जरा हटके – Batmi https://www.batmi.net Get marathi latest news Thu, 10 Nov 2022 03:23:22 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5 https://www.batmi.net/wp-content/uploads/2022/09/cropped-Picsart_22-08-31_02-05-02-169-96x96.jpg जरा हटके – Batmi https://www.batmi.net 32 32 201029915 ठाणे गुन्हे | महाराष्ट्र: ठाण्यातील नदीत धोकादायक केमिकलचा मोठ्या प्रमाणात डंपिंग, ट्रक चालकाला अटक https://www.batmi.net/%e0%a4%a0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a5%87-%e0%a4%97%e0%a5%81%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a5%87-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%a0/ https://www.batmi.net/%e0%a4%a0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a5%87-%e0%a4%97%e0%a5%81%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a5%87-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%a0/#respond Mon, 07 Nov 2022 05:04:40 +0000 https://www.batmi.net/?p=27658

अटक

फाइल फोटो

ठाणे : महाराष्ट्रात, ठाणे जिल्ह्यातील वालधुनी नदीत धोकादायक रासायनिक द्रावण सोडल्याप्रकरणी एका ३२ वर्षीय ट्रक चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, आरोपींनी शनिवारी नदीवर जाऊन टँकरमधून विषारी रसायन टाकून पाणी प्रदूषित केले.

देखील वाचा

महात्मा फुले चौक पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, या संदर्भात माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला अटक केली. आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता (आयपीसी) आणि पर्यावरण (संरक्षण) कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे ते म्हणाले. (एजन्सी)

]]>
https://www.batmi.net/%e0%a4%a0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a5%87-%e0%a4%97%e0%a5%81%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a5%87-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%a0/feed/ 0 27658
स्पष्ट पशु हमले में अमेरिकी अमेज़ॅन ड्राइवर की मौत के बाद पुलिस ने दो कुत्तों को मार डाला https://www.batmi.net/%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f-%e0%a4%aa%e0%a4%b6%e0%a5%81-%e0%a4%b9%e0%a4%ae%e0%a4%b2%e0%a5%87-%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%82-%e0%a4%85%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%b0%e0%a4%bf/ https://www.batmi.net/%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f-%e0%a4%aa%e0%a4%b6%e0%a5%81-%e0%a4%b9%e0%a4%ae%e0%a4%b2%e0%a5%87-%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%82-%e0%a4%85%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%b0%e0%a4%bf/#respond Fri, 28 Oct 2022 04:00:51 +0000 https://www.batmi.net/?p=27485 सोमवार की रात अमेज़ॅन के एक ड्राइवर को उनके पास मृत पाए जाने के बाद पुलिस ने दो कुत्तों को घातक रूप से गोली मार दी थी, जो एक जानवर के हमले से घाव प्रतीत होता था। मिसौरी, एक्सेलसियर स्प्रिंग्स कि पुलिस ने कहा कि पड़ोसियों द्वारा सूचना देने के बाद उन्हें शाम 7 बजे एक घर के सामने के लॉन में एक व्यक्ति का शव मिला। जांचकर्ताओं ने पाया कि मृत व्यक्ति अमेज़न डिलीवरी ड्राइवर था। पुलिस ने यह भी कहा कि एक समय घर में पीछे हटने से पहले एक अंग्रेजी मास्टिफ और एक जर्मन चरवाहा आक्रामक व्यवहार कर रहे थे। मालिक वहां नहीं थे, और स्थानीय शेरिफ, स्कॉट चाइल्डर्स ने कहा कि डेप्युटी ने दोनों कुत्तों को गोली मार दी और मार डाला।

अधिकारियों ने अब तक इस बात की पुष्टि करना बंद कर दिया है कि मारे गए कुत्तों ने अमेज़न डिलीवरी ड्राइवर को मार डाला। लेकिन शेरिफ ने कहा कि आदमी के घाव एक जानवर द्वारा कुचले जाने के अनुरूप थे। अधिकारियों ने सार्वजनिक रूप से आदमी का नाम जारी नहीं किया है। अमेज़ॅन ने एक बयान जारी कर ड्राइवर की मौत पर दुख जताया है. एनबीसी न्यूज के अनुसार, बयान में कहा गया है, “आज रात हमारे अमेज़ॅन परिवार के एक सदस्य के साथ हुई दुखद घटना से हम बहुत दुखी हैं और टीम और ड्राइवर के प्रियजनों को सहायता प्रदान करेंगे।” “हम उनकी जांच में कानून प्रवर्तन की सहायता कर रहे हैं।”

]]>
https://www.batmi.net/%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f-%e0%a4%aa%e0%a4%b6%e0%a5%81-%e0%a4%b9%e0%a4%ae%e0%a4%b2%e0%a5%87-%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%82-%e0%a4%85%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%b0%e0%a4%bf/feed/ 0 27485
…अन् सात वर्षाच्या मुलीने दिलेली ऑर्डर घेऊन ४२ फूड डिलेव्हरी बॉइज घरासमोर झाले हजर https://www.batmi.net/and-42-food-delivery-boys-appeared-in-front-of-the-house-with-the-order-given-by-the-seven-year-old-girl/ https://www.batmi.net/and-42-food-delivery-boys-appeared-in-front-of-the-house-with-the-order-given-by-the-seven-year-old-girl/#respond Wed, 12 Oct 2022 13:46:33 +0000 https://www.batmi.net/?p=26966 फिलिपाइन्समध्ये घडलेली एक घटना सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. ही घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. येथील एका सात वर्षीय मुलीने ऑनलाइन फूड डिलेव्हरी अ‍ॅपवरुन जेवण ऑर्डर केलं.

मात्र ही ऑर्डर घेऊन एक दोन नाही तर तब्बल ४२ वेगवेगळे फूड डिलेव्हरी बॉइज या मुलीच्या घरी पोहचले आणि एकच गोंधळ उडाला. पहिल्यांदा या मुलीने चुकून अनेकदा ऑर्डर दिल्याने हा गोंधळ उडाला नाही ना, अशी शंका अनेकांना वाटली. मात्र या गोंधळामागील कारण वेगळचं निघालं.

