आईच्या अफेअरची ‘ती’ क्लिप लागली मुलींच्या हाती, पहा हे नेमकं प्रकरण काय…
प्रेम आंधळं असत आणि प्रेमाला कुठली हि सीमा नसते हे तर तुम्ही नक्कीच ऐकले असेल. प्रेमा पोटी कुणी कुठलहि पाऊल उचलू शकते हे सुद्धा तुम्हाला नक्कीच माहिती असेल. अश्याच एका आंधळ्या प्रेमाचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. चक्क पत्नीने आपल्या प्रेमासाठी आपल्याच पतीचा खून केला. आणि एका कॉल रेकॉर्डिंग मुळे हे उघडीस आले. (That clip of mother’s case got in the hands of girls, see what is the real case)
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी शहरातील हि घटना आहे. वनविभागामधून लिपिक म्हणून काम करणारे ६६ वर्षीय श्याम रामटेके हे सेवेमधून निवृत्त झाले होते. त्यांची ५० वर्षीय पत्नी रंजना रामटेके तिथेच एक दुकान चालवत होत्या.
त्यांना दोन्ही मुली आहेत त्या दोघीही नागपूरात राहतात. अचानक एकदा रंजना यांनी त्यांच्या दोन्ही मुलीला फोन केला. वडील हृदय विकाराच्या झटक्याने गेल्याच सांगितलं,आणि त्यांना घरी बोलावून घेतलं. अंत्य विधी पार पडला.
त्यानंतर लहान मुलगी आई एकटीच घरी आहे म्हणून आईकडे ब्रम्हपुरीला राहायला आली. मुलीनी काही महिन्यापूर्वी आईला एक स्मार्टफोन दिला होता. बाबा गेल्यानंतर त्यांनी तिच्याकडून तो मोबाईल घेतला.
लहान मुलीने त्या मोबाईल मधील ती कॉल रेकॉर्डिंग ऐकली आणि ती हादरली. त्या कॉल रेकॉर्डिंग मध्ये रंजना आणि तीचा प्रियकर मुकेश त्रिवेदीचे खून झाल्यांनतरचे संभाषण होते. यावरून मुलींनी आई रंजना रामटेके आणि तिच्या प्रियकराला तुरुंगात पाठवले.