ताज्या बातम्याट्रेंडिंग

ॲमेझॉन का करतोय नौकर कपात? जाणून घ्या यामागील नेमकं कारण…

आधी ट्विटर, नंतर मेटा आणि आता ॲमेझॉनचा नंबर! होय, आता ई-कॉमर्स कंपनी ॲमेझॉनने आपल्या कर्मचाऱ्यांना पिंक स्लिप देणे सुरू केले आहे. पिंक स्लिप्स थांबवणे म्हणजे नोकरीतून काढून टाकणे होय. गेल्या आठवड्यातच, कंपनीने आपल्या उच्च अधिकाऱ्यांसोबत केलेल्या अंतर्गत संभाषणात सांगितले होते की, आता नियुक्ती थांबवली आहे. (Why is Amazon cutting jobs? Know the real reason behind this…)

मायक्रोसॉफ्ट, ट्विटर आणि मेटानंतर आता ई-कॉमर्स कंपनी ॲमेझॉन मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. परंतु ॲमेझॉन कंपनी का आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी करत आहे? कुठल्या कारणामुळे ॲमेझॉन आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे? हेच या माध्यमातून आपण थोडक्यात जाणून घेऊयात.

मिळालेल्या माहितीनुसार, ॲमेझॉन कंपनीने गेल्या आठवड्यातच नवीन भरती थांबवल्याची घोषणा केली होती. यानंतर आता कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांची संख्याही कमी करू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ॲमेझॉन कंपनीतील हजारो कर्मचाऱ्यांची नौकरी धोक्यात आली आहे. ॲमेझॉन कंपनीनेही नोकर कपात करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

याशिवाय कंपनीने नवीन भरतीवरही तात्काळ बंदी घातलेली दिसून आले आहे. ॲमेझॉन कंपनीच्या आर्थिक परिस्थितीचं कारण देत सध्या भरती थांबवण्यात आलेली आहे. तीन हजार सातशेहून अधिक कर्मचाऱ्यांना सुद्धा कामावरून हटवण्यात येणार आहे. आर्थिक मंदीमुळे ॲमेझॉन कंपनीने तोट्यात असलेल्या प्रक्रिया बंद करण्यास सुरुवात केली आहे.

कंपनीने गेल्या आठवड्यातच हायरिंग फ्रीजची घोषणा केली होती. यानंतर आता कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांची संख्याही कमी करू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याआधी मायक्रोसॉफ्ट, ट्विटर आणि मेटा या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरून हटवलं होतं. आर्थिक नुकसानीमुळे या कंपन्यांनी हा निर्णय घेतला होता.

फेसबुकची मालकी असलेल्या मेटा कंपनीने अकरा हजार कर्मचारी हटवले होते. तर ट्विटरने निम्मे कर्मचारी कामावरून काढून टाकले होते. त्यानंतर ॲमेझॉननेही नोकरकपातीचा निर्णय घेतला आहे. वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालात दावा करण्यात आला आहे की कंपनीने आपल्या काही नफा कमावणाऱ्या युनिट्समध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना इतरत्र नोकरी शोधण्याचे निर्देश दिले आहेत.

याचे कारण म्हणजे त्यांचे प्रकल्प एकतर बंद किंवा निलंबित केले जाऊ शकतात, असे सांगण्यात आले आहे. कंपनीचे पीपल एक्सपिरिअन्स अँड टेक्नॉलॉजीचे वरिष्ठ उपाध्यक्ष बेथ गॅलेटी यांनी मेमोमध्ये लिहिले आहे की, अर्थव्यवस्था अनिश्चिततेच्या स्थितीत पोहोचली आहे आणि आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून कामावर घेतलेल्या लोकांची संख्या पाहता मॅनेजमेंटने हा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे या आठवड्यात नवीन नियुक्ती थांबवण्यात आल्या आहेत. त्यांनी पुढे हे देखील सांगितले की ही भरती ‘फ्रीझ’ काही महिने टिकेल. आम्ही पुढील काही महिन्यांसाठी ही स्थिरता कायम ठेवू आणि आम्हाला अर्थव्यवस्थेत आणि व्यवसायात जे काही दिसते ते तपासू. तथापि, या मेमोमध्ये असे देखील नमूद करण्यात आले आहे की कंपनी काही प्रकल्पांसाठी नियुक्त्या करत राहील.

जे स्वतःहून निघून जातील त्यांच्या जागी नवीन लोक नियुक्त केले जातील. मात्र अशी परिस्थिती पहिल्यांदाच आलेली नाही, तर यापूर्वीही अनेकवेळा कंपनीला अशा प्रसंगांना सामोरे जावे लागले आहे, या मेमोद्वारे स्प्ष्ट करण्यात आलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button