accident news – Batmi https://www.batmi.net Get marathi latest news Fri, 06 Jan 2023 05:26:59 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.2 https://www.batmi.net/wp-content/uploads/2022/09/cropped-Picsart_22-08-31_02-05-02-169-96x96.jpg accident news – Batmi https://www.batmi.net 32 32 201029915 तेव्हा मांढरदेवीच्या यात्रेत गेला होता अनेकांचा बळी, ही दुर्घटना नेमकी काय होती? https://www.batmi.net/many-victims-had-gone-on-the-pilgrimage-to-mandhardevi-what-exactly-was-this-accident/ https://www.batmi.net/many-victims-had-gone-on-the-pilgrimage-to-mandhardevi-what-exactly-was-this-accident/#respond Fri, 06 Jan 2023 05:26:59 +0000 https://www.batmi.net/?p=29152 आपण अनेक यात्रेत जातो, कुणी देव दर्शनासाठी जातात,तर कुणी मज्जा करायसाठी,आता यात्रा म्हटली की भली मोठी गर्दी आलीच, पण कधी-कधी हीच गर्दी मोठ्या दुर्घटनेच कारण ठरू शकते. (Many victims had gone on the pilgrimage to Mandhardevi, what exactly was this accident?)

आता मी का असं बोलतोय,तर जास्त विचार करू नका कार, आम्ही आज तुम्हाला अशा एका घटनेबद्दल सांगणार आहोत, जे ऐकून तुम्हीही थक्क व्हाल आणि सतर्क सुद्धा .तर महाराष्ट्रात मांढरदेवीच्या उत्सवादरम्यान एक मोठी दुर्घटना घडली होती.

ज्यात जवळपास ३०० लोकांचा मृत्यू झाला होतो.आता ही दुर्घटना नेमकी काय होती? हेच यामध्ये आपण जाणून घेऊयात. तर घटना आहे २५ जानेवारी २००५ ची, मांढरदेवीला काळूबाईच्या नावानेही ओळखलं जात.

देवीचं मंदिर सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्याजवळ एका डोंगरावर वसलेलं आहे. या मंदिरात दरवर्षी १५ दिवसांचा देवीचा उत्सव साजरा केला जातो. जानेवारी महिन्यात हा उत्सव असतो म्हणून दूर-दुरून लाखो भाविक या उत्सवात सामील होण्यासाठी येतात.

त्याही दिवशी म्हणजेच २५ जानेवारी २००५ ला जवळपास ३ लाख भाविक देवीच्या दर्शनासाठी आले होते. आता देवीच दर्शन घ्यायचं आहे, तर डोंगर चढावाच लागेल कारण मांढरदेवीच्या मंदिरात जाण्यासाठी लहान डोंगर चढावा लागतो.

त्यासाठी पायऱ्या आहेत. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूनी पूजेच्या साहित्याची दुकानं आहेत. अनेक प्रथांमधून एक म्हणजे बोकड कापण्याची प्रथा सुद्धा त्यावेळी होती, त्यामळे डोंगराच्या एकाबाजूला बोकड कापले जात होते.

इतक्या लाखोंच्या गर्दीतून लोकं मिळेल तस देवीचं दर्शन घेत होते. दुपारची वेळ होती सगळं व्यवस्थित सुरळीत सुरु होत. पण अचानक, त्या लोकांच्या गर्दीमधून गोंधळ व्हायला लागला.

गर्दी असल्यामुळे तिथे चेंगराचेंगरी झाली. तिथून निघण्याचा प्रयत्न करत त्या गोंधळात धक्का बुक्की मुळे काही लोक डोंगरावरून घसरून खाली पडले.यावेळी डोंगरावर काही तंबू लावले होते. या तंबूंनाही आग लागली.

सिलेंडरचा स्फोट झाला ते चित्र इतकं भयावह होत की एका मागून एकाचे असे तिथे शेकडो जीव गेले, लहान मुलं गुदमरून गेली. पाहता पाहता मृतांचा आकडा शंभरी पार गेला आणि दिवसाअखेर जवळपास ३०० जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं.

आता गर्दीत गोंधळ का उडाला तर, काही स्थानिकांच्या आणि पत्रकारांच्या म्हणण्यानुसार, मंदिराच्या मार्गाने असणाऱ्या दुकानांना आग लागली धुराचे लोट दिसू लागले. काही दुकानांमध्ये ठेवलेल्या गॅस सिलेंडरचाही स्फोट झाला.

स्फोटाचा आवाज आल्याने आणि आग लागल्याने लोकांमध्ये खळबळ उडाली. लोक तिथं असणाऱ्या दुकानांमध्ये शिरत होती. गर्दी दुकानांमध्ये घुसल्याने पत्र्याची दुकानं कोलमडून पडली. शॉक बसल्याने अनेकांचा जीव तिथेच गेला.

