माहितीपूर्ण – Batmi https://www.batmi.net Get marathi latest news Thu, 10 Nov 2022 03:23:22 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5 https://www.batmi.net/wp-content/uploads/2022/09/cropped-Picsart_22-08-31_02-05-02-169-96x96.jpg माहितीपूर्ण – Batmi https://www.batmi.net 32 32 201029915 ठाणे गुन्हे | महाराष्ट्र: ठाण्यातील नदीत धोकादायक केमिकलचा मोठ्या प्रमाणात डंपिंग, ट्रक चालकाला अटक https://www.batmi.net/%e0%a4%a0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a5%87-%e0%a4%97%e0%a5%81%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a5%87-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%a0/ https://www.batmi.net/%e0%a4%a0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a5%87-%e0%a4%97%e0%a5%81%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a5%87-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%a0/#respond Mon, 07 Nov 2022 05:04:40 +0000 https://www.batmi.net/?p=27658

अटक

फाइल फोटो

ठाणे : महाराष्ट्रात, ठाणे जिल्ह्यातील वालधुनी नदीत धोकादायक रासायनिक द्रावण सोडल्याप्रकरणी एका ३२ वर्षीय ट्रक चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, आरोपींनी शनिवारी नदीवर जाऊन टँकरमधून विषारी रसायन टाकून पाणी प्रदूषित केले.

देखील वाचा

महात्मा फुले चौक पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, या संदर्भात माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला अटक केली. आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता (आयपीसी) आणि पर्यावरण (संरक्षण) कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे ते म्हणाले. (एजन्सी)

]]>
https://www.batmi.net/%e0%a4%a0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a5%87-%e0%a4%97%e0%a5%81%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a5%87-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%a0/feed/ 0 27658
फळ पीक विमा अर्ज सुरू झाला आहे, इथे करा अर्ज… https://www.batmi.net/fal-pik-vima/ https://www.batmi.net/fal-pik-vima/#respond Thu, 13 Oct 2022 19:18:55 +0000 https://www.batmi.net/?p=26972 पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत मागविले अर्ज फळपीक विमा योजनेत सहभागाची संधी.

पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत सुरू करण्यात आलेल्या पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेसाठी कृषी विभागाकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना आंबा, डाळिंब, द्राक्ष, केळी, मोसंबी, संत्रे आणि पपई या फळ पिकांचा विमा काढता येणार आहे.

नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे फळपिकांचे नुकसान झाल्यास, या विमा योजनेतून शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई दिली जाते. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये फळपिकांच्या हवामान धोक्यांच्या निकषानुसार ही योजना राबविण्यात येत आहे. ही विमा योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी विविध पिकांसाठी ऐच्छिक आहे.

पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील शेतकऱ्यांना आंबा या फळ पिकासाठी येत्या 31 डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत. दौंड, आंबेगाव बारामती, जुन्नर, इंदापूर, पुरंदर, शिरूर, हवेली व खेड या तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना येत्या 14 जानेवारी 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहेत.

दौंड, आंबेगाव, बारामती, जुन्नर, इंदापूर व शिरूर तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकन्यांना येत्या 15 ऑक्टोबरपर्यंत तर दौड, आंबेगाव बारामती, जुन्नर, इंदापूर, खेड, हवेली व शिरूर तालुक्यातील केळी उत्पादकांना येत्या 31 ऑक्टोबरपर्यंत आणि इंदापूर तालुक्यातील मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना येत्या 31 ऑक्टोबरपर्यंत या विमा योजनेसाठी अर्ज करता येणार आहेत.

याशिवाय शिरूर तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत तर आंबेगाव, जुन्नर व इंदापूर तालुक्यातील पपई उत्पादकांना येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत या विमा योजनेत सहभागी होता येणार असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुभाष काटकर यांनी सांगितले.

]]>
https://www.batmi.net/fal-pik-vima/feed/ 0 26972
मीठ बेताने खा, अपाय टाळा.. https://www.batmi.net/to-make-salt-avoid-the-solution/ https://www.batmi.net/to-make-salt-avoid-the-solution/#respond Sat, 08 Oct 2022 16:26:51 +0000 https://www.batmi.net/?p=26043 मिठाशिवाय जेवणाला चव येत नाही. जेवण चविष्ट करणारं हे मीठ सुद्धा प्रमाणातच चांगलं असतं. नाहीतर काय होईल? याबद्दलच आपण जाणून घेऊ.

वरून मीठ घेण्याची सवय नकोचं….

बऱ्याच जणांना चवीपुरतं मीठ घातलेलं असून सुद्धा वरून मीठ घ्यावं अशी इच्छा होत असते. अनेकदा आपण चव घेऊन पाहिल्यावर आपल्याला लक्षात येतं की मीठ कमी पडलं आहे, म्हणून वरून मीठ घेण्याची सवय असते. पण ही सवय चांगली नाही. कारण या सवयीमुळे आपल्याला त्रास होऊ शकतो. आपल्या भारतीय आहारात सर्व पौष्टिक पदार्थ असतात, म्हणूनच त्याला चौरसाहार पद्धती म्हणतात. पण भारतीय चटपटीत खाण्यावर भर देतात. आपण वरचेवर खातो त्या लोणची, पापडात ही मीठ जास्तच असतं. पण वयोमानापरत्वे या पदार्थातून खाल्ल्या जाणाऱ्या मिठावर निर्बंध यायला हवेत.

जास्त मीठ आरोग्यकासाठी हानिकारक

शरीरात पाण्याचं प्रमाण कमी होणं हे मीठ जास्त झाल्यामुळे होतं. यामुळं मज्जातंतू आणि हृदयावर हे नकारात्मक परिणाम होतो. जास्त मिठामुळे रक्ताच्या गुठळ्या होणं, पक्षाघात किंवा हृदयविकाराचा झटका येणं, रक्ताला प्रमाणाहून जास्त प्रवाहीपणा येणं, अशा गोष्टी होतात. मीठामध्ये मूलभूत घटक सोडियम असतो. सोडीअमची मात्रा जास्त शरीरात जास्त झाली असता सोडीअमसोबत कॅल्शियमही शरीराबाहेर पडतं यामुळे हाडांना ठिसूळपणा येणं वगैरे सारखे विकार होऊ शकतात. मीठ जास्त झाल्यामुळे महत्वाचा होणारा परिणाम उच्च रक्तदाब. म्हणून ज्यांना उच्च रक्तदाब होतो त्यांना लो सोडियम मीठ किंवा सरळ अतिशय कमी मीठ असलेले पदार्थ खाण्याबद्दल सांगितलं जातं.