मॅशेएबलने दिलेल्या वृत्तानुसार, फिलिपाइन्समधील सेबू सिटीमधील एका शालेय विद्यार्थिनीने फूडपांडा या अ‍ॅपवरुन दुपारच्या जेवणासाठी चिकन कटलेटची ऑर्डर दिली. आई-वडील घरी नसल्याने या मुलीने तिच्यासाठी आणि तिच्या मोठ्या बहिणीसाठी ही ऑर्डर दिली होती. ऑर्डर दिल्यानंतर ही मुलगी आपल्या बहिणीला जेवणाची तयारी करण्यात मदत करु लागली.

त्यानंतर काही वेळात या मुलीच्या घरासमोर एक डिलेव्हरी बॉय खाण्याची ऑर्डर घेऊन दाखल झाला. मात्र चिकन कटलेटचीच ऑर्डर घेऊन हळूहळू या मुलीच्या घरासमोर डिलेव्हरी बॉइजची गर्दीच जमली. पाहता पाहता काही मिनिटांमध्ये या ठिकाणी तब्बल ४२ डिलेव्हरी बॉइज गोळा झाले. एवढ्या मोठ्या संख्येने डिलेव्हरी बॉइज बघून सर्वचजण गोंधळात पडले.

एकाच वेळी छोट्याश्या गल्लीमध्ये दुकाची घेऊन गोळा झालेल्या ४२ डिलेव्हरी बॉइजला पाहण्यासाठी गल्लीत स्थानिकांची मोठी गर्दी झाली. कोणालाच काही कळत नव्हते आणि अगदीच गोंधळात टाकणारी परिस्थिती निर्माण झाली. याच गल्लीत राहणाऱ्या एका स्थानिक मुलाने या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला.

खरं तर हा गोंधळ फूड डिलेव्हरी अ‍ॅपमध्ये तांत्रिक दोष निर्माण झाल्याने घडला होता. त्यामुळेच एक ऑर्डर घेऊन तब्बल ४२ डिलेव्हरी बॉइज दाखल झाले. फूड डिलेव्हरी अ‍ॅपमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने या मुलीने दिलेली एक ऑर्डर एकाच वेळी ४२ डिलेव्हरी बॉइजला गेली

आणि ते दिलेली ऑर्डर घेऊन या मुलीच्या घरासमोर हजर झाले. मुलीच्या घरात इंटरनेटचा स्पीड कमी असल्याने फूड डिलेव्हरी अ‍ॅपमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि अचानक एकाच वेळी ४२ जणांना ऑर्डर गेली असं कंपनीने म्हटलं आहे.

]]>
https://www.batmi.net/and-42-food-delivery-boys-appeared-in-front-of-the-house-with-the-order-given-by-the-seven-year-old-girl/feed/ 0 26966
‘मेव्हण्याच्या लग्नासाठी सुट्टी पाहिजे, नाहीतर बायको…’, रजेसाठी पोलिसाने केला अनोखा अर्ज… https://www.batmi.net/leave-is-needed-for-brother-in-laws-marriage-otherwise-the-wife-the-police-made-a-unique-application-for-leave/ https://www.batmi.net/leave-is-needed-for-brother-in-laws-marriage-otherwise-the-wife-the-police-made-a-unique-application-for-leave/#respond Wed, 12 Oct 2022 13:43:10 +0000 https://www.batmi.net/?p=26959 मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमधील एका ट्रॅफिक पोलिसाने सुट्टीसाठी केलेला अर्ज सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. भोपाळचे ट्रॅफिक पोलिस कॉन्स्टेबल दिलीप कुमार अहिरवार यांना मेव्हण्याच्या लग्नासाठी पाच दिवसांची सुट्टी पाहिजे होती. यासाठी त्यांनी रजेचा अर्ज केला होता. पण सुट्टीसाठी केलेला तो अर्ज संबंधित पोलिसाला महागात पडलाय.

रजेसाठी वरिष्ठांकडे केलेल्या अर्जामध्ये अहिरवार यांनी, ११ डिसेंबर रोजी मेव्हण्याचं लग्न आहे, त्यासाठी पाच दिवसांची रजा मंजुर करावी असं नमूद केलं होतं. पण त्यासोबतच अर्जामध्ये

त्यांनी एक स्पेशल नोट लिहिली होती. “जर भावाच्या लग्नाला आला नाहीत तर वाईट परिणाम होतील असं पत्नीने स्पष्टपणे बजवालं आहे” , अशी स्पेशल नोट त्यांनी लिहिली होती.

हा सुट्टीचा अर्ज त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवरही शेअऱ केला होता. त्यावरुन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. अहिरराव यांच्यावर अनुशासनहीनतेची कारवाई केली जाणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

“ही अनुशासनहीनता आहे. सुट्टीसाठी अर्ज केला जाऊ शकतो. पण याचा अर्थ असा नाही की अर्जामध्ये काहीही लिहावं”, अशी प्रतिक्रिया भोपाळ रेंजचे डीआयजी इर्शाद वली यांनी ‘आज तक’शी बोलताना दिली. दरम्यान, सुट्टीसाठी केलेला हा अनोखा अर्ज सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

]]>
https://www.batmi.net/leave-is-needed-for-brother-in-laws-marriage-otherwise-the-wife-the-police-made-a-unique-application-for-leave/feed/ 0 26959
“लिफ्टची क्षमता ३५० किलोची असताना तो दीड टनचा एसी घेऊन गेला”; महिलेची तक्रार व्हायरल https://www.batmi.net/he-carried-a-one-and-a-half-ton-ac-when-the-lift-had-a-capacity-of-350-kg-the-womans-complaint-went-viral/ https://www.batmi.net/he-carried-a-one-and-a-half-ton-ac-when-the-lift-had-a-capacity-of-350-kg-the-womans-complaint-went-viral/#respond Wed, 12 Oct 2022 13:41:22 +0000 https://www.batmi.net/?p=26956 शेजारी आणि शेजारधर्म हा खरं तर मोठा चर्चेचा विषय आहे. म्हणजे शेजाऱ्यांकडून ज्याप्रमाणे चांगली वागणूक मिळते तशीच कधीतरी अगदी खडूस म्हणता येईल अशाप्रकारची वागणुकही मिळते. तर कधीतरी शेजाऱ्यांचे किंवा इमारतीमध्ये राहणाऱ्या

काही जणांचं वागणं हे आपल्या समजण्यापलीकडचं असतं असं वाटतं. असंच काहीसं झालं आहे हर्ष नावाच्या एका व्यक्तीबरोबर. त्यासंदर्भात त्याने ट्विटरवरुन माहिती दिली आहे आणि सध्या हर्षविरोधात तक्रार करणाऱ्या काकू चर्चेचा विषय ठरत आहेत.

