ताज्या बातम्याट्रेंडिंग

हनिमून स्पेशल पलंगतोड पानात नेमकं असतं तरी काय? यात खरंच दम असतो का?

आपल्या भारत देशात पान खाने हे साधारण आहे. तुम्ही अनेक प्रकारचे पान बघितले असतील, आणि खाल्ले सुद्धा असतील, आता तर वेग वेगळ्या व्हेराइटीज मध्ये सुद्धा पान मिळत असते. (What exactly is in the Honeymoon Special Palangtoad page? Is there anything special about it?)

 

जसे बनारसी पान, चॉकलेट पान,फायर पान, पण पलंगतोड़ पाना बद्दल तुम्ही कधी ऐकलंय का? काही लोकांचा दावा असतो की पलंगतोड़ पान हे कामोत्तेजना वाढवते. पण हे कितपत खरं आहे ? आणि नेमकं हे पलंगतोड़ पान असतं काय आणि कसं बनवलं जातं तर यामध्ये आपण आज याच बद्दल चर्चा करणार आहोत.

तर पलंगतोड़ पानाला हनीमून पान म्हणून सुद्धा ओळखलं जातं, लोकांचा पलंग तोड पान खाण्यावर अतिशय विश्वास आहे. काही लोक तर चक्क दावाही करतात की पलंगतोड पान खाल्याने लैंगिक शक्ती चांगलिच वाढते. अनेकपान विक्रेते दावा करतात की पलंगतोड पान हे कामोत्तेजना वाढविण्यासाठी ओळखले जाते.

आता हे पान कसे तयार केले जाते, तर या पानाला गोल्ड फॉयलमध्ये गुंडाळले जाते. त्याला जोडीत विकले जाते. पलंगतोड पान एका खास सुगंधी आणि आकर्षक डब्यात ठेवले जाते. पुरुषासाठी बनविलेल्या या पानात सुगंधी अगर रस, गुलाब, कश्मीरी केसर यांसह इतर काही पदार्थ टाकून ते कलकत्ता पानात गुंडाळले जातात. ज्यामुळे त्याचा वास अत्यंत सुगंधी येतो.

या पानाची जितकी चर्चा आहे तितकंच हे पान महागडं सुद्धा आहे पण नवं लग्न झालेली तर आपली ताकद दाखवायला हे पान हमखास घेतातच. तज्ज्ञांच्या म्हणण्या नुसार पलंगतोड पानांमध्ये नशीले पदार्थ टाकण्यात येतात. त्यामुळे लोकांना पटकण गुंगी येते आणि ते निद्राधीन होतात.

मात्र, पान खाल्यानंतर गुंगी येण्यादरम्यानच्या काळात, संबंधितांमध्ये जो सहवास घडतो, तो त्यांना प्रदीर्घ वाटतो. आयुर्वेदात अस कुठलच औषध नाही ज्यामुळे लगेच, तात्काळ उत्तेजीतता जागी होईल. पलंगतोड पानासोबतच काही औषध, काही गोळ्या, काही तेल लोकं देतात पण अशा गोष्टींचे साईड इफेक्ट जास्त असतात.

त्यामुंळे पलंग तोड पाण खाण्याचा फायदा होतो. पण तो पॉवर वाढण्यासठी नव्हे तर दुकानदाराचा गल्ला भरण्यासाठी. हा फसवणुकीचा ही प्रकार असू शकतो. त्यामूळे असल्या गोष्टींच्या नादी लागू नये अस डॉक्टर सांगतात, आणि जर काही शंका असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असंही म्हणतात.

तर तुम्ही ही काही करण्याआधी किंवा काही घेण्याआधी त्यातील तत्थ्य जाणून घ्या उगाच अफवांना बळी पडू नका आणि सुरक्षित राहा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button