‘हे’ आहे मिठाचे योग्य प्रमाण:

जागतिक आरोग्यावर संघटनेने केलेल्या एका अभ्यासानुसार भारतीय लोक निर्धारित प्रमाणाच्या बाहेर जाऊन मीठ सेवन करतात. आहारात मीठ कमी केल्यास हृदयरोगाचं प्रमाण २५-३०% ने कमी होतं. तसेच कमी मीठाचे पदार्थ खाल्ले असता आपल्या किडन्या निकामी होण्यापासून बचाव होतो. म्हणून प्रौढ व्यक्तीने केवळ २ चमचे इतकंच मीठाचं सेवन करावं.

आता हा लेख वाचून झाल्यानंतर आपण ही स्वतःची सवय बदलणार असू तर ते फायदेशीर आहे. मीठाचं सेवन अत्यंत गंभीर परिणाम करू शकतं, हे आपल्याला कळलं असेलच म्हणूनच यासाठी संस्कृतातील ही ओळ अगदीच योग्य आहे, ‘अति सर्वत्र वर्ज्ययेत’.

]]>
https://www.batmi.net/to-make-salt-avoid-the-solution/feed/ 0 26043
प्रत्येक भारतीयाच्या मनात खदखदणारी फाळणीची घोषणा! https://www.batmi.net/the-announcement-of-partition-that-is-shocking-in-every-indians-mind/ https://www.batmi.net/the-announcement-of-partition-that-is-shocking-in-every-indians-mind/#respond Fri, 19 Aug 2022 07:45:54 +0000 https://www.batmi.net/?p=26378 भारताची फाळणी झाली म्हणून आपल्याकडे १४ ऑगस्ट हा पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन काळा दिवस मानतात. पण या दिवसाची बीजे ज्या दिवशी रोवली गेली तो दिवस होता, ३ जून १९४७. याच दिवशी तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांनी ही फाळणीची घोषणा केली.

पण या फाळणीच्या घोषणेनंतर काय झालं? याबद्दल थोडी खोलात जाऊन माहिती घेऊया. लेख पूर्ण वाचलात तर आपल्या देशाचा एक संघर्षमय इतिहास तुम्हाला समजेल.

भारताची फाळणी कशी झाली?

दुसऱ्या महायुद्धाच्या विरामानंतर इंग्लंडमध्ये ‘क्लेमेंट ऍटली’ हे ब्रिटिश पंतप्रधानपदी बसले. इंग्लंडकडून भारताकडे सत्ता देण्याची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी ‘माउंटबॅटन’ यांची भारतात व्हाइसरॉय म्हणून नियुक्ती केली.

त्यांनी एक योजना मांडली, ज्यात भारतातील तत्कालीन राज्ये स्वतंत्र ठेवून वेगवेगळी ठेवायची आणि त्यांना ‘संविधान सभेत’ सामील व्हायचे की नाही, हे निवडण्याची मुभा द्यावी, असा प्रस्ताव मांडला, त्याला जवाहरलाल नेहरूंनी विरोध केला तेव्हा माउंटबॅटननी ती योजना रद्द केली.

त्यांच्या या योजनेला ‘डिकी बर्ड योजना’ किंवा ‘भारताचे बाल्कनीकरण योजना’ असं म्हणतात. पुढे त्यांनी ३ जूनची योजना आणली.

३ जूनच्या योजनेत घोषित करण्यात आले की, भारत स्वतंत्र झाल्यानंतर दोन राष्ट्रांमध्ये विभागला जाईल – भारत आणि पाकिस्तान. १५ ऑगस्ट १९४७ रोजी विभाजन लागू झाले.

याच योजनेत फाळणीच्या तत्त्वांचा समावेश होता आणि भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना स्वायत्तता आणि सार्वभौमत्व दिले गेले.

तसेच राष्ट्रांना स्वतःची राज्यघटना तयार करण्याचा अधिकार दिला गेला. डिकी बर्ड योजनेपेक्षा वेगळी असणारी ही योजना काँग्रेस आणि मुस्लिम लीग या दोन्ही पक्षांनी स्वीकारली.

१९४७ चा भारतीय स्वातंत्र्य कायदा, जो ब्रिटिश संसदेत मंजूर झाला आणि १८ जुलै १९४७ रोजी त्यास शाही संमती प्राप्त झाली, तो माउंटबॅटन योजनेच्या आधारे तयार करण्यात आला.

या योजनेनुसार, ब्रिटीश सम्राट यापुढे ‘भारताचा सम्राट’ ही पदवी वापरणार नाही आणि ब्रिटीश पार्लमेंट दोन राष्ट्रांपैकी एकावर बंधनकारक असेल असा कोणताही कायदा करू शकत नाही.

नवीन राज्यघटना तयार होईपर्यंत गव्हर्नर-जनरलला म्हणजे माउंटबॅटनना घटनात्मक प्रमुख म्हणजे राष्ट्रपतींप्रमाणे बनवण्यात आले. या योजनेचा एक भाग म्हणून राष्ट्रांच्या संविधान सभांनी संमत केलेल्या कायद्यांना मान्यता देण्यासाठी त्याला जबाबदार धरण्यात आले.

फाळणीनंतर काय झाला परिणाम?

फाळणीमुळे दंगली, मोठ्या प्रमाणावर जीवितहानी आणि स्थलांतराची प्रचंड लाट निर्माण झाली. मुस्लिम पाकिस्तानच्या दिशेने आणि हिंदू आणि शीख भारताच्या दिशेने असे लाखो लोक त्यांना सुरक्षिततेतची अपेक्षा असलेल्या ठिकाणी गेले. पायी, बैलगाडीत आणि रेल्वेने प्रवास करत करत अंदाजे १ कोटी ६० लाख लोक विस्थापित झाले.

फाळणीनंतर मृतांची संख्या २० लाखांपर्यंत गेली होती. अनेक जण दोन धर्मियांच्या हत्याकांडात मेले तर काही जणांना त्यांच्या स्वतःच्या कुटुंबीयांनी निर्वासित शिबिरांमध्ये पसरलेल्या संसर्गजन्य रोगांच्या साथीत मरण्यासाठी सोडून दिले. लाखो महिलांचे बलात्कार किंवा अपहरण करून त्यांचे हालहाल केले गेले.

फाळणीचा आणखी एक अनपेक्षित परिणाम असा झाला की, पाकिस्तानची लोकसंख्या मूळच्या अपेक्षेपेक्षा धार्मिकदृष्ट्या एकसंध झाली.

