ट्रेंडिंगताज्या बातम्या

चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणारा मनोज बरकडे नेमका आहे तरी कोण?

पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानाचे तीव्र पडसाद संपूर्ण राज्यभरात पाहायला मिळाले. पिंपरी चिंचवड येथे चंद्रकांत पाटील यांच्या तोंडावर मनोज बरकडे या व्यक्तीकडून शाईफेक करण्यात आली. (Who exactly is Manoj Barkade who threw ink on Chandrakant Patil?)

त्यांनतर या नावाची चर्चा चांगलीच रंगली. आता राज्यभरात पाटील यांच्या कोणत्या वादग्रस्त विधानामुळे निषेध करण्यात आला? चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केल्यानंतर चर्चेत आलेला मनोज बरकडे कोण? आणि या संपूर्ण प्रकाराबद्दल चंद्रकांत पाटील काय म्हणाले? हेच आज आपण जाणून घेणार आहोत.

आता हे प्रकरण काय आधी समजून घेऊयात? तर पैठण येथील एका कार्यक्रमात बोलतांना चंद्रकांत पाटील म्हणाले, त्या काळात सरकार शाळांसाठी अनुदान देत नव्हते. तरीसुद्धा महापुरुषांना शाळा उघडल्या. मात्र, आता लोकं शाळांच्या अनुदानासाठी सरकारवर अवलंबून राहतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरू केल्या.

या शाळा सुरू करताना सरकारनं त्यांना अनुदान दिलं नाही. त्यांनी लोकांकडं भीक मागितली. हेच ते विधान होते ज्यामुळे राज्यभरात खळबळ बघायला मिळाली. आणि चंद्रकांत पाटीलांवर शाईफेक देखील झाली. आता चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाल्यानंतर एक नाव चर्चेत आल ते म्हणजे मनोज गरबडे.

हा शाईफेक करणारा तरुण समता सैनिक दलाचा कार्यकर्ता आहे. मूळचा तो उस्मानाबाद येथील देवळाली गावाचा. उस्मानाबाद येथील आरपी कॉलेजमधून त्याने १२ वी चे शिक्षण पूर्ण केले, आणि पुण्याला नौकरीच्या शोधात आला. अगदी सुरुवातीला त्यांने कपड्यांच्या दुकानात काम करून आपल्या कामाची सुरुवात केली आणि काही काळातच तो एका नामांकित कंपनीत मॅनेजर पदावर रुजू झाला.

काहीवर्षांत त्याने ही नौकरी सोडली आणि समता सैनिक दला मार्फत पूर्णवेळ समाजसेवा करण्याचा निर्णय घेतला. शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवणे, समाजप्रबोधन, तरुणांना संघटित करून संघ मोठा करणे, आर्थिक आणि दुर्बल घटकांना साहाय्य करणे हे काम तो करू लागला.

आता मनोज गरबडे हे नाव पहिल्यांदाच समोर आलं असंही नाही तर यापूर्वीही भिमाकोरेगाव प्रकरणानंतर औरंगाबाद येथे आयोजित केलेली रामदास आठवले यांची सभा उधळून लावण्यात देखील हे नाव पुढेच होत. चंद्रकांत पाटील यांच्यावर केलेल्या शाईफेकीनंतर हे नाव सोशल मीडियावर चांगलंच गाजलं आहे आणि या प्रकरणात अनेकांकडून त्याला समर्थन मिळतांना देखील दिसून येत आहे.

शाईफेक करणाऱ्यांना पोलिसांनी प्रकरणानंतर ताब्यात घेतलं होत, मात्र आता तिघांचीही जमिनीवर सुटका करण्यात आली, आणि विशेष म्हणजे सुटकेनंतर इतर समर्थकांनी वाजत गाजत त्यांचे स्वागत देखील केले. याच प्रकरणावर स्वतः चंद्रकांत पाटील व्यक्त झाले आणि आपल्या वक्तव्यासाठी जाहीरपणे माफी मागितली.

“माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी जाहीर माफी मागतो’, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. बोलताना माझ्याकडून बोली भाषेतील शब्द अनवधानाने निघाले, यात मला कोणालाही दुखवायचा हेतू नव्हता, असेही त्यांनी स्प्ष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button