इतिहासताज्या बातम्या

असे लढले राजस्थानी वीर मुघल आणि व इंग्रजांविरुद्ध!

भारत देशात राजस्थानला राज्य असूनही देशाचीच उपमा मिळते. जय राजस्थान म्हणत इथले लोक आपली संस्कृती व विचारधारा घेऊन जगतात. इथले भव्य किल्ले त्यांच्या दिव्य इतिहासाची साक्ष देत असतात. राजस्थानच्या वाळवंटामुळेच इथल्या लोकांचेही चिकाटी आली असावी जणू.

इथल्या मारवाड, मेवाड ह्या भागात ह्याच चिकाटी, शौर्य आणि औदार्य अंगी असलेल्या वीरांचा इतिहास घडला. आजच्या लेखामध्ये आपण राजस्थान व मुघल, राजस्थान व इंग्रज आणि राजस्थानची संस्कृती अशा राजस्थानच्या इतिहासातील तीन टप्प्यांबद्दल जाणून घेणार आहोत.

१) राजस्थान व मुघल :

राजस्थान ही लढाऊ लोकांची भूमी आहे. इथे अनेक राजपूत राजांनी राज्य केले. ‘प्राण जाए पर वचन न जाए’ हे त्यांच्या आयुष्याचे ब्रीद होते. त्याला अनुसरूनच इथल्या राजांनी सद्धर्माने राज्य केले. मुघल भारतात आल्यानंतर काही राजपुतांनी त्यांना कडवा प्रतिसाद दिला.

बाबरला राणा संगा नावाच्या राजाने विरोध केला खरा, पण पुढे बाबरने भारतात राज्य निर्माण केलेच. ही दुष्मनी अकबराच्या काळापर्यंत राहिली. अकबराला राणा उदय सिंग आणि नंतर महाराणा प्रताप ह्यांनी विरोध केला. ह्यांच्यात अनेक लढाया झाल्या.

महाराणा प्रताप व अकबराची हळदी घाटातली लढाई अत्यंत प्रसिद्ध आहे. काही मानी व इमानदार राजपुतांनी प्राण सोडले पण आपल्या राज्यातील नखभर जमीन देखील मुघलांना मिळू दिली नाही. अकबराने जोधा सोबत विवाह केल्यानंतर अनेक राजपूत मुलींचा मुघलांसोबत विवाह करण्यात आला.

ही रोटी बेटी रोटी व्यवहाराची परंपरा जरी चालू असली तरी काही देशभक्त राजपुतांनी मुघलांना कायम विरोध केला. जहांगीरच्या काळात राणा अमर सिंग ह्यांनी तर औरंगजेबाच्या काळात राणा राज सिंग ह्यांनी विरोध केल्याचे दिसून येते. असा हा राजपुतांचा मुघलांसोबत लढाईचा काळ होता.

२) राजस्थान व इंग्रज :

राजस्थानच्या भूमीतच पराक्रम मुरलेला असल्यामुळे राजपूत लोकांना इंग्रजांची नोकरी करणे मान्य नव्हते. संपुर्ण भारतात स्वातंत्र्याची चळवळ चालू असताना राजस्थान मधून अनेक लोक ह्या चळवळींमध्ये भाग घेत होते.

ह्या भूमीत अनेक क्रांतिकारक झाले. ज्यांच्यामुळे देशाला खूप प्रमाणात फायदा झाला. राव गोपाल सिंग खरवा हे एक लोकप्रिय क्रांतिकारक होते. इंग्रजांना विरोध केल्यामुळे ह्यांना चार वर्षासाठी तुरुंगात टाकण्यात आले होते. लाठू निथरवाल हे देखील जाट समुदायात जन्मलेले राजस्थानी क्रांतिकारक होते.

त्यांना ईस्ट इंडिया कंपनी बंद करून भारतात लोकतंत्र आणायचे होते. सगरमल गोपा हे देखील एक क्रांतिकारक होते. इंग्रजांना साहाय्य करू नये अशा विचारांनी त्यांनी लढा उभा केला होता.

पुढे त्यांना अटक झाली व जेलमध्येच त्यांना जिवंत जाळण्यात आले. असे व ह्याच प्रमाणे अनेक क्रांतिकारक राजस्थानमध्ये होऊन गेले.

३) राजस्थानची संस्कृती :

संस्कृती हा इतिहासाचाच भाग आहे. कारण परकीय आक्रमणे झाली तेव्हा राजस्थानच्या संस्कृतीवर देखील आघात झाले. पण इथल्या राजपुतांनी आपली संस्कृती नष्ट होऊ दिली नाही. इथले किल्ले, इथले सणवार, इथले गीत, नृत्य प्रकार सारे काही ह्या लोकांनी जतन केले. मुघलांपासून इंग्रजांपर्यंत अनेकांना तोंड देत असतांना राजस्थान मधील लोकांनी आपली संस्कृती जपली.

इथे उंच उंच किल्ले तसेच सुंदर बाग व महाल आहेत. वस्त्रांपासून नृत्याच्या व गायनाच्या प्रकारात राजस्थानने प्रगती केली आहे. मुघलांना व इंग्रजांना तोंड देत राजस्थानने आपले राज यांनी संस्कृती कशी जपली आहे याचे दाखले जागोजागी मिळतात.

राजस्थान म्हणताच पुढे दिसतात वाळवंटातील डोंगर, उंट, धोतर आणि रंगीत पगडी घातलेली माणसे, चनिया चोली, मोठ्या घेराचा आणि पायघोळ घागरा नेसलेल्या बायका. इथे आजही मोठमोठे कार्यक्रम होतात.

इथे पर्यटक वर्षाचे बारा महिने येत असतात. त्यामुळे इथल्या अनेक किल्ले आणि महालांनाच हॉटेल मध्ये रुपांतरीत केलं आहे. यामुळे इथली संस्कृती पर्यटकांना जगता येते आणि त्याची ख्याती देशविदेशात पोहोचते.

राजस्थानचा हा इतिहास अत्यंत महत्वाचा आहे. भारतातील प्रत्येक प्रांताने मुघलांना, इंग्रजांना व अन्य राजवटींना तोंड दिलेले आहे. तसेच आपल्या संस्कृतीला वाचवले देखील आहे. तुम्हाला ह्या स्वरूपात कोणत्या राज्याचा इतिहास वाचायला आवडेल आम्हाला कंमेंट करून नक्की सांगा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button