ताज्या बातम्याट्रेंडिंग

अरुणाचलच्या दूधसागर धबधब्याचे सौंदर्य तुम्हालाही मोहवेल, ‘हा’ व्हिडीओ एकदा नक्की पहा…

धबधबा हा कुणाला आवडणार नाही. निसर्गरम्य सौंदर्याच्या कुषीत दडलेल्या नयनरम्य धबधब्यांवर मनमुराद आनंद लुटण्यासाठी हजारोंच्या संख्येत पर्यटक भेट देत असतात. (The beauty of Arunachal’s Dudhsagar Falls will also enchant you, Watch this video once…)

भारतामध्ये रानावनात, डोंगर कपाडीत, झाडा-झुडपांत लपलेल्या धबधब्यांमुळं निसर्ग सौंदर्य आणखी जास्त सुंदर दिसत.
पांढऱ्या शुभ्र दुधाप्रमाणे वाहणाऱ्या या धबधब्यांवर जाऊन आंघोळ करायला प्रत्येकाला आवडत असते.

अरुणाचल प्रदेशच्या दिबांग घाटात असलेल्या अशाच एका सुंदर धबधब्याचा व्हिडीओ मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.

अरुणाचल प्रदेशचे सीएम पेमा खांडू यांनी अभियानाच्या अंतर्गत हा व्हिडीओ शेअर केला आहे. अरुणाचल प्रदेशच्या पर्यटन अर्थव्यवस्थेला अधिक बळकटी मिळण्यासाठी गतवर्षी हे अभियान सुरु केलं होतं.

या धबधब्याचं मनाला मोहक करणार सौंदर्य तुम्ही या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पाहू शकता. हा व्हिडीओ इतका सुदंर आहे की तुम्ही पाहातच राहाल.

सीएम पेमा खांडू यांनी व्हिडीओ शेअर करत म्हटलं, जर तुम्ही अनिनीला गेला नसाल, तर दिबांग घाटात निसर्गाच्या सौंदर्यात राहून नव्या वर्षाचं स्वागत करा.

जावरू घाटातील निसर्ग सौंदर्य आणि इथली सुंदरता पाहून तुम्हाला विलक्षण आनंद होईल. यावर अनेक नेटकऱ्यांनी खूप छान प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button