हर्षने ट्विटरवरुन एक पत्र शेअर केलं आहे. हे पत्र इमारतीमध्ये हर्षच्या शेजारी राहणाऱ्या महिलेने सोसायटीच्या कमिटीमधील प्रमुखांना पाठवलं आहे. या पत्रामध्ये तक्रार करणाऱ्या काकूंनी हर्षच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. हर्ष यांनी त्यांच्या घरी आलेल्या कामागारांच्या मदतीने इमारतीच्या लिफ्टने दीड टनचा एअर कंडिशन चौथ्या मजल्यावर आणण्यास सांगितल्याचं या तक्रारीमध्ये म्हटलं आहे.

आता या तक्रारीमध्ये चुकीचं काय आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. म्हणजे लिफ्टने एसी चौथ्या मजल्यावर नेल्याप्रकरणी तक्रार करण्यासारखं काय आहे?, हा प्रश्न पडणं सहाजिक आहे. मात्र आपली तक्रार नक्की काय आहे हे या महिलेने पत्रामध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे. “इमारतीमधील दोन्ही लिफ्टची क्षमता ही ३५० किलोची आहे.

मी त्याला अनेकदा नियमांचे उल्लंघन न करताना नियम पाळण्याचा सल्ला दिला. अवजड सामान वाहून नेण्यासाठी लिफ्ट वापरु नये असं मी त्याला सांगितलं. त्यावर त्याने माझ्याशी वाद घालत दीड टनांच्या एसीचे वजन २० किलो असते १५०० किलो नाही असं सांगण्यास सुरुवात केली,” असं या पत्रामध्ये नमूद करण्यात आलं आहे.

आता पत्रातील हा मजकूर वाचून तुम्हीही डोक्याला हात मारुन घेतला असेल. हर्षचीही अशीच काहीतरी पहिली प्रतिक्रिया होती. त्याने हे पत्र “या माझ्या शेजाराच्या बाईने माझ्याविरोधात सोसायटीकडे तक्रार केली आहे. हे पाहा तिने पाठवलेलं तक्रारीचं पत्र. ते वाचून तुम्हाला समजेल ती किती वेडी आहे,” अशा कॅप्शनसहीत ट्विट केलं आहे.

दीड हजारांहून अधिक जणांनी हे ट्विट रिट्विट केलं आहे तर १० हजारांहून अधिक जणांनी याला लाइक केलं आहे. या ट्विटवर शेकडो कमेंट असून अनेकांनी या तक्रारदार महिलेची खिल्ली उडवली आहे.

एकंदरितच या प्रकरणाचे गांभीर्य आणि लावलेला तर्क पाहता हर्षवर कारवाई होणार नाहीच पण या महिलेने पाठवलेल्या या पत्रामुळे नेटकऱ्यांची करमणूक झाली हे मात्र नक्की.

]]>
https://www.batmi.net/he-carried-a-one-and-a-half-ton-ac-when-the-lift-had-a-capacity-of-350-kg-the-womans-complaint-went-viral/feed/ 0 26956
गायछापचा हा निंबध वाचून हसून हसून व्हाल वेडे… https://www.batmi.net/you-will-go-crazy-after-reading-this-story-of-gaichhap/ https://www.batmi.net/you-will-go-crazy-after-reading-this-story-of-gaichhap/#respond Wed, 12 Oct 2022 13:36:12 +0000 https://www.batmi.net/?p=26950 जाहिर निषेध !!! जाहिर निषेध !!!! जाहिर निषेध!!! जे.बी. मालपानी ग्रुपचा जाहिर निषेध।।। 1 रूपएची गाय छाप 5 रुपयेला झाली … 5 रुपयेची 10 रूपयेला .. 10 चे आता 12 रुपये निषेध किम्मत वाढवल्या मुळे नहीं ।।। पण एवढी किम्मत वाढवुन देखील पैकिंग मधे काहीही सुधार झालेला नाही तीच खाकी पूड़ी , लगेच फाटून अणि पूर्ण खिशात सांडते राव… किती दिवस सहन करणार ..निदान चुना तरी फ्री देत जा…..

भिकार्यांसारख मित्राकडे मागवा लागतो….. ब्रांड बदलला की तलब जात नाही … अरे निदान गम तरी नीट लावत जा ।।।
अक्षरशा घरच्यांचे बोलने खावून खावुन तम्बाखू सोडायची वेळ आली राव … ज्या खिशात बघू त्या खिशात तम्बाखूच तम्बाखू ..
एक भडकलेला तम्बाखू प्लेयर…

त्यो परश्या म्हणतोय… तुझ्यासारख तंबाखू खाऊन मरन्यापेक्षा.. आर्ची वर प्रेम करुण मरायला आवडल मला… त्याला कोनी सांगा रे… तंबाखूत जी मज्जा हाय ती आर्चीत पन नाहि. आखील भारतीय घे डबल मळ संघटना

मास्तर:-Facebook / What’s app मुळे कोणता फायदा झाला? गण्या:-गाय छाप खाऊन पण बोलता येतं…!! सकाळ झाली…. गजरच्या आवाजाने जाग आली…. पांघरुण बाजूला केलं…. हात लांब करून जांभई देऊन त्याने आळस झटकला….

शेजारच्या टीपॉय वरील घड्याळाचा गजर त्याने बटण दाबून बंद केला…. टीपॉयकड़े नजर जाताच त्याला काहीसे चुकल्या चुकल्यासारखे जाणवले…  ते लक्षात आल्यावर तो ताड़दिशी उठला…. त्याने टीपॉयच्या खालच्या कप्प्यातील पेपर मासिके काढली….

