ताज्या बातम्याट्रेंडिंग

शेतकऱ्याने शेतात आलेल्या सिंहिणींना दिल आगळ्या – वेगळ्या अंदाजात उत्तर…

दररोज होत असलेल्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंनी धुमाकूळ घातलेला आहे. कधी गाड्यांची स्टंटबाजी, तर कधी भररस्त्यात केलेला भन्नाट डान्स , तर कधी प्राण्यांसोबत खेळ करतानाचे व्हिडीओ तुफान व्हायरल होतांना आपण पाहिले असतील. (The farmer gave a different answer to the lionesses who came to the farm)

मात्र, व्हायरल झालेल्या एका व्हिडीओनं अनेकांच्या अंगावर काटा उभा केला आहे. हा व्हिडीओ छोट्या मोठ्या पाळीव प्राण्याचा नाही, तर हा व्हिडीओ आहे भयानक सिहिंणींचा.

व्हायरल झालेल्या या व्हिडीओ मध्ये शेतकरी एका शेतात काम करत असतांना अचानक सिंहिणींचा कळप येतो आणि पुढं जे घडतं ते पाहून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

सिंहिंणींचा कळप सामान्यत: जंगल परिसरात वावरताना दिसून येतो. मात्र, गुजरातच्या एका शेतमळ्यात सिंहिंणींचा कळप घुसल्यानं एकच खळबळ उडाली आहे. सिंहिणीला पाहून अनेकांच्या अंगावर काटा येतो.

पण शेतात असलेल्या शेतकऱ्याने सिंहिणीला घाबरून पळ काढला नाही, तर शेतकऱ्याने त्याच जागेवर उभं राहून चक्क मोबाईलमध्ये त्यांचे फोटो काढले आहेत.

हे सर्व थरारक दृष्य कॅमेरामध्ये कैद झाली असून सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ आयएफएस अधिकारी सुसांत नंदा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.

हा व्हिडीओ गुजरातचा असल्याचं त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. या व्हिडीओला आतापर्यंत एक लाखाहून अधिक जणांनी पाहिलं आहे. तर चार हजारांहून अधिक नेटकऱ्यांनी लाईकही केलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button