ताज्या बातम्याट्रेंडिंग

पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात अडकला साखळीचोर, घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद…

हा व्हिडीओ बघून दिल्ली पोलिसांच्या या कामगिरीवर सॅल्यूट ठोकण्याची इच्छा प्रत्येकाला होणार. कायदा आणि सुव्यवस्थेचे काटेकोर पणे प्रत्येकाने पालन केले जावे, याची नेहमी जबाबदारी पोलिसांवर असते. त्यासाठी त्यांना नेहमी जागृक राहावे लागते, नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी नेहमीच त्यांच्यावर असते. (The chain thief was caught in the trap set by the police, the thrill of the incident was captured on camera)

जीवाची परवा न करता कर्तव्य बजावणाऱ्या अनेक पोलिसांना तुम्ही बघितले असणारच. अशाच एका धैर्यशील पोलिसाचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पोलीस एका साखळी चोराला पकडण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे.

व्हायरल होणारा हा व्हिडीओ दिल्ली पोलिसांच्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून शेअर करण्यात आला आहे. स्वतःच्या जीवाची परवा न करता शहााबाद डेअरी पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल सतेंद्र यांनी एका साखळी चोराला अटक केली.

या अटकेमुळे ११ गुन्ह्यांचा तपास पूर्ण झाला,असे कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आले आहे. सतेंद्र या साखळीचोराला बाइकवरून खेचत त्याला पकडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे, पण त्यांना साखळी चोर ढकलतो व बाइकवरून उतरत तिथून पळ काढतांना दिसून येत आहे.

मात्र शेवटी या चोराला पकडण्यात दिल्ली पोलिसांना यश आले. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. नागरिक सतेंद्रच्या कामगिरीवर त्यांना प्रोत्साहन देखील करत आहे. हा चोर पोलिसांचा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button