Batmi https://www.batmi.net Get marathi latest news Sat, 07 Jan 2023 05:14:14 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5 https://www.batmi.net/wp-content/uploads/2022/09/cropped-Picsart_22-08-31_02-05-02-169-96x96.jpg Batmi https://www.batmi.net 32 32 201029915 जन्माने हिंदू असलेल्या ए.आर. रहमान यांनी का स्वीकारला होता इस्लाम धर्म? ‘हे’ होत कारण… https://www.batmi.net/why-did-a-r-rehman-a-hindu-by-birth-convert-to-islam-because-this-is-happening/ https://www.batmi.net/why-did-a-r-rehman-a-hindu-by-birth-convert-to-islam-because-this-is-happening/#respond Sat, 07 Jan 2023 05:14:14 +0000 https://www.batmi.net/?p=29156 फक्त बॉलिवूडच नाही तर ए.आर. रहमान हे नाव संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. आवाजही असा आहे की तो ऐकणाऱ्याच्या आत्म्यात प्रवेश करतो, असं म्हणायला काही हरकत नाही. (Why did A R Rehman, a Hindu by birth, convert to Islam? Because ‘this’ is happening)

१९९२ सालापासून त्यांनी आजवर अनेक भाषांमधील चित्रपटांमध्ये मंत्रमुग्ध करून टाकणारे संगीत देऊन जगभरामध्ये त्यांच्या चाहत्यांची मने जिंकली आहेत.

आपल्या संगीताने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या आणि संगीताच्या क्षेत्राला कलाटणी देणारे ए.आर. रहमान हे जन्माने मुस्लीम नाही तर हिंदू होते. सगळ्यात विशेष म्हणजे फार कमी लोकांना ए.आर. रहमान यांचं खरं नाव माहित आहे.

त्यांचं खरं नाव हे ए. आर. रहमान नसून दिलीप शेखर हे आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि असं नेमकं काय घडलं होतं की रहमान यांनी हिंदू धर्म सोडून मुस्लिम धर्म स्वीकारला. चला तर मग हाच किस्सा आज आपण यामध्ये थोडक्यात जाणून घेऊयात.

ए. आर. रहमानचे खरे नाव दिलीप शेखर आहे. दिलीपचा जन्म ६ जानेवारी १९६७ रोजी झाला. दिलीपच्या वडिलांचे दीर्घ आजाराने निधन झाले होते. पण यानंतर कुटुंब खूप अस्वस्थ झाले होते. कुटुंबाची परिस्थितीही फारशी चांगली नव्हती.

अशात दिलीपची बहीण सुद्धा आजारी पडली होती. यावेळी कुटुंब एका मुस्लिम पीरकडे जात असे. त्या पीराने असा चमत्कार केला की बहिणीची तब्येत बरी झाली.

महत्त्वाचं म्हणजे जेव्हा त्यांच्या बहिणीची तब्येत सुधारली तेव्हा घरात आनंदाचं वातावरण पसरल होतं. आपल्या कठीण काळात इस्लामने त्यांची साथ दिली आणि सगळं काही सुरळीत सुरू झालं.

इथेच दिलीपच्या आईला वाटले की इस्लाम धर्म हाच तिच्या समस्यांवर उपाय आहे आणि तिने इस्लामचा स्वीकार केला.
आता धर्म बदलला की साहजिकच आहे नावही बदलावे लागले.

पण दिलीप नाव असताना ए. आर. रेहमान नाव कसं पडलं याच्यामागे सुद्धा एक किस्सा आहे. ८० च्या दशकाची गोष्ट आहे. कुटुंब एका ज्योतिषाकडे गेले. आईला आपल्या मुलीच्या लग्नाबद्दल ज्योतिषाला विचारायचे होते.

परंतु ज्योतिषाला हा मुलगा कोण आहे याबद्दल जास्त रस होता. दिलीपला त्याचे नाव बदलायचे होते. यामुळे ज्योतिषाने त्यांना दोन नावं सांगितली.

पहिलं नाव ‘अब्दुल रहीम’ आणि दुसरं नाव ‘अब्दुल रहमान’ पण मग ज्योतिषी म्हणाले तुझे नाव ‘अब्दुल रहीम रहमान’ असावे. दिलीपला ‘रेहमान’ हे नाव आवडले पण ‘अब्दुल’ ऐवजी ‘अल्ला’ असे ठेवले आणि तिथून जगाला मिळाला.

ए.आर. रहमान.  म्हणजे अल्लाह रहीम रहमान. नसरीन मुन्नी कबीर यांच्या ‘एआर रहमान द स्पिरिट ऑफ म्युझिक’ या पुस्तकात रहमान म्हणतात की, एका ज्योतिषाने मला मुस्लिम नाव दिले.

तरुणांमध्ये फेमस असलेल्या आणि भला मोठा चाहते वर्ग असणाऱ्या रेहमान यांच्या जीवनाबद्दलची ही कहानी खूप कमी लोकांना माहिती आहे.

]]>
https://www.batmi.net/why-did-a-r-rehman-a-hindu-by-birth-convert-to-islam-because-this-is-happening/feed/ 0 29156
तेव्हा मांढरदेवीच्या यात्रेत गेला होता अनेकांचा बळी, ही दुर्घटना नेमकी काय होती? https://www.batmi.net/many-victims-had-gone-on-the-pilgrimage-to-mandhardevi-what-exactly-was-this-accident/ https://www.batmi.net/many-victims-had-gone-on-the-pilgrimage-to-mandhardevi-what-exactly-was-this-accident/#respond Fri, 06 Jan 2023 05:26:59 +0000 https://www.batmi.net/?p=29152 आपण अनेक यात्रेत जातो, कुणी देव दर्शनासाठी जातात,तर कुणी मज्जा करायसाठी,आता यात्रा म्हटली की भली मोठी गर्दी आलीच, पण कधी-कधी हीच गर्दी मोठ्या दुर्घटनेच कारण ठरू शकते. (Many victims had gone on the pilgrimage to Mandhardevi, what exactly was this accident?)

आता मी का असं बोलतोय,तर जास्त विचार करू नका कार, आम्ही आज तुम्हाला अशा एका घटनेबद्दल सांगणार आहोत, जे ऐकून तुम्हीही थक्क व्हाल आणि सतर्क सुद्धा .तर महाराष्ट्रात मांढरदेवीच्या उत्सवादरम्यान एक मोठी दुर्घटना घडली होती.

ज्यात जवळपास ३०० लोकांचा मृत्यू झाला होतो.आता ही दुर्घटना नेमकी काय होती? हेच यामध्ये आपण जाणून घेऊयात. तर घटना आहे २५ जानेवारी २००५ ची, मांढरदेवीला काळूबाईच्या नावानेही ओळखलं जात.

देवीचं मंदिर सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्याजवळ एका डोंगरावर वसलेलं आहे. या मंदिरात दरवर्षी १५ दिवसांचा देवीचा उत्सव साजरा केला जातो. जानेवारी महिन्यात हा उत्सव असतो म्हणून दूर-दुरून लाखो भाविक या उत्सवात सामील होण्यासाठी येतात.

त्याही दिवशी म्हणजेच २५ जानेवारी २००५ ला जवळपास ३ लाख भाविक देवीच्या दर्शनासाठी आले होते. आता देवीच दर्शन घ्यायचं आहे, तर डोंगर चढावाच लागेल कारण मांढरदेवीच्या मंदिरात जाण्यासाठी लहान डोंगर चढावा लागतो.

