ट्रेंडिंगताज्या बातम्या

भारतात असंही एक गाव जिथे कलियुगात होईल सतयुगाची अनुभूती, हे गाव आहे तरी कुठे?

भारत हा विविध संस्कृतींचा देश आहे. अनेक वेळा आपण विचित्र-विचित्र गोष्टी ऐकल्या आणि पाहिल्या असतील आणि अनेक गोष्टींनी आपल्याला विचार करायला भाग ही पाडलं असेल. या जगात दोन प्रकारचे लोक असतात आस्तिक आणि नास्तिक. (There is also a village in India where the feeling of golden age will be felt in Kali Yuga, where is this village?)

आस्तिक म्हणजे ज्यांची देवावर अतूट श्रद्धा असणे. देवावर श्रद्धा, विश्वास आणि त्यांच्या चमत्काराच्या गोष्टी आपण नेहमी पाहत आणि अनुभवत असतो. पण आज आम्ही तुम्हाला अशा गावाविषयी सांगणार आहोत, जिथे आपल्याला लोकांची देवाप्रती असलेली अनोखी भक्ती पाहायला मिळेल.

जिथे कलियुगात सतयुगाची अनुभूती येईल. चला तर मग जाणून घेऊयात हे गाव आहे तरी कुठे? राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यात असलेले देवमाळी हे एक छोटेसे गाव आहे, हे गाव स्वतःतच एक रंजक कथा आहे. येथे राहणाऱ्या लोकांची भगवान नारायणाला घेऊन जी श्रद्धा आहे त्यानीच या गावाला अनोखं बनवलं आहे.

तर इथे लोक मातीच्या घरात म्हणजेच कच्च्या घरात राहतात. या गावात कोणी पक्के घर बांधत नाही, आता हे गाव आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहे असे ही नाही. या गावातील श्रीमंत लोक ज्यांच्या घरी एसी आहे, मोठी वाहने आहेत, असे लोकही कच्च्या घरात राहतात.

तर एक आणखी आश्यर्याची गोष्ट म्हणजे या गावात कोणी मांस खात नाही किंवा कोणतीच मादक द्रव्ये घेत नाही किंवा कुठल्याही प्रकारचा नशा करत नाही आणि इथे लाईट्स गेल्यास रॉकेलचा वापरही केला जात नाही. तिळाच्या तेलाचा वापर करून हे लोक दिवे लावतात तसेच संपूर्ण गावात एकाच गोत्राचे लोक राहतात.

गावात ३०० कुटुंबांची वस्ती आहे.आणि लोकसंख्या सुमारे २००० च्या जवळपास आहे आता हे लोक अशे का राहतात, इथे कुणाचच घर पक्क का नाही.. या सगळ्यांसाठी कारण असं की ग्रामस्थांची भगवान देवनारायण यांच्यावर नितांत श्रद्धा आहे. देवनारायण जेव्हा या गावात आले तेव्हा त्यांना गावकऱ्यांच्या सेवाभावनेने खूप आनंद झाला.

त्यांनी गावकऱ्यांना वरदान मागायला सांगितल्यावर गावकऱ्यांनी काही मागितले नाही. त्यावर देवनारायण म्हणाले की, तुम्हाला गावात शांतता हवी असेल तर पक्के छत असलेले घर बांधू नका. आजही गावकरी याचे पालन करतात. सर्व गावकरी पहाटे गावाच्या डोंगरावर अनवाणी फिरतात.

गावातील शाळा आणि मंदिर या पक्क्या भिंतींनी बनलेल्या आहेत त्या व्यतिरिक्त ग्रामस्थांकडे एक इंचही जमीन नाही. गावातील सर्व जमीन भगवान देवनारायण यांच्याकडे आहे. म्हणजे गावातील सर्व जमीन भगवान देवनारायण यांच्या नावाने अंकित आहे. त्यामुळे त्यांना अनेक सरकारी योजनांचा लाभ मिळत नाही.

एवढचं नाही तर गावात पाण्याच्या टाक्या सुद्धा बनत नाही, गावकरी फक्त प्लास्टिकच्या डब्यात पाणी साठवतात अनेक दशके उलटली तरी देवमाळी गावात पक्के छत असलेले एकही घर बांधलेले नाही.गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार अनेकांनी पक्के छत टाकण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे त्यांना कुठल्या ना कुठल्या प्रकारे याचा फटका सहन करावा लागला.

तेव्हापासून अनुचित प्रकार घडण्याची भीती असल्याने ग्रामस्थ पक्के छत करत नाहीत. पशुपालनातूनच इथले लोक जीवन जगत आहे. याला श्रद्धा म्हणा किंवा अंधश्रद्धा. मात्र गावकऱ्यांच्या या श्रध्देने सर्वांनाच आश्चर्यात टाकले असून, या गावात दर्शनासाठी देशभरातून भाविक येतात.

गेल्या ५० वर्षांपासून या गावात एकही घरात चोरी झाली नाही. त्यामुळे इथल्या घरांना कोणीही कुलूप लावत नाही. ही एक विचित्र गोष्ट आहे की आज आपण २१ व्या शतकात जगत आहोत, जिथे आज प्रत्येकजण दारूसट्टा सारख्या गोष्टींच्या अधीन गेले आहे तिथे हे संपूर्ण गाव व्यसनमुक्त आहे.

जिथे प्रत्येकाला पैसे कमवून मोठमोठी सुंदर घरं बनवायची आहेत, तिथे या गावात शतकानुशतके एकही कायमस्वरूपी घर बांधले गेले नाही, आजही इथल्या लोकांना कलियुगात सतयुगाचा अनुभव होतोय, आता या गोष्टींना आपण कश्या प्रकारे घ्यायचं. ही श्रद्धा समजायची की अंधश्रद्धा हा सर्वस्वी त्याचा त्याचा निर्णय आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button