ताज्या बातम्याट्रेंडिंग

चीनमध्ये कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ, आता भारताचे काय होणार? जाणून घ्या…

झीरो कोविड पॉलिसीचे पालन करून सुद्धा शेवटी पुन्हा एकदा चीनला कोरोनाने गाठलेल दिसून येत आहे. चीनमध्ये कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. चीन येथील राष्ट्रीय आरोग्य योजनेंने जाहीर केलेल्या माहिती नुसार चीन मध्ये आज ३२ हजार ९४३ आणि २४ नोव्हेंबर ला ३१ हजार ६५६ नव्या रुग्णांची भर पडली आहे. (Rapid increase in corona patients in China, what will happen to India now?)

तुम्हाला हा आकडा जरी ३० आणि ३२ हजारांचा वाटत असला तरी चीन च्या १४० कोटी लोकसंखेच्या तुलनेमध्ये कमीच आहे असं एका गटाला वाटत. दुसरी कडे कडक लॉकडाऊन, प्रवासावर निर्बंध लावत झिरो कोविड पॉलिसी राबवून सुद्धा चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक का हातोय ? आणि याचा भारत देशाला धोका आहे का? आणि आहेच तर तो किती? हेच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.

नॅशनल हेल्थ कमिशनच्या माहिती नुसार या नवीन कोविडच्या लाटेत चीनमध्ये आतापर्यंन्त कोविड रुग्ण २ लाख ९७ हजारांवर पोहोचले असून, ५ हजार २३२ जणांचा कोरोना मुळे मृत्यू झालाय. तर चीनमध्ये जागतीक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार आतापर्यंत ९५ लाख २३ हजार १४ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे.

२९ हजार ८८९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोविड रुग्णांची संख्या कमी जरी वाटली तरी चीन मध्ये झिरो कोविड पॉलिसी राबविण्यात येत आहे. तरी सुद्धा कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ का होत आहे? झिरो पॉलिसी म्हणजे ज्या परिसरा मध्ये बोटांवरती मोजण्या इतके कोविड रुग्ण आढळले, तरी देखील लॉकडाउन लावण्यात येत आहे.

याचाच परिणाम शांघाय मध्ये आपल्याला बघायला मिळाला. ज्या मध्ये २५ लाख लोकांना डाम्बवून ठेवले होते. आता सुद्धा चीन मध्ये काही भागांमध्ये प्रत्येक घरातील एकाच व्यक्तीला ठराविक वेळेमध्ये घराच्या बाहेर फक्त अत्याव्यश्यक वस्तूंच्या खरेदी करीता पडण्याची परवानगी मिळाली आहे.

तर बीजिंग मध्ये काही परिसरामध्ये दर आठवड्यामधून एकदा कोविड चाचणी करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहे. या झिरो कोविड पॉलिसीमूळे चीन मध्ये कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात आली असली तरी, याचा थेट परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि सर्व सामान्यांच्या जीवनावर झालेला दिसून येतआहे.

दुसरीकडे तत्ज्ञांनी मात्र झिरो कोविड पॉलिसी मुळे चीन सरकारला धारेवरती धरलं आहे. त्यांच्यानुसार झिरो पॉलिसी लावून सुद्धा कोविड रुग्ण संख्या आटोक्यात आलेली नाही. कारण चीन ने कोविड प्रति आपला अप्रोच बदललेला नाही. इतर देश लसीकरणानं कोविडशी सामना करत असताना, मात्र चीन ने झिरो कोविड पॉलिसी कठोर रित्या राबवून तिथल्या नागरिकांवरती बंधन लाधले आहे. ज्यामधून मानव अधिकारच उल्लंघन होत असल्याची टीका होत आहे.

विज्ञानानुसार कोविड १९ मधून बरे झालेल्या रुग्णांमध्ये या विषाणू विरोधात नैसर्गिक रोगप्रतिकार शक्ती विकसित होते असे बऱ्याच जर्नल्स आणि अभ्यासातून समोर आले आहे. २०२१ मधून एका अवाहलानुसार एस ए आर एस को संसर्गामुळे निर्माण झालेली रोग प्रतिकार शक्ती टिकणार याचा पुरावा देत आहे.

डब्ल्यू एच ओ नुसार चीन मधील झिरो कोविड पॉलिसी मुळे रुग्ण संख्या आटोक्यात येत असली तरी डब्ल्यू एच ओ च्या म्हणण्यानुसार हि योजना दीर्घकालीन टिकणारी नाही. त्यामुळे चीनने वेळेतच गरज ओळखून परिवर्तन करायला हवे असा सल्ला डब्ल्यू एच ओ कडून दर्शविण्यात आला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार ४ नोव्हेंबर पर्यंत चीन मध्ये ३०० कोटींची डोस ची निर्मिती केली यातून १२० कोटी नागरिकांचं लसीकरण पूर्ण करण्यात आलं आहे. तर ८० कोटींहुन अधिक नागरिकांना बुस्टर डोस देण्यात आलं आहे. लसीकरणाने विषाणू विकार थांबण्याची शक्यता कमी आहे.

पण यामुळे एखादी व्यक्तीला विषाणूशी प्रतिकार करण्याची शक्ती वाढते. तरी चीनच्या झिरो पॉलिसी प्रोग्रॅमच्या अयशस्वी होण्यामागे दोन कारणे आहेत. एक म्हणजे कमी प्रभावी लस आणि दुसरी म्हणजे लसीच्या दोन डोसमधील अंतर, असं एका भारतीय वैद्यकीय तत्ज्ञांचं मत आहे. चीन परदेशी लसींना मान्यता देण्यात टाळाटाळ करत असताना दिसून येत आहे.

कारण चीन मध्ये जुन्या तंत्रज्ञाचा वापर करून बनवलेल्या स्थानिक लसींनाच मान्यता देण्यात आली आहे. आता पर्यंन्तच्या अभ्यासानुसार कोरोना वॅक आणि सिनोफॉर्म लसीपासुन रोग प्रतिकार शक्ती वेगाने कमी होते आणि वृद्धांनाही हवे तितके सौरक्षण मिळत नाही. काही तत्ज्ञांनी तर चीन च्या लसीकरणावरती प्रश्न उपस्थित केला आहे. चीनच्या स्थानिक आरोग्य समितीच्या माहितीनुसार ९० टक्के नागरिकांचं लसीकरण झालय.

चीनने परदेशी लसींना परवानगी द्यायला हवी. आणि आरोग्य सुविधांसाठी चा निधी वाढवायला हवा. जो इतर देशांच्या तुलनेमध्ये खूपच कमी आहे. मागील कोविड च्या दोन लाटांच्या अनुभवावरून भारताला कोरोनाचा धोका किती हे तर आपल्याला लक्षात आलंच आहे. प्रत्येकाने कोविड संदर्भातील खबरदारी घ्यायला हवी.

चीनच्या वाढत्या कोरोनाच्या भारतातील उत्पादनाच्या आयात नियात वर सुद्धा परिणाम होऊ शकतो. भारताच्या चिनी उत्पादनाची विक्री बघता वाढत्या कोरोनामुळे दोन्ही देशाच्या अर्थव्यवस्थेवर देखील परिणाम होण्याची शक्यता जास्त प्रमाणात आढळून येऊ शकते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button