त्यासाठी पायऱ्या आहेत. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूनी पूजेच्या साहित्याची दुकानं आहेत. अनेक प्रथांमधून एक म्हणजे बोकड कापण्याची प्रथा सुद्धा त्यावेळी होती, त्यामळे डोंगराच्या एकाबाजूला बोकड कापले जात होते.

इतक्या लाखोंच्या गर्दीतून लोकं मिळेल तस देवीचं दर्शन घेत होते. दुपारची वेळ होती सगळं व्यवस्थित सुरळीत सुरु होत. पण अचानक, त्या लोकांच्या गर्दीमधून गोंधळ व्हायला लागला.

गर्दी असल्यामुळे तिथे चेंगराचेंगरी झाली. तिथून निघण्याचा प्रयत्न करत त्या गोंधळात धक्का बुक्की मुळे काही लोक डोंगरावरून घसरून खाली पडले.यावेळी डोंगरावर काही तंबू लावले होते. या तंबूंनाही आग लागली.

सिलेंडरचा स्फोट झाला ते चित्र इतकं भयावह होत की एका मागून एकाचे असे तिथे शेकडो जीव गेले, लहान मुलं गुदमरून गेली. पाहता पाहता मृतांचा आकडा शंभरी पार गेला आणि दिवसाअखेर जवळपास ३०० जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं.

आता गर्दीत गोंधळ का उडाला तर, काही स्थानिकांच्या आणि पत्रकारांच्या म्हणण्यानुसार, मंदिराच्या मार्गाने असणाऱ्या दुकानांना आग लागली धुराचे लोट दिसू लागले. काही दुकानांमध्ये ठेवलेल्या गॅस सिलेंडरचाही स्फोट झाला.

स्फोटाचा आवाज आल्याने आणि आग लागल्याने लोकांमध्ये खळबळ उडाली. लोक तिथं असणाऱ्या दुकानांमध्ये शिरत होती. गर्दी दुकानांमध्ये घुसल्याने पत्र्याची दुकानं कोलमडून पडली. शॉक बसल्याने अनेकांचा जीव तिथेच गेला.

दुकानांना आग लागली. लूटमार सुरू झाली.’चेंगराचेंगरी झाली आणि अनेकांचे मृत्यू झाले तर अनेक त्यात जखमी सुद्धा झाले. दुर्घटना डोंगरावर झाल्याने आणि लाखोंची गर्दी असल्याने अग्निशमन दलाची मदत पोहचण्यासाठी तिथे वेळ झाला.

तिथे मृतदेहांचे ढीग पडले होते. मृतांमध्ये सगळ्यात जास्त संख्या महिला आणि लहान मुलांची होती. कुणी आपली आई गमावली, कुणी वडील, तर कुणी अख्य कुटुंब. आजही हा प्रसंग आठवला की अनेकांच्या अंगावर शहारे येतात.

पण या दुर्घघटने नंतर प्रशासनाने या यात्रेचा ताबा घेतला असून. आता सुरक्षा यंत्रणाही वाढवण्यात आली आहे, अनेक सोय-सुविधा सुरु केल्या गेल्या आहेत. आणि अनेक कडक पाऊले सुद्धा प्रशासना कडून उचलली गेली आहेत.

]]>
https://www.batmi.net/many-victims-had-gone-on-the-pilgrimage-to-mandhardevi-what-exactly-was-this-accident/feed/ 0 29152
पुणे- मुंबईत चालते पुरुषांची देहविक्री, पहा यामागील सत्य काय? https://www.batmi.net/prostitution-of-men-in-pune-mumbai-what-is-the-truth-behind-this/ https://www.batmi.net/prostitution-of-men-in-pune-mumbai-what-is-the-truth-behind-this/#respond Thu, 05 Jan 2023 05:20:10 +0000 https://www.batmi.net/?p=29148 वेश्या व्यवसाय म्हंटल, तर आपल्यासमोर चित्र उभं रहातं महिलांचं. वेश्या व्यावसायात आपल्या देहाची विक्री करून पोट भरलं जातं. आता हा व्यवसाय कुणी स्व इच्छेनं करत, कुना कडे काही पर्याय नसला म्ह्णून करतात किंवा कुणी या दलदलीत ओढावल्या जातात म्ह्णून. (Prostitution of men in Pune-Mumbai, what is the truth behind this?)

आता चित्रपट म्हणा किंवा खऱ्या आयुष्यात आपण महिलांनाच देह व्यवसाय करतांना पाहिले किंवा आपल्या निदर्शनास आले असेल, पण आम्ही जर तुम्हाला म्हंटल की पुरुष सुद्धा देह विक्री व्यवसाय करतात तर? आता बऱ्याच लोकांना याची कल्पना नसेल मात्र हे खर आहे.

पुणे मुंबई सारख्या मोठ्या शहरात हा व्यवसाय केला जातो. हा व्यवसाय शहरात नेमका कसा चालतो? यामागीलच्याच अचंबित करणाऱ्या गोष्टी आपण आज या माध्यमातून जाणून घेऊयात.

जवळ जवळ सर्वांनाच माहित आहे की देहविक्री वापर हा सर्वीकडे केला जातो, आणि याची जागा सुद्धा ठरलेली असते. मात्र पुरुषांच्या देहविक्रीला हे लागू होत नाही. तर मुंबई पुण्या सारख्या अनेक मोठमोठ्या शहरांमध्ये हा बाजार जरा वेगळता पद्धतीनं चालतो.

विशेषतः इथे येणारे ग्राहक असतात, श्रीमंत घरातील महिला. हे खर तर आश्चर्याची गोष्ट आहे, यावर कदाचितच आपला विश्वास बसेल मात्र हे खर आहे. पुरुषांची देहविक्री याला जिगोलो असे सुद्धा म्हंटल्या जाते.

यासाठी एक बाजार भरतो त्याला जिगोलो बाजार म्हणतात. हा बाजार मुख्यतः प्रतिष्ठित लोकांच्या परिसरात भरतो. या बाजारात देहविक्री करणाऱ्या पुरुषांवर बोली लावली जाते. मोठमोठ्या घरातल्या स्त्रियांच या पुरुषांवर बोली लावतात.

या जिगोलो बाजारात पुरुषांचे दर ठरलेले असतात, घरी बोलवायचे असल्यास, बाहेर गावी न्यायचे असल्यास अशा प्रत्येक गोष्टीचे दर ठरलेले असतात. या बाजारात येणाऱ्या महिला श्रीमंत असल्यामुळे, कितीही हजारांची बोली लावण्याच्या तयारीत असतात.

हे पुरुष एका रात्रीकरिता ८००० ते १०००० घेतात. जशी पुरुषाची शरीर यष्टी ताशे त्यांचे दार ठरले जातात, काही पुरुषांकरिता महिला १५ ते २० हजार द्यायला देखील तयार असतात. असे सांगण्यात येते की देहविक्री व्यवसायात महिलांपेक्षा पुरुष जास्त कमाई करतात.

त्यांना याकरिता विशिष्ट प्रकारचे ट्रेनिंग देखील दिले जाते. पण नुसतं पैसाच नाही तर या पुरुषांना आपल्या जीवाचा देखील धोका असतो, कारण यात एच आय व्ही सारखा आजार होण्याची देखील शक्यता असते.

