कोणत्याही वादात ‘कन्नड रक्षण वेदिके संघटना’ चर्चेत का असते? असा आहे संघटनेचा इतिहास…
बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या महाराष्ट्र- कर्नाटक सीमावादाने पुन्हा एकदा डोकं वर काढलय, दिवसेंदिवस हा सीमावाद चिघळतच चालला आहे. या सर्व वादात एक संघटना आक्रमक भूमिका घेत आहे. (Why is ‘Kannada Rakshana Vedike Sangathan’ discussed in any controversy? Such is the history of the organization)
केवळ हाच वाद नाही तर कोणताही वाद का नसो ही संघटना कायम आक्रमक असते आणि ही संघटना आहे ‘कन्नड रक्षण वेदिके’ संघटना. या संघटनेचा इतिहास काय? आणि ही संघटना नेहमी चर्चेत का असते? हेच आपण जाणून घेऊयात. नुकतंच या आंदोलनाचे हिंसक वळण पाहायला मिळाले.
ज्यात बेळगाव येथील हिरे बागेवाडी टोल नाक्याजवळ महाराष्ट्राच्या ट्रकवर दगडफेक आणि शाईफेक करण्यात आली. दगड फेक करणारी लोक होती कन्नड रक्षण वेदिके संघटनेची. आता हा वाद आक्रमक होत असल्याचे दिसून येताच राज्यातील अनेक नेतेमंडळी देखील यावर व्यक्त होतांना दिसत आहे.
आता महाराष्ट्र आणि कर्नाटक प्रश्नांवर कन्नड रक्षण वेदिके संघटनेचं नावचं का चर्चेत येत. तर महाराष्ट्राने आपला दावा ठोकलेल्या बेळगावचा मुद्दा असो किंवा पाणीप्रश्न असो कायम ही संघटना आक्रमक भूमिका घेत आली आहे. या संघटनेला अगदी उभं आणि मोठं करणार नाव आहे कन्नड लेखक आणि पत्रकार जनागेरे वेंकटरामय्या.
हि संघटना इतकी मोठी आहे कि महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, तामिळनाडू इतकेच काय तर संयुक्त अरब अमिरात, सिंगापूर, अमेरिका आणि ब्रिटन सारख्या देशात सुद्धा या संघटनेच्या शाखा आहेत. संघटनेच्या वेबसाईटनुसार, कन्नड भाषेची अस्मिता जोपासणे, भूमिपुत्रांना नोकरीत प्राधान्य मिळण्यासाठी प्रयत्न करणे.
कन्नड संस्कृतीचे संरक्षण, कन्नड भाषेची अस्मिता जोपासणं हे काम या संघटनेद्वारे केले जाते. कन्नड रक्षण वेदिकेची काही आंदोलनं तर बरीच गाजली होती, ज्यामुळे ही संस्था चर्चेचा विषय ठरली. यात २००५ साली जेव्हा महाराष्ट्रा एकीकरण समितीने बेळगाव पालिकेच्या माध्यमातून महाराष्ट्र विलीन होण्याचा ठराव मंजूर केला होता.
त्यावेळी या संघटनेतील लोकांनी महापौर विजय मोरे यांच्या चेहऱ्याला चक्क काळ फासलं होत. २००७ साली कावेरी पाणी वाटपाबाबत घेण्यात आलेला लवादचा निर्णय अन्यायकारी असल्याचं सांगत या संघटनेनं कर्नाटक बंद ची हाक दिली, ज्याला चांगलाच प्रतिसाद मिळाला.
त्यांनंतर या संघटनेनं २००७ साली २ लाख सदस्यांना घेऊन काढलेला मोर्चा देखील चर्चेचा विषय ठरला होता. यासोबतच कर्नाटक येथील थिएटरमध्ये तामिळ चित्रपटांचा विरोध, तामिळ वाहिन्यांच्या प्रक्षेपणावर बंदी असे अनेक आंदोलन कन्नड रक्षण वेदिके संघटनेद्वारे करण्यात आले, आणि जे आजही सुरूच असतात.
आता आंदोलन तर बऱ्याच संघटना करतात, मात्र या संघटनेच्या आंदोलनाची पद्धत आणि आक्रमकतेमुळेच कन्नड रक्षण वेदिके संघटना जास्त चर्चेचा विषय ठरत आहे. अगदी सुरुवातीच्या काळात काही मुद्द्यांना घेऊन जशी शिवसेना आपली भूमिका मांडायची अगदी त्याच पद्धतीची भूमिका कन्नड रक्षण वेदिके या संघटनेद्वारे मांडली जात आहे.
मात्र नुकतच डोकं वर काढलेल्या बेळगावच्या मुद्द्यात या संघटनेद्वारे अतिशयोक्ती दिसून येत आहे. केवळ दगड फेकच नव्हे तर याआधी सुद्धा या संघटनेनं महाराष्ट्रातील सीमा समन्वय मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांच्या बेळगाव दौऱ्याचा विरोध केला होता आणि यावर आंदोलनही झाली ज्यामुळे हा दौरा रद्द केला गेला.
गेल्या अनेक वर्षांपासून या संघटनेचा महारष्ट्रासोबत केला जाणारा व्यवहार हा अगदी चुकीचा मानला जातोय, कारण या आक्रमक भूमिकेतून ही संघटना महाराष्ट्राला केवळ न केवळ डिवचण्याचाच प्रयत्न करत आहे हेच खरंय’