त्यांना झटकत त्याचा शोध चालू झाला…. तिथेही निराश झाल्यावर त्याने टीपॉय भिंतीपासून पुढे ओढला… त्या मागच्या फटीत तर ती वस्तू नाही ना….??? मोबाइलची बॅटरी on करून तो टीपॉय मागील फट, bed च्या खाली बघू लागला… आता मात्र त्याला घाम फुटला होता, हृदयाचे ठोके वाढत चालले होते….

पांघरूण झटकलं, गादी वर खाली करून बघितली, जिथे जिथे म्हणून शोधता येईल तिथे तिथे तो शोधू लागला…. आता मात्र तो असहय झाला होता….!  त्याच्या चेहऱ्यावर विचित्र भाव उमटू लागले होते….  तो कासावीस झाला होता. Loading… दरवाजाच्या मागे

असणाऱ्या hanger ला असणारी पँट अखेर त्याने हातात घेतली आणि तिला तो चाचपू लागला.  आणि अखेर एक हर्षान्वित लहर त्याच्या चेहऱ्यावर चमकली. त्याचा शोध आता संपला होता.  कारण :- गायछाप् सापड़ली होती आणि आता तो समाधानाने संडासला जाणार होता .. !!!!!

]]>
https://www.batmi.net/you-will-go-crazy-after-reading-this-story-of-gaichhap/feed/ 0 26950
असा ‘धाडसी’ होता औरंगजेबाचा निंदक ‘कवी भूषण’! https://www.batmi.net/aurangzebs-slanderer-kavi-bhushan-was-so-brave/ https://www.batmi.net/aurangzebs-slanderer-kavi-bhushan-was-so-brave/#respond Fri, 19 Aug 2022 07:51:52 +0000 https://www.batmi.net/?p=26388 काही मोजके लोक नेहमी अन्यायकारक नि चुकीच्या लोकांना, प्रथेला, विचारधारेला इत्यादी गोष्टींना समर्थन देत असतात. ह्या ना त्याप्रकारे समाजात तेढ निर्माण होते ती वेगळीच.

इतिहासात ज्या औरंगजेबाची नाचक्की, बदनामी, क्रूरता नमूद आहे तो आपला आदर्श कसा होऊ शकतो? अर्थात ह्या चुकीच्या गोष्टींविरुद्ध वाचा फोडण्यासाठी लागते ते धाडस. जे साडेतीनशे वर्षांपूर्वी थेट औरंगजेबाच्या दरबारात एका व्यक्तीने केले होते.

एक कवी ज्याने जीवाची तमा न बाळगता धाडसाने औरंगजेबासमोर त्याच्याच अत्याचाराचे व पापाचे पाठ वाचून दाखवले. तो कवी म्हणजे कवीराज भूषण. नेमके हा भूषण औरंगजेबाला काय म्हणाला हे पाहूयात.

कवी भूषण औरंगजेबाच्या दरबारात कविता सादर करणार होता त्याने अभयदान मागून छंद गायला सुरुवात केला.

“किबले की ठोर बाप बादशाह साहंजाह,
ताको कैद कियो मानो मक्के आग लायी हे।
बडो भाई दारा को पकरीके मारी दारियो,
मेह रहू नाही माको बडो सगा भाई हे।।”

अर्थात मक्केच्या काबे इतके पवित्र असणाऱ्या वडीलांना ह्या औरंगजेबाने अटक केली. जणू मक्क्याला आग लागावी इतके मोठे ते पाप होते. ह्या औरंगजेबाने स्वतःच्या बापाला कैद करून बादशाहपद बळकावले. शहाजहानसाठी त्याने एक खोली ठेवली होती, त्या बाहेर शहाजहानला येण्यास बंदी होती.

केवळ त्या खोलीतून ताजमहाल दिसायचा इतकेच काय ते सुख. औरंगजेबाने धूप अंगाऱ्यात विष मिसळून त्याचा उबारा स्वतःच्या बापाला दिला होता. इतकेच नाही तर स्वतःच्या सख्या भावाला ह्या क्रूर औरंग्याने मारले होते. एकाच आईच्या पोटी जन्म घेऊन तो भावाच्या जीवावर उठला होता.

दारा शिकोह हा औरंगजेबाचा मोठा भाऊ हिंदू मुसलमानास समतेची वागणूक द्यायचा. त्याने अनेक हिंदू धर्मग्रंथ फारसीमध्ये अनुवादित करत चांगले हितसंबंधही जोडले होते. पण त्यालाही औरंगजेबाने मारले. शिवाय आपल्या बापासमोर सख्ख्या काकाचा गळा दाबत त्याचा जीव घेतला ते वेगळेच. 

“बंधू तो मुरादबक्ष बादी चुक करिबे को,
बिच ले कुरान खुदा की कसम खाई हे।
भूषण सुकवी कहे सुनो नवरंग जेब,
ये तो काम किन्ने तेयु पादशाही पायी हे।।”

भूषण म्हणतो, ‘हे औरंगजेबा तुझ्या दुसऱ्या भावाला मुरादबक्ष ह्यास कुराणाची शपथ घेऊन तू दगा न देण्याचे वचन दिले होते. पण तरी छलकपट करत तू त्यासही कैद केलेस.

अश्या खोट्या शपथा घेऊन पाप करत तू हे पादशाहीचे पद मिळवले आहे.’ दरबारात सारे लोक हे ऐकून थक्क झाले होते पुढे काय होईल ह्याची कोणालाच कल्पना नव्हती. तोच कवी भूषणाने पुढचे छंद गण्यास सुरुवात केली.

“हाथ तसबीह लिए प्रातः उठे बंदगी को
आपही कपट रूप कपट सु जप के।
आगरे में जाय दारा चौक मे चुनाय लिन्हो
छत्रहू छिनायो मानो मरे बुढे बाप के।।”

भूषण म्हणतो हा औरंगजेब सकाळी जपमाळ घेऊन अल्लाहची आराधना करतो ते सारे कपट आहे. टोप्या आणि चादरी विणून मानवतावादी कोणीही होत नसतं. हा जपमाळेत देवाचे नाही कपटाचेच जप करतो. आग्ऱ्यात दारा शिकोह ह्यास औरंग्याने चिणून मारले आपल्या बापजाद्यांचे तख्त लबाडीने बळकावले.

