण करता येणं हे एक कौशल्य आहे. काही लोकं शिताफीने आयुष्यातल्या समस्या दूर करतात. तर काही लोकं एक समस्या सोडवता सोडवता दुसऱ्या समस्येत अडकून जातात. पण समस्या आली की समस्येतून काय मार्ग काढता येतील, समस्या कशी सोडवता येईल यावर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे.

समस्या आली म्हणून त्यावर रडत न बसता लवकरात लवकर त्यावर उपाय शोधण्यास आपण प्राधान्य दिलं पाहिजे. ही सवय आपल्याला आयुष्यभरासाठी अतिशय मदतीची ठरेल. समस्यांपासून पळण्यापेक्षा त्या सोडवण्यावर, मार्गी लावण्यावर भर देणं आपल्या व्यक्तिमत्वात स्मार्टनेस आणेल.

४. ध्येयाबाबत स्पष्टता

आयुष्यात आपल्या प्रत्येकाचं काही ना काही ध्येय असतं. या ध्येयाबाबत स्पष्टता असली तरच ते पूर्ण करता येऊ शकतं. स्पष्टता नसेल तर वाट चुकलेल्या वाटसरुसारखं आपल्याला फिरत रहावं लागेल. त्यामुळे करीअर सेट करण्यापूर्वीच आयुष्यात ध्येय निश्चित करुन ते पूर्ण करण्याच्या मागे आपण लागलो पाहिजे.

आपली आवड नक्की कशात आहे, जे ध्येय आपण ठरवलं आहे ते पूर्ण करण्याची क्षमता, मेहनत घेण्याची तयारी आपली आहे का या सगळ्याचा विचार आपण केला पाहिजे.

जेणे करुन आपल्यावर नंतर पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही. शिवाय, योग्य नियोजनाने ध्येय ठरवून पूर्ण करणं यातून आपला स्मार्टनेस दिसतो.

५. इतरांबद्दल सहानुभूती आणि दया

आपण खूप स्मार्ट आहोत, आपल्या सगळ्या कामांमध्ये चोख आहोत म्हणून इतरांना कमी लेखण्याचा प्रयत्न कधीही करु नये. अशी माणसं इतरांना स्मार्ट नाही तर अहंकारी वाटत असतात. अहंकारी माणसाने आयुष्यात कितीही चांगलं यश मिळवलं तरी कोणीही त्याकडे सन्मानाने पाहणार नाही.

याउलट, सगळ्या कामात उत्तम करत असलेला, लोकांबाबत सहानुभूती असलेला, दया दाखवणारा माणूस सगळ्यांनाच आकर्षित करेल. लोकांना जिंकण्याचा त्याचा स्मार्टनेस सगळ्यांनाच आपलंसं करेल.

६. निर्णयक्षमता

निर्णयक्षमता हादेखील अतिशय महत्त्वाचा गुण स्मार्ट माणसांमध्ये दिसून येतो. परिस्थितीचं योग्य मूल्यमापन करुन वेळ न घालवता योग्य निर्णय अशी माणसं घेत असतात. स्वतःसाठी काय चांगलं आहे, हे अशा माणसांना व्यवस्थित समजतं.

त्यामुळे योग्य वेळेत योग्य गोष्टी ते घडवून आणत असतात. यामध्ये प्रत्येकवेळी निर्णय बरोबरच येतील असं नाही पण निर्णय चुकीचे ठरले तर ते स्वीकारण्याची जबाबदारीदेखील ते घेत असतात. हाच स्मार्टनेस प्रत्येक माणसात असणं गरजेचं आहे.

स्मार्ट माणसांमध्ये हे सगळे गुण आपल्याला बघायला मिळतात. आपणही हे सगळे गुण आत्मसात केले तर स्मार्ट व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाऊ शकू. लेखात दिलेली माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा.
]]>
https://www.batmi.net/what-to-do-to-be-smart-in-todays-time/feed/ 0 26186