ताज्या बातम्याट्रेंडिंग

बीअर बारचा व्यवसाय कसा सुरु करायचा? जाणून घ्या परवाना काढायला किती खर्च येतो…

आपल्या शहरात येता जाता आपल्याला बरेच बिअर बार्स दिसतात. तुम्ही कधी तिथे गेला असाल, किंवा गेला नसलात तरी बिअर बार बद्दल सर्वांनाच माहित असत. या व्यवसायात किती नफा आहे याची जाण देखील अनेकांना असते. (How to start a Beer Bar business? Find out how much it costs to get a license)

असे बोलले जाते की हा व्यवसाय सर्वात जास्त नफा मिळवून देणाऱ्या व्यवसायांपैकी एक आहे. सध्या नौकरीची कमतरता आणि नौकरीत सुरक्षा नसल्यामुळे लोक व्यवसायाकडे वळत आहेत. तर हा व्यवसाय एक उत्तम पर्याय असू शकतो. आता बिअर बार सारख्या व्यवसायात उतारण्याआधी त्याची माहिती असणे खूप गरजेचे आहे.

या व्यवसायामध्ये ५० टक्के नफा तर निश्चितच मिळतो. आपल्याला जर बियर बार व्यवसाय सुरु करायचाच असेल, तर यासाठी महत्त्वपूर्ण आणि आवश्यक कागदपत्रे काय आहेत? आणि बियर बार उघडण्यासाठी किमान किती खर्च येतो? अशीच या व्यवस्याबद्दलची महत्वाची माहिती जाणून घेऊयात.

आजच्या काळात बिअर बारचा ट्रेंड खूप वाढला आहे. कोणतिही पार्टी असो, किंवा कोणताही विशेष दिवस साजरा करायचा असो, बहुतेक लोकांना बिअर बार मध्ये जाणे खूप आवडतं. तुम्ही फक्त त्या राज्यांमध्येच हा व्यवसाय करू शकता, ज्या राज्यांमध्ये याला सरकारने मान्यता दिली आहे. कारण अनेक राज्यांमध्ये दारू विक्री आणि खरेदीवर आजही बंदी आहे.

अशा ठिकाणी वैध परवान्याशिवाय अल्कोहोलयुक्त पेय विकणे बेकायदेशीर मानले जाते आणि ते कायद्याने दंडनीय सुद्धा आहे. आता या व्यवसायात उतरायचं असल्यास सुरुवात कुठून करायची हे बघुयात. बिअर बारसाठी परवाना मिळवायचा असेल तर राज्य सरकारच्या एकसाईज डिपार्टमेंटकडे अर्ज करणे आवश्यक असते.

हेच डिपार्टमेंट अर्ज पडताळणी करून वाईन शॉपचे परवाने देत असते. सगळ्यात आधी १० रुपये किमतीचा कोर्टाचा स्टॅम्प घ्यावा लागतो. त्यांनतर तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी असेलेल्या राज्य सरकारच्या एकसाईज ऑफिसमध्ये जावे लागते. जर एकसाईज ऑफिस तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी नसणार तर तुम्ही कलेक्टर ऑफिसकडे चौकशी करून पर्यायी ऑफिस ची माहिती मिळवू शकता.

ऑफिसमध्ये परवान्यासाठी एक अप्लिकेशन फॉर्म घ्यायचा असतो. हा फॉर्म अगदी मोफत मिळतो. त्या फॉर्म मधील सर्व माहिती अचूक पद्धतीने भरावी लागते. फॉर्म मध्ये भरलेल्या माहिती नुसार निगडित कागद पत्रे जवळ असणे आवश्यक आहे. जसे की आधार कार्ड, ड्राइव्हिंग लायसन्स इत्यादी. आता खरेदी केलेल्या स्टॅम्प पेपर वर अप्लिकेशन फॉर्म चिकटवून.

अप्लिकेशन फॉर्म, फोटो आणि एड्रेस प्रूफ साठीच्या कागदपत्रांच्या झेरॉक्स ऑफीस मध्ये सबमिट कराव्या लागतात. अप्लिकेशन पडताळणी झाल्यांनतर परवाना तुमच्या हाती येतो. बिअर बार च्या व्यवसायाकरिता हि सगळी कागदपत्रे लागतात. या पद्धतीने तुम्ही तुमचा परवाना काढू शकता.

बिअर बार व्यवसायासाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टी देखील तुम्हाला माहित असायला हव्यात, यासाठी जागा, मशीन, गुंतवणूक, कामगार, जीएसटी क्रमांक आणि मार्केटिंग सारख्या गोष्टी लागतात. बिअर बार व्यवसायासाठी लागणारी जागा किमान ८०० ते १००० स्केवर फूट इतकी तर असावीच लागते.

कोणत्याही व्यवसायात तुम्हाला मशीनची गरज असते, पण या व्यवसायात तुम्हाला मशीनची गरज भासत नाही. कारण त्यात बिअर ठेवण्यासाठी फक्त फ्रीजची गरज असते. बिअर बार च्या व्यवसायासाठी जास्तीत जास्त १५ ते २० लाख रुपये इतकी तरी गुंतवणूक करणे गरजेचे आहे.

बिअर बार व्यवसायासाठी कर्मचाऱ्याची सुद्धा गरज असते. जसे की मॅनेजर, वेटर, डिश वॉशर, बार टेंडर, स्टोअर किपर इत्यादि. प्रत्येक कर्मचाऱ्यांचे वेतन, त्यांच्या अनुभवावरून आणि त्यांच्या कौशल्यावर अवलंबून कर्मचारी ठेवणं कधीही योग्य ठरते. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन, तुम्ही या व्यवसायात नक्कीच उतरू शकता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button