ताज्या बातम्याट्रेंडिंग

शिक्षकाच्या जादूचा व्हिडीओ तुफान व्हायरल, काही क्षणातच हातातील ग्लास केला गायब…

सोशल मीडियावर शिक्षक आणि विद्यार्थ्यांनचे बरेच व्हिडीओ नेहमी व्हायरल होतात. शिक्षकाने विद्यार्थ्यांसमोर प्रयोग सुद्धा केलेले व्हिडीओ व्हायरल होत असतात. (The video of the teacher’s magic went viral, the glass in his hand disappeared within moments)

अशाच एका शिक्षकाने विद्यार्थ्यांसमोर केलेल्या प्रयोगाच्या व्हिडीओने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे. फिजिक्स हा विषय शिकवणाऱ्या एका शिक्षकाने विद्यार्थ्यांना चक्क जादू करून दाखवलेली आहे.

डोळ्यांची पापणी लवण्याआधी त्याने त्याच्या हातातील ग्लास चक्क गायब करून दाखवलेला आहे. जादूगार शिक्षकाचा हा व्हिडीओ पाहून सर्वजण थक्क झालेले आहेत.

प्रत्येक शिक्षकाची शिकवण्याची वेगवेगळी पद्धत असते. शिकवण्याच्या हटके शैलीसाठी हे शिक्षक नेहमीच प्रसिद्ध असतात. अशाच शिक्षकांपैकी हा एक शिक्षक आहे.

ज्याने शिकवता शिकवता जादू करून त्याच्यासमोरील विद्यार्थ्यांचंच नाही, तर सोशल मीडियावर कित्येक नेटकऱ्यांचं मन जिंकलं आहे.
व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता शिक्षकाच्या हातात दोन काचेचे ग्लास आहेत.

एक ग्लास छोटा आणि एक ग्लास मोठा. शिक्षक मोठ्या ग्लासच्या आत छोटा ग्लास ठेवतात आणि विद्यार्थ्यांना ग्लासच्या आतील ग्लास दिसतो का, असं विचारतात.

यावेळी ग्लासच्या आतील ग्लास स्पष्टपणे दिसतो. त्यानंतर या दोन्ही ग्लासमध्ये ते तेल ओतात आणि ग्लासच्या आतील ग्लास चक्क गायब होतो. पाहता पाहता ग्लास काही सेकंदातच दिसेनासा होतो.

हा चमत्कार नेमका कसा झाला, असं का घडलं यामागील लॉजिकही शिक्षक विद्यार्थ्यांना सांगत असतात. यामागील स्पष्टीकरण देतात.
ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता.

फक्त इंग्रजी बोलून चमकणारा नव्हे तर हा एक हाडाचा शिक्षक आहे, असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं होत. या शिक्षिकाची फिजिक्स शिकवण्याची स्टाईल सर्वांना आवडली आहे. सगळीकडे त्याच कौतुक देखील केलं जातं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button