वडिलांची ७००० कोटींची बिसलेरी कंपनी सोडणाऱ्या जयंती चौहान आहे तरी कोण?
नुकतंच आपण बातमी ऐकली असेल की भारतातील सर्वात मोठा पॅकेज्ड वॉटर ब्रँड बिसलेरी आता टाटा समूहाकडून विकत घेतला जाणार आहे. तब्बल ७००० कोटी रुपयांमध्ये ही डील होणार असल्याची शक्यता आहे. सुमारे तीन दशके कंपनीचे मालक असणारे रमेश चव्हाण यांनी अचानक ही कंपनी विकण्याचा निर्णय का घेतला हा तर प्रश्न अनेकांना पडलाच असेल. (Who is Jayanti Chauhan who left his father’s 7000 crore Bisleri company?)
तर यामागील कारण म्हणजे त्यांची मुलगी जयंतीला व्यवसायात फारसा रस नाही आणि म्हणूनच तिने हा व्यवसाय पुढे नेण्यास नकार दिलाय. वडिलांच्या ७००० कोटींच्या व्यवसायाला नकार देणारी आणि वडिलांची एकुलती एक लेक असणारी जयंती चव्हाण आहे तरी कोण? हेच आपण या माध्यमातून जाणून घेऊयात.
सध्या एक चर्चा चांगलीच रंगली आहे, कि मुलीने वडिलांच्या व्यवसायात रस न दाखविल्यामुळे वडिलांना ३० वर्षे जुना व्यवसाय विकावा लागतोय. हे व्यक्ती दुसरे तिसरे कुणी नाही तर भारताच्या सर्वात मोठ्या वॉटर पॅकेज ब्रँड बिस्लरीचे मालक रमेश चव्हाण आहेत. मोठ्या कुटुंबांमध्ये उद्योगावरून बरेच वाद आपण पहिले असतील, परंतु ही परिस्थिती थोडी वेगळी आहे. कारण रमेश चव्हाण यांच्या एकुलत्या एक मुलीने त्यांचा करोडोंचा व्यवसाय साम्भाळायलाच नकार दिलाय.
जयंती चव्हाण यांचे वय आता ३७ वर्षांचे आहे, अगदी वयाच्या २४ वर्षांपासून त्यांनी आपल्या कौटुंबिक व्यवसायात पाऊल टाकले. सध्या त्या बिसलेरी इंटरनॅश्नलच्या व्हॉइस चेअरपर्सन पदावर कार्यरत आहेत. पूर्वी जयंती दिल्ली मध्ये असणारे बिस्लरीचे कार्यालय सांभाळायच्या तत्यांनंतर त्यांनी मुंबई येथील कार्यालयाचे काम पाहण्यास देखील सुरुवात केली. बिस्लरीला एका आंतरराष्ट्रीय पातळीवर नेऊन ठेवण्यात त्यांचे भले मोठे योगदान आहे.
यामागील कारण म्हणजे अगदी कंपनीच्या जाहिरातींपासून तर विपणन विभागापर्यंत सर्व काम त्यांनी उत्तमरीत्या सांभाळले. विसजेश म्हणजे कंपनीमध्ये ऑटोमेशन ची सुरुवात देखील त्यांनीच केली. जयंती चव्हाण यांचे शिक्षण पाहता त्यांनीप्रोडक्शन डेव्हलपमेंटची पदवी पूर्ण केली आहे. यासोबतच त्यांनी लॉस एंजलिस मधील फॅशन इन्स्टिट्युट ऑफ डिझाईन आणि मर्चन्डाइझिंग मधील शिक्षण देखील पूर्ण केले आहे, या कोर्समध्ये त्यांनी फॅशन बाबत गहाण अभ्यास केला आहे.
इतकेच नव्हे तर लंडनमध्ये त्यांनी फोटोग्राफी आणि फॅशन स्टाइलिंगचेही शिक्षण घेतले आहे. २४ व्या वर्षी त्यांनी आपला कौटुंबीक व्यवसाय हाताळायचा निर्णय घेतला. त्यांनी हा व्यवसाय पुढे नेण्यात आपले फार मोठे योगदान दिले आहे. त्यांनी कंपनीच्या कामांमध्ये आपला रस दाखविल्यामुळे हा व्यवसाय दिवसेंदिवस वाढतच गेला आणि अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवर येऊन पोहोचला.
आता जयंती चव्हाण यांची चर्चा सुरु झाली ती बिसलरी कंपनी विकणार असल्याची बातमी पसरल्यानंतरच.
अचानक पणे जयंती यांचा या कंपनीमधून रस का कमी झाला, व स्वतःच्या वडिलांची बिसलरी कंपनी त्यांनी न हाताळण्याचा निर्णय का घेतला असावा हा प्रश्न तर सर्वांपुढे आहे. मात्र अद्यापही यामागील कारण स्पष्ट झालेले नाही. कुणी सांगतय की जयंती यांना त्यांच्या फॅशन संबंधी व्यवसायावर लक्ष घालायचे आहे तर जयंती यांनी लिंक्ड इन प्रोफाईलवर कुठल्याही गोष्टीच्या दोन बाजू असतात, असे लिहिले आहे. त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. मात्र खरं काय हे कुणालाच माहित नाही.
कंपनीचे मालक रमेश चव्हाण यांचे वय आता ८२ वर्षे आहे. आपल्या मेहनतीने उभी केलेली कंपनी विकण्याच्या निर्णयामुळे ते अतिशय भावुक झाले आहेत. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी सांगितले की, आजवर ज्याप्रमाणे कंपनी सांभाळली आहे त्याप्रमाणे कंपनी सांभाळायला कोणीही नाही.
मुलगी जयंती चव्हाणला देखील व्यवसायात फारसा रस नाही. आणि त्यामुळेच त्यांना हा व्यवसाय विकावा लागतोय. दुसरी कडे त्यांनी हे देखील सांगितले की, टाटा समूह अधिक चांगल्या पद्धतीने बिसलेरी कंपनीची काळजी घेईल. मला टाटा समूहाची संस्कृती आवडते आणि त्यामुळे इतर खरेदीदार असूनही मी टाटा समूहच निवडला आहे.