त्यामुळे कदाचित आजवर तुमचा आमचा एक चुकीचा समज होता की केवळ महिलाच देह व्यापार करतात. मात्र पुरुषही या व्यवसायात सक्रिय आहे आणि महिलांपेक्षा जास्त पैसा देखील कमवत आहेत.

]]>
https://www.batmi.net/prostitution-of-men-in-pune-mumbai-what-is-the-truth-behind-this/feed/ 0 29148
…आणि म्हणून भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या तब्बल १४ वर्षानंतर गोवा स्वतंत्र झाला… https://www.batmi.net/and-so-goa-became-independent-almost-14-years-after-indias-independence/ https://www.batmi.net/and-so-goa-became-independent-almost-14-years-after-indias-independence/#respond Wed, 04 Jan 2023 05:24:47 +0000 https://www.batmi.net/?p=29144 जगभरात पर्यटकांना आपल्या कडे आकर्षित करणारं राज्य म्हणजेच गोवा. कुठेही हॉलिडे प्लॅन करायचं म्हटलं तर,पटकन गोव्याचं नाव डोक्यात येत. पण तुम्हला ऐकून आश्चर्य वाटेल की, भारताला स्वतंत्र मिळाल्याच्या १४ वर्षा नंतर,गोवा स्वतंत्र झाला. (…and so Goa became independent almost 14 years after India’s independence)

मग भारताचा एक भाग झाला. तर बातमी व्हिडीओज मध्ये आपण गोवा मुक्त झाल्यापासून संपूर्ण भारताचे राज्य होण्यास १४ वर्षांचा कालावधी का लागला..? आणि या काळात गोवा कोणाच्या अधिपत्याखाली होता ? हेच जाणून घेणार आहोत.

गोवा त्याच्या सुंदर समुद्रकिनाऱ्यासाठी आणि त्याच्या वास्तुकलेसाठी जगभर प्रसिद्ध आहे. गोवा ही १९६१ पूर्वी पोर्तुगालांची वसाहत होती. पोर्तुगीजांनी गोव्यावर सुमारे ४५० वर्षे राज्य केले.

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत जरी स्वतंत्र झाला असेल, पण गोवा अजूनही स्वातंत्र्यासाठी संघर्ष करत होता. गोव्याच्या स्वातंत्र्याची चळवळ तेव्हा सुरू झाली,जेव्हा गोव्याच्या राष्ट्रवाद्यांनी एकत्र येऊन १९२८ मध्ये मुंबईत, ‘गोवा काँग्रेस कमिटी’ स्थापन केली.

या समितीचे अध्यक्ष डॉ.टी.बी.कुन्हा होते. त्यांना गोवा राष्ट्रवादाचे जनक मानले जाते. पण गोव्याच्या या चळवळीला यश मिळू शकले नाही.
देशाच्या स्वातंत्र्याच्या वेळी ब्रिटीशांशी बोलणी सुरू असताना, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी गोवा भारताच्या स्वाधीन करण्याची मागणी ब्रिटिशांकडे केली.

त्याचवेळी पोर्तुगालनेही गोव्यावर आपला दावा ठोकला. इंग्रजांनी भारताचे ऐकले नाही आणि गोवा पोर्तुगीजांना हस्तांतरित करण्यात आला. भारताच्या स्वातंत्र्यानंतर, जेव्हा पोर्तुगीजांना गोवा भारताच्या स्वाधीन करण्यास सांगितले गेले तेव्हा त्यांनी नकार दिला.

परंतु भारताने १९ डिसेंबर १९६१ रोजी ऑपरेशन विजयच्या माध्यमातून गोवा मुक्त केला .आणि त्यानंतर दमण आणि दीव चे विलीनीकरण करून केंद्रशासित प्रदेश बनवला.

जर आपण गोव्याच्या सुरुवातीच्या राजकीय इतिहासावर नजर टाकली तर, तो सातवाहन साम्राज्याचा एक भाग होता. त्यानंतर कदंब, मलखेड़ राष्ट्रकूट, चालुक्य आणि सिलाहार या राजघराण्याचे इथे राज्य होते.

१४ व्या शतकाच्या शेवटी यादवांचे राज्य संपले,आणि दिल्लीतील खिलजी घराणे येथे राज्य करू लागले. असं म्हटल्या जात की, वास्को द गामा आणि त्यानंतर अनेक पोर्तुगीज प्रवासी १४९८ मध्ये भारतात सागरी मार्ग शोधत असताना भारतात पोहोचले.

१५१० मध्ये अल्फोन्सो डी अल्बुकर्कने, विजयनगर सम्राटाच्या मदतीने गोव्यावर आक्रमण केले आणि ते ताब्यात घेतले. १५ ऑगस्ट १९४८ रोजी भारत स्वतंत्र झाल्यानंतरही गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यात राहिला.

पण, पोर्तुगीज राज्यकर्ते गोव्याच्या आकांक्षा पूर्ण करू शकले नाहीत. भारत सरकारच्या अनेक विनंत्या करूनही पोर्तुगीजांनी ते मान्य केले नाही, तेव्हा ऑपरेशन विजय सुरू करण्यात आले.

शेवटी १९ डिसेंबर १९६१ रोजी गोवा मुक्त झाला. दमण आणि दीव मध्ये यांचे विलिनीकरण करून, गोव्याला केंद्रशासित प्रदेश बनवण्यात आला. पण नंतर ३० मे १९८७ रोजी गोव्याला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात आला.

दमण आणि दीव हे स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश बनवण्यात आले.तेव्हापासून, ३० मे हा गोवा मुक्ती दिन म्हणजेच स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो. स्थापनेनंतर पणजीला गोव्याच्या राजधानीचा दर्जा आणि कोकणी भाषेला राजभाषा म्हणून मान्यता देण्यात आली.

]]>
https://www.batmi.net/and-so-goa-became-independent-almost-14-years-after-indias-independence/feed/ 0 29144
भारतातील यूट्युबर्स किती आणि कसा पैसा कमावतात?, जाणून घ्या… https://www.batmi.net/how-much-and-how-do-youtubers-earn-in-india-know/ https://www.batmi.net/how-much-and-how-do-youtubers-earn-in-india-know/#respond Tue, 03 Jan 2023 05:25:50 +0000 https://www.batmi.net/?p=29140 पैसा हा प्रत्येकाच्या आयुष्यातला महत्वाचा भाग आहे. गेल्या काही वर्षांमध्ये म्हणजेच या कोरोनाच्या काळामध्ये सगळं जीवन ऑनलाईन झालं होत, आणि त्यावरून अनेकांनी ऑनलाईन पैसे सुद्धा कमविले होते. (How much and how do Youtubers earn in India?, Know)

तुम्हाला जर माहिती असेल तर मोठं मोठे सेलेब्रिटीना त्यांच्या पोस्ट वरून, इंस्टाग्राम च्या माध्यमातून पैसे मिळत असतात. तसेच युट्युब वरून देखील असंख्य भारतातील लोक पैसे कमवत असतात.

पण तुम्हाला माहिती आहे का की , युटूबवरून पैसे कसे कमवल्या जातात? आणि भारतातील यूट्युबर्स असे किती पैसे कमावतात? याबाबत तुम्हालाही विचार आला असेल तर आज यामध्ये याच प्रश्नांची उत्तर जाणून घेऊयात.

