सलमानच्या बिग बॉसमध्ये ८० हजाराचे शूज घालण्याचा दावा करणारा एमसी स्टॅन आहे तरी कोण?
२३ वर्षीय हिंदी रॅपर एमसी स्टॅन सध्या खूप चर्चेत आहे. त्याने अगदी लहान पातळीपासून सुरुवात केली आणि आज भारतात तो खूप लोकप्रिय आहे. एमसी स्टॅनने बिग बॉस १६च्या घरात प्रवेश केला आहे. (Who is MC Stan who claims to wear Rs 80k shoes in Salman’s Big Boss?)
यापूर्वीही एमसी स्टॅन कुठल्या न कुठल्या गोष्टींमुळे चर्चेत असतो. इतक्या कमी वयात त्याने इतकं सगळं कस मिळवलं असेल? आणि अशा कोणत्या गोष्टींमुळे तो चर्चेचा विषय ठरतो? चला तर मग आज यामध्ये एमसी स्टॅन याच्याशी संबंधित अश्याच काही मनोरंजक गोष्टींबद्दल जाणून घेऊयात.
एमसी स्टॅनचे खरे नाव अल्ताफ शेख आहे. मूळचा तो पुण्याचा असून वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी त्याने कव्वाली गाण्यास सुरुवात केली. अभ्यासाऐवजी त्याचे लक्ष गाण्यावर आणि रॅपवर होते. गाण्याव्यतिरिक्त तो बीट बॉक्सिंग सुद्धा करत होता. स्टॅनने त्याच्या ‘समझ मेरी बातो को’ या रॅप गण्यामधनं रॅपर डिव्हाईन आणि एमिवेला रोस्ट केले होते.
यानंतर त्याने अस्तगफिरुल्लाह हे गाणे रिलीज केले. यामध्ये त्यानी त्याच्या संघर्षाची कहाणी सांगितली. त्यांनतर वट्टा या गाण्यावरून स्टॅनला ओळख मिळाली. या गाण्याला २१ मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले. एमसी स्टॅनने सांगितले की, गेल्या दोन-तीन वर्षांतच त्याने भरघोस पैसे कमावले.
एमसी स्टॅनची एकूण संपत्ती १ करोड ते २ करोड रुपये आहे. यूट्यूब व्यतिरिक्त तो लाइव्ह कॉन्सर्टच्या माध्यमातून देखील पैसे कमावतो. वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलताना एमसी स्टॅनने सांगितले की, तो अनम शेखला डेट करत आहे. बिग बॉस १६ च्या घरातील नामांकित स्पर्धकांमध्ये, रॅपर एम.सी. स्टॅन देखील आहे.
एमसी स्टॅन अतिशय साध्या कुटुंबातील असून, त्याचं कुटुंब एका चाळीत राहत होतं आणि रॅपिंगसाठी सगळेच त्याच्या विरोधात होते. जेव्हा रॅपर एमसी स्टॅन कुटुंबामध्ये स्वतःच्या करियर बद्दल बोलला तेव्हा सर्वांनी त्याला नकार दिला. पण तरी देखील त्याने आपले स्वप्न सोडले नाही.
एमसी स्टॅनने कठोर परिश्रम केले आणि आज त्याची सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खूप लोकप्रियता आहे. लाखो लोक त्याचे चाहते आहेत जे त्याला युट्यूब वर देखील फॉलो करतात. बिग बॉस १६ च्या भव्य प्रीमियरमध्ये सलमान खान म्हणाला की एमसी स्टॅनच्या प्रवासाचा मला अभिमान आहे.
बिग बॉस १६ मध्ये त्याने शोच्या भव्य प्रीमियरमध्ये, खुलासा केला की त्याच्याकडे ८०,००० रुपये किमतीचे शूज आहेत. याशिवाय प्रीमियरमध्ये त्यावर हिंदी लिहिलेला नेकपीस सुद्धा घातलेला होता. ज्याची किंमत सुमारे डिड करोड रुपये इतकी आहे.
बॉग बॉस मधील स्पर्धक अंकित गुप्ता आणि प्रियंका चहर यांच्याशी झालेल्या संभाषणात एमसी स्टॅनने त्याच्या लव्ह लाईफबद्दल सांगितले.
त्याने उघड केले की त्याची आणि अजमाची प्रेमकथा कशी सुरू झाली. प्रियंकाने एमसी स्टॅनला अजमाच्या आई-वडिलांना त्यांच्या प्रेमाविषयी माहिती आहे का, असे विचारले असता. एमसी स्टॅनने सांगितले की, तिचे पालक या नात्याबद्दल खुश नव्हते. त्यानंतर मी लग्नाच्या मागणी साठी ४०-५० लोकांसह तिच्या घरी गेलो.
मी तिच्या आई-वडिलांना सांगितले की एकतर हे नाते सन्मानाने स्वीकारा, नाहीतर मी तिला पळून घेऊन जाईन. तो पुढे म्हणाला, गोष्टी खूप वाईट झाल्या होत्या पण नंतर सर्व काही ठीक झाले. अशी होती रॅपर एमसी स्टॅन ची कहाणी.