इतिहासजरा हटकेताज्या बातम्यामाहितीपूर्ण

एसआयपी मध्ये योग्य गुंतवणूक कशी करायची? एकदा नक्की वाचा…

योग्य ठिकाणी पैसे गुंतवणे ही खरंतर आजच्या काळाची गरज झाली आहे. त्यासाठी एसआयपी हा एक म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीचा प्रकार मानला जातो. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना दोन पर्याय असतात.

एक म्हणजे लमसम म्हणजेच ‘एक रकमी गुंतवणूक’ आणि दुसरा मार्ग म्हणजे ‘एसआयपी द्वारे गुंतवणूक.’ आजच्या या लेखात आपण एसआयपी म्हणजे नेमकं काय हे जाणून घेऊ.

• एसआयपी म्हणजे काय ?

एसआयपी म्हणजे सिस्टेमॅटिक इन्वेस्टमेंट प्लॅन. ही एक पद्धतशीर गुंतवणूक योजना असून ही कोणतीही स्कीम नाही. हे गुंतवणूक करण्याचे एक माध्यम आहे ज्यामध्ये एक ठराविक रक्कम एका ठराविक दिवशी आपल्या गुंतवणुकीत जोडली जात असते.

उदाहरणार्थ आपल्याकडे १२,००० रुपये आहेत. आपण हे सगळे पैसे एखाद्या म्युच्युअल फंड मध्ये सरसकट गुंतवू शकतो आणि जर तेच १२,००० जर आपण महिन्याला १००० अशा पद्धतशीरपणे एक वर्षासाठी गुंतवत राहिलो तर ती होईल एसआयपी म्हणजेच पद्धतशीर गुंतवणूक योजना.

तसे पाहायला गेले तर ही अगदीच साधी, सोपी आणि सरळ योजनपद्धती आहे. ज्याची प्रक्रिया योग्यरित्या जाणून घेऊन गुंतवणूक केली तर त्याचा चांगला फायदा आयुष्यभरासाठी होऊ शकतो.

• एसआयपी मध्ये किती रक्कम गुंतवू शकतो ?

यामध्ये गुंतवणूकदार कमीतकमी रक्कम सातत्याने गुंतवू शकतो. म्हणजेच यामध्ये ५०० रुपयांपासून देखील एसआयपी चालू करता येऊ शकते.

काही फंड तर ५०० पेक्षा सुद्धा कमी गुंतवणूक करण्याची मुभा देतात. मुख्य म्हणजे इथे अमुक एक रक्कम भरायचीच असे बंधन नसते. त्यामुळे इथे जास्तीत जास्त त्याच्या मर्जीनुसार कोणत्याही रकमेची गुंतवणूक करू शकतो.

• एसआयपीचा कालावधी किती असतो ?

गुंतवणूकदाराला आपली एसआयपी एक वर्षासाठी, दोन वर्षासाठी, पाच किंवा दहा वर्षांसाठी किंवा जोपर्यंत तो स्वतः एसआयपी बंद करत नाही तोपर्यंत एसआयपी चालू ठेवता येते.

• एसआयपीचे फायदे काय आहेत ?

१. अधिक परतावा (Good return on investment)

म्युच्युअल फंडच्या एसआयपी प्लॅनमध्ये काही काळानंतरच आपल्याला गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळाल्याचे दिसून येते.

परंतु जर दीर्घ कालावधीसाठी एसआयपी केली गेली तर मात्र अधिक परतावा मिळालेला दिसून येतो. किमान पाच वर्षांपेक्षा अधिक एसआयपी केली तर चांगला फायदा मिळतो.

२. एसआयपी मधील लवचिकता (Flexibility in SIP)

गुंतवणूकदार कधीही आपले पैसे काढून घेऊ शकतो. तसेच गुंतवणूकदार आपला एसआयपी प्लॅन हवा असेल तेव्हा थांबवू शकतो. एसआयपी मधील पैसे काढून घेऊ शकतो किंवा अजून नवीन पैशांची गुंतवणूक करू शकतो.

३. कमी प्रमाणातील जोखीम (Low risk SIP)

जर गुंतवणूकदार इक्विटी फंडमध्ये आपल्या पैशांची गुंतवणूक करत असेल तर तिथे एकाच बाजारभाव चक्रात गुंतवणूकदाराचे पैसे गुंतवले जात नाहीत.

तसेच दीर्घकालीन एसआयपी मध्ये वेगवेगळ्या किमतींवर युनिट्स खरेदी केले जातात. शेवटी बाजार भावाची सरासरी काढली जाते ज्याचा जास्त नकारात्मक प्रभाव पडताना दिसून येत नाही. (फारसा तोटा होत नाही)

४. किमान रकमेतील गुंतवणूक (minimum investment in SIP)

अगदी कमीत कमी रकमेत देखील आपण आपल्या म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात करू शकतो. विद्यार्थी असो, गृहिणी असो किंवा एखादा उद्योगपती असो सगळ्यांसाठी हा उत्तम मार्ग आहे.

ही होती अत्यंत आवश्यक आणि गरजेची असणारी एसआयपी संबधित माहिती. जर तुम्हालाही यात गुंतवणूक करायची असेल तर

आपण जवळच्या कोणत्याही Mutual Fund Broker किंवा ऑनलाईन पद्धतीने सुद्धा एसआयपी चालू करू शकता. मात्र, सगळी माहिती, कागदपत्रे पाहूनच गुंतवणूक करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा.

Vaibhav Gupta

Email : [email protected]
vaibhav gupta has pursued Bachelors of Technology and Mass Communication. He has 4 years of experience in active journalism. From a columinst at huff post to seniorColuminst at Batmi, the journey wasn't so smooth. He loves animals so much. In his free time, he loves to sing and watch Netflix.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button