जगभरामध्ये यूट्युबचे २.३ अब्ज पेक्षा जास्त युजर्स आहेत. २०२० मध्ये यूट्युबच्या वार्षिक कमाईमध्ये ३०.४ टक्के वाढ झाली आहे. एका वर्षामध्ये यूट्युबने १९. ७ बिलियनची कमाई सुद्धा केली आहे.

यूट्युबवरच असलेल्या लोकप्रिय मुलांची चॅनल, रायन्स वर्ल्डनं २०२० मध्ये २९.५ मिलियन डॉर्लसची कमाई केली. भारतात असे काही व्यक्ती आहेत, जे यूट्युबच्या माध्यमातून भरपूर पैसे कमवतअसतात.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हि कमाई होते तरी कशी? तर यूट्युबनं गेल्या तीन वर्षांमध्ये क्रिएटर्स, आर्टिस्ट आणि मीडिया संस्थांना जवळपास ३० अब्ज डॉलर्स दिले आहे.

२०१९ मध्ये, टी-सिरीज हे १०० मिलियन युजर्सचा टप्पा पार करणारं भारतामधल पहिलं यूट्युब चॅनल बनलं आहे. अनेक यूट्युबर्सनी व्ह्युवर्सचे अशक्य वाटणारे आकडे ओलंडले आहेत.

कोरोना साथीमुळे भारतात यूट्युबच्या वाढीला वेग मिळाला. कोरोना साथीच्या रोगापूर्वी, व्हॉट्सअॅप हे भारतातील प्रबळ व्यासपीठ होतं. पण, अॅप अॅनीच्या डेटानुसार, डिसेंबर २०२० मध्ये यूट्युबचे महिन्याचे अॅक्टिव्ह युजर्स ४२५ मिलियन इतके होते.

तर व्हॉट्सअॅपचे महिन्याचे अॅक्टिव्ह युजर्स ४२२ मिलियन होते. युट्युबवर प्रत्येक वेगवगेळ्या कॅटेगिरीज नुसार पैसे मिळत असतात. तुमच्या कुठल्या विषयावर चॅनल बनवलेले आहे ते सुद्धा तितकेच महत्वाचे ठरते.

उदाहरण द्यायचे झाले की कुणाचं टेकनॉलॉजी रिलेटेड चॅनल असेल तर १००० ते २००० व्ह्यूज ला १ ते २ डॉलर मिळत. म्हणजे ७० ते १४० रुपये मिळतात. तुम्हला महिन्याला साठ हजार रुपये सुद्धा मिळू शकतात.

वर्षभरात एखादी व्यक्ती अंदाजे सात लाख 30 हजार रुपये मिळवू शकते. ही संख्या माघेपुढे होऊ शकते. लाईक ला कमेंट ला डिसलाईक ला किंवा सबस्क्राईब ला कुठलाही पैसा मिळत नाही.

असे प्राप्त झालेल्या माहितीनुसार पुढे आले आहे. जे लोक तुमचे व्हिडीओ बघतात त्यावर जे अड्वर्टाइज येत असतात त्याचेच फक्त पैसे मिळतात. जर कुठल्या लोकल कॅटेगरी मधलं तुमचं चॅनल असेल तर मग तिथे तुम्हाला ५००० व्ह्यूज नंतर १ डॉलर मिळतो.

याव्यतिरिक्त यूट्युब पार्टनरशीप प्रोगॅमसाठी अर्ज करून पैसे कमावता येतात. यूट्युब कंटेंट क्रिएटर्सना त्यांच्या चॅनेलची जाहिरातीतील कमाई, चॅनल मेंबरशीप, सुपर चॅट्स, सुपर स्टिकर्स, मर्च शेल्फ्स आणि यूट्युब प्रीमिअम कमाईच्या माध्यमातून पैसे मिळवण्यास देखील मदत करतं.

तुम्ही यासाठी पात्र असल्यास यूट्युब शॉर्ट्स फंडाचा भाग म्हणून तुम्हाला शॉर्ट्स बोनससुद्धा मिळू शकतो. यूट्युब पार्टनरशीप प्रोग्रॅमसाठी पात्र होण्याकरिता, तुमच्या यूट्युब चॅनेलला गेल्या एका वर्ष्यामध्ये म्हणजेच १२ महिन्यात चार हजार वॉच अवर्स आणि १० हजारपेक्षा जास्त सबस्क्रायबर्स असणं आवश्यक आहे.

अॅडव्हर्टायझिंग रिव्हेन्यु, चॅनेल मेंबरशीप, सुपर चॅट्स आणि सुपर स्टिकर्स, मर्च शेल्फ, यूट्युब प्रीमिअम रिव्हेन्यु यातील उत्पन्नाचा काही भाग यूट्युब आपल्या पात्र क्रिएटर्सना देतं असत.

तुमचे व्ह्युज जर भारतामधून मिळत असतील तर प्रतिहजार व्हिडिओ व्ह्युजमागे तुम्हाला १.५ ते ३ डॉलर्स मिळू शकतात. पण, जर तुमचे दर्शक युनायटेड स्टेट्समधील असतील तर तुम्हाला २ ते ४ चार डॉलर्स मिळू शकतात.

सीपीएम अंदाजानुसार तुम्ही यूट्युबवर किती पैसे कमवू शकता हे अचूकपणे सांगणं कठीण आहे. प्राप्त झालेल्या माहितीदरम्यान भारतामधले युटूबर वेगवेगळ्या श्रेणीसाठी वेगवेगळे पैसे मिळवत असतात.

कॉमेडी व्हिडिओसाठी २२ ते ३० हजार रुपये, म्युझिक व्हिडिओसाठी ७ ते ११ हजार, टेक्नॉलॉजी व्हिडिओसाठी १४ ते २२ हजार, रोस्टिंग व्हिडिओसाठी १८ ते २९ हजार, फूड व्हिडिओसाठी ७ ते ११ हजार आणि गेमिंग व्हिडिओसाठी ७ ते १४ हजार रुपये मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

यूट्युब हे भारतातील प्रबळ व्यासपीठ आहे. यामुळे तुम्ही सुद्धा युट्युब वर चॅनल उघडू शकता, आणि पैसे कमवू शकता. फक्त यासाठी तुम्हला तुमचा पूर्ण वेळ आणि स्ट्रॅटेजि हवी.

]]>
https://www.batmi.net/how-much-and-how-do-youtubers-earn-in-india-know/feed/ 0 29140
बॉलिवूड कलाकार कास्टिंग काउचच्या जाळ्यात कसे अडकतात, कास्टिंग काउच कशाला म्हणतात? https://www.batmi.net/how-bollywood-actors-fall-into-the-trap-of-casting-couch-what-is-casting-couch-called/ https://www.batmi.net/how-bollywood-actors-fall-into-the-trap-of-casting-couch-what-is-casting-couch-called/#respond Mon, 02 Jan 2023 05:40:25 +0000 https://www.batmi.net/?p=29136 अख्खे जग, बॉलिवूड आणि त्यामागची झगमगती दुनिया, अश्या बॉलिवूडचे आकर्षण नाही असे फार कमी लोक आढळतील. प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते की आपल्याला एकदा तरी बॉलिवूडमध्ये काम करायचे आहे. (How Bollywood actors fall into the trap of Casting Couch, What is Casting Couch called?)

भारतामधनं लाखो कलाकार आपले स्वप्न घेऊन या बॉलिवूडमध्ये येत असतात. मात्र फार कमी कलाकारांना ती संधी मिळते. बॉलिवूडमध्ये सहजासहजी संधी कधीच मिळू शकत नाही. त्यातच कास्टिंग काऊच हा प्रकार सध्या फार चर्चे मध्ये आला आहे.