मुस्लिम लीगच्या नेत्यांनी असे गृहीत धरले होते की, पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात गैर-मुस्लिम लोकसंख्या असेल, ज्यांच्या उपस्थितीमुळे भारतात राहिलेल्या मुस्लिमांचे स्थान सुरक्षित होईल.

परंतु पश्चिम पाकिस्तानमध्ये, १९५१ साली बिगर मुस्लिम अल्पसंख्याक हे एकूण लोकसंख्येच्या केवळ १.६% होते. तर पूर्व पाकिस्तान आताच्या बांगलादेशमध्ये २२% होते.

त्यानंतर दोन्ही देशांना फाळणीनंतर आलेल्या निर्वासितांना सामावून घेण्यात आणि त्यांचे पुनर्वसन करण्यात मोठ्या समस्यांचा सामना करावा लागला.

१९४७-४८ मध्ये जम्मू आणि काश्मीरच्या विवादित प्रदेशाबाबत दोन राज्यांमध्ये युद्ध झाल्यानंतर निर्वासितांची संख्या अजूनच वाढली.

६० च्या दशकाच्या उत्तरार्धातही स्थलांतरित झालेल्या लोकांच्या झुंडी भारतात येतच होत्या. जातीय तणावाच्या नंतरच्या संघर्षांनी आणखी चळवळ निर्माण केली.

फाळणीमुळे भारत छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये विभागला न जाता एकसंध राहिला हे जरी खरं असलं तरी फाळणी ही भारताच्या इतिहासातली कायमची भळभळती जखम बनून राहणार आहे.

]]>
https://www.batmi.net/the-announcement-of-partition-that-is-shocking-in-every-indians-mind/feed/ 0 26378
एसआयपी मध्ये योग्य गुंतवणूक कशी करायची? एकदा नक्की वाचा… https://www.batmi.net/how-to-invest-properly-in-sip/ https://www.batmi.net/how-to-invest-properly-in-sip/#respond Fri, 19 Aug 2022 07:43:50 +0000 https://www.batmi.net/?p=26375 योग्य ठिकाणी पैसे गुंतवणे ही खरंतर आजच्या काळाची गरज झाली आहे. त्यासाठी एसआयपी हा एक म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीचा प्रकार मानला जातो. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना दोन पर्याय असतात.

एक म्हणजे लमसम म्हणजेच ‘एक रकमी गुंतवणूक’ आणि दुसरा मार्ग म्हणजे ‘एसआयपी द्वारे गुंतवणूक.’ आजच्या या लेखात आपण एसआयपी म्हणजे नेमकं काय हे जाणून घेऊ.

• एसआयपी म्हणजे काय ?

एसआयपी म्हणजे सिस्टेमॅटिक इन्वेस्टमेंट प्लॅन. ही एक पद्धतशीर गुंतवणूक योजना असून ही कोणतीही स्कीम नाही. हे गुंतवणूक करण्याचे एक माध्यम आहे ज्यामध्ये एक ठराविक रक्कम एका ठराविक दिवशी आपल्या गुंतवणुकीत जोडली जात असते.

उदाहरणार्थ आपल्याकडे १२,००० रुपये आहेत. आपण हे सगळे पैसे एखाद्या म्युच्युअल फंड मध्ये सरसकट गुंतवू शकतो आणि जर तेच १२,००० जर आपण महिन्याला १००० अशा पद्धतशीरपणे एक वर्षासाठी गुंतवत राहिलो तर ती होईल एसआयपी म्हणजेच पद्धतशीर गुंतवणूक योजना.

तसे पाहायला गेले तर ही अगदीच साधी, सोपी आणि सरळ योजनपद्धती आहे. ज्याची प्रक्रिया योग्यरित्या जाणून घेऊन गुंतवणूक केली तर त्याचा चांगला फायदा आयुष्यभरासाठी होऊ शकतो.

• एसआयपी मध्ये किती रक्कम गुंतवू शकतो ?

यामध्ये गुंतवणूकदार कमीतकमी रक्कम सातत्याने गुंतवू शकतो. म्हणजेच यामध्ये ५०० रुपयांपासून देखील एसआयपी चालू करता येऊ शकते.

काही फंड तर ५०० पेक्षा सुद्धा कमी गुंतवणूक करण्याची मुभा देतात. मुख्य म्हणजे इथे अमुक एक रक्कम भरायचीच असे बंधन नसते. त्यामुळे इथे जास्तीत जास्त त्याच्या मर्जीनुसार कोणत्याही रकमेची गुंतवणूक करू शकतो.

• एसआयपीचा कालावधी किती असतो ?

गुंतवणूकदाराला आपली एसआयपी एक वर्षासाठी, दोन वर्षासाठी, पाच किंवा दहा वर्षांसाठी किंवा जोपर्यंत तो स्वतः एसआयपी बंद करत नाही तोपर्यंत एसआयपी चालू ठेवता येते.

• एसआयपीचे फायदे काय आहेत ?

१. अधिक परतावा (Good return on investment)

म्युच्युअल फंडच्या एसआयपी प्लॅनमध्ये काही काळानंतरच आपल्याला गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळाल्याचे दिसून येते.

परंतु जर दीर्घ कालावधीसाठी एसआयपी केली गेली तर मात्र अधिक परतावा मिळालेला दिसून येतो. किमान पाच वर्षांपेक्षा अधिक एसआयपी केली तर चांगला फायदा मिळतो.

२. एसआयपी मधील लवचिकता (Flexibility in SIP)

गुंतवणूकदार कधीही आपले पैसे काढून घेऊ शकतो. तसेच गुंतवणूकदार आपला एसआयपी प्लॅन हवा असेल तेव्हा थांबवू शकतो. एसआयपी मधील पैसे काढून घेऊ शकतो किंवा अजून नवीन पैशांची गुंतवणूक करू शकतो.

३. कमी प्रमाणातील जोखीम (Low risk SIP)

जर गुंतवणूकदार इक्विटी फंडमध्ये आपल्या पैशांची गुंतवणूक करत असेल तर तिथे एकाच बाजारभाव चक्रात गुंतवणूकदाराचे पैसे गुंतवले जात नाहीत.

तसेच दीर्घकालीन एसआयपी मध्ये वेगवेगळ्या किमतींवर युनिट्स खरेदी केले जातात. शेवटी बाजार भावाची सरासरी काढली जाते ज्याचा जास्त नकारात्मक प्रभाव पडताना दिसून येत नाही. (फारसा तोटा होत नाही)

४. किमान रकमेतील गुंतवणूक (minimum investment in SIP)

अगदी कमीत कमी रकमेत देखील आपण आपल्या म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात करू शकतो. विद्यार्थी असो, गृहिणी असो किंवा एखादा उद्योगपती असो सगळ्यांसाठी हा उत्तम मार्ग आहे.

