ताज्या बातम्याट्रेंडिंग

सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारा चेहरा, जया किशोरी नक्की आहेत तरी कोण?

जया किरोशी आजकाल हे नाव युवांमध्ये आणि सोशल मीडिया वर बरचं फेमस झालंय. लोकांनी तिला देवीचा दर्जा सुद्धा दिलाय.त्यांच्या कार्यक्रमाला लाखोंनी गर्दी बघायला मिळते. (Who is Jaya Kishori, the face making waves on social media?)

एवढच नाही तर यांच्या सोशल मीडिया वर मोटिवेशन स्पीच च्या रील्स,पोस्टला सुद्धा लाखोंनी व्ह्यूज असतात. पण या कोणी साध्वी किंवा संत नाहीत,त्या भजन आणि कथा पठणाचे काम करणाऱ्या एक सामान्य महिला आहे.

पण त्यांना इतकी प्रसिद्ध कशी मिळाली,त्या इतक्या पॉप्युलर कश्या झाल्या हेच आज आपण यामध्ये जाणून घेणार आहोत. तर जया किशोरी यांचं खरं नाव जया शर्मा हे आहे. त्यांचा जन्म राजस्थान इथे झाला, मात्र सध्या त्या कोलकाता येथे कुटुंबासह राहतात.

जया किशोरी यांचे कुटुंब पारंपारिक धार्मिक श्रद्धेशी निगडीत असल्यामुळे,लहानपणापासूनच त्यांच्या घरात भक्तीचं वातावरण पाहायला मिळतं. आणि म्हणूनच त्यांनीअगदी लहान वयातच अध्यात्माच्या वाटेनं जायला सुरुवात केली

जया किशोरीला लहानपणापासूनच भगवान श्रीकृष्णाची खूप ओढ होती, ती कृष्णाला आपला सख्खा मित्र मानत असे आणि कृष्णाच्या भक्तीमध्ये नेहमी मधुर गाणी म्हणत असे, हनुमानजींचे सुंदरकांड त्यांच्या कुटुंबात नेहमी वाचले जायचे.

त्या नंतरच त्यांनी भजन कीर्तन गायला सुरुवात केली आणि हळूहळू अनेक राज्यांत भजनाचे कार्यक्रम करू लागल्या. कृष्णासाठी तिची भक्ती बघून त्यांचे गुरुजी त्यांना राधा म्हणायचे,आणि नंतर त्यांनीच तिला जया किशोरी हे नाव दिल ज्याचा अर्थ राधा ही होतो.

जया किशोरी यांनी लहान वयातच संस्कृतमध्ये शलोक लिंगष्ठकम, शिव तांडव स्त्रोथम्, रामष्टकम् इत्यादी गाणे सुरू केले, त्यांचा मधुर आवाज सर्वांनाच आवडायला लागला होता, त्यानंतर वयाच्या १० व्या वर्षी जया किशोरीने लाखो भाविकांना समोर सुंदरकांडचे पठण केले.

यानंतरच जया किशोरी खूप लोकप्रिय झाल्या. जया किशोरिंचे भजन जागरण हे कार्यक्रम लोकांना खूप आकर्षित करत होते,कारण लोकांना वाटायचे की एवढी लहान मुलगी इतक्या गोड आवाजात इतकी सुंदर गाणी कशी गाऊ शकते.

तिच्या चेहेऱ्या वरचा तेज तिला कोणत्याही देवीपेक्षा कमी सांगत नव्हता, बरेच लोक तिला देवी देखील मानतात. फार कमी वयातच त्यांना त्यांच्या मधुर आवाजासाठी प्रसिद्धी मिळायला लागली.त्या अनेक मोठं मोठ्या ठिकाणी भजन कीर्तन कथावाचन करू लागल्या.

पण इतकं असूनही त्यांनी त्यांचं शिक्षण मात्र सोडलं नाही कार्यक्रमा बरोबरच त्या शिक्षणही घेत होत्या ,बी.कॉम झाल्या नंतर त्यांनी स्वतःला अध्यत्मात झोकून टाकलं. आता या लोकांना आपल्या स्पीचेस मधून देखील मोटिवेट करतात

जया किशोरी या भारतातील प्रसिद्ध कथाकारांपैकी एक आहेत. त्या त्यांच्या कथांसाठी लोकप्रिय आहे तसेच , प्रेरक भाषणासाठी देखील ओळखल्या जातात. त्यांचा आवाज खूप गोड आहे.

ज्यामुळे त्यांनी करोडो लोकांची मने जिंकली आहेत. करोडो लोक रोज त्यांचे भजन ऐकतात तसेच जया किशोरी त्यांच्या 3 दिवसांच्या नानी बाई का मायरा की कथा,आणि ७ दिवसांच्या श्रीमद भागवत कथेसाठी जास्त प्रसिद्ध आहे.

मीडिया रिपोर्ट नुसार असं म्हटल्या जाते की त्या त्यांच्या एका कार्यक्रमाचे जवळपास ९ लाख रुपये घेतात पण त्यातून येणारे ते पैसे त्या एका अपंग संस्थे ला दान करतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button