दुकानांना आग लागली. लूटमार सुरू झाली.’चेंगराचेंगरी झाली आणि अनेकांचे मृत्यू झाले तर अनेक त्यात जखमी सुद्धा झाले. दुर्घटना डोंगरावर झाल्याने आणि लाखोंची गर्दी असल्याने अग्निशमन दलाची मदत पोहचण्यासाठी तिथे वेळ झाला.

तिथे मृतदेहांचे ढीग पडले होते. मृतांमध्ये सगळ्यात जास्त संख्या महिला आणि लहान मुलांची होती. कुणी आपली आई गमावली, कुणी वडील, तर कुणी अख्य कुटुंब. आजही हा प्रसंग आठवला की अनेकांच्या अंगावर शहारे येतात.

पण या दुर्घघटने नंतर प्रशासनाने या यात्रेचा ताबा घेतला असून. आता सुरक्षा यंत्रणाही वाढवण्यात आली आहे, अनेक सोय-सुविधा सुरु केल्या गेल्या आहेत. आणि अनेक कडक पाऊले सुद्धा प्रशासना कडून उचलली गेली आहेत.

]]>
https://www.batmi.net/many-victims-had-gone-on-the-pilgrimage-to-mandhardevi-what-exactly-was-this-accident/feed/ 0 29152
भव्य- दिव्य समृद्धी महामार्गावर अपघात का होत आहे? याला जबाबदार कोण? https://www.batmi.net/why-accidents-on-samruddhi-highway-who-is-responsible-for-this/ https://www.batmi.net/why-accidents-on-samruddhi-highway-who-is-responsible-for-this/#respond Sat, 17 Dec 2022 10:12:05 +0000 https://www.batmi.net/?p=28954 नुकतच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण पार पडले. हा महामार्ग बनविण्याच्या उद्देशानुसार या महामार्गामुळे लोकांचा वेळ तर वाचणारच. (Why are accidents happening on Samruddhi Highway? Who is responsible for this?)

म्हणजे कमी वेळा मध्ये नागरिक या महामार्गामुळे आपल्या प्रवासाचे अंतर लवकरात लवकर गाठणार. पण या महामार्गामुळे कदाचित लोकांचे जीव धोक्यात असल्याचे दिसून येत आहे. आणि या समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. इतक्या वर्षांपासून या महामार्गाचे काम सुरू होते.

खरं तर हा महामार्ग नागरिकांच्या सोयीसाठी बनविण्यात आला आहे. पण या महामार्गावर सुद्धा अपघाताची सुरवात झाली आहे. आता इतक्या भव्य दिव्य अश्या समृद्धी महामार्गावर अपघात का होत आहे? आणि या अपघातांमागचे नेमके कारण काय? याला जबाबदार कोण? अगदी याच प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न या मध्ये आज आपण करणार आहोत.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी ११ डिसेंबर रोजी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे लोकार्पण करण्यात आले होते. कुठल्याही भागाचा विकास हा स्थानिक ठिकाणी दळण वळणाची साधने किती चांगल्या दर्जाची आहेत, यावर ठरतो. त्यामुळे राज्याच्या विकासाकरिता रस्ते विकासाला अनन्यसाधारण महत्व आहे.

समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्यामधे नागपूर ते शिर्डी या ५२० किलोमीटर रस्त्याचे काम पूर्ण होऊन तो नागरिकांसाठी सुरू करण्यात आला आहे. या माहामार्गामुळे नागपूर ते शिर्डी हे अंतर पार करण्यासाठी पूर्वी १३ तास लागायचे. पण आता हे अंतर फक्त पाच तासांमध्ये पार करणे शक्य झालेल आहे.

या एक्स्प्रेस वेवर वाहन चालकांसाठी प्रतितास १२० किमी इतक्या वेगाची परवानगी देण्यात आलेली आहे. समृद्धी महामार्गामुळे जरी अंतर कमी झाल असेल व वेळ कमी लागत असला पण या महार्गावर अपघात देखील होत आहे. नुकतच समृद्धी महामार्गावर अपघाताच्या घटना ऐकायला आल्या आहेत.

उद्घाटनानंतर थोड्याच वेळात, ‘टाइम्स ऑफ इंडियामध्ये पुलगाव जवळील मार्गावर एका माकडाचा मृत्यू झाल्याचा फोटो प्राप्त झाला होता. वेगवान वाहनाने माकडाला धडक दिल्याने त्यात तो ठार झाला असावा.. असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.
समृद्धी महामार्गावर पहिल्या अपघाताची घटना हि दोन कारची आपसात धडक झाल्याची घडली आहे.