ही होती अत्यंत आवश्यक आणि गरजेची असणारी एसआयपी संबधित माहिती. जर तुम्हालाही यात गुंतवणूक करायची असेल तर

आपण जवळच्या कोणत्याही Mutual Fund Broker किंवा ऑनलाईन पद्धतीने सुद्धा एसआयपी चालू करू शकता. मात्र, सगळी माहिती, कागदपत्रे पाहूनच गुंतवणूक करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा.

]]>
https://www.batmi.net/how-to-invest-properly-in-sip/feed/ 0 26375
आनंदी जीवनाचं तंत्र सोप्प्या भाषेत शिकवणारं पुस्तक… https://www.batmi.net/a-book-that-teaches-the-techniques-of-a-happy-life-in-simple-language/ https://www.batmi.net/a-book-that-teaches-the-techniques-of-a-happy-life-in-simple-language/#respond Fri, 19 Aug 2022 07:42:13 +0000 https://www.batmi.net/?p=26363 द करेज टू बी डिसलाइक्ड हे एक जपानी पुस्तक आहे. जपानमध्ये आणि इतर देशांमध्येही हे पुस्तक प्रचंड प्रमाणात विकलं गेलं. हे केवळ पुस्तक नसून १९व्या शतकातील मानसशास्त्रज्ञ ‘आल्फ्रेड ॲडलर’ यांनी केलेल्या कामाच्या विश्लेषणावर आधारित जपानी तत्त्वज्ञान आहे.

आनंद हा प्रत्येक व्यक्तीच्या हातात असून इतर कशावरही अवलंबून नाही हा संदेश आपल्याला या पुस्तकातून मिळतो. ‘इचिरो किशिमी’ आणि ‘फुमिटेक कोगा’ यांनी हे पुस्तक लिहिलं आहे.

वेगवेगळी प्रकरणं, मुद्द्यांमधून पुस्तक उलगडत जातं हे आपण बऱ्याचदा पाहिलं आहे. पण हे पुस्तक मात्र प्रश्न उत्तरांच्या माध्यमातून आपल्या समोर येतं. एक तरुण व्यक्ती प्रश्न विचारते आणि मानसशास्त्रज्ञ ॲडलर आपल्या तत्वज्ञानातून मार्गदर्शन करतात.

यामध्ये आयुष्यातले क्लिष्ट प्रश्न, समस्या, प्रसंग अशा प्रत्येक प्रकारचे प्रश्न ती व्यक्ती त्यांना विचारते. त्यामुळे आयुष्याच्या प्रत्येक बाजूवर आपल्याला या पुस्तकातून माहिती मिळते. म्हणूनच हे पुस्तक आपल्या स्वतःशी जोडलं जातं. यातले प्रश्न आणि उत्तरं आपल्याशीच संबंधित वाटतात.

आपल्याला वाटतं की, आपल्या भावना आपल्या नियंत्रणात नाहीत, राग आल्यावर आपला कंट्रोल जातो. कधी आपण एखाद्यावर जोरात ओरडून राग व्यक्त करतो तर कधी एखादी वस्तूदेखील फोडतो आणि आपल्या या कृतीचं खापर आपण भावनांवर फोडतो.

मला राग आला म्हणून मी तसं वागलो असं म्हणून मोकळं होतो. ही पळवाट अतिशय चुकीची आहे, याची जाणीव आपल्याला या पुस्तकातून होते. आपल्या प्रत्येकात स्वतःला नियंत्रित ठेवण्याचं सामर्थ्य आपल्यात आहे. आपण आपल्या भावनांना निवडू शकतो, नियंत्रणात करु शकतो, ही शिकवण उदाहरणांमधून आपल्याला मिळते.

त्यानंतर आपल्या आयुष्यातल्या समस्यांच्या मुळावरही हे पुस्तक भाष्य करतं. आयुष्यातल्या अनेक समस्यांचं मूळ आपल्या परस्पर संबंधांमध्ये असल्याचं या पुस्तकात सांगण्यात आलं आहे. प्रत्येक माणूस नात्यांतून बनला आहे.

आपलं इतरांशी नातं कसं आहे, आपलं स्वतःशी नातं कसं आहे, याभोवती आयुष्य फिरत असतं. आपण स्वतःला कमी समजत असू तर अनेक समस्या आपण स्वतःहूनच निर्माण करतो. याबरोबरच सतत लोकं काय म्हणतील, लोकांच्या अपेक्षा पूर्ण करु शकू का, यातूनही अनेक समस्या निर्माण होत असतात. त्यामुळे आपण स्वतःला प्रेमाने वागवण्याची गरज असते.

जर आपणच स्वतःला प्रेमाने, सन्मानाने वागवलं नाही तर इतरांकडूनही आपल्याला तशी वागणूक मिळत नाही आणि हे पुस्तक आपल्याला हेच सगळं समजावण्याचं प्रयत्न करतं. यासाठी लोकांचा विचार सोडून देणं, कोणी आपल्याबद्दल काय बोलतं, कोण काय विचार करतं याकडे दुर्लक्ष करणं महत्त्वाचं आहे.

जेव्हा आपल्याला हे जमेल तेव्हा आपण खऱ्या अर्थाने मुक्त, ताकदवान होऊन जगू शकतो. कोणताही संबंध आपल्या मनाची शांतता, स्वास्थ्य बिघडवणार नाही, याची काळजी आपण घेऊ तेव्हाच आयुष्याचा आनंद आपण घेऊ शकतो. हा दृष्टीकोन आपल्यात आणून स्वतःमध्ये बदल घडवण्यासाठी हे एक पुस्तक वाचणं अतिशय महत्त्वाचं आहे.

आजच्या गुंतागुंतीच्या डिजिटल जगात सोशल मीडिया लाइक्सच्या मागे अनेकजण पळत आहेत. प्रत्येकाला इतरांकडून ‘लाइक’ मिळण्याची अपेक्षा आहे. ते लाइक मिळाले नाही तरी अनेकजण अस्वस्थ होतात.

ही अस्वस्थता मिटवण्यासाठी इतरांकडून नापसंत केलं गेलं तरी ते स्वीकारण्याचं धैर्य आपल्यात असलं पाहिजे. कोणत्याही लाईक्सची गरज न पडता आपण जसे आहोत तसं स्वतःला स्वीकारण्याची जबाबदारी आपण घेतलीच पाहिजे. ही जबाबदारी आनंदी आयुष्याच्या गोल्डन रुल्सपैकी एक आहे, असं लेखक सांगतात.

