ताज्या बातम्याट्रेंडिंग

गाढविणीच्या दुधाची किंमत सोन्यालाही लाजवणारी, याच्या सेवनाने दुर्धर आजारही होतात बरे?

गाढव ओझं वाहण्याशिवाय काय करू शकतो? हा प्रश्न प्रत्येकाला पडणं अगदी सहाजिक आहे. कारण कस आहे ना, बदनामीचा शिक्का एकदा कुणावर लागला, मग तो माणूस असो किंवा प्राणी वर्षोनुवर्षे तसाच राहतो. आता अचानक गाढवाची चर्चा का? (The price of donkey’s milk would put gold to shame, so there would be no chronic disease?)

तर मला सांगा तुम्ही कधी गाढवाचं दूध पिलाय का? होय… तुम्ही बरोबर ऐकलंय… गाढवाचं दूध. आता कुणाला गाईचं दूध प्यायची सवय असेल तर कुणाला म्हशीचं, कुणाला बकरीच दूध प्यायलाही आवडत असणार. पण आम्ही जर तुम्हाला म्हंटल की यापेक्षाही गुणकारी दूध गाढविणीचं असत, तर यावर कदाचितच तुमचा विश्वास बसेल.. पण हे खर आहे.

आपण गाढविणीच्या दुधाला सोन्याचा भाव कसा? त्याचे अशे कोणते आश्चर्यकारक फायदे आहेत, हे जाणून घेऊयात. गाढविणीचे दूध गुणवत्तेच्या बाबतीत चक्क मानवी दुधाच्या जवळ जाणारे आहेत. या दुधाला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे, परंतु हा व्यवसाय करणारे लोक फार कमी आहेत. इतर दुधाच्या तुलनेत गाढविणीच्या दुधाची किंमत हि हजारोंच्या घरात आहे.

आता इतकी किंमत असण्यासारखं या दुधात काय असत? असा प्रश्न आपल्याला आलाच असेल, तर गाढविणीचं दूध हे अतिशय पौष्टिक असत. यात मोठ्या संख्येत लॅकटोजचे प्रमाण आढळते, सोबतच यात व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी १, बी ६ आणि बी १२ आढळते. तसेच यात मोठ्या प्रमाणात अँटी ऑक्सिडंट्स देखील असतात.

असे मानले जाते की लहान बाळाला एकदा जरी हे दूध पाजलं तरी त्याचा परिणाम जीवनभर असतो. फार पूर्वीच्या काळापासनं गाढविणीच्या दुधाचा उपयोग सौंदर्यप्रसाधनांमध्ये केला जातो. इतर दुधाच्या तुलनेत गाढविणीच्या दुधात रोगप्रतिकारक शक्ती देखील जास्त असते. युरोप मध्ये तर कोरोना व्हायरसची सुरुवात झाल्यानंतर या दुधाच्या मागणीत देखील वाढ पाहायला मिळाली.

परदेशात या दुधाची मोठ्या प्रमाणात मागणी आहे, मात्र भारतात हा व्यवसाय अद्यापही तितका प्रचलित नाही, आणि याचे मुख्य कारण म्हणजे गाढविणीच्या दुधाचे महत्व इथे फार कमी लोकांना माहित आहेत. याचे उत्पादन फार कमी आहे व हे दूध सहज उपलब्धही होत नाही, त्यामुळे जर तुम्ही याची किंमत ऐकायला गेलात तर ती थेंबांच्या भावात मिळते.

गाढविणीच्या दुधाच्या केवळ १० थेंबांची किंमत ३०० रुपये इतकी आहे. आता तुम्ही म्हणाल हे कस शक्य आहे? तर गाढविणीचं दूध हे थेंबां थेंबातच साठवलं जात आणि तसच विकलं देखील जात. नांदेडमध्ये एक दादा कायम या दुधाची विक्री करतांना दिसतात. त्यांनी यासाठी सोबत एक माप ठेवलय आणि या एका मापाची किंमत ३०० रुपये आहे.

विशेष म्हणजे अगदी ताज दूध लोकांना खुराकीप्रमाणे तिथेच प्यायला दिल जात. यासाठी लहान मुलांना ३ तर मोठ्यांना ५ माप असे प्रमाण ठरले आहेत. आता या प्रकारे पाहायला गेलं तर केवळ एक लिटर दुधाची किंमत ही १२ हजार रुपये आहे. कारण गाढवाचं एक लिटर दूधही मिळणं फार कठीण आहे.

२० गाढविणीचं दूध काढल्यास कदाचित एक लिटर दूध मिळेल. आता भारतात दिवसेंदीव गाढवांची संख्या कमी होत चाललि आहे. भारत सरकारनेही या संदर्भात पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने एक घोषणा केली आहे, ज्यात हिलारी जातीच्या गाढवांची एक डेअरी स्थापन करण्यात येईल.

त्यांचे जतन करून मोठ्या प्रमाणात गाढविणीचे दूध काढले जाईल आणि वितरित केले जाईल. असे झाल्यास कदाचित याची किंमतही कमी होईल आणि लोक जागरूक देखील होतील. त्यामुळे बहुगुणी गाढविणीचे दूध भारतात देखील सहजपणे सर्वांना मिळेल हे नक्की.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button