ताज्या बातम्याट्रेंडिंग

अडीच महिन्यांच्या बाळाला घेऊन अधिवेशनाला येणाऱ्या आमदार सरोज अहिरे आहेत तरी कोण?

नागपूरमध्ये १९ डिसेंबर पासन, हिवाळी अधिवेशनाची सुरुवात झाली आहे. आता अधिवेशन कायम चर्चेत असत ते म्हणजे अधिवेशनात होणाऱ्या सत्ताधारी आणि विरोधकांमधील आरोप प्रत्यारोपामुळे. (Who is MLA Saroj Ahire who comes to the session with a two and a half month old baby?)

मात्र यंदाच्या अधिवेशनाचा पहिला दिवस एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत राहिला, ते कारण म्हणजे राष्टवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे यांनी आपल्या अडीच महिन्यांच्या बाळाला घेऊन अधिवेशनासाठी हजेरी लावली.

अगदी मोठमोठ्या राजनेत्यांपासून तर सामान्य जनतेपर्यंत सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले. आज यामध्ये आपण याबाबदलच जाणून घेऊयात की सरोज अहिरे नेमक्या आहेत तरी कोण? आणि त्या इतक्या छोट्या बाळाला अधिवेशनासाठी घेऊन का आल्यात?

सरोज अहिरे या नाशिक येथील देवळालीच्या राष्टवादी काँग्रेसच्या आमदार आहेत. फेब्रुवारी २०२१ साली त्यांचा विवाह नाशिक येथील दंतरोगतज्ज्ञ डॉक्टर प्रवीण वाघ यांच्या सोबत झालं.

२०१७ साली सरोज या नाशिक महानगर पालिकेच्या नगरसेवक झाल्या आणि २०१९ साली शिवसेनेचे विद्यमान आमदार योगेश घोलप यांचा पराभव करत सरोज या आमदार म्हणून निवडून आल्या.

अश्या रीतीने शिवसेनेची तीस वर्षांची सत्ता त्यांनी काबीज केली. सरोज यांचे वडील देखील आमदारच होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवानेत्यांमध्ये तर त्यांचे नाव हमखास घेण्यात येते. मतदार संघात जनतेशी नाळ असलेल्या आमदार अशी त्यांची ओळख आहे.

आपल्या चिमुकल्या बाळाला घेऊन त्या विधान भवनात पोहोचल्या होत्या. यावेळी विधानभवनात हिरकणी कक्ष नसल्याचा मुद्दा त्यांनी मांडला, मग काय अगदी तात्काळच ही सुविधा निर्माण करून त्यांच्याच हस्ते विधिमंडळात हिरकणी कक्षाचे उदघाटन झाले.

माध्यमांशी बोलतांना त्यांनी सांगितले, की मी आई आहेच सोबत आमदारही आहे, त्यामुळे दोन्ही कर्तव्ये महत्वाची आहे. बाळ माझ्याशिवाय राहू शकत नाही, सोबत मतदारसंघातील लोकांचे प्रश्नही महत्वाचे आहेत, त्यामुळेच बाळाला घेऊन आले आहे.

त्यांच्या या कृतीवर राजनेतेच नाही तर लोक देखील सोशल मीडियावर भरभरून प्रतिसाद देत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील एक ट्विट करत सरोज अहिरे यांची प्रशंसा केली आहे.

एकनाथ शिंदे बाळाला खेळवत असल्याचा फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राज्याच्या विधिमंडळात पहिल्यांदाच अशी घटना घडली असल्याचे स्पष्ट करत मुख्यमंत्र्यांनी आमदार सरोज अहिरे यांचं भरभरून कौतुक केलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button