आपल्या वैयक्तिक विकासासाठी आत्मविश्वास, आदर्श, आपली मूल्य यांना चिकटून राहणं कसं गरजेचं आहे यावरदेखील लेखक आपल्याला उत्तर देतात. स्वतःचा आनंद वाढवण्यासाठी कधीही खोटेपणा करु नका,

इतरांना खुश ठेवण्यासाठी स्वतःचे आदर्श पणाला लावू नका, मूल्य विसरु नका, कारण कितीही प्रयत्न केले तरी कोणाला ना कोणाला आपण नापसंतच असणार आहे. त्यापेक्षा प्रामाणिकपणे वागून जे आपल्यासोबत राहतील त्यांना खरा मान द्यावा.

कधीही कोणाला व्यवस्थित ओळखल्याशिवाय विश्वास ठेवू नका. लोकांमध्ये अडकून पडण्यापेक्षा तुमच्या मनाला काहीतरी करण्याची प्रेरणा मिळेल, ध्येय ठरवा आणि ते पूर्ण करण्यासाठी सर्वस्व झोकून प्रयत्न करत रहा, असा मोलाचा सल्ला या पुस्तकातून आपल्याला मिळतो.

पुस्तक वाचताना अनेकदा आपणही विचारमग्न होतो, स्वतःच्या वर्तणुकीविषयी, आयुष्याविषयी प्रश्न मनात निर्माण होतात. त्यामुळे खूप शिकवण या पुस्तकातून आपल्याला मिळते.

प्रश्नोत्तरांमुळे वाचन सहजसोपं होतं. त्यामुळे प्रत्येकाने हे पुस्तक नक्की वाचावं. वेगवेगळ्या भाषांमध्ये याचे अनुवाद उपलब्ध असून, ऑनलाइन, ऑफलाइन पद्धतीने आपण हे पुस्तक विकत घेऊ शकतो.

]]>
https://www.batmi.net/a-book-that-teaches-the-techniques-of-a-happy-life-in-simple-language/feed/ 0 26363
क्रेडिट कार्ड वापरण्याचे फायदे काय आहेत? एकदा नक्की वाचा… https://www.batmi.net/what-are-the-benefits-of-using-a-credit-card/ https://www.batmi.net/what-are-the-benefits-of-using-a-credit-card/#respond Fri, 19 Aug 2022 07:41:18 +0000 https://www.batmi.net/?p=26354 क्रेडिट कार्ड वापरण्यासंबंधी अनेकांना अडचणी असतात. कोणाला ते का आणि कशासाठी वापरावे किंवा त्याचे नेमके फायदे काय याची अजिबातच कल्पना नसते.

मग ते वापरावे किंवा नाही, त्यामुळे काही नुकसान झालं तर या संभ्रमात अनेकजण असतात. तर आजच्या या लेखात आपण क्रेडिट कार्डचे नक्की काय फायदे असतात हे जाणून घेऊयात.

• क्रेडिट कार्ड का वापरावे ?

क्रेडिट कार्ड हे एक सोयीचे साधन आहे ज्याद्वारे तुम्ही वस्तू आणि सेवांसाठी पैसे देऊ शकता. शिवाय, तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन क्रेडिट कार्ड वापरू शकता.

रोख किंवा डेबिट कार्ड वापरून तुम्हाला मिळणाऱ्या मुख्य क्रेडिट कार्डच्या फायद्यांपैकी एक म्हणजे तुम्हाला मोफत क्रेडिटचा कालावधी मिळतो. त्यामुळे तुम्ही साठवलेले पैसे न वापरतासुध्दा बरीच उत्पादने घेऊ शकता.

म्हणून, तुमच्यासाठी योग्य असलेले कार्ड निवडण्यापूर्वी कोणत्याही क्रेडिट कार्डची वैशिष्ट्ये जाणून घेणे चांगले असते.

• क्रेडिट कार्डचे फायदे

१. ईएमआय पेमेंट्स –

ईएमआय म्हणजे थोडक्यात असं कर्ज जे प्रत्येक महिन्यात ठराविक रकमेतून फेडावे लागते. क्रेडिट कार्डचा एक वेगळा फायदा म्हणजे परवडणाऱ्या ईएमआयवर फ्लॅगशिप वस्तू खरेदी करण्यासाठी क्रेडिट कार्ड वापरले जाऊ शकते. तुम्ही निवडाल त्या कालावधीत याची परतफेड केली जाऊ शकते.

२. सोप्पी प्रक्रिया –

क्रेडिट कार्ड ऑनलाइन आणि ऑफलाइन उपलब्ध आहे. शिवाय, पात्रता निकष पूर्ण करणे सोपे आहे आणि यासाठी मूलभूत कागदपत्रांची पूर्तता करणे देखील सोपे आहे.

ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही माध्यमात क्रेडिट कार्ड वापरता येत असल्याने कसली पंचाईत होत नाही. तसेच ते हाताळणे देखील सहजशक्य आहे.

३. अडचणीच्या काळात कर्ज –

आपत्कालीन खर्चाच्या बाबतीत वैयक्तिक कर्ज मिळविण्यासाठी क्रेडिट कार्ड सुविधांचा वापर केला जाऊ शकतो.

यावेळी तुमच्या बँकेचे क्रेडिट कार्ड पाहून आणि एकूणच तुमच्या मालमत्तेचा आढावा घेऊन अशी सुविधा क्रेडिट कार्डमुळे शक्य होते.

४. रोख पैसे काढणे –

डेबिट कार्डापेक्षा क्रेडिट कार्डचा आणखी एक फायदा म्हणजे जेव्हा तुम्हाला तुमचे बिल सेटल करावे लागेल तेव्हा तुम्ही एटीएममधून आगाऊ रक्कम काढू शकता.

५. सवलत/ऑफर/पुरस्कार –

स्पष्टपणे, सर्वोत्कृष्ट क्रेडिट कार्ड लाभ म्हणजे सवलत आणि ऑफर ज्या तुम्ही उत्पादनांच्या श्रेणीवर घेऊ शकता.

याशिवाय, तुमचा खर्च आणि तुम्ही कोणत्या प्रकारचे क्रेडिट कार्ड वापरता याच्या आधारावर तुम्हाला रिवॉर्ड पॉइंट मिळतात. हे नंतर अधिक सवलतींसाठी रिडीम केले जाऊ शकतात.