शेवटच्या छंदात भूषण म्हणतो,

“किन्हों है सगोत घात सो मैं नाही कहों,
फेरी पिल पै तोरायो चार चुगुल के गपके।
भूषण भनत छटछांदी मती मंद महा
सौ सौ चुहाई खायके बिलारी बैठी तप के।।”

अर्थात चारचौघांचे ऐकून ह्या औरंग्याने स्वतःच्याच लोकांना हत्तीच्या पायी दिलेले आहे. आणि हा धर्माचा आव तर असा आणतो की, असे वाटते जणू शंभर उंदीर खाऊन मांजर तपालाच बसली आहे.

इथून भूषणाने आपली सुटका करून घेतली मात्र औरंग्याला त्याची जागा आपल्या प्रतिभावान वाणीतून त्याने दाखवून दिली. काही इतिहासकार ह्या कथेला आख्यायिका मानतात पण त्यामागचा हेतू हाच की चुकीच्या गोष्टींना सुज्ञ माणसाने विरोध केलाच पाहिजे.

औरंगजेब तेव्हा पण होता आणि आजही लोकांच्या वृत्तीमध्ये आहे. केवळ कवी भूषण बनून गर्जना करायची आहे. चुकीला चूक म्हणण्यात कसलेच न्यूनगंड नसावे. ज्या काळात औरंगजेबासारखा कट्टर व्यक्ती असताना भूषणाला छंद म्हणताना भीती वाटली नाही,

आपण तर शिवरायांच्याच स्वराज्यातले व मातीतले आहोत. औरंगजेबासारख्या दुष्ट प्रवृत्तींना विरोध करत आपणही हे धाडस दाखवले पाहिजे.

कारण आपला माथा टेकतो तो केवळ शिवप्रभूंच्या समाधी पुढे. इथे मान वाकवली की आयुष्यभर ताठ मानेने जगता येते. म्हणूनच ताठ मानेने जगत चुकीच्या गोष्टींविरुद्ध वाचा फोडायची असते. बरोबर ना? या विषयी आपले मत काय आहे ते कमेंट करून नक्की सांगा.

]]>
https://www.batmi.net/aurangzebs-slanderer-kavi-bhushan-was-so-brave/feed/ 0 26388
औरंगजेबाने लावलेला निर्दयी जिझिया कर हा कसा होता? एकदा नक्की वाचा… https://www.batmi.net/how-was-the-brutal-jizya-tax-imposed-by-aurangzeb/ https://www.batmi.net/how-was-the-brutal-jizya-tax-imposed-by-aurangzeb/#respond Fri, 19 Aug 2022 07:50:15 +0000 https://www.batmi.net/?p=26390 सध्या देशभरात औरंगजेबाच्या कबरीवरून वाद पेटला आहे. काही मोजक्याच लोकांचे म्हणणे आहे की त्या कबरीला फुलं वाहणे काहीही चुकीचे नाहीये. मात्र बहुतांश हिंदू व मुस्लिम लोक ह्या गोष्टीच्या विरोधात आहेत.

ज्या शिवरायांनी हा महाराष्ट्र घडवला, स्वकीयांचे राज्य निर्माण केले आणि हेच राज्य बुडवू पाहणाऱ्या औरंगजेबाला कसे आपण वंदन करू शकू? औरंगजेब कसा होता हे सर्व लोकांना माहिती आहेच.

आज काही मोजक्या लोकांची इच्छा नसली तरी इतिहास औरंगजेबाला निर्दयी, क्रूर, कपटी आणि वाईट असल्याचेच सांगतो.

ह्याचेच एक मोठे उदाहरण आहे औरंगजेबाने हिंदूंवर लादलेला जिझिया कर. हा कर नेमका काय असतो, त्याचा इतिहास काय? औरंगजेबाने ह्या संबंधित काय केले व शिवरायांनी कोणती पाऊले उचलली आहे हे सारे काही आपण आजच्या लेखात पाहणार आहोत.

सर्वात आधी जिझिया कर काय होता हे पाहुयात. मुस्लिम राजवटी जसजशा जगात निर्माण होत गेल्या तसतशा काही कर्मठ मुसलमानांनी हा कर वापरात आणला. त्यांच्यानुसार मुसलमान सोडले तर सारे धर्म चुकीचे होते.

मुसलमान असणेच जगण्याचे सार आहे पण त्यासाठी ह्या काही कर्मठांनी मनाला वाटेल ते अत्याचार लोकांवर केले होते. मुसलमानेतरांना ह्या जगात जगण्याचा अधिकार नाही म्हणून केवळ दोन पर्याय दिले जायचे. एकतर धर्मांतर करावे किंवा मृत्यूस सामोरे जावे.

पण काही काळानंतर ह्या गोष्टी सांभाळणे व अंमलात आणणे कठीण गेले तेव्हा जन्म झाला जिझियाचा. हा कर केवळ हिंदूंवर नाही तर जे जे मुसलमानेतर आहे त्यांच्यावर लादला होता.

ह्यात कर घेऊन त्या उर्वरित धर्मियांना समाजामध्ये दुय्यम दर्जा दिल्या जायचा. त्यांनाच ‘जिम्मी’ असे म्हणतात. जिझिया कर केवळ पैश्यापुरता मर्यादित नसून त्यात अनेक गोष्टी होत्या.

जिझियाचे प्रारूप असे होते – मुसलमानेतरांनी धार्मिक स्थळे बांधायची नाहीत, जुने तुटलेले मंदिर पुन्हा बांधायचे नाही; मुसलमान लोक त्यांच्या यात्रेदरम्यान इतरांच्या मंदिरात राहू शकतील;

मुसलमान व्यक्ती गैरमुसलमानाच्या घरी ३ दिवस सहज म्हणून राहू शकतो; त्या तीन दिवसात त्याने केलेले काम गुन्हा मानला जाणार नाही;

मुसलमानेतरांनी कोणती सभा घेतली तर त्यात मुसलमान येऊ शकतात; इतरांनी आपल्या मुलामुलींची नावे मुसलमानांप्रमाणे ठेवायची नाहीत; इतरांनी मुसलमानांप्रमाणे कपडे घालायचे नाहीत; घोडा वापरायचा असेल तर त्याला लगाम व खोगीर लावायचे नाही;

धनुष्यबाण व तलवार चालवायची नाही; त्यांनी दारू प्यायची नाही व अंगठी देखील घालायची नाही; जुना पोशाख बदलायचा नाही; स्वतःचे सण उत्सव साजरे करायचे नाहीत;

इतकेच काय तर घरातील कोणाचे निधन झाले तर त्याचे प्रेत कब्रस्तानात आणायचे नाही; त्या व्यक्तीसाठी शोक करीत बसायचे नाही; हेरांना मदत करायची नाही व मुसलमान असणाऱ्या लोकांना स्वतःकडे नोकर म्हणून ठेवायचे नाही.

