ताज्या बातम्याट्रेंडिंग
सापाला पळवायला महिलेने चप्पल फेकली अन् साप चप्पल घेऊन पळाला…
साप म्हटलं कि प्रत्येकाच्या अंगावर शहारे येतात. त्याच्या समोरसुद्धा जायला काहींना हिंमत नसते. सापाला पाहताच अनेकांची घाबरगुंडी उडते. पण या वायरल झालेल्या व्हिडीओला बघून चक्क तुम्ही पोट धरून हसणार. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. (The woman threw the slipper to the snake and the snake ran away with the slipper…)
हा व्हिडीओ आयएफएस अधिकारी परवीन कासवान यांनी ट्विटर वरती शेअर केला या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की सापाला घराच्या पायऱ्यांवर आलेले बघून एका महिलेने त्याला हकलवण्यासाठी पायातील चप्पल घेऊन मारली. मात्र, साप ती चप्पलच तोंडात पकडून पळतांना दिसतो आहे. साप चप्पल घेऊन जाताना पाहून महिला त्याला ऐ…ऐ करत असल्याचे दिसून येत आहे.
परवीन कासवान यांनी व्हिडीओ शेअर करत कॅप्शन मध्ये लिहिले आहे की, साप या चप्पलेचे नक्की करणार काय? त्याला तर पायही नाही आहेत.या व्हिडीओला आतापर्यंत हजारो लोकांनी बघितले आहे.
याला चांगलेच व्ह्यूज मिळाले असून लोक त्यावर आपल्या प्रतिक्रिया सुद्धा मांडत आहेत. एकाने तर म्हटलंय, हा नक्कीच बिहारचा साप असावा, इथला नेता किंवा साप रिकाम्या हाती कधीच जात नाहीत. हा व्हिडीओ कुठचा आणि कधीचा आहे हे अद्यापहि कळलेलं नाही.