ताज्या बातम्याट्रेंडिंग

‘या’ हत्तीला हजारो लोकांसमोर देण्यात आली होती फाशी, इतिहासातील क्रूर घटनांपैकी एक…

जगामध्ये असा कुठलाही देश नसेल जिथे नियम आणि कायदे नाहीत. प्रत्येक देशामध्ये गुन्हेगारांना शिक्षा करण्यासाठी नियम आणि कायदे बनवल्या गेले आहेत. अश्या अनेक देशाचा कायदा आहे जो इतका धोकादायक असतो की तो ऐकल्यावरच अंगाला शहारे येतात. (‘This’ elephant was hanged in front of thousands of people, one of the cruelest events in history)

मात्र, केवळ दुष्ट अपराध करण्यासाठीच दोषीला फाशीची शिक्षा देण्याची तरतूद आहे. तुम्ही आजवर सर्व लोकांना फाशीची शिक्षा सुनावल्याचे ऐकले असेल, पण आजपर्यंत कुठल्याच प्राण्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली असेल, असे कधी ऐकले नसणार.

नसेल ऐकले तर आज आम्ही तुम्हाला अशाच एका हत्तीची कहाणी सांगणार आहोत. ज्याला १०५ वर्षांपूर्वी अमेरिकेत सार्वजनिकरित्या फाशी देण्यात आली होती. होय, हे ऐकून तुम्हाला विचित्र नक्की वाटेल, पण हे खरे आहे.

पण जर दुष्ट अपराधासाठीच फाशीची शिक्षा होत असेल. तर मग असं या हत्तीने काय केलं असावं, कि ज्याला चक्क सार्वजनिक रित्या फाशी देण्यात आली. चला तर मग हेच आपण आज यामध्ये जाणून घेऊयात.

१०५ वर्षांपूर्वी, १३ सप्टेंबर १९१६ रोजी अमेरिकेच्या टेनेसी राज्यात मेरी नावाच्या हत्तीला दोन हजार लोकांसमोर फाशी देण्यात आली होती. हत्तीला फाशी देण्याच्या वाक्यामागे एक विचित्र कथा असल्याचे सांगण्यात येते.

प्रत्यक्षात, चार्ली स्पार्क नावाचा व्यक्ती टेनेसीमध्ये ‘स्पार्क्स वर्ल्ड फेमस शो’ नावाचे सर्कस चालवत होता. त्या सर्कसमध्ये मेरी नावाच्या आशियाई हत्तीसह अनेक प्राणी होते, असे म्हणतात.

की एके दिवशी मेरीला सांभाळणाऱ्याने म्हणजेच तिच्या माहूतने काही कारणामुळे सर्कस सोडली. त्यानंतर सर्कसच्या मालकाने त्याच्या जागी दुसरा माहूत ठेवला.

अशा स्थितीत नव्या माहूतला मेरीबद्दल फारशी माहिती नव्हती. तसेच मेरीनेही माहूतसोबत जास्त वेळ घालवला नव्हता. त्यामुळे माहुतला मेरीवर नियंत्रण ठेवण्यात अडचण येऊ लागली.

दरम्यान, सर्कसच्या प्रचारासाठी शहरात एक दिवस परेडचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये मेरीसह सर्व प्राणी आणि सर्कसचे सर्व कलाकार सहभागी झाले होते.

शहराच्या मध्यभागी मिरवणूक काढण्यात आली. यादरम्यान मेरीला वाटेत काहीतरी खायचे दिसले, ज्यासाठी ती वेगाने पुढे जाऊ लागली. यादरम्यान हत्तीवर स्वार झालेल्या माहुतने हत्तीच्या कानामागे मानेवर भाला खुपसला.

त्यामुळे हत्तीला राग आला आणि तिने माहूतला खाली पाडले. त्यानंतर हत्तीने त्याला पायाने चिरडले. त्यामुळे माहुतचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेने नाराज झालेल्या काही लोकांनी हत्तीला मारण्याच्या घोषणा देत रस्त्यावर गोंधळ घातला.

मात्र त्यावेळी हे प्रकरण कसेबसे शांत झाले होते. पण शहरातील बहुतांश नागरिकांनी हत्तीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी सुरू केली. या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी अमेरिकन वृत्तपत्रांनी या दुर्दैवी घटनेबद्दल वृत्तपत्रामध्ये छापले.

त्यानंतर संपूर्ण शहरात ही बातमी वेगाने पसरली. शहरातील लोकांनी सर्कसचा मालक चार्ली स्पार्क याच्याकडे हत्ती मेरीला फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीला सुरुवात केली.

सोबतच असे न झाल्यास शहरात पुन्हा कधीही सर्कस होऊ देणार नाही, अशी धमकी ही त्यांनी दिली. अनेक लोक हत्तीला विविध प्रकारे मारून टाका असे सांगत होते. शेवटी, चार्ली स्पार्कला लोकांच्या आग्रहापुढे मेरीला मृत्यूदंड देण्याचा निर्णय घ्यावाच लागला.

यासाठी त्यांनी १०० टन वजन उचलणारी क्रेन मागवली आणि १३ सप्टेंबर १९१६ रोजी क्रेनच्या सहाय्याने हजारो लोकांमध्ये हत्तीला फाशी देण्यात आली.

ही घटना इतिहासातील प्राण्यांप्रती मानवतेचे सर्वात क्रूर उदाहरण मानले जाते. ही घटना अक्षरशः मनाला हादरून टाकणारी आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button