ताज्या बातम्याट्रेंडिंग

बॉलिवूड कलाकार कास्टिंग काउचच्या जाळ्यात कसे अडकतात, कास्टिंग काउच कशाला म्हणतात?

अख्खे जग, बॉलिवूड आणि त्यामागची झगमगती दुनिया, अश्या बॉलिवूडचे आकर्षण नाही असे फार कमी लोक आढळतील. प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते की आपल्याला एकदा तरी बॉलिवूडमध्ये काम करायचे आहे. (How Bollywood actors fall into the trap of Casting Couch, What is Casting Couch called?)

भारतामधनं लाखो कलाकार आपले स्वप्न घेऊन या बॉलिवूडमध्ये येत असतात. मात्र फार कमी कलाकारांना ती संधी मिळते. बॉलिवूडमध्ये सहजासहजी संधी कधीच मिळू शकत नाही. त्यातच कास्टिंग काऊच हा प्रकार सध्या फार चर्चे मध्ये आला आहे.

तसा हा प्रकार फार जुना असला, तरी देखील काही वर्षात तो चर्चेमध्ये आला आहे. आता कास्टिंग काऊचं म्हणजे नेमकं काय? आणि कलाकार कास्टिंग काऊचंच्या जाळ्यात कसे अडकतात? हेच आपण आज या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

आपण जे चित्रपट बघतो, त्यात काम करत असणारे कलाकार कुठून आले असतील? किंवा त्यांना काम कसे मिळाले असेल? हा प्रश्न तर आपल्या सर्वानाच पडतो. कास्टिंग डायरेक्टरच्या मदतीने दिग्दर्शक कलाकारांना निवडत असतो.

आता कास्टिंग काऊचची व्याख्या करायची झाल्यास, एखाद्या संस्थेतील व्यवसाय किंवा करिअरमध्ये प्रवेश करण्यासाठी उमेदवार किंवा कनिष्ठांकडून लैंगिक संबंधांची मागणी करण्याचा अनैतिक आणि बेकायदेशीरपणा, याबदल्यात त्याला चित्रपटात भूमिका देणे म्हणजे कास्टिंग काउच.

ही गोष्ट अमेरिकेमध्ये बेकायदेशीर मानली जाते. मात्र आपल्याकडे याचे अनेक कलाकार बळी पडले आहेत. कास्टिंग काउच या शब्दाचा उगम मोशन पिक्चर इंडस्ट्रीमध्येच झाला. काऊचं म्हणजे सोफा. याचा अर्थ दिग्दर्शक आणि निर्मात्यांच्या कार्यालयात असणारा काऊचं, जिथे इच्छुक कलाकारांच्या मुलाखती घेतल्या जातात.

हा शब्द बऱ्याचदा मनोरंजनाव्यतिरिक्त इतर उद्योगांमध्ये देखील वापरला जातो. पुरुष कास्टिंग डायरेक्टर, अथवा चित्रपट निर्माते…. अभिनेत्रींकडून शरीर सुखाच्या मागणीकरिता कास्टिंग काउचचा वापर करत असतात. हा प्रकार चित्रपटसृष्टीत फार पूर्वीपासून सुरु आहे.

मात्र या विरोधामध्ये अभिनेत्रींनी वेळोवेळी आवाज उठवला आहे. स्त्रीवाद आणि महिला सबलीकरण हे सर्वाधिक चर्चेचे विषय बनल्यामुळे, बॉलिवूड चित्रपट उद्योगातील अभिनेत्री समस्यांबद्दल अधिक स्पष्टपणे बोलू लागल्या आहेत. केवळ बॉलिवूडचं नाही तर हॉलिवूड मध्ये सुद्धा या विरोधात आवाज उठवण्यात आला आहे.

हार्वे वेनस्टाईन घोटाळा जेव्हा बाहेर आला, तेव्हा अनेक अभिनेत्रींनी यावर आवाज उठवला होता. चार्लीझ थेरॉन, थँडी न्यूटन, रीझ विदरस्पून, जेनिफर लॉरेन्स या अभिनेत्रींनी आपल्याबरोबर घडलेल्या कास्टिंग काऊच बद्दल आपल्या प्रतिक्रिया सुद्धा दिल्या.

बॉलिवूडमध्ये आज काही प्रतिष्ठित कास्टिंग करणाऱ्या संस्था देखील आहेत. यात मुकेश छाब्रा यांची संस्था खूप प्रसिद्ध आहे.
अनेक प्रसिद्ध परंतु जे पडद्यापुढे आले नाहीत, अशा कलाकरांना याचा सामना करावा लागला आहे.

केवळ अभिनेत्रीच नाही तर अभिनेत्यांना सुद्धा याचा सामना करावा लागला आहे. टीव्ही अभिनेता परम सिंगने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते की “एका कास्टिंग डायरेक्टरने त्याच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होता.

अभिनेता रणवीर सिंग देखील आज बॉलिवूडमध्ये आघाडीचा अभिनेता आहे, पण त्यानेदेखील त्याचा अनुभव सांगितला आहे. तो म्हणाला “बॉलिवूडमध्ये हे सामान्य आहे. मी देखील याचा सामना केला आहे”.

बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये कंगना रनौत, नीना गुप्ता, मल्लिका शेरावत, सुरवीन चावला, राधिका आपटे, चित्रांगदा सेन, मौशमी उदेशी, प्रीती जैन यांसारख्या प्रसिद्ध अभिनेत्रींना सुद्धा याचा सामना करावा लागला आहे. काही अभिनेत्रींनी आपल्याला बरोबर घडलेला प्रकार उघड्पणे व्यक्त केला आहे.

मात्र काही अभिनेत्री अशाही आहेत ज्यांच्याबरोबर हा प्रकार घडला असूनसुद्धा त्या व्यक्त झाल्या नाहीत किंवा या आमिषाला बळी पडून देखील त्यांना काम मिळाले नाही.

बॉलिवूडमध्ये मध्यंतरी मी टू मुव्हमेंट मोठ्या प्रमाणात चालली, आणि यात अनेक अभिनेत्रींनीं आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगत, मोठमोठ्या व्यक्तींवर आरोप केलेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button