६. पेमेंट सुरक्षा –

क्रेडिट कार्ड हे एक डिजिटल साधन आहे जे तुम्हाला पेमेंटमध्ये सुरक्षितता देते. ज्यामध्ये मल्टी-फॅक्टर ऑथेंटिकेशन आणि इन-हँड सुरक्षा वैशिष्ट्यांची पूर्तता केली गेली आहे. त्यामुळे काळजी करण्याचे काहीच कारण उरत नाही.

७. क्रेडिटवर बिग-तिकीट उत्पादने –

तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डने उच्च श्रेणीची म्हणजेच महागाची उत्पादने खरेदी करू शकता. केवळ क्रेडिट-मुक्त कालावधीसहच नाही तर EMI मध्ये उत्पादने खरेदी केली जाण्याची त्यात सोय आहे. त्यामुळे बजेटवर देखील याचा जास्त मोठा परिणाम होत नाही आणि तुम्ही चिंतामुक्त राहता.

८. रोख रकमेपासून मुक्ती –

तुम्ही खरेदी करता तेव्हा क्रेडिट कार्ड तुमच्यासोबत रोख रक्कम घेऊन जाण्याची गरज दूर करते. हे ऑनलाइन खरेदीची सुविधा देखील देते.

त्यामुळे कधी पैसे राहिले, विसरले तर क्रेडिट कार्ड ही चिंता मिटवू शकते. शिवाय रोख रक्कम बाहेर घेऊन फिरणे तसे धोक्याचे असते. त्यामुळे क्रेडिट कार्ड हा निश्चिंत राहण्यासाठीचा योग्य पर्याय आहे.

तर हा होता क्रेडिट कार्डचे महत्व आणि त्याचे फायदे सांगणारा लेख. या लेखातून तुम्हाला नक्कीच क्रेडिट कार्डचे फायदे लक्षात आलेच असतील.

तेव्हा क्रेडिट कार्ड वापरण्यासंबंधी जागृत व्हा. स्वतःचा फायदा करून घ्या आणि हा लेख कसा वाटला तेही जरूर कळवा.

]]>
https://www.batmi.net/what-are-the-benefits-of-using-a-credit-card/feed/ 0 26354
मंकीपॉक्स आजाराबद्दल ‘ह्या’ गोष्टी माहिती आहेत का? https://www.batmi.net/do-you-know-these-things-about-monkeypox-disease/ https://www.batmi.net/do-you-know-these-things-about-monkeypox-disease/#respond Thu, 18 Aug 2022 05:56:14 +0000 https://www.batmi.net/?p=26352 आपण कांजण्या म्हणजेच चिकनपॉक्स बद्दल ऐकलं असेलच. पण मंकीपॉक्स बद्दल ऐकलं आहे का? जगात कोरोनाच्या तडाख्यातून देश अजून सावरलेले नाहीत तोवर हा अजून एक आजार येऊन धडकला आहे. तर या लेखात या आजाराबद्दल व त्याच्या विषाणूबद्दल जाणून घेऊयात.

  • मंकीपॉक्सची लागण जोरदार:

मंकीपॉक्स या दुर्मिळ संसर्गाच्या येण्याने अमेरिका आणि युरोपातील शास्त्रज्ञ चिंतेत आहेत. सुदैवाने , आतापर्यंत भारतात संसर्गाचे एकही प्रकरण नोंदवले गेले नाही, परंतु मंकीपॉक्सचा युरोपीय देश ब्रिटन,

इटली, पोर्तुगाल, स्पेन, स्वीडन आणि अमेरिकेसह वीस देशांमध्ये जोरदार फैलाव होताना दिसत आहे. याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेनेही खबरदारीचा इशारा दिला आहे आणि ही सुद्धा महामारी होऊ शकते अशी चिंता व्यक्त केली आहे.

  • मंकीपॉक्स हे नाव का पडले:

मंकीपॉक्स हा मानवी स्मॉलपॉक्स म्हणजेच गोवरासारखाच दुर्मिळ विषाणूजन्य सांसर्गिक आजार आहे. संशोधनासाठी ठेवलेल्या माकडांमध्ये तो प्रथम आढळून आला तो १९५८ मध्ये. त्यावरून त्याचे मंकीपॉक्स असे नाव ठेवले गेले.

तर मंकीपॉक्सचा मानवांना संसर्ग झाल्याचे पहिले प्रकरण १९७० मध्ये नोंदवले गेले. हा रोग प्रामुख्याने मध्य आणि पश्चिम आफ्रिकेतील उष्णकटिबंधीय पर्जन्यवनाच्या प्रदेशात आढळतो आणि कधीकधी इतर प्रदेशांमध्येही पसरतो.

  • मंकीपॉक्स बद्दल तज्ज्ञ काय म्हणतात:

मंकीपॉक्स हा ‘मंकीपॉक्स’ विषाणूच्या संसर्गामुळे होणारा एक दुर्मिळ रोग आहे. मंकीपॉक्सचा संसर्ग प्राण्यांपासून मानावाला व एका मानवापासून दुसऱ्याला होतो. मंकीपॉक्स विषाणू छोट्या जखमा,श्वसनमार्गातून किंवा डोळे,तोंडाद्वारे शरीरात प्रवेश करतो.

प्राण्यांनी चावल्यामुळे अथवा बोचकारल्यामुळे, जंगली प्राण्यांचं मांस खाल्ल्याने या विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. कोरोनाप्रमाणेच याचे संक्रमण शिंकल्यानंतर तयार होणाऱ्या ड्रॉप्लेट्स मुळे होऊ शकते.

रोगी व्यक्तीच्या शरीरातील घाम, थुंकी किंवा जखमांशी थेट व अप्रत्यक्षरित्या संपर्क आला की या आजाराचे मानवास संक्रमण होऊ शकते.

हा विषाणू ‘पॉक्सविरिडे’ या विषाणू कुटुंबातील आहे. या कुटुंबामध्ये कांजिण्या आणि गोवर या रोगांना कारणीभूत असलेले विषाणू देखील समाविष्ट आहेत.

  • मंकीपॉक्स या आजाराची काय आहेत लक्षणे:

मंकीपॉक्स विषाणू मानवी शरीतात गेल्यांनंतर या रोगाची लक्षणे स्पष्टपणे दिसण्याचा कालावधी साधारणतः एक ते दोन आठवड्यांचा असतो.

परंतु काही प्रसंगी तो ५ – २० दिवसांपर्यंत असू शकतो आणि या कालावधीत व्यक्तीच्या संपर्कात आल्याने सहसा संसर्ग होत नाही. ताप येणे,पुरळ उठणे आणि जास्त संख्येने गाठी तयार होणे ही

मंकीपॉक्सची लक्षणे आहेत. काही वेळेस गुंतागुंतीची वैद्यकीय परिस्थिती होऊ शकते. हे पुरळ शक्यतो चेहऱ्यावर आणि हातपायांवर उठतात.

