ताज्या बातम्याट्रेंडिंग

जन्माने हिंदू असलेल्या ए.आर. रहमान यांनी का स्वीकारला होता इस्लाम धर्म? ‘हे’ होत कारण…

फक्त बॉलिवूडच नाही तर ए.आर. रहमान हे नाव संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. आवाजही असा आहे की तो ऐकणाऱ्याच्या आत्म्यात प्रवेश करतो, असं म्हणायला काही हरकत नाही. (Why did A R Rehman, a Hindu by birth, convert to Islam? Because ‘this’ is happening)

१९९२ सालापासून त्यांनी आजवर अनेक भाषांमधील चित्रपटांमध्ये मंत्रमुग्ध करून टाकणारे संगीत देऊन जगभरामध्ये त्यांच्या चाहत्यांची मने जिंकली आहेत.

आपल्या संगीताने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या आणि संगीताच्या क्षेत्राला कलाटणी देणारे ए.आर. रहमान हे जन्माने मुस्लीम नाही तर हिंदू होते. सगळ्यात विशेष म्हणजे फार कमी लोकांना ए.आर. रहमान यांचं खरं नाव माहित आहे.

त्यांचं खरं नाव हे ए. आर. रहमान नसून दिलीप शेखर हे आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि असं नेमकं काय घडलं होतं की रहमान यांनी हिंदू धर्म सोडून मुस्लिम धर्म स्वीकारला. चला तर मग हाच किस्सा आज आपण यामध्ये थोडक्यात जाणून घेऊयात.

ए. आर. रहमानचे खरे नाव दिलीप शेखर आहे. दिलीपचा जन्म ६ जानेवारी १९६७ रोजी झाला. दिलीपच्या वडिलांचे दीर्घ आजाराने निधन झाले होते. पण यानंतर कुटुंब खूप अस्वस्थ झाले होते. कुटुंबाची परिस्थितीही फारशी चांगली नव्हती.

अशात दिलीपची बहीण सुद्धा आजारी पडली होती. यावेळी कुटुंब एका मुस्लिम पीरकडे जात असे. त्या पीराने असा चमत्कार केला की बहिणीची तब्येत बरी झाली.

महत्त्वाचं म्हणजे जेव्हा त्यांच्या बहिणीची तब्येत सुधारली तेव्हा घरात आनंदाचं वातावरण पसरल होतं. आपल्या कठीण काळात इस्लामने त्यांची साथ दिली आणि सगळं काही सुरळीत सुरू झालं.

इथेच दिलीपच्या आईला वाटले की इस्लाम धर्म हाच तिच्या समस्यांवर उपाय आहे आणि तिने इस्लामचा स्वीकार केला.
आता धर्म बदलला की साहजिकच आहे नावही बदलावे लागले.

पण दिलीप नाव असताना ए. आर. रेहमान नाव कसं पडलं याच्यामागे सुद्धा एक किस्सा आहे. ८० च्या दशकाची गोष्ट आहे. कुटुंब एका ज्योतिषाकडे गेले. आईला आपल्या मुलीच्या लग्नाबद्दल ज्योतिषाला विचारायचे होते.

परंतु ज्योतिषाला हा मुलगा कोण आहे याबद्दल जास्त रस होता. दिलीपला त्याचे नाव बदलायचे होते. यामुळे ज्योतिषाने त्यांना दोन नावं सांगितली.

पहिलं नाव ‘अब्दुल रहीम’ आणि दुसरं नाव ‘अब्दुल रहमान’ पण मग ज्योतिषी म्हणाले तुझे नाव ‘अब्दुल रहीम रहमान’ असावे. दिलीपला ‘रेहमान’ हे नाव आवडले पण ‘अब्दुल’ ऐवजी ‘अल्ला’ असे ठेवले आणि तिथून जगाला मिळाला.

ए.आर. रहमान.  म्हणजे अल्लाह रहीम रहमान. नसरीन मुन्नी कबीर यांच्या ‘एआर रहमान द स्पिरिट ऑफ म्युझिक’ या पुस्तकात रहमान म्हणतात की, एका ज्योतिषाने मला मुस्लिम नाव दिले.

तरुणांमध्ये फेमस असलेल्या आणि भला मोठा चाहते वर्ग असणाऱ्या रेहमान यांच्या जीवनाबद्दलची ही कहानी खूप कमी लोकांना माहिती आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button