हा कर अकबराच्या काळात पण होता, त्याने तो काढून टाकला होता. त्याने तो कर हिंदूंच्या भावनेचा आदर करत काढला की बहुसंख्यांकांच्या दबावात काढला हा अभ्यासाचा विषय आहे. अकबराच्या दरबारात तसे अनेक लोक हिंदू होते.

त्यामुळे कदाचित अडचण आली असणार. शिवाय अकबर हिंदू मुसलमान असे भेद करत नव्हता असे काही जाणकार सांगतात. हा कदाचित त्याच गोष्टीचा परिणाम असू शकतो.

मात्र त्याचा पणतू औरंगजेब ह्याने हा कर पुनर्जीवित केला होता. ह्याच्या डोक्यात धर्मांधतेचे खुळ होतेच मुळी. तो स्वतःला आलमगीर म्हणवून घ्यायचा म्हणजेच आलम (संपूर्ण) दुनियचे राजा.

त्यात ‘आलमगीर जिंदा पिर’ अशी त्याची घोषणा सारे पगारी नोकर त्याच्या आनंदासाठी देत असायचे. ह्याने २ एप्रिल १६७९ ला हा कर लावण्यास सुरुवात केली होती. आचार्य गोपालदास ह्यांनी कर भरण्यास नकार दिल्याने त्यांना भर दरबारात ह्या औरंगजेबाने मारले होते.

शिवरायांना हे समजताच त्यांनी औरंगजेबास पत्र धाडले. काही इतिहासकार हे पत्र मानत नाहीत. मात्र त्यात शिवराय स्पष्टपणे औरंगजेबाला खडे बोल सुनावतात. तुम्ही हिंदूंवर कर लावला ह्याचा अर्थ तुमचा खजिना रिकामा झाला का?

असे म्हणत महाराजांनी औरंगजेबाला अकबराचे उदाहरण दिले. शिवाय एकाच देवाची आपण सारी लेकरे आहोत. कोणी बांग देतो तर कोणी घंटानाद करतो. ह्यांच्यात भेद केला तर त्या ईश्वराच्या निर्मितीवर डाग लावण्यासारखे आहे. असे ह्या पत्रात महाराजांनी म्हटले आहे.

पुढे मात्र हा कर औरंगजेबाच्या नातवाने जहाँदर शाह याने बंद केला. तसा ही ह्या कराचा फटका स्वराज्याला बसलाच नव्हता. त्यामुळे तो चालू असून बंद असल्यासारखाच होता.

मात्र ह्यातून औरंगजेबाच्या विकृतीचे दर्शन घडते. ह्याने केवळ हिंदूंना नाही तर मुसलमानांना देखील त्रास दिला होता. चक्क मुसलमानांच्या दाढीची लांबी मोजण्याकरिता ह्या औरंगजेबाने पगारी लोक ठेवले होते.

औरंगजेबाच्या कबरी पुढे डोकं टेकवणाऱ्यांवर त्या काळात अन्याय झाला असता तर कदाचित औरंगजेबाची कबर बांधायची माणुसकी सुद्धा कोणी दाखवली नसती.

पण आजच्या लोकांना औरंगजेब कसा होता हे माहित असून सुद्धा त्याच्यापुढे नतमस्तक होतात. यामुळे सामाजिक तेढ निर्माण होते, याची जाणीव प्रत्येकाला असली पाहिजे. आपलं यावर काय मत आहे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा.

]]>
https://www.batmi.net/how-was-the-brutal-jizya-tax-imposed-by-aurangzeb/feed/ 0 26390
भक्तीचा खरा अर्थ सांगणारे संत चोखोबा… https://www.batmi.net/saint-chokhoba-who-tells-the-true-meaning-of-devotion/ https://www.batmi.net/saint-chokhoba-who-tells-the-true-meaning-of-devotion/#respond Fri, 19 Aug 2022 07:48:25 +0000 https://www.batmi.net/?p=26392 भाव शिरोमणी संत चोखामेळा वारकरी संप्रदायातील अत्यंत महत्वाचे संत आहेत. जातीने महार म्हणून त्यांना उच्चवर्णीय लोकांनी खूप त्रास दिल्याचे आपण जाणतोच. पण एका शब्दानेही विठ्ठलाला त्यांनी बोल लावले नाही.

सर्व महार जातीतील लोकांनी गावाबाहेर राहावे म्हणून एक भिंत बांधण्यात आली होती, त्याच भिंतीखाली त्यांचा मृत्यू झाला असे सांगण्यात येते. स्वतः नामदेवांनी चोखोबांच्या अस्थी पंढरपूरात आणल्या व जिथे चोखोबा उभे राहायचे तिथे समाधी बांधली.

त्यांच्या भोळ्या भक्तीचे फळ हेच की, आजही पांडुरंगाचे दर्शन घेण्याआधी चोखोबांच्या समाधीचे दर्शन घ्यावे लागते. आज चोखोबांची पुण्यतिथी आहे त्या निमित्ताने त्यांच्या एका अभंगातून अध्यात्माचे मर्म जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात.

ह्या अभंगातून चोखोबा सांगतात की, मला काहीही ज्ञान वगैरे कळत नाही. माझ्याकडे केवळ भोळा भाव आहे त्यानेच माझा भगवंत प्रसन्न होतो. ते म्हणतात “आम्हां नकळे ज्ञान न कळे पुराण। वेदाचें वचन नकळे आम्हां।।” चोखोबांना त्यांच्या जातीमुळे उच्चवर्णीय लोकांनी ज्ञानापासून वंचित ठेवले.

