ताज्या बातम्याट्रेंडिंग

फुगा काढायला मुलाला फेकले वर अन्… हा व्हिडीओ तुमच्याही काळजाचा ठोका चुकवेल

दररोज सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात, त्यातील काही हसायला लावणारे व्हिडीओ असतात. तर काही अंगाला शहारे आणणारे असतात. पण सध्या व्हायरल होणारा हा एक व्हिडीओ या दोन्ही प्रतिक्रिया आपण एकावेळी देऊ शकतो असा आहे. या व्हिडीओमध्ये एक फुगा छताला चिकटलेला दिसून येतो आहे. (The child was thrown to remove the balloon and… this video will make your heart skip a beat)

तो फुगा काढण्यासाठी तिथे असणारा व्यक्ती चक्क त्याच्या मुलाला वर जोरात फेकतांना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसणार हे नक्कीच.

या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओ बघतांना चक्क आश्चर्याचा धक्का बसेल. कारण जर त्या मुलाला आणखी जोराने वर फेकले असते, तर कदाचित त्याच्या डोक्याला खूप मोठी दुखापत नक्की झाली असती. त्यामुळे अनेकांनी या व्हिडीओवर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या कृत्यावर नाराजी सुद्धा काही लोकांनी व्यक्त केलेली आहे. तर याउलट काही नेटकऱ्यांना हा व्हिडीओ पाहून त्यांना खूप हसायला आल्याचे कमेंट सुद्धा केल्या आहेत.

या वायरल झालेल्या व्हिडीओला १६ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून, सध्या हा व्हिडीओ अतिशय प्रमाणात व्हायरल होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button