ताज्या बातम्याट्रेंडिंग

चिमुकलीनं गायलं सुंदर गाणं, या निरागस भक्तीनं सर्वांनाच केलय वेडं…

लहान मुले देवाघरची फुले असतात. लहान मुलं कधी कधी त्यांच्या वागण्याबोलण्यानं अनेकांना मंत्रमुग्ध करतात. लहान मुले नेहमी अबोध असतात. त्यांच्या मनात कुठलाही आणि कुणाबद्दलही द्वेष, मत्स नसतोच. सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगी चक्क भजन गातांना दिसती आहे. (The beautiful song sung by the little girl, this innocent devotion made everyone crazy)

हा व्हिडिओ सध्या बराच चर्चेत मध्ये आहे. शाळेचा गणवेश घातलेली एक छोटीशी मुलगी इतर अनेक महिलांसोबत भजन गातांना तुम्ही बघू शकता.

इतक्या लहान वयातही ती गाणं गात होती, आणि बाकीची मंडळी तिच्या मागे मागे गात होती. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांचा दिवस आनंदात जात आहे. या व्हिडिओमध्ये चिमुकली भजन म्हणत असताना तिचा आवाज लोकांना खूप आवडतो.

इतर महिलाही यात सहभाग घेतात. इतक्या लहान वयात चिमुकली गाणं गातेय हे पाहून नेटकरी अगदी चकीत होतात.
व्हिडिओच्या कमेंट्स मध्ये तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

या व्हायरल व्हिडीओने नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे. आतापर्यंत २४ हजारांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून १ हजाराहून अधिक लाईक्स याव्हिडिओला मिळाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button