ताज्या बातम्याट्रेंडिंग

ऐकावं ते नवलच! पुण्यातील ‘या’ ठिकाणी जमिनीत नव्हे तर झाडाला लागले लबालब बटाटे…

निसर्गाचे चमत्कार भन्नाट असतात. कधी काय होणार हे कुणालाच ठाऊक नसते. अशीच एक बातमी समोर आली आहे. बटाटा हे जमिनीच्या खाली येणारं पीक आहे. (It will be surprising to hear! In this place in Pune, potatoes grew not in the ground but on trees)

आता तुम्ही म्हणाल यात काय विशेष आहे. बटाटा हे तर कंदमुळ म्हणूनच त्याची ओळख आहे. कारण ते जमिनीखाली च उगवतं . पण हिच बटाटे जेव्हा जमिनीच्या वर झाडाला अली तर.

आश्चर्य वाटलं ना.. पण हे अगदी खरं आहे. पुणे जिल्ह्यातच आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर या गावामध्ये चक्क झाडाला बटाटे लागले आहेत. युवा शेतकरी संदीप आणि धनेश पांडुरंग वळसे पाटील यांच्या शेतात असणाऱ्या झाडाला चक्क १८ ते १९ बटाटे लगडले आहेत.

आंबेगाव तालुक्यात बटाटा पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. बाजारभावही बटाट्याला चांगला मिळतो. या भागात अनेक ठिकाणी बटाटे काढणीला आले आहेत.

जमिनीत बटाटे येतात तसेच हे बटाटे जमिनीच्या वर आले आहेत. थंडीमुळे जमिनी खालचा बटाटा हिरवा पडतो त्याच प्रमाणे हा बटाटा देखील हिरवा पडला आहे.

बटाटे झाडाला लगडलेले दिसल्याने परिसरात हा कुतूहलाचा विषय होत असून लोकं त्याला बघायला गर्दी करत आहेत. आंबेगाव तालुक्यातीमधील निरगुडसर येथे माळरानावर वळसे पाटील यांची शेती आहे.

साडेतीन एकरमध्ये त्यांनी बटाट्याची लागवड केली असून . बटाटा पीक काढणीला आलेला आहे . अंतिम टप्प्यातील पाला काढण्याचे काम सुरू आहे.

या पाल्याची कापणी करत असताना वळसे पाटील यांना त्यांच्या पिकातील एका झाडाला चक्क बटाटे आलेले दिसले. हे बटाटे त्यांनी पाहिल्यानंतर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला.

कारण एवढे दिवस बटाटे लागवड करत असतांना आतापर्यंत असे काही बघायला त्यांना मिळालेलं नाही. मात्र यावर्षी बटाटा चक्क झाडाला लगडलेले असल्याने त्यांना आश्चर्य वाटले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button