तसा हा प्रकार फार जुना असला, तरी देखील काही वर्षात तो चर्चेमध्ये आला आहे. आता कास्टिंग काऊचं म्हणजे नेमकं काय? आणि कलाकार कास्टिंग काऊचंच्या जाळ्यात कसे अडकतात? हेच आपण आज या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

आपण जे चित्रपट बघतो, त्यात काम करत असणारे कलाकार कुठून आले असतील? किंवा त्यांना काम कसे मिळाले असेल? हा प्रश्न तर आपल्या सर्वानाच पडतो. कास्टिंग डायरेक्टरच्या मदतीने दिग्दर्शक कलाकारांना निवडत असतो.

आता कास्टिंग काऊचची व्याख्या करायची झाल्यास, एखाद्या संस्थेतील व्यवसाय किंवा करिअरमध्ये प्रवेश करण्यासाठी उमेदवार किंवा कनिष्ठांकडून लैंगिक संबंधांची मागणी करण्याचा अनैतिक आणि बेकायदेशीरपणा, याबदल्यात त्याला चित्रपटात भूमिका देणे म्हणजे कास्टिंग काउच.

ही गोष्ट अमेरिकेमध्ये बेकायदेशीर मानली जाते. मात्र आपल्याकडे याचे अनेक कलाकार बळी पडले आहेत. कास्टिंग काउच या शब्दाचा उगम मोशन पिक्चर इंडस्ट्रीमध्येच झाला. काऊचं म्हणजे सोफा. याचा अर्थ दिग्दर्शक आणि निर्मात्यांच्या कार्यालयात असणारा काऊचं, जिथे इच्छुक कलाकारांच्या मुलाखती घेतल्या जातात.

हा शब्द बऱ्याचदा मनोरंजनाव्यतिरिक्त इतर उद्योगांमध्ये देखील वापरला जातो. पुरुष कास्टिंग डायरेक्टर, अथवा चित्रपट निर्माते…. अभिनेत्रींकडून शरीर सुखाच्या मागणीकरिता कास्टिंग काउचचा वापर करत असतात. हा प्रकार चित्रपटसृष्टीत फार पूर्वीपासून सुरु आहे.

मात्र या विरोधामध्ये अभिनेत्रींनी वेळोवेळी आवाज उठवला आहे. स्त्रीवाद आणि महिला सबलीकरण हे सर्वाधिक चर्चेचे विषय बनल्यामुळे, बॉलिवूड चित्रपट उद्योगातील अभिनेत्री समस्यांबद्दल अधिक स्पष्टपणे बोलू लागल्या आहेत. केवळ बॉलिवूडचं नाही तर हॉलिवूड मध्ये सुद्धा या विरोधात आवाज उठवण्यात आला आहे.

हार्वे वेनस्टाईन घोटाळा जेव्हा बाहेर आला, तेव्हा अनेक अभिनेत्रींनी यावर आवाज उठवला होता. चार्लीझ थेरॉन, थँडी न्यूटन, रीझ विदरस्पून, जेनिफर लॉरेन्स या अभिनेत्रींनी आपल्याबरोबर घडलेल्या कास्टिंग काऊच बद्दल आपल्या प्रतिक्रिया सुद्धा दिल्या.

बॉलिवूडमध्ये आज काही प्रतिष्ठित कास्टिंग करणाऱ्या संस्था देखील आहेत. यात मुकेश छाब्रा यांची संस्था खूप प्रसिद्ध आहे.
अनेक प्रसिद्ध परंतु जे पडद्यापुढे आले नाहीत, अशा कलाकरांना याचा सामना करावा लागला आहे.

केवळ अभिनेत्रीच नाही तर अभिनेत्यांना सुद्धा याचा सामना करावा लागला आहे. टीव्ही अभिनेता परम सिंगने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते की “एका कास्टिंग डायरेक्टरने त्याच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होता.

अभिनेता रणवीर सिंग देखील आज बॉलिवूडमध्ये आघाडीचा अभिनेता आहे, पण त्यानेदेखील त्याचा अनुभव सांगितला आहे. तो म्हणाला “बॉलिवूडमध्ये हे सामान्य आहे. मी देखील याचा सामना केला आहे”.

बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये कंगना रनौत, नीना गुप्ता, मल्लिका शेरावत, सुरवीन चावला, राधिका आपटे, चित्रांगदा सेन, मौशमी उदेशी, प्रीती जैन यांसारख्या प्रसिद्ध अभिनेत्रींना सुद्धा याचा सामना करावा लागला आहे. काही अभिनेत्रींनी आपल्याला बरोबर घडलेला प्रकार उघड्पणे व्यक्त केला आहे.

मात्र काही अभिनेत्री अशाही आहेत ज्यांच्याबरोबर हा प्रकार घडला असूनसुद्धा त्या व्यक्त झाल्या नाहीत किंवा या आमिषाला बळी पडून देखील त्यांना काम मिळाले नाही.

बॉलिवूडमध्ये मध्यंतरी मी टू मुव्हमेंट मोठ्या प्रमाणात चालली, आणि यात अनेक अभिनेत्रींनीं आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगत, मोठमोठ्या व्यक्तींवर आरोप केलेत.

]]>
https://www.batmi.net/how-bollywood-actors-fall-into-the-trap-of-casting-couch-what-is-casting-couch-called/feed/ 0 29136
सोलापूरचे बिडी घरकुल, जिथे प्रत्येक घरात बनवली जाते बिडी… https://www.batmi.net/bidi-gharkul-of-solapur-where-bidi-is-made-in-every-household/ https://www.batmi.net/bidi-gharkul-of-solapur-where-bidi-is-made-in-every-household/#respond Sat, 31 Dec 2022 09:36:35 +0000 https://www.batmi.net/?p=29131 तंबाखु आणि बिडी हे आपल्या शरीरासाठी घातक असते .हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. पण आपल्या महाराष्ट्रात असं एक गाव आहे जिथे ,घरा- घरात प्रत्येक महिला ही बिडी बनवण्याचा व्यवसाय करते. आणि त्यावरच त्यांचा पूर्ण महिना चालतो. ऐकतांना थोडं विचित्र वाटतं ना. (Bidi Gharkul of Solapur, where Bidi is made in every household)

की प्रत्येक घरात हाच व्यवसाय कसा? आणि ते गाव कोणतं? तर यामध्ये आज आपण याच गावाचा शोध घेणार आहोत. सोलापूर हे सोलापुरी चादर साठी प्रसिद्ध आहेच,पण तिथल्या बिडी उद्योगासाठी सुद्धा चांगलंच प्रसिद्ध आहे. सोलापूरात बीडी घरकुल नावाचा परिसर आहे.

जिथे जवळपास प्रत्येक घरात महिला स्वतःच्या हातानी बीडी बनवतात, आता पासूनच नाही तर गेल्या २०, २५ वर्षा पासून हा त्यांचा व्यवसाय बनला आहे. या व्यवसायापासूनच त्यांचं घर चालत.

बिडी कारखान्यांकडून या महिलांना बिडी बनवण्यासाठी साहित्य मिळत, त्या साहित्यात महिला दिवसाला १००० बिडी बनवतात. पण हे ऐकून तुम्हला नक्कीच आश्चर्य वाटेल की त्यांना रोजच्या ८ ते १० तासांच्या कामानंतर दिवसाचे १५० रुपये मिळतात.

