ताज्या बातम्याट्रेंडिंग

योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली औषधांवर बंदी, जाणून घ्या यामागील नेमकं कारण…

योग विद्येचे गुरु अशी ओळख असणारे बाबा रामदेव यांचा पतंजली ग्रुप सौंदर्य प्रसाधन, औषधांचे उत्पादन अशा सर्व गोष्टींचे उत्पादन करत. आता बाबा रामदेव यांच्या पतंजली ग्रुपला मोठा धक्का बसला आहे. पतंजली ग्रुपच्या पाच औषधांचे उत्पादन बंद करण्याचे आदेश उत्तराखंड येथील आयुर्वेद व युनानी परवाना प्राधिकरणाकडून देण्यात आले आहेत. काय आहे हे प्रकरण? पतंजलीच्या कोणत्या पाच औषधींवर बंदी घालण्यात आली आहे? याबद्दलच थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. (Yoguru Baba Ramdev’s Patanjali medicines banned, know the real reason…)

उत्तराखंड सरकारने ज्या औषधांवर बंदी घातली आहे, या औषधी दिव्या फार्मसी द्वारे उत्पादित केल्या जातात. उत्तराखंड येथील आयुर्वेद आणि युनानी परवाना प्राधिकरणाच्या मते, पतंजलीच्या या औषधींची जाहिरात दिशाभूल करणारी आहे. यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया समोर आली असून, अशी कुठलीही प्रत आतापर्यंत मिळाली नसल्याचे आणि हे सर्व आयुर्वेद विरोधी औषध माफियांचे कारस्थान असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

प्राधिकरणाने पतंजलीच्या दिव्या फार्मसीद्वारे उत्पादित होणाऱ्या मधुग्रीट, बीपीग्रीट, थायरोग्रीट, आयग्रीट, लिपडोम टॅबलेट आणि गोल्ड टॅबलेट अशा पाच औषधांवर बंदी घातली आहे. हि सर्व औषध मधुमेह, ग्लुकोमा, रक्तदाव, आणि हाय कोलेस्ट्रॉल सारख्या समस्यांचे निदान असल्याच्या जाहिराती करण्यात येत होत्या.

या जाहिराती म्हणजे सामान्य नागरिकांची दिशाभूल असल्याचे आयुर्वेद व युनानी प्राधिकरणाकडून सांगण्यात आले होते.
आता अचानक ही कारवाई का करण्यात आली? तर केरळ येथे वास्तव्यास असणाऱ्या नेत्रचिकित्सक केव्ही बाबू यांनी याच वर्षी जुलै महिन्यात या औषधींविरोधात तक्रार दाखल केली आणि याच अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली.

यात पतंजली उत्पादक दिव्या फार्मसीच्या वतीने ड्रग्स अँड मॅजिक रेमेडीस कायदा १९५४, ड्रग्स अँड कॉस्मेटिक नियम १९४५ आणि ड्रग्स अँड कॉस्मेटिक अक्टस १९४० यांचे उल्लंघन केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

उत्तराखंड आयुर्वेदिक आणि युनानी सेवांचे परवाना अधिकारी डॉ. जीसीएस जंगपांगी यांनी बंदीचा आदेश जारी केला, व यात उल्लंघन केलेल्या नियमांची यादी सांगण्यात आली.

या सर्व औषधांच्या उत्पादनासाठी दिव्या फार्मसीला पुन्हा रीतसर परवानगी घेणे आवश्यक असल्याचे देखील बजावण्यात आले आहे. आता या प्रकरणात योग गुरु बाबा रामदेव काय भूमिका घेतील व त्यांचं पुढचं पाऊल काय असेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button