अचानक गाडीत शिरली सिंहीण, अन् पुढं जे झालं ते पाहून तुम्हालाही बसेल धक्का…
अनेक प्राणी प्रेमी मोकळ्या वेळेमध्ये जंगल सफारी करण्याकरिता जात असतात. या वेळेत वेगवेगळ्या प्राण्यांना जवळून पाहता यावे, त्यांचे निरीक्षण करता यावे ही प्रत्येकाचीच इच्छा असते. (Suddenly a lioness entered the car and what happened next will shock you too…)
त्यातही वाघ, सिंह असे प्राणी लांबून दिसले तरी भीती वाटत असते. अशावेळी जर अचानक तुमच्या गाडीमध्ये असा एखादा प्राणी शिरला तर? या कल्पनेनेही भीती वाटते. सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये असेच घडले आहे, पण त्यामध्ये एक ट्विस्ट आहे.
सध्या व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये काहीजण एका गाडीतून जंगल सफारीसाठी निघाले असल्याचे दिसत आहे. पण त्याचवेळी लांबून त्यांना एक सिंहीण गाडीजवळ येताना दिसते. इतकेच नाही तर ही वाघीण चक्क त्या गाडीत शिरते.
पण त्या व्यक्तींना कुठली इजा न करता, ती त्यांना लळा लावत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून कोणालाही आश्चर्याचा धक्का बसेल.
व्हायरल होणारा हा व्हिडीओ ५५ लाखांहून अधिक लोकांनी बघितला आहे. व्हिडीओ मध्ये वाघीण पाळीव असल्याचे दिसून येत आहे. कारण ती पाळीव प्राण्यांसारखीच गाडीतल्या लोकांना लळा लावतांना दिसून येत आहे.
नेटकऱ्यांनी आश्चर्यजनक प्रतिक्रिया दिलेल्या आहे.