त्या हिशोबानी महिन्याचे ३५०० ते ४००० हजार त्यांना मिळतात. या आधी तर त्यांना दिवसाचे १०० रुपये मिळायचे पण महिलांनी यासाठी मोर्चा केल्यानंरत ती रक्कम वाढवून १५० करण्यात आली.

आता काहीही म्हटलं तरी ,कला ही कला असते.. बिडी बनवण्यासाठी किंवा तयार करण्यासाठी विशेष कौशल्य आवश्यक आहे. आणि या महिला ती अतिशय सुंदर रित्या पार ही पडतात.

बिडी बनवायसाठी जे पान मिळत ज्याला तेंदूपत्ता असं म्हटल्या जाते. त्याला भिजवून मापाने कापून मग तो तेंदूपत्ता हलक्या हाताने दुमडून त्यात तंबाखू भरतात आणि पान न तोडता धाग्याने बांधतात.

अश्या २५ बिड्यांचा एक बंडल बनवतात. आणि ते संध्याकाळी कंपनीला परत पाठवतात. आता पैश्यांच म्हटलं तर आधी पैसे आठवड्याला कॅश मध्ये मिळायचे.

पण आता रोजचा हिशोब ठेवून दर महिन्याच्या शेवटी बिडी कंपनी पैसे महिलांच्या खात्यात जमा करतात. पण काम म्हटलं किंवा व्यवसाय म्हटलं तर समस्या येतातच, इतकं काम करूनही दिवसाला फक्त १५० रुपये हाती येतात.

कंपनी त्यांना तेंदुपत्ती तंबाखू आणि दोरा देते त्यातल्यात्यात कारखान्यातून जितकं सामान पठवंल त्यात दिवसाचं टारगेट पूर्ण करायचं असते. मग बिडी बनवण्यासाठी तंबाखू किंवा तेंदूपत्ता जे कंपनी कडून पाठवतात ते कमी पडत असेल.

किंवा ते पान खराब आले तर ते त्या महिलांना स्वतःच्या पैश्यांनी विकत घेऊन टारगेट पूर्ण करावं लागत. महिलांच्या सांगण्यानुसार प्रत्येक वेळेला पान हे कमी पडतात.

त्या विकत घेतातच म्हणजे महिन्याचे पैसे ३५०० ते ४००० आणि त्यातही टारगेट पूर्ण करायसाठी स्वतःहून खर्च करावा लागतो. एकंदरीत बघायला गेलं तर महिना भर इतके कष्ट करून त्यानं जे मिळायला हवं ते मिळत नाही.

पण सोलापुरातील वस्त्रोद्योग आणि बीडी बनविण्याच्या उद्योगांमुळे कमी पगाराचा का होईना पण येथे खेड्यापाड्यातील अनेक कामगारांना रोजगार मिळतो तेही तीतकेचं खरे .

]]>
https://www.batmi.net/bidi-gharkul-of-solapur-where-bidi-is-made-in-every-household/feed/ 0 29131
कोल्हापुरातील महालक्ष्मी-अंबाबाई मंदिराच्या ‘या’ गोष्टी तुम्हालाही माहित नसतील… https://www.batmi.net/you-may-not-even-know-these-things-about-mahalakshmi-ambabai-temple-in-kolhapur/ https://www.batmi.net/you-may-not-even-know-these-things-about-mahalakshmi-ambabai-temple-in-kolhapur/#respond Sat, 31 Dec 2022 09:30:18 +0000 https://www.batmi.net/?p=29127 कोल्हापुरातील महालक्ष्मी-अंबाबाई मंदिर हे खूप प्रसिद्ध आहे. कोल्हापूरच्या मंदिराचा उल्लेख अंबाबाई किंवा महालक्ष्मी असा करण्यात येतो. अनेक पिढीतील लोक कोल्हापूर येथील देवीच्या दर्शनासाठी प्रचंड प्रमाणात गर्दी करतात. (You may not even know ‘these’ things about Mahalakshmi-Ambabai Temple in Kolhapur)

या मंदिराचा इतिहास प्राचीन तर आहेच पण या मंदिरानं अनेक शतकांचा इतिहास घडतांना बघितलेला आहे. पण या मंदिराबद्दल अश्या अनेक गोष्टी आहेत ज्या कदाचित तुम्हाला माहिती नसणार? चला तर मग याच मंदिराबद्दल च्या काही माहित नसलेल्या गोष्टी आपण जाणून घेऊयात.

कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर अंबाबाईचे देऊळ हे पुराणात उल्लेखलेल्या १०८ पीठांपैकी एक व महाराष्ट्रात असलेल्या देवींच्या साडेतीन पीठांपैकी एक मानले जाते. प्राप्त माहितीनुसार मंदिराच्या मांडणीवरून ते चालुक्यांच्या काळात इ. स. ६०० ते ७०० मध्ये बांधले गेल्याची शक्यता दर्शवितात.

मंदिराचे पहिले बांधकाम हे राष्ट्रकूट किंवा त्याआधीच्या शिलाहार राजांनी सुमारे आठव्या शतकात केले असावे असे सांगण्यात येते. पुराणे, अनेक जैन ग्रंथ, ताम्रपत्रे व सापडलेली अनेक कागदपत्रे यांवरून अंबाबाई मंदिराचे पुरातत्व वेळोवेळी सिद्ध होते. आणि कोल्हापूरची अंबाबाई खऱ्या अर्थाने अखिल महाराष्ट्राची कुलस्वामिनी ठरते.

कोल्हापूर या शहराची किंवा सुरुवातीच्या काळातील वस्तीची सुरुवात पंचगंगा या नदीच्या काठावर झाली असे ब्रह्मपुरी टेकडीवर मिळालेल्या अवशेषांवरून सांगण्यात येतं. जर आज या मंदिराचा इतिहास बघायला गेल तर पौराणिक आणि ज्ञात ऐतिहासिक पुरावे या दोन्हीचा विचार करावा लागतो.

पुराणामध्ये सुद्धा याचे उल्लेख आहेत आणि काही कागदोपत्री पुराव्यांवरही इतिहास लिहिला गेला आहे. मंदिराचं गर्भागार कर्णदेव नावाच्या चालुक्यांच्या सुभेदाराने ६२४ मध्ये बांधलं आणि त्यानंतर शिलाहारांच्या मारसिंह नावाच्या राजाने या मंदिराचा विस्तार केला. व त्याच्याच वंशातल्या गंडरादित्यानं मंदिरावर कळस चढवला, असं मानले जाते.

आजच्या महालक्ष्मी-अंबाबाई मंदिराच्या संकुलाची रचना विचारात घेतली असता सुरुवातील महाद्वार, चारही दिशांनी… द्वार, आत गेल्यावर मेंढा व बैल यांचे शिल्प, नगारखाना, दीपमाळा, मध्यवर्ती महालक्ष्मी-महाकाली, महासरस्वती यांची मंदिरं आणि चारही बाजूंनी अनेक देवतांची मंदिरं दिसून येतात.

महालक्ष्मी समग्र दर्शन या पुस्तकामध्ये लिहल्या गेले आहे की, हे मंदिर कोणी बांधले यासंबंधी काही पुरावे उपलब्ध नाहीत. केव्हा बांधले याबद्दल अनेक प्रवाद आहेत. प्र. कृ. प्रभुदेसाई यांनी एका मुलाखती दरम्यान म्हटले होते की, महालक्ष्मी मंदिराचे १०५५ च्या आधी आणि नंतर असे दोन टप्पे आढळून येतात.

