ताज्या बातम्याट्रेंडिंग

चांदीच चांदी…’या’ जोडप्याने व्हराडासाठी अक्ख विमानाचं केलं बुक, व्हिडीओची व्हायरल…

सध्या सगळीकडे लगीन सराई सुरू आहे. ज्या घरामध्ये लग्न असते तिथे उत्साहाचे वातावरण असते. लग्न म्हटलं तर वर वधू या दोघांकडे हि लग्नाच्या निमंत्रण पत्रिका वाटणे असो. (This couple booked a full flight for the wedding guests, the video went viral)

लग्नातील वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन असो. ते कार्यक्रम सर्वांपेक्षा वेगळे करण्याच्या हटके कल्पना असो. कपड्यांची खरेदी असो. प्री वेडिंग फोटोशूट असो अशा सर्व गोंष्टींची धमाल हि लग्नामध्ये असते.

या सर्व प्रसंगांमध्ये आपले सर्व जवळचे नातेवाईक, मित्रमंडळी आपल्या आनंदात सहभागी व्हावेत असे प्रत्येक जोडप्याला वाटत असते. त्यासाठी सर्वांना सोयीस्कर होईल असे ठिकाण, तारीख असे सर्व नियोजन केले जात असतात.

अशाच एका नियोजनाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. लग्नातील वऱ्हाडी मंडळींसाठी चक्क संपूर्ण विमानाचे बुकिंग करण्यात आल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हायरल झालेल्या हा व्हिडीओ श्रेया शाह या युजरने इन्स्टाग्राम वर शेअर केला आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत.

या व्हिडीओला ९९ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ‘बहिणीच्या लग्नासाठी संपूर्ण विमान बुक केले आहे’ असे लिहिले आहे. या व्हिडीओमध्ये विमानात बसलेली वऱ्हाडीही दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button