चेहरा, हाताचे तळवे आणि पायांचे तळवे जास्त प्रमाणात व त्यानंतर तोंडात , जननेंद्रियाच्या ठिकाणी आणि डोळ्यातही पुरळ येतात. याची लक्षणे २-४ आठवड्यांपर्यंत असतात. रुग्णाची परिस्थिती गंभीर होऊ शकते. मृत्यू होण्याचं प्रमाण साधारणतः १-१०% इतकं आहे. लहान मुलांमध्ये या लक्षणांची तीव्रता अधिक आहे.

पुरळ उठणे सुरू होण्याच्या दोनेक दिवस आधी संक्रमित व्यक्ती हा रोग पसरवू शकतो आणि सगळ्या पुरळांवरील खपली पडेपर्यंत संक्रमण राहू शकते.

  • मंकीपॉक्सवर कसा उपचार केला जातो?

मंकीपॉक्स या रोगावर अजूनही कोणतेच ठराविक औषध नाही. म्हणूनच आधीपासून असलेल्या अँटीव्हायरल औषधांच्या द्वारे याचा उपचार करण्यात येतो.

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्या लक्षणांची तीव्रता कमी करण्यावर भर देण्यात येतो. वर सांगितल्याप्रमाणे याचे विषाणू कांजण्याच्या विषाणूंच्या वर्गात मोडतात म्हणून कांजण्यांचे औषध देऊनच याचा उपचार केला जातो.

‘टेकोविरिमेट’ हेच उपचारासाठी वापरले जाणारे औषध आहे. ते खरंतर सर्वत्र मिळत नाही. म्हणून जिकडे जी अँटीव्हायरल औषधे आहे ती दिली जातात.

आपल्याकडे याचे रुग्ण नसतील ही चांगली बाब आहे पण आपण सतर्क राहायलाच हवं आहे. तुम्हालाही हेच वाटतं ना?
]]>
https://www.batmi.net/do-you-know-these-things-about-monkeypox-disease/feed/ 0 26352
नामांतराची प्रकरणे का चिघळतात? एकदा नक्की वाचा… https://www.batmi.net/why-do-name-change-cases-get-so-hot/ https://www.batmi.net/why-do-name-change-cases-get-so-hot/#respond Thu, 18 Aug 2022 05:54:02 +0000 https://www.batmi.net/?p=26349 ‘नावात काय आहे?’ असं शेक्सपिअरने म्हणलं आहे. पण नावातच सगळं आहे. नावामुळे आपली ओळख असते. नावाचं स्पेलिंग चुकलं तरी व्यावहारिक जीवनात बऱ्याच अडचणी येतात.

लोकांच्या भाव भावना, अस्मिता या ही नावाशीच जोडलेल्या असतात. आपण जगात धडपड करत असतो ती नाव मिळवण्यासाठी आणि पावलं जपून टाकत असतो ते नावाला बट्टा लागू नये म्हणून तीच नावं बदलण्यावरून बरेच वाद पेटले आहेत.

अशी नावाची प्रकरणे महाराष्ट्राला नवीन नाहीत या निमित्ताने महाराष्ट्रात घडलेली काही नामांतराची प्रकरणे पाहू.

मराठवाडा विद्यापीठाचा नामांतराचा लढा:

‘नामांतर चळवळ’ म्हणून हे प्रकरण प्रसिद्ध आहे. १९७८ मध्ये विधानसभेतच डॉ. बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठ असं नाव ठेवण्याचा ठराव संमत झाला आणि जेव्हा ही बातमी पसरली तेव्हा औरंगाबाद व मराठवाड्याच्या बाकी भागात वातावरण पेटलं.

बऱ्याच विचारवंतांनीही याला विरोध केला. दलित विरुद्ध सवर्ण असा हा वाद पेटला. दलित वर्गातील बऱ्याच लोकांचे जीव गेले आणि त्यांची घरे पेटली.

यांत सेनेसारखा पक्ष नामांतराच्या विरोधात होता. कारण मराठवाड्यातील सेनेचे मतदार त्या विरोधात होते म्हणून. पण नामांतर न होता केवळ नामविस्तार होऊन ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं नाव ठेवलं गेलं.

औरंगाबादचे संभाजीनगर:

१९८८ ला औरंगाबादेत शिवसेनेचे २८ नगरसेवक निवडून आले. त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर घेतलेल्या सभेत औरंगाबादचं नाव संभाजीनगर केल्याचं जाहीर केलं. जून १९९५ मध्ये औरंगाबाद महापालिकेच्या सभेत बदलण्याचा ठराव बहुमतानं मंजूर करण्यात आला.

हा ठराव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला. तेव्हा राज्यसरकारमध्येही सेनाच होती. तेव्हाचे पालकमंत्री चंद्रकांत खैरेंनी नामांतराचा प्रस्ताव मांडला.

तो मंजूर करून नाव बदललं पण यांवर खूप वादंग झाला. औरंगाबाद महापालिकेचे तत्कालीन नगरसेवक मुश्ताक अहमद यांनी याविरोधात सुप्रिम कोर्टात याचिका दाखल केली.

व विरोध का आहे ? यावर ‘”आमचा विरोध नावाला अथवा व्यक्तीला नाही. पण हे करण्यामागे जो उद्देश आहे तो वाईट आहे, त्याला आमचा विरोध आहे.” असं मुश्ताक यांनी सांगितलं.

पुढं सुप्रिम कोर्टानेही नाव बदलण्यापेक्षा विकास काम करा असं सांगून ताशेरे ओढले. २००४ मध्ये आघाडी सरकार आल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनी हे ही मंजुरी मागे घेतली.

सोलापूर विद्यापीठाचे नामांतर:

सोलापूर विद्यापीठाचे नामांतर करून ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ’ करण्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केल्यावर लिंगायत समाजाने आंदोलन करून त्यांचे पुतळे जाळले तर तत्कालिन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ही घोषणा मागे घेतल्यावर धनगर समाजाने आंदोलन करून त्यांचे पुतळे जाळले. व हे प्रकरण मागे पडलं आहे.

नामंतरावरून रान पेटवलं जातं आणि वाद निर्माण केले जातात. वातावरण बिघडवलं जातं. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला जातो. यात इतक्या परस्परविरोधी भूमिका दिसतात की मराठवाडा

विद्यापीठाच्या नामांतरासाठी हाल सोसणारे; औरंगाबाद शहराच्या नामांतराला विरोध करतात. किंवा मराठवाडा विद्यापीठाचे नाव बदलण्याच्या निर्णयाला विरोध करणारे मुंबई विद्यापीठाच्या नामांतराची मागणी करतात.