चोळ राजांनी हे मंदिर जाळण्याचा प्रयत्न केला होता, म्हणजे त्याचा बहुतांश भाग हा लाकडाचा असावा. प्रभुदेसाई यांनी या मंदिराची वैशिष्ट्ये सांगताना म्हटले कि, हे मंदिर एकमेवाद्वितिय असं म्हटलं पाहिजे. यात दोन मजले असून दोन गर्भगृहे आहेत. सध्या दिसणारी शिखरं अगदी अलिकडची म्हणजे १८ व्या किंवा १९ व्या शतका मधली असावीत.

मंदिराच्या रचनेबद्दल त्यांनी म्हटलं की, मंदिराच्या छताचा आतला भाग पाहिला असता लाकडामध्ये जे स्थापत्य बनवले जाते, अगदी त्याचीच नक्कल दगडामध्ये घडवल्याचे दिसून येतं. महालक्ष्मीच्या मूर्तीबद्दल इतिहास अभ्यासक इंद्रनील बंकापुरे यांनी एका मुलाखती दरम्यान म्हटलं की, ही मूर्ती काळ्या पाषाणात म्हणजे बेसॉल्टपासून तयार केलेली आहे.

ती उभी मूर्ती आहे. तिच्या हातामध्ये म्हाळुंग म्हणजे बीजपूरक, गदा, ढाल, पानपत्र आहेत. अशाप्रकारची रचना असलेल्या मूर्ती कर्नाटक, तामिळनाडू, ओडिसात आढळून येतात. देवी म्हणून तिच्या भक्तांची व्याप्ती दूरवर पसरलेली आहे. ओडिसा, पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारतापासून भाविक दर्शनासाठी या मंदिरामध्ये येत असतात. नवरात्रामध्ये भाविकांची दर्शनासाठी प्रचंड गर्दी असते.

]]>
https://www.batmi.net/you-may-not-even-know-these-things-about-mahalakshmi-ambabai-temple-in-kolhapur/feed/ 0 29127
महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांच्या अंधश्रद्धेचे काही चित्र- विचित्र किस्से… https://www.batmi.net/some-pictures-of-superstitions-of-political-leaders-in-maharashtra-weird-tales/ https://www.batmi.net/some-pictures-of-superstitions-of-political-leaders-in-maharashtra-weird-tales/#respond Sat, 31 Dec 2022 09:23:29 +0000 https://www.batmi.net/?p=29123 महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय नेते आणि त्यांचा जोतिष्य बुवा बाबांवर विश्वास, असे अनेक किस्से प्रचलित आहेत. आता महाराष्ट्राचे सीएम एकनाथ शिंदेंचं घ्या ना, ते सुद्धा जोतिष्याला भेटायला गेले होते आणि नंतर काय, तर.. महाराष्ट्रात उलट सुलट चर्चा सुरु झाल्या होत्या. (Some Pictures of Superstitions of Political Leaders in Maharashtra – Weird Tales)

पण हे पहिलेच अशे राजकारणी नाहीत ज्यांनी असं काही केलय. या आधीही असे अनेक राजकारणी नेते आहेत जे भविष्यवाणी ऐकून, किंवा एखाद्या बाबांच्या म्हणण्यानुसार आपले निर्णय घ्यायच आणि आता ही घेतात. तर साध्या भाषेत सांगायचं झालं तर, यामध्ये आज आपण ते नेते कोण आहेत?, सोबतच अशाच राजकारण्यांच्या चित्रविचित्र अंधश्रद्धांचे काही किस्से जाणून घेणार आहोत….

आता पहिला किस्सा मी सांगणार आहे तो कुठल्या नेत्याचा नाही तर विधिमंडळाच्या इमारतीचा आहे. राजस्थान विधानसभेतील आमदार किर्ती कुमारी आणि कल्याण सिंह यांचे आकस्मिक निधन झाल्यानंतर, २०१८ मध्ये भाजपच्या आमदारांनी मागणी केली होती की, विधिमंडळाचे शुद्धीकरण करावे.

कारण ती इमारत स्मशानावर उभी आहे, आणि तिथे भुताखेतांचा वास आहे. शुद्धीकरण केल्यानंतर असे आकस्मिक मृत्यू होणार नाहीत. होम हवन करून शुद्धीकरण केलं आणि यथायोग्य दानधर्म केलं तर भुतं आणि आत्मे पळून जातील असं या आमदारांचं म्हणणं होतं. त्यावेळी विधिमंडळाच्या सचिवांनी यावर आश्चर्य व्यक्त केलं होतं.

दुसरी गोष्ट अशी की आपल्या महाराष्ट्राचे आताचे डेप्युटी सीएम देवेंद्र फडणवीस यांचा मिरची हवन सुद्धा चर्चेचा विषय बनला होता.सत्तेत येण्यासाठी त्यांनी मिरची हवन केले होते. आणि त्यानंतर फडणवीस यांचा पहाटेचा शपथविधी झाला होता.

मिरची हवन करणाऱ्या तांत्रिकाच्या सांगण्यावरूनच शपथविधीच्या वेळी फडणवीसांनी त्यांच्या आवडत्या निळ्या रंगाच्या जॅकेटऐवजी काळ्या रंगाचं जॅकेट घातले होते.

असं ज्येष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांनी आपल्या “चेकमेट- हाऊ बीजेपी विन अँड लॉस्ट” या पुस्तकात म्हटलं होतं. ज्योतिषांबद्दल बोललं की सगळ्यात आधी नाव येत ते तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचं, यांनी अनेक निर्णय असे घेतले आहेत.

ज्यावर जोतिष्यशाश्त्राचा प्रभाव असतो,अश्या टीका विरोधक नेहमी त्यांच्यावर करत असतात. याच उदाहरण सांगायचं झालं तर ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले असता, शपथ विधीच्या वेळी जोतिष्याच्या सांगण्यावरुन शपथविधीच्या वळेवर शपथ न घेता ४ मिनिटं नंतर घेतली होती.

यावरही बऱ्याच चर्चा सुरु झाल्या होत्या. इतकच नाही तर चंद्रशेखर राव यांच्या कारचा क्रमांक हा ६६६६ असा आहे. त्यांच्या ताफ्यात याच क्रमांकाच्या अनेक गाड्या पाहायला मिळतात. त्यांच्या या हट्टापायी तेलंगणा सचिवालयाची चांगली इमारत असताना सुद्धा ते कोट्यवधी रुपये खर्चून वास्तूशास्त्राप्रमाणे नवीन इमारत बांधून घेत असल्याची टीका त्यांच्या विरोधकांनी केली होती.

२०१६ साली मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्राचार्य महाराजांची रत्नागिरी येथे जाऊन भेट घेतली होती. नरेंद्राचार्यांच्या वाढदिवसानिमित्त असलेल्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता मोठी आहे. हे वाक्य आणि ही भेट वादग्रस्त ठरली होती.

नरेंद्र महाराजांचे नाव गैरव्यवहारात अडकलेले असताना त्यांना मुख्यमंत्री कसे भेटले, अशा महाराजाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावणे याचा खेद वाटतो, असं अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मुक्ता दाभोलकर म्हणाल्या होत्या. आता हवेतून लाडू-पेढेच काय पण सोन्याचे नेकलेस काढून आपल्या भक्तांना दिल्यामुळे सत्य साईबाबांचा ही भक्त परिवार मोठा आहे.