नागपूरमध्ये वायफळ टोल नाक्यावर एका स्विफ्ट कारला भरधाव मर्सिडीज बेंझ कारने मागून जोरदार धडक दिली होती. या अपघातात स्विफ्ट कारचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या अपघातामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही. याच बातमी ला २४ तास सुद्धा नव्हते झाले कि समृद्धी महामार्गावर आणखी एक अपघाताची बातमी समोर आली. ज्यामध्ये एक गॅस सिलेंडर भरून असलेला ट्रक पलटी झाला.

ट्रकचा तोल गेल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना बुलढाण्यातील मेहकर बेळगाव येथील डोणगाव पोलीस ठाण्याजवळ घडली. सिलेंडरने भरलेला ट्रक नागपूरहून शिर्डीला जाणार होता. आता या अपघाताच्या मागच नेमकं कारण म्हणजे मोठ मोठे रस्ते बघून चालकाचे लक्ष गाडीवरून हटले व हा अपघात झाला असे वर्तविण्यात येत आहे .

आता या अपघातामागे नेमकी चुकी कुणाची आहे. समृद्धी महामार्गाचे उद्घाटन झाल्यापासून सलग दोन ते तीन अपघात झाले आहेत. रस्ता पाहून लोक भरधाव वेगात गाडी चालवत आहेत. ज्यामध्ये संतुलन गमावणे सामान्यच आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये अपघाताची शक्यता ही वाढते.

त्यामुळेच लोकांना समृद्धी महामार्ग किंवा इतर कोणत्याही रस्त्यावर वाहन चालवत असतांना त्यांच्या वाहनाचा वेग गरजेनुसार ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. याच्या मदतीने तुम्ही स्वतःला आणि तुमच्या कुटुंबाला कोणत्याही अनुचित घटनेला बळी पडण्यापासून वाचवू शकता.

]]>
https://www.batmi.net/why-accidents-on-samruddhi-highway-who-is-responsible-for-this/feed/ 0 28954
हवेत उडणार विमान अचानक तारांमध्ये जाऊन अडकलं अन् ९०,००० घरात… https://www.batmi.net/a-plane-flying-in-the-air-suddenly-crashed-into-power-lines-and-90000-homes/ https://www.batmi.net/a-plane-flying-in-the-air-suddenly-crashed-into-power-lines-and-90000-homes/#respond Thu, 01 Dec 2022 05:45:22 +0000 https://www.batmi.net/?p=28677 विमान कोसळण्याचे आणि विमानाच्या आत घडणारे अनेक व्हिडीओ आपण बघितले असणार. पण या व्हिडीओमध्ये चक्क विमान विजेच्या तारामध्ये जाऊन अडकल्याचे दिसेल. (A plane flying in the air suddenly crashed into power lines and 90,000 homes…)

होय, वॉशिंग्टन पोस्टच्या एका अधिकाऱ्यांने दिलेल्या माहिती नुसार अमेरिके मधील मेरीलँड राज्यातील मॉन्टगोमेरी येथे एका विमान अपघाताची घटना घडली आहे.

हवेतून उडणारे एक विमान थेट विजेच्या तारांमध्ये अडकल्यामुळे जवळपास ९० हजारांहून अधिक लोकांच्या घरातील वीज गेल्याचे कळलं आहे. विमान अपघातीची ही घटना रविवारी सायंकाळी मॉन्टगोमेरी येथील काउंटी पॉवर लाईन्समध्ये घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, मॉन्टगोमेरी येथे एक छोटे विमान हवेतून जात असताना अचानक ते वीजेचा तारांमध्ये घुसल्यामुळे हा अपघात झाला. या अपघातामध्ये सुदैवाने कोणीही जखमी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.

फेडरल एविएशन एडमिनिस्ट्रेशनच्या सांगण्यानुसार, रविवारी सायंकाळी ५ वाजून ४० मिनिटाच्या सुमारास एनवाई येथून उड्डाण घेतलेले एक सिंगल-इंजिन विमान गैथर्सबर्गमधील मॉन्टगोमेरी काउंटी एअरपार्कच्या जवळ असणाऱ्या वीजेच्या तारांमध्ये जाऊन अडकले.

तर त्या विमानाची ओळख देखील फेडरल एविएशन एडमिनिस्ट्रेशन कडून करण्यात आली असून, ते विमान मूनी एम२० जे असल्याचं सांगितलं जातं आहे.

या घटनेबाबत मॉन्टगोमेरी काउंटी पोलिसांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे “रॉथबरी डॉ अँड गोशेन आरडी परिसरात एक लहान विमान वीजेच्या तारांमध्ये घुसल्याने त्या भागातील वीज पुरवठा खंडीत झाला आहे.

अग्निशामक दलासह बचाव पथकं घटनास्थळी दाखल झाली आहेत. तर नागरिकांनी या भागात जाणं टाळावं” असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

]]>
https://www.batmi.net/a-plane-flying-in-the-air-suddenly-crashed-into-power-lines-and-90000-homes/feed/ 0 28677