ताज्या बातम्याट्रेंडिंग

तिहार जेलसमोरून चोरट्यांनी पळवली काँग्रेस नेत्याची SUV, घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद

काँग्रेस नेते पंखुरी पाठक यांची चक्क तिहार तुरूंगासमोरून चोरांनी कार चोरल्याचा व्हिडीओ वायरल होतो आहे. चोरांनी कार चोरल्याचा व्हिडीओ ट्विट करत काँग्रेस नेते पंखुरी पाठक यांनी दिल्ली पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पाठक यांनी केलेल्या या ट्विटमध्ये त्यांच्या मालकीची असणाऱ्या फॉर्च्यूनर SUV ही कार चोरुन नेल्याच्या घटनेचा व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे.या व्हिडीओमध्ये चोर कसलीही भीती न बाळगता कार चोरताना दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही कार चक्क तिहार तुरुंगासमोरुन चोरून नेण्यात आली आहे. (Thieves ran away Congress leader’s SUV in front of Tihar Jail, the thrill of the incident was caught on camera)

चोरीच्या घटने नंतर पंखुरी पाठक यांनी ट्विटर वरती एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे. “काल रात्री जनकपुरी येथील मुख्य रस्त्यावरून आमची फॉर्च्यूनर SUV ही कार चोरीला गेली.

जवळपास अर्धा तास चोरटे कसलीही भीती न बाळगता कारचा दरवाचा उघडून ती चोरण्याचा प्रयत्न करत होते. शिवाय ही कार एका बँकेच्या समोर लावली होती, ज्या ठिकाणी एका रांगेत अनेक बँका आहेत, तरीही चोरट्यांनी एवढ्या आरामात आणि कसलीही भीती न बाळगता ही कार चोरली आहे आणि दिल्ली पोलीस झोपा काढत आहेत.”

पंखुरी पाठक यांनी कार चोरीच्या प्रकरणावरुन पोलिसांवर आरोप केला. तर या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यावरून नेटकरी सुद्धा पोलिसांवरती आरोप करीत आहेत.

तुरुंगाच्या समोरुन जर एवढ्या सहजरित्या चोरांना चोरी करता येत असणार, तर इतर ठिकानांची काय परिस्थिती असेल त्याचा अंदाज लावायला नको असंही पंखुरी पाठक यांनी म्हटलं आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button