अशोक चव्हाण हे देखील सत्यसाईबाबांचे भक्त आहेत. २००९ मध्ये ते मुख्यमंत्री असताना वर्षा बंगल्यावर, म्हणजेच शासकीय निवासस्थानी सत्य साईबाबा आले होते. सत्य साईबाबांच्या भक्त मंडळीत विलासराव देशमुख, जयंत पाटील, डी. वाय पाटील यांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येते.

विलासराव देशमुख हे सत्य साईबाबांचे भक्त होते आणि त्यांनी आपल्या घरी सत्य साईबाबांचे आदरातिथ्य केले होते. त्यामुळे त्यांच्या हस्ते नरेंद्र दाभोलकर यांनी पुरस्कार नाकारला होता.

]]>
https://www.batmi.net/some-pictures-of-superstitions-of-political-leaders-in-maharashtra-weird-tales/feed/ 0 29123
संतोष आग्रे : बारावी नापास असून या शेतकऱ्यानं वर्षभरात केला कोट्यवधींचा टर्नओव्हर… https://www.batmi.net/santosh-agre-the-12th-failed-farmer-made-a-turnover-of-crores-in-a-year/ https://www.batmi.net/santosh-agre-the-12th-failed-farmer-made-a-turnover-of-crores-in-a-year/#respond Thu, 29 Dec 2022 05:13:00 +0000 https://www.batmi.net/?p=29118 न्युज पेपर वाचत असतांना किंवा सोशल मीडिया वर, नेहमी शेतकरी आत्महत्येच्या बातम्या बघायला मिळतात, ऐकू येतात. देशात शेतकरी आत्महत्येचं प्रमाण वाढत असताना ,एका शेतकऱ्यानं कमालच करून दाखवली. (Santosh Agre: The 12th failed farmer made a turnover of crores in a year)

संतोष आग्रे,या बारावी नापास शेतकऱ्यानं वर्षभरात कोट्यवधींचा टर्नओव्हर करून दाखवला. आता तो त्याने कसा केला,हेच आज आपण यामध्ये जाणून घेणार आहोत.

संतोष आग्रे औरंगाबाद जिल्ह्यातल्या फुलंब्री तालुक्यातील बाभुळगावमध्ये राहतो. त्याच्या कडे दीड एकर शेती आहे. दहावी झाल्यानंतर संतोष शहरात नौकरी करायला गेला. ७,८ वर्ष औरंगाबादच्या खासगी संस्थेत काम केलं.

पण तिथं त्याला काही जमल नाही, म्हणून गावाकडे परतण्याचा निर्णय घेतला. पण गावाकडे जाऊन काय करणार होता,घरी १ एकर शेती त्यात, काहीच भागणार नाही म्हणून घरचे त्याला परत यायला नकार देत होते.

पण संतोष तरीही परत आला आणि गाव कडे परत आल्या नंतर त्यानी ६ वर्ष शेळीपालन केलं,त्यातून त्याची शेती क्षेत्रातील जाणकारांशी ओळखी झाल्या. आणि पुढे २०२२ च्या ऑक्टोबर महिन्यात संतोष यानी शेतकरी उत्पादक कंपनी एफपीओ स्थापन करण्याचा निर्णय घेतला.

पण आता ही कंपनी काय,आणि त्यांनी ही कशी स्थापन केली असावी. कारण कुठली ही कंपनी उभी करायची म्हटलं तरी लोक हवेत .. पैसे हवा. मग त्याचे मार्गदर्शक दीपक जोशी यांच्या समाजवल्या नंतर, त्यांनी गावातील काही सुशिक्षित बेरोजगारांना सोबत घ्यायचे ठरवले.

खूप मेहनतीनं १० जणांना तयार करत बाभुळगावकर मित्र फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड, या नावानं शेतकरी उत्पादक कंपनीची ऑक्टोबर २०२१ मध्ये नोंदणी केली. आता या कंपनीचे सगळे सदस्य अल्पभूधारक म्हणजेच ५ एकरच्या आतील शेती असणारे आहेत.

त्यांनी प्रत्येकी १० हजार रुपये गोळा करून १ लाखांच्या भांडवलावर कंपनी सुरू केली. शेयर कॅपिटल म्हणून गोळा केलेले दहा-दहा हजार रुपये वापरून, सुरुवातीला त्यांनी मका खरेदी करायला चालू केली.

सदस्यांच्याच घरचा मका आधी खरेदी केला. त्यातून आणखी थोडं भांडवल उभं राहिलं. ते एक दीड महिन्यानंतर त्यांनी त्यांच्या सदस्यांना परत केलं. त्यातून मग बाकीच्या लोकांची मका खरेदी चालू केली.

गेल्या वर्षी या कंपनीकडे केवळ गावातलेच लोक माल विक्रीसाठी घेऊन आले. कारण, कंपनी नवीन असल्यामुळे पैसे देईल की नाही, अशी शंका लोकांच्या मनात होती. यंदा मात्र जवळपासच्या ४ खेड्यातील लोक त्यांच्याकडे मका आणि सोयाबीन विक्रीसाठी घेऊन आले आहेत.

ज्या दिवशी मका घेतला, त्याच्या दुसऱ्या दिवशी ते चेक द्वारे शेतकऱ्यांना पेमेंट करतात. बाकीच्या व्यापाऱ्यांपेक्षा क्विंटलमागे दहा-वीस रुपये वाढवून सुद्धा देतात. वर्षभरात त्यांनी जवळपास एक हजार टनापर्यंत माल खरेदी केला.

त्यात गहू, मका, सोयाबीन, तूर, हरभरा आहे. त्यांनी बँक स्टेटमेंट काढलं असून, जवळपास 1 कोटींच्या पुढे टर्नओव्हर गेलेला आहे,आता इथून पुढे कंपनीला जो नफा राहणार, त्यानुसार जे शेतकरी त्यांच्याकडे शेतमाल विकतील.

त्यांना दिवाळीला बोनस वाटप करण्याचा संतोष यांचा निर्धार आहे. हे सगळं करत असताना संतोष या शेतकऱ्याच्या आयुष्यातही मोठा बदल झालाय, त्यानी कुक्कुटपालन हा व्यवसाय सुरू केलाय, मळणीयंत्रही घेतलंय.

अल्पभूधारक शेतकऱ्यांना अनेक मर्यादा येतात. त्यामुळे शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शेतकरी व्यापारीही होऊ शकतो, हे संतोषनी करून दाखवलं. आधी व्यापाऱ्याकडे माल घेऊन गेल्यास तो माल ते हातात घ्यायचे.

व्यापारी चावून बघायचे आणि तेच त्यांचा मॉईश्चर असायचं. ते बघून भाव काही पण सांगायचे, तिथं मग शेतकऱ्यांची लूट व्हायची.त्यामूळे संतोष म्हणतो की शेतकऱ्यांनी स्वतः व्यापार करून शेतकऱ्यांना फायदा करून दिला पाहिजे.

आता संतोष जवळ असलेल्या पैश्यांनी व्यापार कसा वाढेल याकडे तो लक्ष देतोय….

]]>
https://www.batmi.net/santosh-agre-the-12th-failed-farmer-made-a-turnover-of-crores-in-a-year/feed/ 0 29118