त्यांचे मन ह्या गोष्टींमुळे पिळवटून निघाले असेल. कारण चोखोबा म्हणतात, “उंबरठ्यासी कैसे शिवू आम्ही जाती हीन। रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दिन।।” असे शब्द ऐकून आपल्यालाच वाटते की, त्या काळात जाऊन चोखोबांचा हात हातात घ्यावा आणि त्या पांडुरंगाच्या मूर्तीला लावावा.

जी काय शिक्षा व्हायची, ती थोडी आपण सहन करू. पण चोखोबांचाच अधिकार इतका मोठा आहे की त्यांनी आपला हात धरून अध्यात्म समजावले आहे.

चंद्रभागा नदीकडे आपल्याला घेऊन जावे नि सांगावे “चोखा म्हणे मज नवल वाटावे। विठ्ठलपरते आहे कोण।।”

अर्थात चोखोबा सांगतात की, देव मंदिरातच आहे असे नाही, तो तर ह्या चंद्रभागेच्या वाळवंटात आणि जगाच्या कणाकणात आहे. असं काय आहे, जे विठ्ठल नाहीये? इतके ज्ञान असून देखील चोखोबा म्हणतात की, आम्हाला ज्ञानाच्या गोष्टी कळत नाही.

पुराणातील कथा मर्म आम्हाला कळत नाही. आणि इतकेच नाही तर वेदांमधील जी वचने आहेत ती देखील आम्हाला कळत नाही. आता चोखोबा असे म्हणत असले तरी आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की, जे ज्ञान वेदांना कळणार नाही ते वारकरी संतांकडे होते.

जरी वाचनाचा अधिकार चोखोबांना नव्हता तरी देखील नामदेवांनी त्यांना लिहायला-वाचायला शिकवले होते. नामदेवांनी त्यांना अध्यात्माचे मर्म सांगितले म्हणूनच चोखोबांना वेदांचे ज्ञान ठाऊक नसल्याची खंत वाटत नाही. चोखोबा पुढे म्हणतात,

“आगमाची आढी निगमाचा भेद। शास्त्रांचा संवाद न कळे आम्हां।।”

आगम हे अध्यात्मातील एक तत्वज्ञान आहे. ते शैव परंपरेत असते. तसेच निगम म्हणजे वेदप्रमाण मानणारे वैष्णव होय. इथे चोखोबा म्हणतात की, आम्हाला ह्या शिव परंपरेतील आगमाची आढी व विष्णू परंपरेतील निगमाचा हा भेद माहिती नाहीये.

पुढे ते म्हणतात, शास्त्रांचा संवाद देखील आम्हाला कळत नाही. सुरुवातीला वेदांचे वचन व नंतर शास्त्रांचा संवाद असे चोखोबांनी म्हटले आहे, ह्याचे कारण असे की, वेदांमध्ये नियम किंवा सूत्र असतात ज्याला आपण वचन म्हणतो तसेच शास्त्रांमध्ये ऋषीमुनींचे संवाद आहेत. ते एक ज्ञानाचे मंथन आहे पण हे देखील आम्हाला कळत नाही असे चोखोबा म्हणतात.

अभंगाच्या तिसऱ्या चरणात चोखोबा म्हणतात, “योग याग तप अष्टांग साधन। नकळेची दान व्रत तप।।” अर्थात आम्हाला योग विद्या माहिती नाहीये, आम्हाला यागयज्ञ कळत नाही, तप करणे आम्हाला जमत नाही तसेच मोक्षप्राप्तीसाठी लागणारी आठ प्रकारची योगसाधने देखील आम्हाला ठाऊक नाहीयेत.

दान देणे वा व्रत उपवास करणे देखील आम्हाला कळत नाही. आता काहीच कळत नाही ,असे चोखोबा म्हणतात खरे पण त्यांना जे येते ते कदाचित कोणालाच येत नसावे. पंडितांना देखील माहिती नसेल इतकी माहिती वरील तीन चरणांमध्ये देत चोखोबा स्वतःला अज्ञानी का म्हणतात हा प्रश्न महत्वाचा आहे. ह्याचे उत्तर शेवटच्या चरणात देताना ते म्हणतात,

“चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा। गाईन केशवा नाम तुझें।।” ह्यात चोखोबांच्या अभंगाचा मर्म समजतो. आम्हाला हे ज्ञान कळत नाही आणि कळण्याची गरज देखील नाहीये. एक भोळा भाव असला की, देव आपलाच होतो. देव भावाचा भुकेला असतो.

अर्थात देवाला केवळ भाव समजतो. जाती-धर्म तर मानवाने निर्माण केले. चोखोबांच्याच शब्दात सांगायचे तर ते म्हणतात, “ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा। चोखा डोंगा परी भाव नाही डोंगा।।” म्हणजे तुमच्या लेखी माझी जात आणि मी हीन असेन पण माझा भाव शुद्ध आहे हेच चोखोबा सांगतात.

अर्थात ही केवळ स्वतःची भावना नसून चोखोबा आपल्याला अध्यात्माचे सार सांगतात. ‘इतके ज्ञान मिळवत बसू नका. कारण केवळ एक शुद्ध भाव तुम्हाला देवस्वरूप बनवेल’, असे म्हणत चोखोबा आपल्या सारख्या अज्ञानी लोकांसमोर ज्ञानाची कवाडे खुली करतात.

]]>
https://www.batmi.net/saint-chokhoba-who-tells-the-true-meaning-of-devotion/feed/ 0 26392
प्रत्येक भारतीयाच्या मनात खदखदणारी फाळणीची घोषणा! https://www.batmi.net/the-announcement-of-partition-that-is-shocking-in-every-indians-mind/ https://www.batmi.net/the-announcement-of-partition-that-is-shocking-in-every-indians-mind/#respond Fri, 19 Aug 2022 07:45:54 +0000 https://www.batmi.net/?p=26378 भारताची फाळणी झाली म्हणून आपल्याकडे १४ ऑगस्ट हा पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन काळा दिवस मानतात. पण या दिवसाची बीजे ज्या दिवशी रोवली गेली तो दिवस होता, ३ जून १९४७. याच दिवशी तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांनी ही फाळणीची घोषणा केली.

