ताज्या बातम्याट्रेंडिंग

तरुणानं भंगारातून बनवली अनोखी स्कुटर, आनंद महिंद्रा यांनी या देशी जुगाडाचं केलं कौतुक…

आनंद महिंद्रा हे नाव सगळ्यांच्याच परिचयाचं आहे. ते भारतातील प्रसिद्ध उद्योजक असून. हे त्यांच्या ट्विटमुळे नेहमीच चर्चेत असतात. ते दररोज आपल्या ट्विटर अकाऊंटवरून अनेक पोस्ट शेअर करत असतात. (A unique scooter made by a young man from scrap, Anand Mahindra appreciated this indigenous experiment)

त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून एक खास पोस्ट शेअर केली आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक जुन्या असलेल्या स्कूटरचा वापर करुन सिमेंटच्या गोणी चौथ्या मजल्यावर पोहोचवत आहे.

त्या जुन्या स्कूटरच्या मागच्या चाका जवळ एक दोरी बाधली आहे. फक्त एकचदा त्या स्कुटरला एक्सलेटर दिले कि स्कुटरच्या मागचं चाक फिरते आणि ती दोरी गुंडाळत जाऊन ती गोणी वर जाऊन पोहोचते.

हा व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून आनंद महिंद्रा सुद्धा थक्क झाले. आनंद महिंद्रा यांनी ट्विटर वर हा व्हिडीओ शेअर केला आहे. ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, ‘मला वाटतं यासाठी आम्ही यांना ‘पॉवर ट्रेन’ असं म्हणतो.

वाहन इंजिनाच्या पॉवरचा वापर करण्याच्या अनेक पद्धती आहेत. ई स्कूटरसोबत हे आणखी सोपं होईल. ई स्कूटरची प्रोडक्शन कॉस्ट कमी झाली किंवा सेकंड हँड उपलब्ध झाल्या की सांगायला नको.

हा व्हिडीओ अपलोड झाल्या झाल्याच हजारो लोकांनी तो बघितला. आनंद महिंद्रा यांनी ट्वीट केल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याच्यावर कमेंट करून वेगवेगळ्या प्रतिक्रिया सुद्धा दिलेल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button