या तर मोठ्या गोष्टी साध्या सिनेमाच्या नावावरून ही लोकांच्या अस्मिता दुखावतात आणि सिनेमाचं नाव बदललं जातं. नावं बदलण्यासाठी दंगे धोपे करण्यापेक्षा समजा शहरांची नावं न बदलता त्यांची मूळ नावं,

त्यांचा इतिहास समाजात सर्वत्र पोहोचवला, शहरातील ऐतिहासिक वास्तू आणि अन्य ठेवा नीट जपला तर शांततेत बराच अपेक्षित बदल होईल.

पण केवळ राजकीय फायद्यासाठी वातावरण तापवून शांतता नष्ट करून काय लाभ होणार? तुम्हाला याबद्दल काय वाटतं?

]]>
https://www.batmi.net/why-do-name-change-cases-get-so-hot/feed/ 0 26349
संवाद कौशल्य सुधारण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स… https://www.batmi.net/use-these-tips-to-improve-communication-skills/ https://www.batmi.net/use-these-tips-to-improve-communication-skills/#respond Thu, 18 Aug 2022 05:52:43 +0000 https://www.batmi.net/?p=26347 “न बोलणाऱ्याचे गहू तसेच राहतात, पण बोलणाऱ्याचा कोंडा ही विकला जातो.” अशी म्हण आपण ऐकली असेल. म्हणजेचं संवाद कौशल्य सगळ्यात महत्त्वाच आहे.

म्हणून आपल्यालाही वाटतं का की आपलं संवाद कौशल्य सुधारलं पाहिजे तर हा लेख वाचा. यामध्ये दिलेल्या आहेत संवाद कौशल्य सुधारण्यासाठी काही टिप्स…

व्हा उत्तम श्रोता:

चांगल्या पद्धतीने संवाद करता येण्यासाठी, आपल्याला प्रथम चांगले ऐकावे लागेल. संवाद नीट लक्ष देऊन ऐकला तर प्रत्येक महत्त्वाचा तपशील मिळतो आणि आपण अजून चांगला संवाद कसा साधता येईल याकरता सुधारणा सुद्धा करु शकतो.

थोडक्यात आणि मुद्द्याचं बोला:

जेव्हा अनावश्यक माहिती बोलण्यात येत असेल तेव्हा बहुतेक वेळेस संवाद योग्य प्रकारे घडत नाहीत. आपल्या संभाषणादरम्यान महत्त्वाच्या मुद्यांना बगल न देता संक्षिप्तपणे आपले म्हणणे मांडावे.

हे मौखिक संभाषणच नव्हे तर लिखित संभाषण करतानाही लागू होते. संवादाचा प्रकार कोणताही असू दे लेखी अथवा मौखिक; संभाषणासाठी जे महत्त्वाचे आहे तेच बोलण्याचा सराव करा.

आपला श्रोता ओळखा:

आपण कोणाशी संवाद साधत आहात हे आपल्याला माहित असले पाहिजे आणि ते कोणत्या प्रकारे केलेले संभाषण समजणार आहेत हे लक्षात घ्यायला पाहिजे. उदा. जर तुम्ही एखाद्या सहकाऱ्याशी किंवा वरिष्ठांशी संवाद साधत असाल,

तर उघडपणे अनौपचारिक भाषा वापरली जाऊ नये. तसेच, तुम्ही शॉर्टफॉर्म असलेले शब्द वापरल्यास, समोरच्या व्यक्तीला लगेच समजेल असे आपण गृहीत धरू शकत नाही. तर, आपलं बोलणं ऐकणारा कोण आहे, हे नीट पहा.

आवाजाच्या चढ-उतारांकडे लक्ष दया:

बहुतेक वेळेस कोणीच जर का योग्य स्वरात बोलत नसतो त्यावेळेस गैरप्रकारे संवाद घडतात. खूप मोठ्याने बोलू नये. खूप सौम्यही होऊ नका आणि उद्धट किंवा उर्मटपणे तर नाहीच. सर्वांशी नेहमी नम्रपणे आणि आदराने संवाद साधायला हवा.

सकारात्मकतेने संवाद साधा:

आपण आपल्या संवादासाठी वापरत असलेल्या भाषेत जास्तीत जास्त वेळेस होकारार्थी वाक्ये असणं आवश्यक आहे. उदा. तो हे काम नक्की करेल.

भाषेचं स्वरूप श्रोत्याचं किंवा वाचकाचं लक्ष त्वरित वेधून घेतं. ते तुमच्या प्रत्येक शब्दावर लक्ष ठेवतात आणि अपेक्षित असणारा संदेश त्यांना मिळतो.

देहबोली योग्य ठेवा:

देहबोली हा शब्दांशिवाय संवाद साधण्याचा एक उत्तम मार्ग आहे त्याचा खोलवर प्रभाव पडतो. जेव्हा आपण व्हिडिओ कॉन्फरन्स कॉलमध्ये किंवा समोरासमोर भेटत असतो तेव्हा,

एक सकारात्मक देहबोली ठेवावी जसे की मोकळेपणा आणि डोळयांत डोळे घालून पाहणे. ही देहबोली पाहून समोरचा व्यक्तीही बदलून जाईल आणि त्याची देहबोलीही सकारात्मक होईल.

थेट बोला:

आपल्याला ज्या व्यक्तीशी संवाद साधायचा आहे त्याच्याशी जाऊन थेट बोला. बर्‍याच संस्थांमध्ये, संदेश पाठवण्यासाठी याच्या त्याच्या माध्यमातून संदेश पाठवले जातात.

कानगोष्टी सारख्या खेळाचा अनुभव असेल तर निरोप इकडून तिकडे जाताना काहीतरी भलताच दिला जातो म्हणून जेव्हा बरेच लोक असतात तेव्हा हे कानगोष्टी सारखा प्रकार नकोच. आपण संबंधित व्यक्तीशी थेट संवाद साधायाला हवा.

संवाद ही अशी गोष्ट आहे ज्याचा आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनावर मोठा प्रभाव पडतो. ही गोष्ट गांभीर्याने घ्यायला हवी. आणि नेहमी लक्षात ठेवा की सर्वात यशस्वी आणि आनंदी लोक जे आहेत, त्यांना उत्तम संवाद साधता येतो.

]]>
https://www.batmi.net/use-these-tips-to-improve-communication-skills/feed/ 0 26347