पण या फाळणीच्या घोषणेनंतर काय झालं? याबद्दल थोडी खोलात जाऊन माहिती घेऊया. लेख पूर्ण वाचलात तर आपल्या देशाचा एक संघर्षमय इतिहास तुम्हाला समजेल.

भारताची फाळणी कशी झाली?

दुसऱ्या महायुद्धाच्या विरामानंतर इंग्लंडमध्ये ‘क्लेमेंट ऍटली’ हे ब्रिटिश पंतप्रधानपदी बसले. इंग्लंडकडून भारताकडे सत्ता देण्याची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी ‘माउंटबॅटन’ यांची भारतात व्हाइसरॉय म्हणून नियुक्ती केली.

त्यांनी एक योजना मांडली, ज्यात भारतातील तत्कालीन राज्ये स्वतंत्र ठेवून वेगवेगळी ठेवायची आणि त्यांना ‘संविधान सभेत’ सामील व्हायचे की नाही, हे निवडण्याची मुभा द्यावी, असा प्रस्ताव मांडला, त्याला जवाहरलाल नेहरूंनी विरोध केला तेव्हा माउंटबॅटननी ती योजना रद्द केली.

त्यांच्या या योजनेला ‘डिकी बर्ड योजना’ किंवा ‘भारताचे बाल्कनीकरण योजना’ असं म्हणतात. पुढे त्यांनी ३ जूनची योजना आणली.

३ जूनच्या योजनेत घोषित करण्यात आले की, भारत स्वतंत्र झाल्यानंतर दोन राष्ट्रांमध्ये विभागला जाईल – भारत आणि पाकिस्तान. १५ ऑगस्ट १९४७ रोजी विभाजन लागू झाले.

याच योजनेत फाळणीच्या तत्त्वांचा समावेश होता आणि भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना स्वायत्तता आणि सार्वभौमत्व दिले गेले.

तसेच राष्ट्रांना स्वतःची राज्यघटना तयार करण्याचा अधिकार दिला गेला. डिकी बर्ड योजनेपेक्षा वेगळी असणारी ही योजना काँग्रेस आणि मुस्लिम लीग या दोन्ही पक्षांनी स्वीकारली.

१९४७ चा भारतीय स्वातंत्र्य कायदा, जो ब्रिटिश संसदेत मंजूर झाला आणि १८ जुलै १९४७ रोजी त्यास शाही संमती प्राप्त झाली, तो माउंटबॅटन योजनेच्या आधारे तयार करण्यात आला.

या योजनेनुसार, ब्रिटीश सम्राट यापुढे ‘भारताचा सम्राट’ ही पदवी वापरणार नाही आणि ब्रिटीश पार्लमेंट दोन राष्ट्रांपैकी एकावर बंधनकारक असेल असा कोणताही कायदा करू शकत नाही.

नवीन राज्यघटना तयार होईपर्यंत गव्हर्नर-जनरलला म्हणजे माउंटबॅटनना घटनात्मक प्रमुख म्हणजे राष्ट्रपतींप्रमाणे बनवण्यात आले. या योजनेचा एक भाग म्हणून राष्ट्रांच्या संविधान सभांनी संमत केलेल्या कायद्यांना मान्यता देण्यासाठी त्याला जबाबदार धरण्यात आले.

फाळणीनंतर काय झाला परिणाम?

फाळणीमुळे दंगली, मोठ्या प्रमाणावर जीवितहानी आणि स्थलांतराची प्रचंड लाट निर्माण झाली. मुस्लिम पाकिस्तानच्या दिशेने आणि हिंदू आणि शीख भारताच्या दिशेने असे लाखो लोक त्यांना सुरक्षिततेतची अपेक्षा असलेल्या ठिकाणी गेले. पायी, बैलगाडीत आणि रेल्वेने प्रवास करत करत अंदाजे १ कोटी ६० लाख लोक विस्थापित झाले.

फाळणीनंतर मृतांची संख्या २० लाखांपर्यंत गेली होती. अनेक जण दोन धर्मियांच्या हत्याकांडात मेले तर काही जणांना त्यांच्या स्वतःच्या कुटुंबीयांनी निर्वासित शिबिरांमध्ये पसरलेल्या संसर्गजन्य रोगांच्या साथीत मरण्यासाठी सोडून दिले. लाखो महिलांचे बलात्कार किंवा अपहरण करून त्यांचे हालहाल केले गेले.

फाळणीचा आणखी एक अनपेक्षित परिणाम असा झाला की, पाकिस्तानची लोकसंख्या मूळच्या अपेक्षेपेक्षा धार्मिकदृष्ट्या एकसंध झाली.

मुस्लिम लीगच्या नेत्यांनी असे गृहीत धरले होते की, पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात गैर-मुस्लिम लोकसंख्या असेल, ज्यांच्या उपस्थितीमुळे भारतात राहिलेल्या मुस्लिमांचे स्थान सुरक्षित होईल.

परंतु पश्चिम पाकिस्तानमध्ये, १९५१ साली बिगर मुस्लिम अल्पसंख्याक हे एकूण लोकसंख्येच्या केवळ १.६% होते. तर पूर्व पाकिस्तान आताच्या बांगलादेशमध्ये २२% होते.

त्यानंतर दोन्ही देशांना फाळणीनंतर आलेल्या निर्वासितांना सामावून घेण्यात आणि त्यांचे पुनर्वसन करण्यात मोठ्या समस्यांचा सामना करावा लागला.

१९४७-४८ मध्ये जम्मू आणि काश्मीरच्या विवादित प्रदेशाबाबत दोन राज्यांमध्ये युद्ध झाल्यानंतर निर्वासितांची संख्या अजूनच वाढली.

६० च्या दशकाच्या उत्तरार्धातही स्थलांतरित झालेल्या लोकांच्या झुंडी भारतात येतच होत्या. जातीय तणावाच्या नंतरच्या संघर्षांनी आणखी चळवळ निर्माण केली.

फाळणीमुळे भारत छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये विभागला न जाता एकसंध राहिला हे जरी खरं असलं तरी फाळणी ही भारताच्या इतिहासातली कायमची भळभळती जखम बनून राहणार आहे.

]]>
https://www.batmi.net/the-announcement-of-partition-that-is-shocking-in-every-indians-mind/feed/ 0 26378