ताज्या बातम्याट्रेंडिंग

तेव्हा मांढरदेवीच्या यात्रेत गेला होता अनेकांचा बळी, ही दुर्घटना नेमकी काय होती?

आपण अनेक यात्रेत जातो, कुणी देव दर्शनासाठी जातात,तर कुणी मज्जा करायसाठी,आता यात्रा म्हटली की भली मोठी गर्दी आलीच, पण कधी-कधी हीच गर्दी मोठ्या दुर्घटनेच कारण ठरू शकते. (Many victims had gone on the pilgrimage to Mandhardevi, what exactly was this accident?)

आता मी का असं बोलतोय,तर जास्त विचार करू नका कार, आम्ही आज तुम्हाला अशा एका घटनेबद्दल सांगणार आहोत, जे ऐकून तुम्हीही थक्क व्हाल आणि सतर्क सुद्धा .तर महाराष्ट्रात मांढरदेवीच्या उत्सवादरम्यान एक मोठी दुर्घटना घडली होती.

ज्यात जवळपास ३०० लोकांचा मृत्यू झाला होतो.आता ही दुर्घटना नेमकी काय होती? हेच यामध्ये आपण जाणून घेऊयात. तर घटना आहे २५ जानेवारी २००५ ची, मांढरदेवीला काळूबाईच्या नावानेही ओळखलं जात.

देवीचं मंदिर सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्याजवळ एका डोंगरावर वसलेलं आहे. या मंदिरात दरवर्षी १५ दिवसांचा देवीचा उत्सव साजरा केला जातो. जानेवारी महिन्यात हा उत्सव असतो म्हणून दूर-दुरून लाखो भाविक या उत्सवात सामील होण्यासाठी येतात.

त्याही दिवशी म्हणजेच २५ जानेवारी २००५ ला जवळपास ३ लाख भाविक देवीच्या दर्शनासाठी आले होते. आता देवीच दर्शन घ्यायचं आहे, तर डोंगर चढावाच लागेल कारण मांढरदेवीच्या मंदिरात जाण्यासाठी लहान डोंगर चढावा लागतो.

त्यासाठी पायऱ्या आहेत. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूनी पूजेच्या साहित्याची दुकानं आहेत. अनेक प्रथांमधून एक म्हणजे बोकड कापण्याची प्रथा सुद्धा त्यावेळी होती, त्यामळे डोंगराच्या एकाबाजूला बोकड कापले जात होते.

इतक्या लाखोंच्या गर्दीतून लोकं मिळेल तस देवीचं दर्शन घेत होते. दुपारची वेळ होती सगळं व्यवस्थित सुरळीत सुरु होत. पण अचानक, त्या लोकांच्या गर्दीमधून गोंधळ व्हायला लागला.

गर्दी असल्यामुळे तिथे चेंगराचेंगरी झाली. तिथून निघण्याचा प्रयत्न करत त्या गोंधळात धक्का बुक्की मुळे काही लोक डोंगरावरून घसरून खाली पडले.यावेळी डोंगरावर काही तंबू लावले होते. या तंबूंनाही आग लागली.

सिलेंडरचा स्फोट झाला ते चित्र इतकं भयावह होत की एका मागून एकाचे असे तिथे शेकडो जीव गेले, लहान मुलं गुदमरून गेली. पाहता पाहता मृतांचा आकडा शंभरी पार गेला आणि दिवसाअखेर जवळपास ३०० जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं.

आता गर्दीत गोंधळ का उडाला तर, काही स्थानिकांच्या आणि पत्रकारांच्या म्हणण्यानुसार, मंदिराच्या मार्गाने असणाऱ्या दुकानांना आग लागली धुराचे लोट दिसू लागले. काही दुकानांमध्ये ठेवलेल्या गॅस सिलेंडरचाही स्फोट झाला.

स्फोटाचा आवाज आल्याने आणि आग लागल्याने लोकांमध्ये खळबळ उडाली. लोक तिथं असणाऱ्या दुकानांमध्ये शिरत होती. गर्दी दुकानांमध्ये घुसल्याने पत्र्याची दुकानं कोलमडून पडली. शॉक बसल्याने अनेकांचा जीव तिथेच गेला.

दुकानांना आग लागली. लूटमार सुरू झाली.’चेंगराचेंगरी झाली आणि अनेकांचे मृत्यू झाले तर अनेक त्यात जखमी सुद्धा झाले. दुर्घटना डोंगरावर झाल्याने आणि लाखोंची गर्दी असल्याने अग्निशमन दलाची मदत पोहचण्यासाठी तिथे वेळ झाला.

तिथे मृतदेहांचे ढीग पडले होते. मृतांमध्ये सगळ्यात जास्त संख्या महिला आणि लहान मुलांची होती. कुणी आपली आई गमावली, कुणी वडील, तर कुणी अख्य कुटुंब. आजही हा प्रसंग आठवला की अनेकांच्या अंगावर शहारे येतात.

पण या दुर्घघटने नंतर प्रशासनाने या यात्रेचा ताबा घेतला असून. आता सुरक्षा यंत्रणाही वाढवण्यात आली आहे, अनेक सोय-सुविधा सुरु केल्या गेल्या आहेत. आणि अनेक कडक पाऊले सुद्धा प्रशासना कडून उचलली गेली आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button