असा ‘धाडसी’ होता औरंगजेबाचा निंदक ‘कवी भूषण’!
काही मोजके लोक नेहमी अन्यायकारक नि चुकीच्या लोकांना, प्रथेला, विचारधारेला इत्यादी गोष्टींना समर्थन देत असतात. ह्या ना त्याप्रकारे समाजात तेढ निर्माण होते ती वेगळीच.
इतिहासात ज्या औरंगजेबाची नाचक्की, बदनामी, क्रूरता नमूद आहे तो आपला आदर्श कसा होऊ शकतो? अर्थात ह्या चुकीच्या गोष्टींविरुद्ध वाचा फोडण्यासाठी लागते ते धाडस. जे साडेतीनशे वर्षांपूर्वी थेट औरंगजेबाच्या दरबारात एका व्यक्तीने केले होते.
एक कवी ज्याने जीवाची तमा न बाळगता धाडसाने औरंगजेबासमोर त्याच्याच अत्याचाराचे व पापाचे पाठ वाचून दाखवले. तो कवी म्हणजे कवीराज भूषण. नेमके हा भूषण औरंगजेबाला काय म्हणाला हे पाहूयात.
कवी भूषण औरंगजेबाच्या दरबारात कविता सादर करणार होता त्याने अभयदान मागून छंद गायला सुरुवात केला.
अर्थात मक्केच्या काबे इतके पवित्र असणाऱ्या वडीलांना ह्या औरंगजेबाने अटक केली. जणू मक्क्याला आग लागावी इतके मोठे ते पाप होते. ह्या औरंगजेबाने स्वतःच्या बापाला कैद करून बादशाहपद बळकावले. शहाजहानसाठी त्याने एक खोली ठेवली होती, त्या बाहेर शहाजहानला येण्यास बंदी होती.
केवळ त्या खोलीतून ताजमहाल दिसायचा इतकेच काय ते सुख. औरंगजेबाने धूप अंगाऱ्यात विष मिसळून त्याचा उबारा स्वतःच्या बापाला दिला होता. इतकेच नाही तर स्वतःच्या सख्या भावाला ह्या क्रूर औरंग्याने मारले होते. एकाच आईच्या पोटी जन्म घेऊन तो भावाच्या जीवावर उठला होता.
दारा शिकोह हा औरंगजेबाचा मोठा भाऊ हिंदू मुसलमानास समतेची वागणूक द्यायचा. त्याने अनेक हिंदू धर्मग्रंथ फारसीमध्ये अनुवादित करत चांगले हितसंबंधही जोडले होते. पण त्यालाही औरंगजेबाने मारले. शिवाय आपल्या बापासमोर सख्ख्या काकाचा गळा दाबत त्याचा जीव घेतला ते वेगळेच.
भूषण म्हणतो, ‘हे औरंगजेबा तुझ्या दुसऱ्या भावाला मुरादबक्ष ह्यास कुराणाची शपथ घेऊन तू दगा न देण्याचे वचन दिले होते. पण तरी छलकपट करत तू त्यासही कैद केलेस.
अश्या खोट्या शपथा घेऊन पाप करत तू हे पादशाहीचे पद मिळवले आहे.’ दरबारात सारे लोक हे ऐकून थक्क झाले होते पुढे काय होईल ह्याची कोणालाच कल्पना नव्हती. तोच कवी भूषणाने पुढचे छंद गण्यास सुरुवात केली.
भूषण म्हणतो हा औरंगजेब सकाळी जपमाळ घेऊन अल्लाहची आराधना करतो ते सारे कपट आहे. टोप्या आणि चादरी विणून मानवतावादी कोणीही होत नसतं. हा जपमाळेत देवाचे नाही कपटाचेच जप करतो. आग्ऱ्यात दारा शिकोह ह्यास औरंग्याने चिणून मारले आपल्या बापजाद्यांचे तख्त लबाडीने बळकावले.
शेवटच्या छंदात भूषण म्हणतो,
अर्थात चारचौघांचे ऐकून ह्या औरंग्याने स्वतःच्याच लोकांना हत्तीच्या पायी दिलेले आहे. आणि हा धर्माचा आव तर असा आणतो की, असे वाटते जणू शंभर उंदीर खाऊन मांजर तपालाच बसली आहे.
इथून भूषणाने आपली सुटका करून घेतली मात्र औरंग्याला त्याची जागा आपल्या प्रतिभावान वाणीतून त्याने दाखवून दिली. काही इतिहासकार ह्या कथेला आख्यायिका मानतात पण त्यामागचा हेतू हाच की चुकीच्या गोष्टींना सुज्ञ माणसाने विरोध केलाच पाहिजे.
औरंगजेब तेव्हा पण होता आणि आजही लोकांच्या वृत्तीमध्ये आहे. केवळ कवी भूषण बनून गर्जना करायची आहे. चुकीला चूक म्हणण्यात कसलेच न्यूनगंड नसावे. ज्या काळात औरंगजेबासारखा कट्टर व्यक्ती असताना भूषणाला छंद म्हणताना भीती वाटली नाही,
आपण तर शिवरायांच्याच स्वराज्यातले व मातीतले आहोत. औरंगजेबासारख्या दुष्ट प्रवृत्तींना विरोध करत आपणही हे धाडस दाखवले पाहिजे.
कारण आपला माथा टेकतो तो केवळ शिवप्रभूंच्या समाधी पुढे. इथे मान वाकवली की आयुष्यभर ताठ मानेने जगता येते. म्हणूनच ताठ मानेने जगत चुकीच्या गोष्टींविरुद्ध वाचा फोडायची असते. बरोबर ना? या विषयी आपले मत काय आहे ते कमेंट करून नक्की सांगा.