ताज्या बातम्याट्रेंडिंग

मुख्यमंत्री होऊन देखील Sharad Pawar यांना ५ वर्षांचा कार्यकाळ का पूर्ण करता आला नाही?

राजनेतिक जगताचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा शरद पवार हे एकेकाळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. एकदा नव्हे तर तेही चार वेळा. पण चार वेळा मुख्यमंत्री झाल्या नंतरही त्यांना एकदाही पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. (Why Sharad Pawar could not complete 5 years tenure despite being Chief Minister?)

यावर आजही विरोधक त्यांची मज्जा घेतात . पण याला नेमकं कारण काय? ते चार वेळा मुख्यमंत्री कसे झाले?, त्या वेळी राजनेतिक परिस्थिती काय होती आणि ते ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण का करू शकले नाहीत? याबद्दलच आज आपण चर्चा करणार आहोत.

नुकतीच एकनाथ शिंदे यांनी केलेली बंडखोरी तर सगळ्यांना माहितीच असेल, अशीच बंडखोरी शरद पवार यांनी देखील केली होती . १९७८ साली वसंत दादाच्या सरकार मध्ये शरद पवार हे उद्योगमंत्री होते, त्यावेळी सुरु असलेल्या भर पावसाळी अधिवेशनात पवारांनी दत्ता मेघे ,सुशील कुमार शिंदे,आणि सुंदरराव सोळंके या मंत्र्यांसह एकूण ३८ आमदारांना घेऊन बंडखोरी केली होती.

याच बंडखोरी मुळे वयाच्या 38 व्या वर्षी शरद पवार हे पहिल्यांदा मुख्यमंत्री झालेत, त्या वेळी ते महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरले होते. त्यांनी केलेली ही बंडखोरी महाराष्ट्राच्या स्थापनेनंतरची सगळ्यात मोठी बंडखोरी होती. शरद पवारांच्या नेतृत्त्वात १७ कॅबिनेट आणि १७ राज्यमंत्र्यांसह राज्यात पुलोदचा प्रयोग सुरू झाला.

जवळपास दोन वर्षे शरद पवारांच्या नेतृत्वातील पुलोदचं सरकार चाललं, त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा गांधी पुन्हा सत्तेत आल्या आणि पंतप्रधान झाल्या. १७ फेब्रुवारी १९८० रोजी इंदिरा गांधींच्या शिफारशीनंतर राष्ट्रपतींनी शरद पवारांचं पुलोदचं सरकार बरखास्त केलं आणि महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली. अश्याप्रकारे शरद पवार यांच्या पहिलया मंत्रिपदाचा कार्यकाळ हा १ वर्ष २१४ दिवसांचा झाला.

पुलोदचं सरकार गेल्यानंतर ६ वर्षे शरद पवार हे विरोधी बाकावर बसलेले होते.. पण त्यानंतर ७ डिसेंबर १९८६ रोजी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नेतृत्वात ते पुन्हा काँग्रेसमध्ये परतले. त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण होते. त्यांच्यावर झिरो बजेट च्या मुद्द्यावरून टीका व्हायला लागल्या, त्यातल्या त्यात काँग्रेसमधील एक गट त्यांना मुख्यमंत्री पदावरून काढण्यासाठी प्रयत्न करत होता.

महाराष्ट्रात काँग्रेसच वातावरण त्यावेळी फारस बरं नव्हतं, महाराष्ट्र काँग्रेसमधील तेव्हाचे ज्येष्ठ नेते वसंतदादा पाटील हे राजस्थानचे राज्यपाल होते. आणि त्यांनाही चव्हाण हे मंत्रीपदावर नको होते ., त्यामुळे राजस्थानच्या राजभवनातूनच महाराष्ट्रातील मुख्यमंत्रि बदलासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले.

नंतर राज्यपाल पदाचा राजीनामा देऊन ते मुंबईत आले आणि मुंबईतून शंकरराव चव्हाणांना हटवण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली. आता चव्हाण हे मंत्रिपदावरून हटणार हे माहित होताच.. नवीन मुख्यमंत्रीसाठी नावांची निवड सुरु झाली. तेव्हा शरद पवार यांचं नाव राजीव गांधींपर्यंत पोहोचलं.

पवारांना राजीव गांधी यांचा फोन आला आणि त्यांनी पवारांना थेठ दिल्लीला बोलावलं आणि सांगितलं की, “शंकरराव चव्हाणांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेत आहोत आणि तुम्हाला मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी देत आहोत”. २६ जून १९८८ रोजी शरद पवार हे २ दा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले, यावेळी त्यांचा एकच वर्षांचा कार्यकाळ होता.

कारण त्यानंतर महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आणि पवारांना नियमाप्रमाणे पद सोडावं लागलं. १९९० ची निवडणुक काँग्रेस ने शरद पवार यांच्या नेतृत्वात लढवली होती त्यामध्ये शिवसेना भाजप ने युती केली होती, त्यांना हरवत काँग्रेस ने १४७ जागा जिंकल्या, त्यामुळे बहुमत हे काँग्रेस कडे होत.

पवार मात्र काठावर पास झाले, पण अखेर शरद पवार पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर आले. निवडणूक निकालानंतर शरद पवार यांनी राज्यपालांकडे जाऊन सत्तास्थापनेचा दावा केला. आणि ४ मार्च १९९० रोजी पवारांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, हा कार्यकाळही त्यांना पूर्ण करता आला नाही.

कारण पवार केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी व्हायला गेले. पी. व्ही. नरसिंहराव म्हणजे तेव्हा चे पंतप्रधान यांनी पवारांना केंद्रीय मंत्रिमंडळात येण्याची विनंती केली. आणि मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत, पवारांनी केंद्रात संरक्षणमंत्री पदाची जबाबदारी घेतली. अशाप्रकारे पवारांचा तिसऱ्या मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ जवळपास एक ते दीड वर्षांचाच झाला.

आता शरद पवार हे दिल्लीत चांगलेच रमले होते, पण ६ डिसेंबर १९९२ ला ‘बाबरी मशीद उद्ध्वस्तीचं’ प्रकरण घडलं आणि त्यानंतर मुंबईमध्ये त्याचे पडसाद उमटले. मुंबईत दंगली सुरू झाल्या. आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतून ‘मुंबई वाचवा’ च्या हाका दिल्लीपर्यंत पोहोचू लागल्या. सुधाकरराव नाईक यांना या दंगली काही रोखता आल्या नाहीत.

पर्यायानं महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद पूर्वी तीनवेळा भूषवलेल्या शरद पवार यांनाच महाराष्ट्रात पाठवण्यात आलं. त्यानुसार ६ मार्च १९९३ रोजी शरद पवार यांच्याकडे महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद देण्यात आलं. पवारांच्या या चौथ्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात त्यांना अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागलं. बॉम्बस्फोट, भ्रष्टाचाराचे आरोप इत्यादी बऱ्याच गोष्टी घडल्या.

मात्र, पवारांनी या सगळ्यात आपल्या आतापर्यंतच्या अनुभवाचा वापर करत मार्ग काढला आणि मुख्यमंत्री पद यशस्वी रित्या पार पाडले. परंतु हे ४ मुख्यमंत्रीपदे पवारांनी नाईलाजाने स्वीकारले होते. पुढे पवारांच्याच नेतृत्वात काँग्रेसने महाराष्ट्रात १९९५ च्या निवडणुका लढल्या. मात्र, यावेळी काँग्रेसला यश काही आलं नाही, पवारांच्या या चौथ्या मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ केवळ २ वर्षे ८ दिवसांचाच होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button