ताज्या बातम्याट्रेंडिंगमहाराष्ट्र

महाराष्ट्रातील ‘या’ गावात १८ वर्षांखालील मुलांच्या फोन वापरावर आहे पूर्णतः बंदी

यवतमाळ मधील बान्सी येथे पार पडलेल्या ग्रामसभेमध्ये किशोरवयीन मुलांना म्हणजे 18 वर्षांखालील मुलांना गावात मोबाईल वापरावर बंदी घालण्यात आली आहे. मोबाईल फोन हा जितका फायदेशीर आहे तितकाच धोकादायक सुद्धा आहे. (In ‘this’ village in Maharashtra, the use of mobile phones by children below 18 years is completely banned)

हे आपल्या प्रत्येकाला माहिती आहे. एकविसाव्या शतकात मोबाइल फोन हा प्रत्येकाकडे आढळतो. मोबाइल फोन म्हणजे प्रत्येकाची दैनंदिन गरज झालेली आहे. छोट्या मुलांना आता मोबाईल फोनच व्यसन लागलेले आहे.

पण महाराष्ट्रात असेही एक गाव आहे जिथे चक्क १८ वर्षाखालील मुलांना मोबाइल फोन वापरण्यास मनाईच आहे. पण ही बंदी नेमकी घालण्यात आली? यामागिलचाच उद्देश या
तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल फोन जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला असताना, अशा प्रकारच्या या निर्णयाची सध्या राज्यभर चर्चा आहे.

कोरोना संकटकाळामध्ये मोबाईल आणि इंटरनेट हेच अनेक विद्यार्थ्यांसाठी एकमात्र शिक्षणाचे माध्यम बनले होते. कोरोना संकटामुळे मुलांची ऑनलाईन शाळा सुरु होती. कोरोना काळात प्रत्येक शाळेने ऑनलाईन पद्धतीने स्वतःच्या शाळा सुरु ठेवल्या होत्या.

पण आता काळ सरला आहे. गावातील नागरिकांनी आपली तरुण पिढी आणि किशोरवयीन मुलं मोबाईलच्या आधीन जाऊन त्याचा दुष्परिणाम गावकर्यांनी अनुभवला आहे. सतत हातामध्ये असणारा मोबाईल किशोरवयीन मुलांसाठी व्यसन बनू नये म्हणून या गावाने चक्क मोबाईल बंदीचा निर्णय घेतला आहे.

यवतमाळ मधील पुसद तालुक्यातील बान्सी ग्रामपंचायतीकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. अशाप्रकारे ग्रामसभेत निर्णय घेऊन मोबाईल बंदी करणारं हे पहिलंच गाव आहे. ग्रामपंचायतिच्या या निर्णयामुळे तिथल्या पालकांकडून सुद्धा आनदं व्यक्त करण्यात आला.

11 नोव्हेंबर रोजी बान्सी मध्ये पार पडलेल्या ग्रामसभेमध्ये किशोरवयीन मुलांना गावात मोबाईल वापरावर बंदी घालण्यात आली आहे. किशोरावस्थेमध्ये हातात सतत मोबाईल असण्यामुळे मुलांमध्ये वाईट सवयी जडू शकतात. चूकीच्या प्रकारच्या वेबसाईट पाहण्याचं व्यसन, मोबाईल वर अति प्रमाणात खेळ खेळण्याचे व्यसन,

हे त्यांच्या आरोग्यावर चूकीचे परिणाम टाकू शकतात. अति मोबाईल फोन वापरल्यामुळे डोळ्यांवर आणि मेंदूवर त्याचा फार वाईट परिणाम होतो. हा धोका ओळखून त्यांनी मुलांच्या आरोग्याचा विचार करून किशोरवयीन मुलांना मोबाईल पासून लांब ठेवण्याकरिता हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

बान्सी मध्ये 18 वर्षांखालील मुलांना मोबाईल बंदी सोबतच 100 टक्के कर भरणाऱ्या नागरिकांसाठी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना सुद्धा लागू करण्यात आली आहे. सोबतच निराधार लोकांसाठी वृद्धाश्रम ही संकल्पना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मोबाईल फोन वर अनेक गेम्स ऑनलाईन खेळण्याच्या नादामध्ये अनेकांनी जीव गमावल्याचा घटना समोर आल्याचे पाहायला मिळते.

ऑनलाईन गेमिंग च्या आधीन कित्येक किशोरवयीन मुले गेले आहेत. त्यासाठी मोबाईल चा वापर न करु देत असल्यामुळे स्वतःच्याच आईवडिलांना जीवे मारण्याच्या घटना सुद्धा समोर आल्या आहेत. अश्या प्रकारच्या कित्येक घटना आपण रोज ऐकत असतो. त्या आधारावर इथल्या किशोरवयीन मुलांच्या पालकांना या निर्णयाला आपली पूर्ण सहमती दिली आहे.

अशावेळी या व्यसनापासून मुलांना लांब ठेवण्याच्या उद्देशाने घेण्यात आलेल्या बान्सी ग्रामपंचायतीचा हा निर्णय स्तुतीस पात्र ठरत आहे. अन्न, वस्त्र,निवारा नंतर आता मोबाईल ही प्रत्येकाची गरज बनत चालली आहे पण त्याचा अतिरेकही धोकादायक आहे हे ओळखणं गरजेचे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button