इतिहासताज्या बातम्या

औरंगाबादच्या ऐतिहासिक स्थळांबद्दल माहित आहे का?

औरंगाबाद की संभाजीनगर असा वाद खूप पूर्वी पासून चालत आला आहे. ज्या संभाजी महाराजांनी स्वराज्य रक्षण केले त्यांचे नाव ह्या शहराला द्यायचे सोडून त्यांना क्रूरपणे मारणाऱ्या औरंगजेबाचे नाव ह्या शहराला आहे.

ह्या शहराच्या नामांतराचा वाद तसा मोठा आहे. अर्थात तितकाच मोठा ह्या शहराचा इतिहास आहे. नेमका ह्या शहराचा इतिहास काय आहे? इथे कोणत्या ऐतिहासिक गोष्टी पाहण्यासारख्या आहे जाणून घेऊ आजच्या लेखात.

औरंगाबाद मधील ऐतिहासिक लेण्या :

औरंगाबाद पासून ३० किलोमीटरच्या अंतरावर असणाऱ्या वेरूळच्या लेण्या प्रसिद्ध आहेत. साधारण पाचव्या ते दहाव्या शतकामध्ये ह्या लेण्या कोरल्या गेल्या असाव्यात.
१७ हिंदू, १२ बौद्ध तथा ५ जैन लेण्या इथे आहेत. भारत सरकारने ह्या लेण्यांना राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले आहे. ह्यात एक महादेवाचे कैलास मंदिर आहे.

ह्या मंदिराचे वैशिष्ट्य असे की ह्याचे बांधकाम इतर मंदिरांप्रमाणे झालेले नाही. तर पायापासून पायथ्यापर्यंत कोरीवकाम करत हे मंदिर निर्माण करण्यात आलेले आहे.

तसेच बौद्ध लेण्यांमध्ये गौतम बुद्धांच्या बसलेल्या मुर्त्या कोरल्या आहेत. जैन लेण्यांमध्ये हत्ती, इंद्र तथा भरलेली सभा अशा गोष्टी कोरल्या आहेत.

औरंगाबादमध्ये वेरूळ प्रमाणेच अजिंठा लेणी देखील आहे. ह्यात बौद्ध धम्माच्या तत्वज्ञानाला धरून चित्र व कोरीव मुर्त्या बघायला मिळतात. इथले चित्रदालन पर्यटकांचे मन वेधून घेते. भगवान गौतम बुद्धांचे महापरिनिर्वाण झालेले शिल्प इथे आहे.

तसेच बुद्धांची आई त्यांच्या वडिलांना आपल्या स्वप्नाबद्दल सांगत असतानाचे चित्र देखील आहे. असे विभिन्न भाव, प्रसंग ह्या मुर्त्या व चित्रांमधून आपल्याला बघायला मिळतात.

औरंगाबाद मधील किल्ले :

औरंगाबाद मध्ये सर्वात प्रसिद्ध असणारा आणि पर्यटकांची सर्वाधिक गर्दी होत असलेला एकमेव किल्ला म्हणजे दौलताबादचा किल्ला.
अगदी वेरूळ च्या लेण्यांपुढे हा किल्ला आहे. ज्या डोंगरांच्या गिरीशिखरांवर देवाने तप केले तो देवगिरी किल्ला नंतर मुसलमानी राजवटीत दौलताबाद झाला.

हा किल्ला खूप बघण्यासारखा आहे. जैन, हिंदू, बुद्ध, इस्लाम सर्व धर्मीयांची प्रार्थना स्थळे व संस्कृती ह्या किल्ल्यात दिसते.

पण औरंगाबाद मध्ये केवळ दौलताबादच एकमेव किल्ला नसून इतरही किल्ले आहेत. कन्नड भागात अंतुर नावाचा एक किल्ला आहे.

हा किल्ला मराठ्यांनी बांधला होता नंतर तो निझामाकडे गेला. तसाच अजिंठा रांगेत सर्वात उंच ठिकाणी असणारा बैतलवाडी किल्ला देखील अपरिचित आहे.

अत्यंत खडतर रस्ता असल्यामुळे पर्यटक इथे जात नाही. औरंगाबाद मध्ये तसे अनेक किल्ले आहे त्यातलेच लहुगड नांद्रा, तालतम किल्ला, भांगसीमाता किल्ला प्रसिद्ध किल्ले आहेत.

औरंगाबाद मधील मंदिरांचा इतिहास :

औरंगाबाद मधील मंदिरे अत्यंत सुंदर आहेत. प्रामुख्याने ज्या मंदिरांची नावे घेतली जातात त्यातले एक वेरूळ लेण्यांमधील कैलास मंदिर आहे व तसेच घृष्णेश्वराचे मंदिर देखील आहे.
हे मंदिर देखील वेरूळ लेण्यांजवळ आहे. ह्याचे बांधकाम अहिल्यादेवी होळकरांनी करवून घेतले होते. असे म्हणतात की हे मंदिर एकाच पाषाणातून बनले आहे.

ह्याच प्रमाणे एक खंडोबा मंदिर देखील अहिल्याबाईंनी बांधल्याचे कळते. खंडोबा मंदिराचे स्थापत्त्य देखील मनमोहक आहे. भालगाव मध्ये रामाचे मंदिर आहे.

हे समर्थ रामदासांनी बांधले आहे. मोठा वाडा वाटावा असे हे मंदिर आहे. औरंगाबाद मध्ये भद्रा मारुतीचे देखील मंदिर प्रसिद्ध आहे.

औरंगाबाद मधील वाडे आणि महाल :

औरंगाबाद मध्ये बीबी का मकबरा हा प्रसिद्ध महाल आहे. शहाजहान ने मुमताज साठी ताजमहाल बांधला तसाच औरंगजेबाने त्याच्या बेगम साठी बांधलेला हा बीबीका मकबरा औरंगाबाद मधील खुलताबाद मध्ये आहे. औरंगाबाद मध्ये ह्याच प्रमाणे भोसल्यांचा वाडा देखील आहे.

शहाजी महाराजांच्या वडिलांनी अर्थात मालोजी राजांनी बांधेलला हा वेरूळचा वाडा बघण्यासारखा आहे. भोसले पूर्वी वेरुळचेच होते त्यामुळे तसे वाडे आणि महाल इथे बघायला मिळतातच. देवगिरी किल्ल्यावर देखील रंग महाल, शिशमहाल इत्यादी महाल आहेत.

असा हा औरंगाबादचा इतिहास सर्व गोष्टींमध्ये परिपूर्ण ठरतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button